भामा

.
https://lh3.googleusercontent.com/8NdF4Y_0eQut_UROXH72b16U2VPUVjGKD1bXgbduzJpI4XkNoOelvZ1ucWk27HGBOyrTKIRC_ECryl9OBTuJ4XCnyofgvrP25mAm5XzgsNBYwBBAK-PkRPL5VT9Z4f7NxGIW5e-7lPjl2u9DrLtXg3aWfit8un6mJ2xMNrNs8zG4je7JheFfSAaghUEPSG6Mh9Mpi7zGYQiJhdYQTGVEvVJxxRfUnlTHXUcHcsEGGOwAdWaVmyWpJeQHxYoi29UBal-w68As5pozSHbDW6oHbkYRZPjjOKhAxQ1CyOYlHW1GirA4KadGoF8yOHv42pQweJP2Kyf9du3lnUPcbyN-ZozfPMuS4m1E8-M4TBOVdMxElpY4Jwy9nbez8jPwrvy085n71nJvmc6m24pepZ9w88bzIFqZfppfoS1Kl9YdJQJgQu3355D8HNHQwLa3eqz2XObX95XK3I3zKhq26tpLC2Lr_MPKayADmq1IPCSt6nivd5NeUSeQUVLtX8CNcvq_7QjqfLof6OhSq7yI6Bwlxg544_aHDO7xGyUlLEKnRbQx0tEVLOKweQ19o73gMnVEAjVvK_HZ95RHefdhtVkn81gbY9FuziyYyKlh0iCthotxmImsh94H9g=w610-h640-no
आज व्हेलेंटाईन डे निमित्त आलेला धागा पाहिला आणि एखादी विनोदी कथा विशेषतः: श्रीकृष्ण, भामा आणि रुक्मिणी यांच्यावर बेतलेली लिहिण्याची खूप सुरसुरी. ऊर्मी दाटून आली. पण प्रत्येक कथासूत्रात रुक्मिणीचा भाव खात राहिली, रुक्मिणीच भामेला प्रवचन झोडत राहिली. आणि भामा बिचारी असूया, मत्सर सगळं नाट्य घडवूनही उपेक्षित नायिकाच राहिली. एट्टो नॉय चॉलबे. असे ना का तुमची रुक्मिणी सद्गुणांची पुतळी,असेनाका भक्तीमधील साक्षात लीनता, हरीला ती प्रिया असेनाका पण आमच्य हट्टी भामेवरचा अन्याय आम्हाला सहन होणारच नाही. नाही काय चुकीचं आहे मत्सरात, काय चूक आहे सांगा असूयेत. अजिबात काहीही नाही. आपल्या प्रियकरावरती हक्क गाजवावासा वाटणे यात अपराधी वाटून घ्यायचं तसं मुद्दाम भामेला वाटवून देण्याचं कारणच नाही ना मुळी. असूया कधी वाटते असूयेमागचे मानसशास्त्र काय ते तरी घ्या जाणून. अतिशय प्रेमापोटीचच फक्त असूया उद्भवते. राधा काय रुक्मिणी, सत्यभामा काय प्रेमाच्या विविध जातकुळीच आहेत त्या.राधे मध्ये प्रेमाची फलश्रुती असेल तर रुक्मिणीच्या लीनता आहे, सत्यभामेच्या Longing आहे. प्रेम मिळाल्यानंतर ते हरवू नये याचा मनस्वी आणि करुण प्रयत्न आहे, ते हरवलं तर .... या "तर" चे जाळणारे दु:ख आहे. ज्यांचा शुक्र जलराशीत असेल त्यांचा या दु:खालच्या जातकुळीशी परिचय असेल आणि वृश्चिक राशीतील शुक्र वाले जातक तर त्या वेदनेशी अगदी जवळून, निकटचे परिचित असतील. प्रेम मिळणं ही जरा लॉटरी असेल तर ते चिरंतन टिकणे हा जॅकपॉटच म्हणा की, अगदी पॉवरबॉल. खरं तर वृश्चिक शुक्र लोक प्रेमात पाडण्याचे टाळतात ते याच कारणामुळे की नंतर दु:ख नको. पण असे ठरवून जसे प्रेमात पडता येत नाही तसे टाळू म्हटल्याने टळताही नाही.कोणीतरी प्रसिद्ध शायर (गालिब बहुदा) म्हणूनच गेलाय ना की - ये वोह आग है जो लगाये ना लगे और बुझाए ना बने " असो.
.
तर सांगायचा मुद्दा हा आहे की कथा तर लिहिली आहे की भामेला श्रीहरींची व्हेलेंटाईन डेट तर मिळाली, सिनेमा, शॉपिंग, हॉटेल,बाग, चॉकलेटस, फुले सग्गळं सग्गळं मनसोक्त झालं अगदी रात्रीचा चांदण्यातील नौकाविहारही. पण झालं काय तिच्या या सर्व सुखावरती एका क्षणात पाणी पडलं. कारण एकच झोपेत श्रीहरींच्या ओठावरती रुक्मिणीचं नाव आलं. ही कथा लिहून तयार आहे पण प्रकाशित करवत नाही. कारण एकच सत्यभामा आमची अतिशय लाडकी आहे. अगदी तिच्या हट्ट, असूयेसकट नव्हे त्यामुळेच. तिच्या अधिकार गाजविण्याच्या fiery, naive स्वभावामुळेच. खरं तर कोण्या कवीने स्वतः:ची प्रतिभा डिस्प्ले करण्याकरता उगाच ते पारिजातकाचे कुभांड रचले आहे. अशी फुले पडतात काय शेजारील दारी? इतकं वाकडं झाड पाहिलंय कोणी? का वारा पाहिलाय जो सतत एकाच दिशेने वाहणारा.
.
ते काही नाही. एक अशी कथा लिहिणारे ज्यात सत्यभामा वरचढ ठरेल. आणि तशी लिहीली की मगच प्रकाशित करेन.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ज्यात सत्यभामा वरचढ ठरेल.

परत भामा वरचढ ठरणार म्हणजे कृष्णाचे लक्ष तिला मिळणार. अरेरे पुरुषकेंद्रित या जुनाट विचारसरणीतून तुम्ही बाहेर कधी पडणार मामी? जरा बेख्डेल टेस्ट वगैरे वाचत चला क्काय?
<हा प्रतिसाद माझ्या ड्यु आय डी ने दिला आहे असे समजा> किंव <मल्टिपल पर्सनॅलिटी समजा> किंवा <मिथुन लग्नाच्या जुळ्या बालकांपैकी दुसर्‍या बालकाने दिलेला समजा>
.
पण परत माझाच धागा वाचताना आता हेच मनात येतय त्याला उपाय नाही.
.
तसं स्वतःचे सुमार धागे वाचायचं धाडस मी करतच नाही. पण हा धागा नवीन असल्याने ..... Wink असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0