पुणे-मुंबई-पुणे - एक पुनर्नवानुभव

फारा वर्षांपूर्वी आम्ही मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. ३ तासांच्या डेक्कन क्वीन प्रवासासाठी, दोन तास रिझर्व्हेशनच्या रांगेत उभे रहाण्याचाही आम्ही विक्रम नोंदवला आहे. त्या रिझर्व्हेशन केलेल्या डब्यांत तीन्-दोन अशी बसण्याची व्यवस्था असल्याने , आम्ही सेकंड क्लासमधेही , अगदी मांडी घालून प्रवास केलेला आहे. पुढे, रेल्वेला भिकेचे डोहाळे लागल्याने, त्यांनी आमचा विश्वासघात करुन तीन्-तीन अशी बसण्याची व्यवस्था आणली. त्याचा आम्ही भरपूर निषेध केला. कारण तोपर्यंत आमची बुडे भरपूर रुंदावल्यामुळे, आमची, अंगाला अंग लागू न देण्याची ब्रिटिश सभ्यता धोक्यांत आली. पण तरीही, वरच्या वर्गाचे तिकीट काढण्याला आमचे मध्यमवर्गीय मन साथ देत नव्हते. त्यामुळे, आमचा अंग चोरुन प्रवास काही दिवस चालूच राहिला. पण एके दिवशी तो घोर प्रसंग उदभवला. पुण्याहून मुंबईला जाताना, आमचे तिकीट मध्यभागी आले. दोन्ही बाजूल दोन पुणेरी ललना आल्या. दोघींनाही, मला स्वतःला कडेला बसू द्या, अशी विनंती करुन पाहिली. पण दोघींनीही ती साफ धुडकावून लावली. खिडकीवालीला खिडकी सोडायची नव्हती आणि कडेचीला आपले स्वातंत्र्य गमावायचे नसावे. त्यामुळे, अगदी दादर येईपर्यंत, अंगाची घडी घालून बसावे लागले. चुकून डुलकी लागून जरासा स्पर्श झाल्यावर नजरेचे अंगार झेलावे लागले. घरी आल्यावर दोन दिवस अंग दुखत होते. त्या अनुभवावरुन आम्ही रेल्वे सोडली आणि एशियाडची कास धरली. पुढे, एशियाडच्याही सर्व खिडक्या वाजू लागल्यावर, नवीन आलेल्या वोल्वो कडे मोर्चा वळवला. दोन्ही बाजूला, स्टॉप, घराच्या अगदी जवळ असल्याने, तो फार सुखकर प्रवास झाला. फक्त एक, ठणठणाटी सिनेमाचा त्रास होता. पण तोही, आम्ही कानांत 'इअर प्लग्स' घालून सोडवला. असा अनेक वर्षे हा सुखाचा प्रवास चालू राहिला असता. पण, वोल्वोचे भाव डोक्यावरुन जायची वेळ आली आणि पुण्याहून निघणारी वोल्वो, हिजवडीपर्यंतच एक तास घ्यायला लागली तेंव्हा रेल्वेचा पुनर्विचार करायची वेळ आली. रिटायर झाल्यामुळे आता हीपण प्रवासांत बरोबर येणार असल्याने, व्यस्त बुडांच्या मेजॉरिटीवर तिसर्‍याला चिणता येईल, असा धूर्त विचार केला. दोन्ही वेळेची तिकीटे नेटवर काढून ठेवली.

प्रवासाच्या दिवशी, रिक्शाची मक्तेदारी मोडण्यासाठी 'ओला' मागवली. अनेक वर्षांनंतर पुणे स्टेशनवर पाय ठेवायची वेळ आल्याने, गाडी कुठल्या फलाटावर लागते, हे सुद्धा विसरुन गेलो होतो. रेल्वे किती बदलली आहे, याचा अनुभव घ्यायचा होता. पण, सुटायच्या वेळेला पंचवीस मिनिटे राहिली असतानाही, गाडी फलाटावर नव्हती. गाडी लागल्यावर अपेक्षित डबा चांगला एक फर्लांग पुढे गेलेला बघून पुनर्प्रत्ययाचा प्रथमानंद झाला. त्यानंतर प्रवास सुरु झाल्यावर, गाडीच्या लोखंडी खिडक्या, अजूनही आपला 'शाहिस्तेखान' करतात, हे पाहून रेल्वे बदलली नसल्याचा द्वितीयानंद जाहला. त्यापाठोपाठ, आतली काचेची खिडकी बंद केल्यावर, अजूनही ती कडीला न जुमानता, बायकांच्या पोटिमा पोलक्यासारखी, वरवर जातच रहाते, हाही साक्षात्कार झाला. अशा तर्‍हेने आपली रेल्वे, अजूनही आपल्या जुन्या संवयी सोडत नाही याचा आनंद झाला. (पोटिमा शब्द विआ बुवा नामक लेखकांनी शोधला असून त्याचा पूर्ण उच्चार, 'पोटावर टिचकी मारा", असा आवाजच्या दिवाळी अंकात वाचल्याचे स्मरते.) शेवटी जुन्या परंपरेनुसार गाडी पंधरा मिनिटे उशीरा पोचली. दादर स्टेशन बाहेर, टॅक्सीज उभ्या होत्या पन त्यातले कोणीच अंधेरीला यायला तयार नव्हते. (पूर्वी तर, उडी मारुन यायचे). शेवटी स्टेशन परिसराच्या बाहेर एक नॉर्मल टॅक्सीवाला भेटला. परतीच्या प्रवासातही हेच सगळे अनुभव, उलट्या क्रमाने आले त्यामुळे त्याची द्विरुक्ती टाळतो.

दोन्ही वेळेला, रेल्वेच्या सुपीक डोक्याच्या संगणकामुळे, आमची तिकीटे वेगवेगळ्या बाकांवर आली. अर्थातच व्यस्त बुडे मायनॉरिटीत गेल्याने आम्हीच 'वाटीत पुरण" झालो. पुन्हा एकदा वोल्वोचे पाय धरणे आले!!!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

'बोटांचा शायिस्तेखान' आणि 'व्यस्त बुडांच्या मेजॉरिटीवर तिसर्‍याला चिणता येईल हा धूर्त विचार' खूपच आवडले. एकदम अनारकलीची आठवण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच की तिमाजीपंत.
आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पारावर बसून 'बभ्या' कीस्सा सांगतो ना, तसं लिखाण आहे हे. म्हणायला गेलं तर साधा अनुभव. पन बभ्या आसं काही झ्याक सांगतोय का मग म्या पन बसलू जरा आयकत!

आणि "...व्यस्त बुडांच्या मेजॉरिटीवर तिसर्‍याला चिणता येईल,"..." हे अगदी खास Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हाण्ण तेजायला, ते पोटिमा विशेष आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढे, एशियाडच्याही सर्व खिडक्या वाजू लागल्यावर : खल्लास! मानतो!
१९७४ ते १९८६ मी पण मुंबई पुणे रेल्वे प्रवास सातत्याने करायचो. आठवण झाली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मस्त मजेदार आहे. अनेक प्रवास आठवले.

मला अजूनही रेल्वेच जास्त इंटरेस्टिंग वाटते. पावसाळ्यात पुण्याला येताना सिंहगड मधे बदलापूर च्या पुढे दारात उभे राहायचे ते खंडाळ्यापर्यंत्.बोगद्यातील तो आवाज, वरून पडणारे पाणी, डावीकडे दिसणारे डोंगर व धबधबे. हायवे या सगळ्याला फटकून बाहेरून निघून जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्यटन धाग्यातल्या काय काय पाहिले, खाल्ले जंत्रीपेक्षा रंगतदार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळे हिशेब लिहिण्याची क्षमता आवडली. हे वाचून कळलं कि मी पण अस्सेच हिशेब मांडत असतो. प्रवासाप्रमाणे अन्य बाबतीत देखिल तुम्ही जे अनुभवले ते लिहा. मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मजेशीर लिहिले आहे.आवडले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिशेब करतात लोक म्हणूनच "प्रिमिअम टिकेट्स"वाली राजधानी,बुलेट ट्रेन,मेट्रो आहे.

रेल्वेच्या बाबतीत अजून एक चांगली गोष्ट - झडती घेतात एरपोर्टात तशी नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हलकंफुलकं छान लेखन. एखाद्या साध्या घटनेकडेही 'ही काय साली गंमत आहे' अशा नजरेने पाहिलं की त्यातून मस्त मजा येते. हा नजरिया लेखकाला बरोब्बर गवसलेला आहे. मी काय म्हणतो, एवढं लिहिलंत तर अजून लिहा की... 'आयुष्य - एक कटकटीचा प्रवास' किंवा 'प्रवास - आयुष्यातली एक कटकट' अशा मोठ्या लेखाचा हा छान भाग होऊन जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघा,
उत्तेजनाबद्दल धन्यावाद. प्रयत्न करतो. पण ते अचानक उचंबळून यावे लागते, तेंव्हाच एकटाकी बाहेर पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदारीकरणाला अडीच दशकं उलटून गेल्यावर, आता मध्यमवर्गीय विमानानुभव लिहिणंही क्रमप्राप्त आहे. त्यातही अमेरिका या समृद्ध देशातले विमानानुभवही तिरशिंगरावांच्या रेल्वेनुभवापेक्षा निराळे नसतात, हे लक्षात आल्यावर अगदी खासच. विमानांतही सलग तीन सिटा असतात; त्यात मधली सीट आली तर दोन्ही बाजूंना बारीक अंगकाठीच्या स्त्रिया असाव्यात अशी मी माझ्या नास्तिक देवांकडे सतत प्रार्थना करत राहते.

विमानात बसण्याबद्दल (अलिखित) समज असा की खिडकीतल्या माणसांना खिडकी, टोकाच्या सीटवरच्या माणसांना स्वातंत्र्य म्हणून मधल्या खुर्चीतल्या लोकांना दोन्ही आर्मरेस्ट मिळावेत. दोन पुरुषांच्या मध्ये बसायची वेळ आली तर मी आधी पुरुष स्त्रीवादी नसणार, म्हणजे परंपरा मानणारे, हुशार, समजूतदार वगैरे वगैरे लोक असणार अशी मनाची समजून घालते. पण माझ्या उदारमतवादी समजुती कशा चुकीच्या आणि बाईच कशी बाईला मदत करते, याचा प्रत्यय वारंवार येत राहतो.

हे पुरुष एक तर तरुण स्त्रियांकडे बघतात. बारकी मुलगी आहे, असं समजून दोन्ही तंगड्या दोन दिशांना फाकवून बसतात. पुरुषांना कोणीही रीतभात शिकवत नाहीतच, किमान क्रिकेटतरी शिकवा; पाय आणि बॅटची भक्कम तटबंदी बनवून त्यातून बारका बॉलही पलीकडे जाणार नाही याचं शिक्षण त्यांना दिलेलं असतं. मला खात्री आहे, टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून नाव कमावलेले पुरुष विमानात Mr Congeniality असा किताब नेहमी मिळवत असणार. या पाय पसरलेल्या पुरुषांची बहुदा स्पर्धा असावी, कोणाच्या पायांमधून सगळ्यात मोठी गाडी घालता येईल. पुरुष आणि मोठ्ठाल्या गाड्यांचं आकर्षण यांचा संबंध श्रीमंतीशी नसून, कोणाचे पाय जास्त फाकतात या स्पर्धेशीच असणार. आपण विमानात बसलो आहोत, विमान आपल्या पायांमधून जाणार नाहीये; हे समजलं तर पुरुषांवरही शहाणं असण्याचा आरोप झाला नसता का!

हे असले अस्ताव्यस्त पसरलेले पुरुष बघून, सगळ्या पुरुषांना विमानात सीटबेल्ट सोबत, तंग शॉर्टस्कर्ट घालण्याचीही सक्ती केली पाहिजे; अशी अनावर इच्छा होते. त्यातून 'माझे खांदे पाहा किती रुंद, बघा मी कसा सांड आहे', असं यांना दाखवायचं असतं का काय; छाती ताणून पायांसारखेच हातही पसरून बसतात. कायमचे हात पसरलेल्या जीजस क्राईस्टनं विमानातून कधीही प्रवास केला नव्हता; विमानच काय, कोणत्याही वाहनातून प्रवास केला नसेल. तो सगळीकडे चालत फिरायचा; विमानात बसून ख्रिस्त बनता येत नाही! मधल्या सीटवर बसूनही आर्मरेस्ट आपल्याला मिळत नाहीच, शिवाय माझ्या भागात यांचे हात यायला लागतात. तेव्हा तर मध्ययुगातली, हात कलम करण्याची शिक्षा काळाच्या किती पुढे होती या विचारांनी ऊर भरून येतो.

विशेषतः उन्हाळ्यात. जेव्हा बहुतेक लोकांनी अर्ध्या बाह्यांचे किंवा बिनबाह्यांचे शर्ट घातलेले असतात. उन्हाळ्याचा त्रास तेव्हा सुरू होतो. अस्वली पुरुषांचे केसाळ हात माझ्या हाताला लागायला लागतात. त्याकडे बघूनच, हातात रुमाल किंवा मोजा घालून, हे हात चिमटीत पकडून बाजूला टाकून देण्याची इच्छा होते. कधी तरी वॅक्स लावलेेल्या पट्ट्या विमानात न्यायच्या आहेत. अस्वलाचं माझ्या सीटवर अतिक्रमण झालं की त्या पट्ट्यांचा वापर करायचा आणि 'तुम्हालाच स्वच्छतेसाठी मदत करत होते हो' असं म्हणायचं, असा विचार मनात येतो.

विमान हवेत गेलं की झोपेचा प्रहर सुरू होतो. मग अस्ताव्यस्त, कसंही पसरण्याची अहमहिका सुरू होते. माणूस ऑक्टोपस नाही, माणसाला हात-पाय मिळून चारच गोष्टी असतात, याबद्दल अस्तित्वात नसलेल्या देवाचे आभार कसे मानू याबद्दल माझ्या मनात कालवाकालव सुरू होते.

लग्न झालेले किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असलेले पुरुष बरेच बरे वागतात. आपल्या हाता-पायांवर प्रेम असल्यासारखे हे पुरुष स्वतःचे हात-पाय स्वतःच्याच अंगाला चिकटून ठेवतात. नातं म्हणजे रेशमी धागा नसून जाडा दोरखंड असतो; हे वचन साक्षात पटतं, एवढं नाही त्याबद्दल आपुलकी वाटायला लागते. या बाप्यांचे हात-पाय अनोळखी स्त्रीच्या स्पेसमध्ये शिरकाव करत नाहीत. या पुरुषांची शिस्त बघून तुतेनखामेनला कापडात कसं गुंडाळलं असेल त्याची कल्पना येईल. एरवी विवाहसंस्थेला मी कितीही नावं ठेवली तरीही विमानातून प्रवास करण्याची वेळ आली की मी विवाहसंस्थेची भक्त बनते. मी लग्न करून एका पुरुषाला का होईना गुंडाळून ठेवलं, माझे अर्ध्या जगावर किती उपकार आहेत याचा अंदाज घेऊन मी कृतकृत्य होते. शेवटी बाईची काळजी बाईलाच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देव करो आणि तुम्हाला अधिकाधिक विमानप्रवास घडोत जेणेकरुन तुमचा देव आणि विवाहसंस्था या संकल्पनांवरचा विश्वास वाढीस लागो. Smile

बाकी या प्रतिसादाचा वेगळा लेख केला असता तर अधिक चांगले झाले असते. आता तुमच्या प्रतिसादावर चर्चा करायची की तिरशिंगरावांच्या लेखावर असा गहन प्रश्न पडलाय.

अतिअवांतर : ते नावाच्या खाली "कर्म" दिसत नाही आजकाल ! आम्ही नरकात गेलो की काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांच्या तंगड्या फाकवून बसण्याबद्दलचे, अदितीचे निरीक्षण अचूक. ते रेल्वेतही अनुभवायला मिळते. मला वाटतं, खांदे पाडून, पाय एकमेकांना घट्ट जुळवून आणि दोन्ही हात स्वतःच्याच मांड्यांवर ठेवणारे, जे अल्पसंख्य, पापभीरु पुरुष आहेत, त्यांतला मी एक. नाहीतर बाकीचे असे बसलेले असतात की वाटते, यांना विचारावे, 'तुम्हाला हार्निया वा हायड्रोसिल्स झाले आहे का ?' आणि मी मूळचाच पापभीरु हो! लग्नाआधीपासूनच मी शहाण्या मुलासारखा बसायचो. त्यामुळे बसमधे बाजूला मुली बसल्या तर माझ्याऐवजी त्यांनाच लॉटरी लागल्यासारखं वाटत असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुम्हाला हार्निया वा हायड्रोसिल्स झाले आहे का ?'

पाडाला पिकलाय आंबा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रेल्वे/विमान प्रवासात बय्राच गमतीदार ,त्रासदायक घटना घडतात त्या वाचायला फार आवडतात. प्रवाशांचे काहिही होवो वाचकांचे भले झालेच पाहिजे॥ माबोवरती 'ट्रेन स्पॅाटिंगच्या'नावाखाली एकजण ( नावात २६ डबे नाहीत हे एक बरय) फारच रटाळ लिहितो.
बाकी कडेच्या सीटवाल्याला बाजूच्या दोघांना वारंवार जाण्याची सवय नसेल तरच बराच निवांतपणा असतो.
रेल्वेच्या प्रवासात कडेची सीटअधिक अपर बर्थ मुद्दामहून घेतो. फारच स्वातंत्र्य असतं. पुस्तक वाचन रेल्वे प्रवासातच शक्य असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कहर भारी.. अधिक लिहीत जा तात्यानु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झकास आहे. (अलीकडे अतिवापराने सर्दाळलेले असले तरी) 'खुसखुशीत' हे विशेषण शोभून दिसावे असा. 'फाकडू' प्रतिक्रियाही खासच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0