बॉब डिलानच्या तीन कवितांचा अनुवाद

बॉब डिलानच्या तीन कविता
१-
For Times Are A-Changin’.

काळ बदल्तोय
या लोक हो, एकत्र या
कुठेही भटकत असा
तुमच्या सभोवारचे पाणी फुगत चालले आहे मान्य करा
आणि हे ही करा मान्य
की भिजून जाल लवकरच हाडापर्यंत.
आपला वेळ, आपले जगणे महत्त्वाचे वाटत असलेच
तर आता हातपाय मारून पोहायला सुरुवात करा
नाहीतर बुडाल एखाद्या दगडासारखे
कारण काळ बदल्तोय

या लेखकांनो, या समीक्षकांनो
आता भविष्य सांगा आपल्या लेखणीने
ठेवा डोळे टक्क उघडे
अशी संधी पुन्हा येणार नाही
पण फार लवकरही नकाच बोलू
कारण अजून चाकांची गरगर जोरात आहे
आणि अजून कळणार नाही
कोणाकडे रोख आहे
आताचा हरणारा कुणी
नंतरचा जेता असेल
कारण काळ बदल्तोय

या जनतेच्या प्रतिनिधींनो
ऐका पुढल्या हाका
दारे अडवून ठाकू नका
दालने तुंबून टाकू नका
जो अडवू पाहील
त्याचा घात होईल
बाहेर लढाई सुरू आहे
आणि भली तुंबळ आहे
थरकापतील लवकरच तुमच्याही खिडक्या
आणि हादरतील तुमच्या भिंती
कारण काळ बदल्तोय...

या बाप हो आणि या माउल्यांनो
साऱ्या प्रांतांतून या
आणि टीका करू नका
जे समजत नाही त्यावर गप्प रहा
तुमची पोरं आणि पोरी
आता तुमच्या ताब्यात नाहीत
तुमच्या जुन्या मळल्या वाटा
झिजून गेल्या पुरत्या आता
मदत करणार नसाल तर
नव्या वाटांवर अडथळेही आणू नका
कारण काळ बदल्तोय

आता सारं रेखलं गेलंय
शाप द्यायचा देऊन झालाय
आता संथ असेलही
नंतर वेग मिळणार आहे
जसा आताचा वर्तमान
नंतरचा इतिहास असणार आहे
आताचा जो अव्वल आहे
नंतर आखरी असणार आहे
कारण काळ बदल्तोय

२-
The Answer is Blowin’in the Wind.

किती रस्ते घालावे लागतील पालथे माणसाला
माणूस म्हणवून घेण्यासाठी?
त्या शुभ्र कबुतरीला किती सागर लागतील ओलांडावे
वाळूत विसावण्याआधी?
किती काळ धडधडत कोसळत राहतील तोफगोळे
कायमचे बंद होण्याआधी?
उत्तर घोंघावतंय वाऱ्यासवे, मित्रा, उत्तर घोंघावतंय वाऱ्यासवे.

किती वेळा माणसाने मान उंचावून वर दृष्टी फेकावी
म्हणजे दिसेल त्याला खुलं आकाश?
आणि एका माणसाला किती कान असावेत
लोकांचे आक्रंदन ऐकू येण्यासाठी?
आणि त्याला काही कळेतोवर किती होतील मृत्यू...
नको इतकी माणसं मेलीत हे त्याला कळण्यापूर्वी?
उत्तर घोंघावतंय वाऱ्यासवे, मित्रा, उत्तर घोंघावतंय वाऱ्यासवे.

किती वर्षे असतील एखाद्या पर्वताच्या अस्तित्वाची
तो समुद्रार्पण होण्यापर्यंत?
आणि किती वर्षे काही लोक असेच जगततगत राहतील
त्यांना मुक्तीदान मिळेपर्यंत?
आणि किती काळ मान फिरवत राहील माणूस
आपल्याला दिसतच नसल्याचं सोंग वठवत?
उत्तर घोंघावतंय वाऱ्यासवे, मित्रा, उत्तर घोंघावतंय वाऱ्यासवे.

३-
Hard Rains

कुठे गेला होतास माझ्या लाडक्या बाळा?
सांग कुठे होतास तू एवढा वेळ, बाळा?
बारा धुकटलेल्या पर्वतांच्या कडीखांद्यांवरून मी फिरत होतो
सहा कठोर राजमार्गांवरून चालत, रेंगत फिरलो मी
सात खिन्नरानांच्या मधून पावले टाकत राहिलो मी
सात निर्जीव निश्चेत सागरांच्या समोर उभा झालो मी
एका मसणवटीच्या मुखातून दहा हजार मैल चालत गेलो मी
आणि आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे

तू काय पाहिलंस बाळा, माझ्या लाडक्या बाळा?
सांग तू काय पाहिलंस तरी काय, बाळा?
मी पाहिले एक तान्हुले... घेरलेले हिंस्र लांडग्यांनी
मी पाहिला एक रत्नखचित राजमार्ग कुणीच पाऊल न ठेवलेला
मी पाहिली एक काळवंडलेली डहाळी... तीतून ठिबकत होतं रक्त सतत
मी पाहिली एक खोली माणसांनी गच्च- हातातले हातोडे त्यांच्या रक्तरंजित
मी पाहिली एक शुभ्र शिडी पाण्यात बुडून गेलेली
मी पाहिली दहाहजार माणसं बोलू पाहाणारी... जिभा छिन्न झालेली
मी पाहिल्या नंग्या तलवारी आणि बंदुका- हातांत लहान पोरांच्या
आणि आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे

आणि काय ऐकलंस, माझ्या लाडक्या बाळा?
कायकाय ऐकलंस, सांगशील ना बाळा?
मी ऐकली गर्जना एका वादळाची... ताकीद होती कशाची
मी ऐकली गर्जना एका लाटेची... जी बुडवून टाकू शकते साऱ्या जगाला
मी ऐकले ढोल शंभर ढोलवादकांचे... हात ज्यांचे होते तप्त आगीसारखे
मी ऐकले दशसहस्र लोक कुजबुजताना... आणि ऐकतच नव्हतं कुणी
मी ऐकला आवाज एका व्यक्तीच्या उपाशी पोटाचा... आणि खूप माणसे हसतानाचा
मी ऐकले एक गीत एका कवीचे... जो मरून गेला होता गटारात
मी ऐकला आवाज एका विदूषकाचा... जो गल्लीत छपून रडत होता
आणि आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे

कुणी भेटलं का तुला, माझ्या लाडक्या बाळा?
कोण भेटलं तुला सांगशील, माझ्या बाळा?
भेटलं मला एक लहान मूल, मेलेल्या शिंगराजवळ बसलेलं
एक गोरा माणूस भेटला मला, काळ्या कुत्र्याला फिरवून आणत होता
एक तरुण स्त्री भेटली मला, तिचा देह जळत होता
आणि भेटली एक किशोरी, तिने माझ्या हाती दिलं इंद्रधनू
एक माणूस भेटला, प्रेमात विध्द झालेला
आणि दुसरा भेटला, द्वेषात विध्द झालेला
आणि आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे

आणि आता तू काय करणार आहेस, माझ्या लाडक्या बाळा?
सांगशील मला- तू काय करणार आता, बाळा?
मी- मी मागे सरणार हा भयंकर पाऊस कोसळायला सुरुवात होण्यापूर्वी
घनगर्द काळ्या जंगलात खोलवर चालत जाईन मी
जिथे अनेक लोक आहेत, आणि त्यांचे हात अगदी रिकामे
जिथे विषाच्या गुटिका त्यांच्या पाण्यातून महापुरासारख्या शिरतात
दरीतल्या घराच्या अंगणात कुबट गलिच्छ तुरुंगाची सुरुवात होते
तिथल्या मृत्यूदात्याचा चेहरा नेहमीच नीटच झाकलेला असतो
तिथली भूक अतिशय ओंगळ आहे, तिथल्या आत्म्यांचा विसर पडलेला आहे
एकरंग सारा काळा, काहीच नसणे हीच संख्या
आणि मी हे सारे सांगेन, त्यावर विचार करेन आणि ते बोलून दाखवेन... श्वास होईल तो माझा
पर्वतावरून त्याचे प्रतिबिंब फेकेन सभोवर... जे दिसेल साऱ्या आत्म्यांना
मग उभा राहीन मी महासागराच्या पृष्ठावर... बुडेपर्यंत
मला माझे पूर्ण गीत ठावे असेल... गळ्यातून उमटेपर्यंत
... आणि आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आता फार भयंकर... फार फार भयंकर असा पाऊस कोसळणार आहे

---------------------------------------------------

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खफ वरुन साभार -

आदूबाळ
गुरुवार, 13/10/2016 - 07:02
.

माणसाला माणूस म्हणायला किती वाटा धुंडाळाव्या?
किती समुद्र घुसळून आता शिडांच्या वाद्या आवळाव्या?
तोफांचे गोळे थांबवायला किती चिता सावडाव्या?
...उत्तरं पाचोळ्यागत भिरभिरून जातायत, राजेहो!
पर्वताची माती व्हायला असा किती काळ लागतो?
गुलामीच्या बेड्या तुटून माणूस कधी का जागतो?
सगळं दिसूनही न दिसल्यागत कसा काय बुवा वागतो?
...उत्तरं पाचोळ्यागत भिरभिरून जातायत, राजेहो!
कितीदा मान उंचावली की दिसेल एकदा आकाश?
किती कान असले की ऐकू येईल आक्रोश खग्रास?
किती खून पडले की उठाशील, म्हणशील "आता बास!"
...उत्तरं पाचोळ्यागत भिरभिरून जातायत, राजेहो!

.
(बॉब डिलनच्या एका गाण्याचा स्वैर अनुवाद)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वैर... छान आहे.
छान झालाच असता. मी स्वैर केला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवाद छान झाला आहे. पण खरं सांगायचे तर इंग्रजीतच मूळ कविता जास्त भावते. उदा:

Yes, and how many years can a mountain exist
Before it's washed to the sea?
Yes, and how many years can some people exist
Before they're allowed to be free?
Yes, and how many times can a man turn his head
And pretend that he just doesn't see?
The answer, my friend, is blowin' in the wind
The answer is blowin' in the wind

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तर घोंघावतंय वाऱ्यासवे, मित्रा, उत्तर घोंघावतंय वाऱ्यासवे.

असहमत. उत्तरं वेगाने लांब चालली आहेत असा अर्थ डिलनभौंना अपेक्षित असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

घोंघावतंय एवढं खरं. आता तिथेच स्थिरेल की फिरेल आणि दूर जाईल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आणि आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...
आणि आता फार भयंकर, फार भयंकर, फार भयंकर ...

- काही लोक ही पृथ्वी सोडून जातील
अगदी वेळेवर
तिकडे नवीन कविता म्हणतील शेकोटीभवती बसून
बरं झालं लवकर निघालो
बरं झालं लवकर निघालो
बरं झालं लवकर निघालो

पितरांना तिथेच सोडून आलो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुवाद सुंदर झाले आहेत. या मूळ कवितांच्या लेखनाचा कालखंड कोणता? कोणत्या येऊ घातलेल्या आपत्तीविषयी डिलॅन लिहीत आहे ? दुसरे महायुद्ध? तिसरे? आयसिस इत्यादी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

http://www.npr.org/2000/10/21/1112840/blowin-in-the-wind

What does it mean, `The answer, my friend, is blowin' in the wind?' Dylan himself was cryptic about it, telling Sing Out! magazine in 1962, quote, "There ain't much I can say about this song, except the answer is blowin' in the wind. It ain't no book or movie or TV show or discussion group, man. It's in the wind." Writer David Hajdu says its ambivalence is part of the song's appeal.

"The song can be anything to anybody. It's critical and it's hard, this litany of questions about what's wrong with the world, OK; so if you're inclined, you know, to damn the establishment and the prevailing authority, there's your song. If you're of a more positive nature, well, this song provides an answer, too, or it hits—it leans toward an answer. `The answer, my friend, is blowin' in the wind.'"

Peter Yarrow, who, with Noel Stookey and Mary Travers, has probably sung the song more often than anyone else, says it's wrong to take the lyrics too literally.

"You can hear in this a yearning and a hope and a possibility and a sadness and sometimes a triumphal proclamation of determination. The answer is blowin' in the wind means we will find the answer. So it's a matter of interpretation and, frankly, I think Bobby was probably right and legitimate in not giving a specific interpretation."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मिलिन्द, हेच सूचित करते घोंघावणे...
त्याने दुसऱ्या कवितेत तिसऱ्या महायुद्धाच्या स्वप्नाचा उल्लेख केला होता हे माहीत असेलच. कवितेचा अर्थ कुठल्या मनात कसा रुजून येतो कोण निश्चित करू शकेल??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0