वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
सर्वप्रथम '२७ फेब्रुवरी अर्थात मराठी भाषा दिवसाच्या' सर्व मराठी भाषीकांना हार्दीक शुभेच्छा!
यळकोट यळकोट जय मल्हार...
यळकोट यळकोट जय मल्हार...
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जाववू ||धृ||
देव खंडोबा मार्तंड मल्हारी
मणी मल्ल दैत्य संहारी
चढलो नवलाख पायरी
देव आहे जेजुरी गडावरी
जवळ बसली म्हाळसा सुंदरी
नवस देवाचा आता पुरा ग करू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||१||
तळी उचलून करू चौक भरणी
परसन्न करू देवाची करणी
माथा झुकवूनी त्याच्या चरणी
बेल भंडार उधळू गगनी
तेजानं दिवटी बुधली ग पेटवू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||२||
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जाववू ||धृ||
- वाघ्या पाषाणभेद
प्रतिक्रिया
जागर आवडला
मराठमोळा जागर आवडला!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मलाही हा जागर आवडला होता.
मलाही हा जागर आवडला होता. गेल्या वेळी लिहायचे राहून गेले.