धूसर

जो तुफ़ानी दर्या से बगावत कर जाये वो इश्क
भरे दरबारमे जो दुनिया से लड जाये वो इश्क
जो मेहेबूब को देखे तो खुदा को भूल जाये वो इश्क
तिच्यातली मस्तानी खुदाला विसरली होती. स्वतःच्या भिडस्थ स्वभावाला न जुमानता ती जाऊन भेटली त्याला आणि सांगितलं मनातलं गूज. पण ज्याच्यासाठी ती खुदा विसरली होती त्याचं काय? तो तिला बोलवत होता त्याच्याबरोबर काही दिवस- त्याच्या जगात. आपण एकमेकांना आवडतोय का ते अजमावण्यासाठी. पण ही बुजरी आणि स्वतःच्या भावनांच्या अनपेक्षित तीव्रतेनी भांबावलेली. न जाणो, प्रत्यक्ष एकत्र आल्यावर आवडलोच नाही आपण त्याला तर? तो जग बघितलेला, विचारी आणि स्वच्छंद. ही हळवी, मायाळू आणि जीव लावणारी. तो उंच आकाशात सुरक्षित विहरणारा आणि ही मातीत घट्ट रुजलेली. त्याच्याविना मग नक्की कोणत्या जगात राहू शकली असती ?
ती बावरली. तुफानी दर्या पार करून आणि मनातल्या दरबाराशी भांडून नाहीच गेली त्याच्याकडे. स्वतःच्या मनाची समजूत करून दिली कि त्याला नसतोच आवडलो आपण आणि मग तो त्याचं अवकाश शोधायला निघून गेला असता. ते दुःख सहन करण्यापेक्षा त्याला "नाही येत मी" असं सांगणं सोपं वाटलं. त्यानी सुद्धा का म्हणून विचारलं नाही. नुसताच तुटकपणे म्हणाला की सन्यास घेणार आहे.
तिला गहिऱ्या मनाची सृष्टी खुणावत होती. एक निर्मळ, खेळकर आणि सुरेल धून बोलावत होती. पानाफुलांनी बहरलेलं आणि पाखरांची चिवचिव ऐकू येणारं जग तिला वसवायचं होतं. मग तिला भेटला एक युवराज. तिच्या असण्या-दिसण्यावर लोभावलेला. त्यानी मुळी तिला सांगूनच टाकलं की माझी साम्रादनि तूच. तुझ्याविना मी माझं साम्राज्य उभारूच शकणार नाही. आपण दोघे निर्माण करू आपली आनंदी, रंगीत दुनिया. मग तिनी त्या स्वप्नात आपला खुदा बघितला. तिच्या युवराजाच्या मोहिमेत सहज सामिल झाली. त्याचा मनस्वीपणा आणि आवेग आपल्यात सामावून घेत गेली. आपला जिव्हाळा आणि स्थिरता त्याला देत गेली. त्याच्या यश- अपयशाची वाटेकरी झाली. त्याच्या बरोबर चालता चालता एका साम्राज्याची निर्माती सुद्धा झाली. त्यात होती चिमुकली पिल्लं आणि कितीतरी रहिवासी. त्या सर्वांची ही जीवनरेखा !
पण एखाद्या अनवट तरल क्षणी खुदाचा विसर पडायचा आणि मग त्याची आठवण यायची. तो असेल त्याच्या ताऱ्यांच्या जगात, असं वाटून ती कातर हसायची.
आणि तो ? तो उंच उंच गेला पतंगासारखा. पण जमिनीशी नातं पूर्ण तुटत नाही हेच खरं. त्याची जमीन होती शुभ्र, बेफिकीर आणि शीतल. त्याला नव्हती रंगांची आणि किलबिलाटाची आस.पण का कोण जाणे एकदा पाहून यावी हिरवी सृष्टी असं वाटून गेलं खास. इतक्या वर्षांपूर्वीची मनातली तिची आकृती अगदी धूसर झाली होती, वाटलं ती आठवते तशीच असेल का ते पहावं. मग वाहावत आला तो एक दिवस तिच्या अंगणात, तिची परवानगी विचारून. एकमेकांना पाहून दोघांचाही अडला थोडा श्वास. तिच्या गहिऱ्या मनातली खळबळ दिसली नाही कोणाला. हलके तरंग मात्र जाणवले त्याला आणि तिच्या सम्राटाला. पण सम्राटाला होती खात्री तिच्या अढळपणाची.
त्याला मात्र अजबच वाटली दुनिया तिची. का इतके रंग आणि सूर आवडावे कोणाला? ही आपल्या शुभ्र, निरव जगात आली असती तर? का नाही मी तिला हट्टानी नेलं ? त्याला पडलेले प्रश्न तिच्याही मनात होते. कसं कोणी राहू शकतं इतक्या अलिप्तपणे ? आणि अचानक का मागे वळून पहावं असं वाटतं मग ? पण ते प्रश्न कोणीच कोणाला विचारायचे नव्हते. नजरेनीच काय समजायचं ते समजले.
मग पुन्हा एकदा तुझ्या जगात माझा जीव रमत नाही, तुझी दुनिया तुलाच लखलाभ असं म्हणून तो परत निघाला, मागे वळून न पहाता. पाणावलेल्या डोळ्यांना दिसेनासा झाला खुदा काही क्षण. आणि त्याच्या मनात उमटली तिची प्रतिमा - निःशब्द, पूर्वीपेक्षा उजळलेली आणि स्पष्ट.......

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मनस्वी मुक्तक आवडले.

न जाणो, प्रत्यक्ष एकत्र आल्यावर आवडलोच नाही आपण त्याला तर?

परफेक्ट!!! प्रेम जेव्हा समोर येतं तेव्हा बहुतेक हेच वाटतं की आपली लायकी आहे का. एक मस्त कविता वाचली होती ती देते जर मिळाली तर.
_____


Love (III)
BY GEORGE HERBERT


Love bade me welcome. Yet my soul drew back
Guilty of dust and sin.
But quick-eyed Love, observing me grow slack
From my first entrance in,
Drew nearer to me, sweetly questioning,
If I lacked any thing.
.
A guest, I answered, worthy to be here:
Love said, You shall be he.
I the unkind, ungrateful? Ah my dear,
I cannot look on thee.
Love took my hand, and smiling did reply,
Who made the eyes but I?
.
Truth Lord, but I have marred them: let my shame
Go where it doth deserve.
And know you not, says Love, who bore the blame?
My dear, then I will serve.
You must sit down, says Love, and taste my meat:
So I did sit and eat.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0