दुर्दैवी अंत

ही म्हटली तर लहान मुलांकरता असलेली कथा आहे, It makes a perfect sense to me.
__________________________________________________________________________________________________________________

आटपाट नगर होतं. या नगराची एक राणी होता. मनस्वी, दिलदार, अत्यंत धीराची आणि लावण्यखाणी असे लावण्य जे अंतर्प्रकाशाने, हृदयातील ज्योतीने मुख उजळून टाकते. राणी नगरीतील लोकांची जान होती म्हणा ना. नगरी अगदी आदर्श होती अशातला भाग तर मुळीच नाही . हां पण राणी वरचे नगरवासियामचे प्रेम अत्युत्कट होते, आभाळा हूनही विशाल आणि समुद्राहूनही अथांग होते. राणी च्या राज्यातील प्रजा सुखी होती. रोज पहाटे राणी च्या मुखकमळाच्या दर्शनाने त्या नगरवासीयांच्या दिवसाची सुरुवात होई. दिवसभर राणी बद्दल, अतिशय चांगले आणि चांगलेच बोलले जाई, खरं तर प्रत्येक दिवस हा मंगल सण आणि प्रत्येक क्षण हा जगण्याचा उत्सव असे. आणि तो तसा असण्याचे कारण आपला राणी आहे याची नागरवासियांची खात्रीच नाही तर मनोमन अढळ श्रद्धा असे.
याच नगरीत जसे तिची अलोट भक्ती करणारे पूजक होते, तिचे हुकूम तळहातावर झेलणाऱ्या यौवना होत्या, राणी चे कौतुक करणारे वृद्धजन होते, राणीच्या चरणापुढे फुलांची पाखरं करणाऱ्या तिच्या सन्मानार्थ रांगोळी घालणाऱ्या दासी होत्या, तसेच काही दुष्टस्वभावाचे लोकही होते.
सुरक्ता नावाची एक अतिकुरूप दासी होती जी पदोपदी राणी च्या वागण्यातील चुका हायलाईट करी, त्याचा गवगवा करी. तर माया नावाची एक भावीण होती जी सतत या धास्तीत असे की राणी कधीही विश्वासघात करू शकते आणि माया ची हकालपट्टी करू शकते आणि जरा असे कुंपणानेच शेत खाल्ले तर जायचे कोठे. मायेच्या हाताखालची नोकराणी हरिता तर धूर्त महाचांडाळीण , होती जी वारंवार मायेच्या असुरक्षिततेस खतपाणी घाली जिची sidekick जडबुद्धी नावाची अतिशय मांदय असलेली , लंबोदरी, कुरूप अवलक्षणी दासी होती.
एवढ्या सुंदर शुभ्र कॅनवास वरती कुठेतरी धब्बा ,मलिन डाग हा असणारच की. या जगात परफेक्ट अशा फार कमी गोष्टी आपण पहातो, ज्या काही पाहतो त्या स्वप्नातच. हां मान्य आहे कोकिळेचा पंचम, रोपट्यावर डोलणारा गुलाब, गुलाबी मासोळीसारखी त्वचा असलेले, बुद्धाचा चेहरामोहरा लाभलेले अर्थात प्रत्येक नवजात अर्भक , निसर्गाच्या कुंचल्याची कमाल, यांसारख्या काही गोष्टी परफेक्ट असतात परंतु विशाल जगतामध्ये त्या तशा मूठभरच.
तर राणीचा तिच्याइतकीच लोभस एक ideosynchracy होती ती म्हणजे अत्युत्तम, सुंदर टिकाऊ आणि कलाकुसरीच्या वस्तू नगरात इथे तिथे लपवून ठेवायच्या, आहे की नाही रोचक छंद. कधी राघू-मोर कोरलेली चांदीची हळदकुंकवाची कुयरी तर कधी चंदनाच्या लाकडात घडलेली, अंगठी ठेवायची लहानशी पेटी, अत्तरकुपी तर कुठे मण्यामण्याचा पक्षी राणी लपवून ठेवे. तुम्ही भाग्यवान असाल तर मखमली बटव्यात सोन्याच्या मोहोराही तुम्हाला सापडण्याची शक्यता असे. या वस्तू अगदी अनवट ठिकाणी पेरलेल्या असत. म्हणजे झाडाची ढोल , पक्ष्याचे घरटे, नदी समुद्राला मिळते तेव्हा त्रिकोणी फाटे फुटून ती हजार बाहूंनी सागरास कवटाळते अशावेळी जे सुपीक त्रिकोण तयार होतात त्या त्रिकोणी प्रदेशातच कुठे मोत्याची माळ लपव अशा नाना कल्पक जागांमध्ये या वस्तू दडलेल्या असत. मग का नाही नगरजन उत्साहाने दिवस सुरु करणार?
हा गोड राज्यकारभार, सुसंवाद खूप वर्षे नीट चालले होते, अबाधित होते परंतु हरितेने, जडबुद्धीला समवेत घेऊन विष कालविण्यास सुरुवात केलीच. नगरजनांना मोठ्या चातुर्याने , धूर्ततेने तिने हे पटविण्यास सुरुवात केली की राणीकडे अफाट अमाप संपत्ती आहे आणि त्यातील कणभरही वाटली जात नाही. अनेक हलक्या डोक्याच्या लोकांचा ताबडतोब विश्वास बसला तर हरितेच्या कूटनीतीमुळे पंडित विद्वानही बुद्धीभ्रष्ट होउ लागले. अजून हवे-अजून हवे अशी हाव प्रत्येकालाच सुटल्यावर जे व्हायचे तेच झाले, राणीबद्दल वाईटसाईट खोट्या बातम्या, खोटे आरोप पसरू लागले. राणी फार कनवाळू होती, करुणा,दयेची, सौंदर्याची मूर्ती होती, सत्याची चाड असलेली होती, उदार तर होतीच परंतु ती कुशल राजनीतीज्ञ नव्हती. किंबहुना या उठावामुळे ती इतकी विचलीत झाली की तिला हेही भान उरले नाही की तिच्यावरती प्रेम करणारे काही अतिशय थोडे पण ओजस्वी, इमानदार लोक आहेत आणि she better not let them down .
.
& alas! she let them down . ती स्वतः: राज्यपदावरून उतरली. आणि या उरलेल्या तिच्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या लोकांनी कायमची हार मानली. परत उभारी ना धरण्यासाठी.
.
मला प्रश्न पडतात - राणीने त्या भेटींचा वर्षावचा नको होता करायला का? की ओळखून हरितेला हाकलून द्यायला हवे होते? पण हरितेच्या विषयाची कुणकुण तिला तेव्हा लागली जेव्हा ऑलरेडी खंजीर तिच्या पाठीत खोलवर घुसला होता, कुठेतरी एका देवदूताचा मृत्यु झाला होता. कोमल असणे हा राणीला शाप होता का? की कोमलतेबरोबर कणखरपणा नसणे हा शाप होता,लिमिटेशन होते?
काहीही असो राणीने सिंहासनावरुन पदच्युत व्हावयास नको होते. राज्य करपले ते करपलेच. ही दैवगती नाही, This could have been avoided. एक देवदूत मरुन पडणे हे थांबविता आले असते. असते का?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगलं राज्य जास्ती दिवस टिकत नाही बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कसले रूपक आहे कळेना. जडबुद्धी वाचकासाठी काही क्लू मिळेल का? राणीच्या नावाचा संस्कृतोद्भव प्रतिशब्द तरी? सुरक्ता, हरिता असा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राणीबद्दल वाईटसाईट खोट्या बातम्या, खोटे आरोप पसरू लागले. राणी फार कनवाळू होती, करुणा,दयेची, सौंदर्याची मूर्ती होती, सत्याची चाड असलेली होती, उदार तर होतीच परंतु ती कुशल राजनीतीज्ञ नव्हती. ...काही सूत्र मिळते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पन तुमचा प्रतिसाद वाचला अन केज्रुमोदी हे नेहमीचे कलाकार समोर आले डोळ्याच्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पदच्युत झाल्यावर राणी बहुधा आजारी पडली असावी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सूत्र असे काहीही नाहीये. लहान मुलांचीच गोष्ट आहे. अ‍ॅनी डिलर्ड यांचे २०१६ मधील नॉन्फिक्शन बेस्ट सेलर पुस्तक "टोट्ल एक्लिप्स" मधलीकल्पना आहे - हे निसर्गावरील निबंधांचे पुस्तक असून, यात ती म्हणते की निसर्गात प्रेटी मच "आता आहे-आत्ता नाही" असा खेळ असतो. म्हणजे एखादा सुंदर सूर्योदय, एखाद्या चिमुकल्या पक्ष्याची डौलदार झेप, दवबिंदूंनी न्हालेली गवताची पाती सर्व काही क्षणभंगुर आहे. अ‍ॅनी लहानपणी एखादे नाणे लपवत असे व दूर कुठुन तरी बाण काढत "खजिन्याकडे चला" किंवा "पुढे गंमत सापडेल" असे लिहून व्यक्तीस तिथपर्यंत नेत असे. जर कोणी व्यक्ती त्या मार्गाने बरोब्बर माग काढत गेली तर त्या व्यक्तीस ते नाणे सापडे. नाणे ही काही फार मोठी गोष्ट होती अशातला भाग नाही. पण अ‍ॅनी म्हणते, अशे अनेक नाणी निसर्गात लपविलेली असतात आणि जर हे आपल्याला कळू शकले तर आपण श्रीमंत आहोत.
.
त्यावरुन ही कल्पना सुचली. रद्दी आहे हे मान्य.
_____
अजुन एक सुंदर कल्पना तिने मांडली आहे. मुंगळा (अ‍ॅनी ने अन्य अगम्य , परदेशी प्राण्याचे नाव घातले आहे) चावतो तेव्हा, आपण किती का प्रयत्न करा तो पकड सोडत नाही (आता शास्त्रिय दृष्टीकोनातून त्याच्या नांग्या रुतुन बसतात वगैरे जाऊ द्यात) तो मस्तक/शिर (शि ह्रस्व ही दीर्घ?) गमावेल एकवेळ पण पकड सुटत नाही. अ‍ॅनी म्हणते आपण जेव्हा एखादा विकल्प स्वीकारतो तेव्हा मुंगळ्यासारखा स्वीकारायच असतो. पराकाष्ठेनेही आपण विचलित व्हावयाचे नसते. हे जे "कमिटमेन्ट" बद्दलचे "संपूर्ण वाहीलेले असण्याबद्दलचे" रुपक आहे त्याच्या सौंदर्याला तोडच नाही.
____
अ‍ॅनी एखादं तत्व अतिशय खुलवुन सांगते. म्हणजे त्या त्या प्रकरणाचा मूळ जीव असतो इवलासा. इवलसं तळं म्हणा ना पण अ‍ॅनी सुरुवात करते डोंगरावरुन, मग डोंगर उतारावरुन नागमोडी वळणं घेत, भुलवत, कुठे पायवाटेने फुलं दाखवत, मधेच दुतोंडी गुहेतून बाहेर पडत एक लांबची अत्यंत मोहक सफर घडवत ती आपल्याला त्या तळ्यापर्यंत नेते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0