ही बातमी समजली का? - १२४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____

Rail ticket surge pricing on experimental basis: Railways

झक्कास. फक्त हे रेल्वेमधे सर्रास राबवायचा प्लॅन करा. मजा येईल.

---

The case for cautious optimism - The sharp increase in nominal growth is welcome: It signals improvement in underlying real economic activity, holds out hope for the health of the corporate and banking sectors. अरविंद सुब्रमण्यम यांचा लेख.

--

India's manufacturing PMI rises to 52.6 in August

The Nikkei India Manufacturing Purchasing Managers' Index, or PMI, climbed to a 13-month high of 52.6 in August from 51.8 in July. A reading above 50 indicates economic expansion, while one below 50 points toward contraction.

field_vote: 
0
No votes yet

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

आता कावकाव सुरु होईल की "अजून ग्राऊंड लेव्हल वर काही बदल दिसत नाही".

हे नक्की कशामुळे घडलं असावं?
लॉजिस्टिक एफिशिअन्सी म्हणजे एकूणातली वस्तूंची अधिक जलद हालचाल का?
कस्टम क्लिअरन्सेस मध्ये सुधारणा झाल्यामुळे हे झाले आहे का? अधिक चांगले रस्ते बनले आहेत का?
कारण बाकी सुधारणा घडेल अशी शक्यता असलेला जीएसटी अजून यायचाय.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

रेल्वेने सर्ज प्राइसिंग करणे हे इनहेरंटली विसंगत आहे. मोनोपोली आहे. नेहमी सेवा शॉर्ट सप्लायमध्ये आहे. अशावेळी सर्ज प्राइसिंग या कन्सेप्टलाच काही अर्थ नाही. रेल्वे कायमच मनमानी किंमत मागू शकते.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

+११ थत्तेचाचा.

एकुणात सर्व बाबतीत ढोंग करण्याची जी विचारसरणी आहे त्याचा हा परीपाक आहे. सरळ तिकीटांचा दरच ३०-४० टक्क्यानी वाढवायचा जर रेल्वेला परवडत नाही तर. हे मोनोपॉली सेक्टर मधे फ्लेक्सी चार्जींग चे ढोंग कशाला?

सध्याचे रेलवेमंत्री दर वाढवत नाहीत. ते (अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह) ट्रिक्स वापरून प्रवाशांकडून अधिक पैसे काढतात.

गेल्या वर्षीपासून मधल्या स्टेशनांवरून मेल एक्सप्रेसची तिकिटे देणे बंद केले आहे. ज्या स्टेशनवर मेल एक्सप्रेस थांबतात तेथूनच तिकिटे मिळतात. बेगडेवाडि ते दादर (किंवा बदलापूर ते पुणे) तिकिट मिळत नाही. त्यांनी लोणावळ्याचे (कर्जतचे) लोकलचे तिकीट काढायचे आणि लोणावळ्याला (कर्जतला) जाऊन लोणावळा दादर (कर्जत पुणे) वेगळे तिकीट काढायचे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

सध्याचे रेलवेमंत्री दर वाढवत नाहीत. ते (अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह) ट्रिक्स वापरून प्रवाशांकडून अधिक पैसे काढतात.

फक्त सध्याचेच नाही, अश्या प्रकारे मागच्या दारानी पैसे काढायचा प्रकार लालु काळापासुन सुरु झाला.

सध्याचे रेल्वेमंत्री सुदैवाने चांगले असल्यामुळे त्यांना नावे ठेवावी असे वाटत नाही. त्यांना आजन्म रेल्वेमंत्री केले पाहिजे

रेल्वेने सर्ज प्राइसिंग करणे हे इनहेरंटली विसंगत आहे. मोनोपोली आहे. नेहमी सेवा शॉर्ट सप्लायमध्ये आहे. अशावेळी सर्ज प्राइसिंग या कन्सेप्टलाच काही अर्थ नाही. रेल्वे कायमच मनमानी किंमत मागू शकते.

तुमच्या निष्कर्षाशी सहमत आहे.

थत्तेचाचांशी सहमत.

माझे मत-

लालूप्रसादच्या अगोदर लोकाभिमुख रेल्वे अर्थसंकल्पाच्या नावाने रेल्वे भाडेवाढ केलीच नव्हती ती आता निरनिराळ्या प्रकारे करत आहेत इतकेच.
१)ज्येष्ठ नागरिकांना सरसकट तीसचाळीस टक्के सूट होती ती आता मूळ भाड्यात देतात पण सुपरफास्ट/रिजर्वेशन फी तशीच ठेवतात.
२)आगावू आरक्षित जागा लवकर रिकाम्या व्हाव्या यासाठी रद्द करण्याचा काळ ४८-७२ तास केलाय.त्यानंतर फक्त वीस रु परत देतात.
३) जर कोणी विमानाने संध्याकाळी मुंबई/पुण्याहून दिल्लीला गेला तर त्यास विमानभाडे अधिक तिकडे एक रात्र राहाण्याचा खर्च पडते पण राजधानी गाडीने गेला तर तो सकाळी दहाला कामाच्या वेळी दिल्लीत पोहोचतो तर त्याचे बरेच पैसे वाचतात.म्हणून प्रिमिअम राजधानीचे तिकिट वाढवले
४)एसी तिकिटांचे दर तीनवेळा वाढवले आणि सर्विस ट्याक्स लावला पण साध्या स्लिपरचे तिकिट फारसे वाढले नाही.
५)कम्प्यूटरामुळे कुठून कुठलेही तिकिट देतात त्यामुळे बेगडेवाडी ते लोणावळा पॅसेंजर तिकिट अधिक लोणावळा ते दादर मेल/सुपरफास्ट तिकिट मिळेल.
भाडेवाढ योग्य ठिकाणी करत आहेत.फर्स्टक्लासने जाणाय्राला स्टेशनवरही फर्स्ट सुविधा नव्हत्या त्या देत आहेत॥ उदाहरणार्थ झाशीला एसी वेटिंग रुम दहा रु तास होती २०१३ मध्ये.फारनरस त्याचा फोटो काढत होते आणि खुश दिसत होते. हळहळू हे सर्व द्वितिय/तृतिय पातळीच्या स्टेशनांपर्यंत नक्कीच जाईल.

हे रत्न सापडलं.
http://scoreline.asia/malala-to-advocate-return-of-cricket-to-pakistan/

“I am ready to tell the world that Pakistan is a safe place and teams should go there and play cricket,” Malala told reporters at Edgbaston.

काकू तुम्ही स्वतः इंग्लंडात रहाता तर इतरांना काय सांगता पाकिस्तान सेफ आहे ते.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

एक गोळी झेलल्यामुळे नोबेल प्राईझ मिळाल्याने काकूंना काहीही बोलायचा हक्क प्राप्त झालाय ढेरेशास्त्री. बोलू द्या त्यांना. वैसेभी बोलणे सोडून और कुच करतैच नै उनो.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

+१

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

...'काकू'??????

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

नबा युथ ऑब्सेस्ड सोसायटीमध्ये कंटेम्प्ट दाखवायचा असेल, कोणाला लागेल असं बोलायचं असेल की काकू, मामी म्हणण्याची पद्धत अजुन तुमच्या अंगवळणी नाही पडली? Wink

...तिच्या यौवनाबद्दल वा वार्धक्याबद्दल नसून तिच्या वैवाहिक स्थितीबद्दल आहे.

(बाकी, आमच्यासारखा अंकल-क्याटेगरीतला इसम जर इतरांना 'काकू' नि 'मामी' म्हणत हिंडू लागला, तर मग काय राहिले? त्यापेक्षा आमच्या लेखी मलाला'तै'च ठीक आहे.)

असो.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

आमच्यासारखा अंकल-क्याटेगरीतला इसम जर इतरांना 'काकू' नि 'मामी' म्हणत हिंडू लागला, तर मग काय राहिले

हाहाहा Smile

वाचाळ पुरुषांचा अपमान करायला त्यांना काय म्हणायची पद्धत आहे?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुझी मार्केटमधली पत काय तू बोलतोस काय Wink
पुरुष एकंदर पतीविषयी शेन्शिटिव्ह असावेत असा अंदाज.

पुरुष एकंदर पतीविषयी शेन्शिटिव्ह असावेत असा अंदाज.

ज्या गोष्टीची कमतरता असते त्या बाबतीत शेन्शिटिव्ह असणे समजण्यासारखे आहे Smile

अरारा काय ग हे. ROFL
मी ही तुझे प्रतिसाद आवर्जुन वाचू लागले आहे. ते गंभीर नाही तर टवाळ, विनोदी Smile आत्ता दिलास तसे.

जिमनॅस्टिक विजेते. चाळीस वर्षांच्या अंतराने.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बजेट आणण्यापुर्वी , अधुन मधुन वेगवेगळ्या मार्गाने दरवाढ करायची आणि बजेट च्या वेळी " यंदा कोणतीही दर वाढ नाही " असे म्हणवून स्वत:ची पाठ थोपटवून घ्यायची , ह्यात नवीन ते काय ? शिवाय आतातर दोन्ही बजेट एकत्रच जाहिर करणार , म्हणजे रेल्वे बजेट्वर जास्त चर्चा होण्यापेक्षा, मेन बजेट वरच जास्त फोकस राहील असे दिसते.

२०१६ मध्ये हे वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं.
http://wunc.org/post/youth-radio-navigating-two-cultures-indian-american...

"Two weeks ago, I got a summer haircut. Yeah, I know it doesn't seem like a big deal, but it's been five years since I've gotten a real haircut. You see, to me and my dad, Raghavendra Narasimhan, these 18 inches mean a lot more than just cosmetic change.

"So, if I want my kids to look beautiful, to look traditional, divine, Indian, whatever, long hair just kind of goes with it," my dad said.

आणि हे

"Someone who's brown on the outside and then white on the inside," Brinda said.
"Brown people who try to act like white people because they don’t want to be Indians," Keshav said.

किंवा हे

My family goes to the Hindu temple every week, but my sister and I never wear casual Indian clothes in public. Right now, we’re on our way back home from the temple and we’re still wearing our Kurthas and Chudidars. We need to stop by the grocery store. But, my sister, Brinda, refuses to go inside.

कमॉन, २००१ कॉल्ड! दे आस्क्ड योर चुडिदार ब्याक.

पण डेटिंगच्या बाबतीत, अंग दाखविणे, तंग कपडे घालणे - या बाबतीत खरच अमेरिकेतील भारतीय पहीली पीढी पालक जाचक वाटतात मुलांना.

असं पूर्वी होतं हे मान्य. २०१६ मध्ये हेच वाचायला मिळालं म्हणून आश्चर्य वाटलं इतकंच.
--
मुसलमान इमिग्रंट्स काय करतात याबाबत काही कल्पना अ‍ाहे का? बुरखा घातला तरी प्रॉब्लेम.. नाही घातला तरी प्रॉब्लेम. Smile

Two basic principles of management

म्यानेजमेंट सायन्स(??) ही बदमाशी, लबाडी आहे असं ज्यांना वाटतं त्यांना हा लेख खूप आवडेल. पहिल्या परिच्छेदात लेखकाने म्यानेजमेंट सायन्स ची धज्जीया उडवलेली आहे.

---

Arvind Kejriwal says Badals making CDs against AAP - सगळं जग आमच्या विरुद्ध कट करून राहिलंय.

---

मद्यपींना तडीपार करा : अण्णा हजारे

अण्णांना माहीते सगळ्यांचा शुक्रवारचा प्रोग्रॅम. आँ लब्बॉड अण्णा ROFL

आँ ??

अण्णा हजारेंविषयी बोलताहेत चिनिमामी. बापटांबद्दल नव्हे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अण्णा बापटांनी अण्णा हे स्वतःचे नाव म्हणून मान्य केले म्हणायचे!

हाण्ण!!! ROFL हे झकासच. बापटांना पकडलय शब्दात.

होय होय , पकडलंय शब्दात ,, माघार ... (हा मिहीर या नावावर का टपून बसलाय , त्याचा हिशोब जरा करायला च पाहिजे )

Brazil, US probe graft in $208 million Embraer jet deal inked by UPA

Embraer is alleged to have paid commissions to a UK-based defence agent -such middlemen or unauthorised agents are banned under the Indian defence procurement system -in the $208 million deal for three EMB-145 jets inked by the UPA government in 2008. The three EMB-145 aircraft have been equipped with indigenous radars in a Rs 2,520 crore DRDO project to serve as AEW&C (airborne early-warning and control systems) air craft for IAF.

Tourism प्रदर्शन

TTF Mumbai
TTF Mumbai at Nehru Centre will have a full-house show with more than 180 participants, including representation from 21 Indian states and more than 10 countries.

Start-End: 16 to 18 September, 2016
Address: Nehru Centre, Mumbai
17 Sept 2.00pm to 7.00pm
18 Sept 11 am to 7.00pm
Open to all
____________________________~_
TTF Pune
TTF Pune to be held at Messe Global Pune at Seasons Mall will have a house-full show, with over 150 participants from 5 countries and 17 states. TTF Pune is the biggest-ever tourism event in the city with overwhelming footfall of over 6,000 visitors.

Start-End: 23 to 25 September, 2016
Address: Messe Global Pune at Seasons Mall, Pune

Link :-
Exhibition Enquiry | India's Largest Tourism Fair Network href="http://www.ttfotm.com/exhibition-enquiry/"

नलीनी चिदंबरम यांच्यावर समन्स.

---

कावेरी पाणी तंटा : बॉंब फेक झाली - पण अजून "या तंट्यास मोदी जबाबदार आहेत" असा आरडाओरडा कुणीच कसा केलेला नाही ?? आश्चर्य आहे.

>>"या तंट्यास मोदी जबाबदार आहेत" असा आरडाओरडा कुणीच कसा केलेला नाही ?? आश्चर्य आहे.

खाई त्याला....... ?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

थत्ते चाचा , ऑलरेडी सर्व माध्यमातून उलट प्रतिसाद देण्याची सर्व तयारी आम्ही करून ठेवली आहे . नुसती एक पोस्ट टाकण्याचे मनात सुध्दा आणून बघा , मग बघा कसा सोशल मीडियातुन तुमच्यावर प्रतिहल्ला करून तुम्हाला नमो सॉरी नामोहरम करून टाकतो

विविधतेतिल एकते चे उदाहरण.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/prohibitory-orders-imposed...

इतर देशांमध्ये राज्या-राज्यांमध्ये अश्या पाणीवाटपाच्या मारामार्‍या होतात काय?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

माहीती नाही, पण बाकी कुठला देश स्वताला "विविधतेमधे एकता" असे काही बिरुद लाउन घेतो का?

इतर कुठल्या देशात इतकी विविधता आहे तेवढे सांगा, मग पाहूच ते काय म्हणतात ते.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

इतर कुठल्या देशात इतकी विविधता आहे तेवढे सांगा, मग पाहूच ते काय म्हणतात ते.

आम्रिकेत आहे की विविधता. भारता इतकी नाही. पण बरीच आहे. जगातल्या अनेक देशांतून माणसे येऊन सेटल होतात म्हणून त्याला मेल्टिंग पॉट म्हणतात. डेमोक्रॅटिक पार्टी चा चाललेला असतो विविधतेच्या नावाने कंठशोष.

विविधता हे अमेरिकेचे बलस्थान आहे का ? त्याबद्दलचा एक युक्तीवाद इथे.

जगात अनेक देश असे आहेत की जिथे विविधता नसूनही (म्हंजे होमोजिनिटी असूनही) अंतर्गत शांतता, भरभराट आहे. उदा. स्वीडन, नॉर्वे, जपान.

http://www.latimes.com/business/hiltzik/la-fi-hiltzik-20140620-column.html

क्यालिफोर्निया अन अ‍ॅरिझोना यांच्यात पाणीयुद्ध. चक्क चक्क हामेरिकेत वगैरेही होतात अशी भांडणे हे वाचून उदाहरणार्थ रोचक वगैरे वाटलं.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

शब्दशः मारामाऱ्याच अपेक्षित नसतील तर हे वाचून पाहा. Where the River Runs Dry : The Colorado and America’s water crisis.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतामधे नक्कीच विविधतेमधे एकता आहे. शुक्रवारी संपाच्या दिवशी बंगळुरात असल्यामुळे ह्याचा अनुभव घेता आला. संप प्री-डिक्लेअर्ड असल्यामुळे दारुच्या दुकानांमधला स्टॉक गुरुवारी म्हणजेच अगोदरच्या दिवशीच जवळजवळ संपला. उद्याच्या दिवसासाठी उर्जा मिळविण्याचा हा उपाय असावा बहुतेक. शुक्रवारी सकाळी ९.३० - १०.०० च्या सुमारास आपल्या मुंबई-ठाण्या-पुण्यात दहिहंडीच्या दिवशी फिरतात तसे मोटारसायकलवर हेल्मेट न घालता, लाल-पिवळ्या रंगाचा झेंडा फडकवत तीन तीन सीट बसून झुंडी मोठमोठ्याने आरोळ्या मारत फिरत होत्या. तीन पेक्षा जास्त संख्या असेल तर मग रिक्षात बसून फिरायचे. इथल्या स्थानिक लोकांना संप काय चीज असतो तो अगोदरच माहिती असल्यामुळे सगळीकडे चिडीचूप बंद होता. अगदी स्टेट बँक आणि इतर काही नॅशनल बँकांची एटीएम देखील बंद होती. एखाद शटर हाफ डाऊन असलं तरी ते बंद करायला लावत होते. मी ज्या ऑफीसमधे कामासाठी गेलो होतो त्यांनी आणि अशा अनेक कंपन्यांनी अगोदरच सुट्टी जाहिर केली होती. मात्र माझं काम इमरजन्सी स्वरुपाचं असल्यामुळे ते करणे भागच होते. मात्र वॉचमेनने अगदी खिडकीत उभं राहायलाही मनाई केली. जर कोणी खिडकीत पाहिलं तर वर येऊन राडा होण्याची शक्यता होती. मात्र मला मुंबईची भोचक उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. काम करतांना मधे मधे ३-४ वेळा रोडवर जाऊन गंमत बघून आलो. ज्यांच्याकडे बंदच काम नव्हतं अशी पोरं रस्त्यांवर क्रिकेट खेळत होती. दोन तीन वेळा बाहेर राडे झाले. पोलीसांनी नेहमीप्रमाणे मध्यस्थी न करता प्रेक्षकाचं काम केलं. संध्याकाळी विमान पकडायचं असल्यामुळे अ‍ॅपवरुन टॅक्सी बुक करण्याचा प्रयत्न केला मात्र सगळीकडेच नन्नाचा पाढा. मग शेवटी एका रिक्षावाल्याने दयाबुद्धी दाखवत डब्बल भाडं घेऊन विमानतळावर सोडलं. विमानतळावरुन काही अंतरावर एका एअरपोर्ट टॅक्सीमधे बसवून दिले आणी फ्री अपग्रेड दिलं. नेहमी विंडो सीट साठी जादा पैसे आकारणार्‍या विमान कंपनीनं देखील फुकटात विंडो सीट दिली.
एकंदरीत मुंबई असो की ठाणे की पुणे अथवा बंगळुरु विविधतेत एकता दिसली. कानडी आणि मराठी खळळं खट्याकं किंवा रिक्षावाले किंवा क्रिकेट म्हणा, सगळीकडे अ‍ॅट होमचा फिल आला.
आजच्या बातमीप्रमाणे कन्नडीगांनी आपल्या भागात तामीळींच्या मालमत्तेची नासधुस केली तर तामिळींनी आपल्या भागात वाईस वर्सा. एकंदरीत सारे भारतीय एकसारखेच आहेत.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सचिवांना का फोन? मंत्र्यांना का नाही?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

१. बहुतांश मंत्री अंगठा-छाप आहेत.
किंवा
२. मंत्र्यांच काम पॉलिसी ठरवण आणि नोकरशहांच ती अंमलात आणणं अशी साधारण विभागणी असक्यामुळे हे काम नोकरशहांकडे दिलं गेलं असावं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

सचिवांना का फोन? मंत्र्यांना का नाही?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

समलैंगिक पुरुष जोडप्यांसाठी ही बातमी दिलासादायक असणार; विशेषतः ज्यांना स्वतःची मुलं वाढवायची इच्छा असेल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

क्या बात है.

स्त्रीजातीचा र्‍हास झाला तरी मानव वंश अबाधित रहाणार Sad ए नॉय चॉलबे!!

तद्दन निसर्गदत्त मोनोपॉलीच्या आधारे आम्ही पेश्शल पेश्शल वगैरे ट्यांव ट्यांव करणार्‍यांना चांगली चपराक आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

डॅनियल डेनेट यांचे हे नवीन पुस्तक फेब्रुवारीमधे रिलिज होणार आहे. : From Bacteria to Bach and Back: The Evolution of Minds

----

कपिल शर्मा ची चौकशी होणार. - वा रे न्याय. लक्षावधी WPoS लोकांनी सरकारी जमीनीवर अतिक्रमणं करून झोपडपट्ट्या बांधल्या तर त्यांना ती जमीन कायम / रेग्युलराईझ करून देणार. आणि एका माणसाने त्याच्या फ्लॅट मधे काही वेगळे बांधकाम केले तर त्याला समन्स ????

----

Judge to woman in rape case: 'Why couldn't you just keep your knees together?' - न्यायमूर्ती इतके अविचारी असतात ?

In a different part of the trial, he said "Some sex and pain sometimes go together...that's not necessarily a bad thing."

>>कपिल शर्मा ची चौकशी होणार. - वा रे न्याय. लक्षावधी WPoS लोकांनी सरकारी जमीनीवर अतिक्रमणं करून झोपडपट्ट्या बांधल्या तर त्यांना ती जमीन कायम / रेग्युलराईझ करून देणार. आणि एका माणसाने त्याच्या फ्लॅट मधे काही वेगळे बांधकाम केले तर त्याला समन्स ????

तुम्ही हा तत्त्वाचा प्रश्न समजताय. पण हे सरळ रेट्रिब्यूशन आहे.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

(हे फोटो खरे असतील तर...)

अरेरे!

सांडपाणी व्यवस्था चांगली नाही म्हणून रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली म्हणे! याला म्हणतात- शेळी जाते जिवानिशी अन् खाणारा म्हणते वात्तड कशी?

फोटो पाहून अक्षरश: वांती आली. शी!

जोडीला इकडे आपल्याकडे बिहारात शहाबुद्दीनच्या सुटकेच्या आनंदात १३००- १५०० वाहनांची ऐतिहासिक मिरवणूक निघाली म्हणे.

ब्रिटीशांनी काही जातींवर 'चोर' म्हणून कायमचा ठपका ठेवला अशी टीका आपण ऐकतो.

पण घाणीत राहणे, उकिरड्यात राहणे, गुन्हे करताना काही चुकीचे वा वाईट न वाटणे या काही लोकसमूहांच्या स्वाभाविक प्रवृत्ती आहेत हे कुठेतरी मान्य करायला हवे.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

शांतताप्रिय लोकांना शिव्या घालणार्‍या संघी वाघमारे सरांचा निषेध.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

फोटो पाहून अक्षरश: वांती आली. शी!

+१०००

http://www.bbc.com/news/world-middle-east-37358719

मनातली शंका: मुहम्मदाची इमोजी काढावी असा प्रस्ताव आला तर?

असा प्रस्ताव कोण मांडेल याबद्दल शंका आहे. जर महंमदाचे रिप्रेझेंटेशनच करायचे असेल तर हे पुरेसे व्हावे, नै का?

m

हे म्हणजे "ला इलाह इल्लल्लाह, मुहम्मदुर्रसूलल्लाह" अर्थात, अल्ला सोडून कोणी देव नाही, आणि मुहम्मद हा अल्लाचा प्रेषित आहे ही घोषणा. यालाच शहादा असे नाव आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अल्लाह हा स्वतंत्र युनिकोड आहे.

अच्छा, धन्यवाद.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

चार्ली हेब्दो सारख्या कोणी प्रस्ताव मांडला तर?

शक्यता कमी आहे इतकेच म्हणणे आहे. जिलँड्स-पोस्टेन, चार्ली हेब्दो वगैरे प्रकारांनंतर असले कुणी करू धजावेलसे वाटत नाही.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

गूगल तुमचा पाठलाग करत आहे.
http://www.theregister.co.uk/2016/09/14/google_location_location_location/

..... many bank officials, citing “pressure from above,” are quietly depositing Re 1 into zero-balance Jan Dhan accounts to reduce their share.

तुम एक पैसा दोगे ... वो दस लाख देगा.

------

मोदींचा U Turn ? : 15-yr vision document to have thrust on urbanisation

The 15 year vision document of Modi government will have a major thrust on urbanisation said Niti Aayog vice-chairman Arvind Panagariya. The long-term vision document will replace the erstwhile Planning Commission’s five year plans that have been in force since 1951.

मला हे १ रुपया प्रकरण कळलेलं नाही.
ही जन धन खाती शून्य बॅलन्सवाली असणं अपेक्षित आहे ना? मग बँका ही खाती शून्य बॅलन्सवाली का ठेवू इच्छित नाहीत? की ही अकाउंट डॉर्मंट होऊ नयेत म्हणून त्यात काहीतरी व्यवहार करण्यासाठी १ रुपया टाकत आहेत?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

झीरो बॅलन्सच आहेत ती खाती पण त्यात झीरो बॅलन्स असणं हे चांगलं लक्षण नाही. त्यात ब्यालन्स असेल तर व्यवहार होतायत असं दिसेल. पण हे असले व्यवहार असतील तर उपयोग नाही.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ब्यांकेचे खाते हे एक प्रकारे नेटवर्क इफेक्ट ला जन्म देते. हे फोन सारखेच काम करते. दोन व्यक्तींचे प्रत्येकी एक बँक अकाउंट्स असेल तर २ ट्रान्जॅक्शन्स होऊ शकतात. पण तिसरा अकाऊंट असेल तर त्यातून ६ ट्रान्जॅक्शन्स होऊ शकतात. चौथा असेल तर १२ ट्रान्जॅक्शन्स होऊ शकतात. असं ते वाढत जातं. म्हणून बँक अकाऊंट्स हे खूप प्रगतीकारक आहेत असं म्हणायला हरकत नसावी. अर्थात त्यात पैसे नसतील तर अवघड आहे.

Making it valuable to the account holder to use the account is the key. Once he gets hooked up then we will have the exponential effect. आणि राष्ट्रीयीकृत ब्यांकेच्या कर्मचार्‍यांना नेमके हेच साध्य करण्यासाठी पुरेसे इन्सेंटिव्ह्ज असणे गरजेचे आहे.

Globalization Goes National

जीएस्टी, उत्तर प्रदेश, जागतिकीकरण, डोसा, चिकन तंदूरी वगैरे वगैरे.

पाकिस्तानात रेल्वे गाड्या चालतात?

मला तर तिथे केवळ कबिले, उंट घोडे हेच चालतात असं वाटलं होतं.

असो, मृतांना RIP इत्यादी.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

Airbnb moves to tackle discrimination by hosts

SAN FRANCISCO: For much of this year, Airbnb has been under fire over the ease with which its hosts can reject potential renters based on race, age, gender or other factors. The barrage of criticism began with a Harvard University study, snowballed with firsthand accounts of discrimination from Airbnb guests and has prompted a lawsuit.

On Thursday, Airbnb took its most forceful actions yet to combat discrimination. It told its rental hosts that they needed to agree to a "community commitment" starting on November 1 and that they must hew to a new non-discrimination policy. The company also said that it would try to reduce the prominence of user photographs, which indicate race and gender, and that it would accelerate the use of instant bookings, which lets renters book places immediately without host approval.

माणसाने आपलं घर कुणाला भाड्याने द्यायचे व कुणाला नाही याचा निर्णय सुद्धा घेऊ नये ? तिथेपण घाणेरडा डिस्क्रिमिनेशन विरोधी क्रायटेरिया लावणार ?? मान्य आहे की तुम्ही प्रायव्हेट कंपनी आहात आणि तुम्हाला तुमचे नियम लावायचे स्वातंत्र्य आहे. ज्यांना तुमची साईट वापरायची नाही त्यांनी वापरू नये. पण कस्टमर वर तुमची मूल्ये का लादली जावीत ? उद्या मॅट्रिमोनियल साईट्स पण म्हणतील की तुम्ही जात, धर्म या आधारावर डिस्क्रिमिनेट नाय करायला पायजे. काय चक्रमपणा आहे !!!

संपूर्ण समाज "नॉन-डिस्क्रिमेशन (race, age, gender or other factors)" या मूल्याकडे चालला असताना, काही मूठभर लोक प्रवाहाविरुद्ध जात असतील तर असच होणार आणि तुमच्या भाषेत सांगायचे झाले ते "सुयोग्यच" आहे.
.
आणि एवढा जर भेदभाव करायचाच असेल तर सटली करा ना. जसे कंपनीत "डिसेबिलिटी(बायपोलर वगैरे)" लिहीले की घेत नाहीत ही फॅक्ट आहे. पूर्वी "मला डिक्लेअर करायचे नाही" हा ऑप्शनच नव्हता आता निदान आहे तरी.
.

उद्या मॅट्रिमोनियल साईट्स पण म्हणतील की तुम्ही जात, धर्म या आधारावर डिस्क्रिमिनेट नाय करायला पायजे. काय चक्रमपणा आहे !!!

हे फिअय्मॉन्गरींग नाही तर काय आहे?

हे फिअय्मॉन्गरींग नाही तर काय आहे?

फिअय्मॉन्गरींग च आहे.

फिअर ला रिस्क असे नाव दिले तर चालेल ?

--

संपूर्ण समाज "नॉन-डिस्क्रिमेशन (race, age, gender or other factors)" या मूल्याकडे चालला असताना, काही मूठभर लोक प्रवाहाविरुद्ध जात असतील तर असच होणार आणि तुमच्या भाषेत सांगायचे झाले ते "सुयोग्यच" आहे.

हे म्हंजे लोकांवर मूल्ये लादली जाणे नाही का ? किमान काही प्रमाणावर तरी ?

--

आणि एवढा जर भेदभाव करायचाच असेल तर सटली करा ना. जसे कंपनीत "डिसेबिलिटी(बायपोलर वगैरे)" लिहीले की घेत नाहीत ही फॅक्ट आहे. पूर्वी "मला डिक्लेअर करायचे नाही" हा ऑप्शनच नव्हता आता निदान आहे तरी.

हास्यास्पद.

जर हायरिंग म्यानेजर ला हे माहीती नसेल की विशिष्ठ डिसॅबिलिटी असलेल्या व्यक्तीकडून काम कसे करून घ्यावे तर त्याने त्या विशिष्ठ डिसॅबिलिटी वाल्या व्यक्तीला नोकरी न देणे जास्त श्रेयस्कर नाही का ?

हे म्हंजे लोकांवर मूल्ये लादली जाणे नाही का ? किमान काही प्रमाणावर तरी ?

जर घरमालक संख्येने कमी आहेत व घरे विकत घेणारे इच्छुक जास्त तर मग सांख्यबल पहाता घरमालक "फडतूस" ठरतात. व मग त्यांचा विरोध चिरडणे हे आवश्यकच नाही का Smile
.

फिअर ला रिस्क असे नाव दिले तर चालेल ?

नाव देऊन आत्मा जो की "काल्पनिक बागुलबुवा" बदलणारे का?
.

जर हायरिंग म्यानेजर ला हे माहीती नसेल की विशिष्ठ डिसॅबिलिटी असलेल्या व्यक्तीकडून काम कसे करून घ्यावे तर त्याने त्या विशिष्ठ डिसॅबिलिटी वाल्या व्यक्तीला नोकरी न देणे जास्त श्रेयस्कर नाही का ?

श्रेयस्कर आहे हे तुमचे म्हणणे पटते.

जर घरमालक संख्येने कमी आहेत व घरे विकत घेणारे इच्छुक जास्त तर मग सांख्यबल पहाता घरमालक "फडतूस" ठरतात.

तुमच्या विचारात मुळातच जांबडगुत्ता आहे. घरमालक जरी संख्येने कमी असले तरी त्यांच्याजवळ 'घर' हा अ‍ॅसेट आहे.
घरे विकत घेणार्‍यांजवळ तो नाही.
पर्यायाने घरे विकत घेऊ इच्छिणारे हे तुमच्या भाषेत 'फडतूस' ठरतात!
बाकी चालू द्या.....

गब्बरचा विरोध म्हणून माझा पाठींबा. गब्बर विरोध करतोय म्हणजे त्यात कायतरी 'बास्केट-डिप्लोरेबिलिटी' असणारच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फक्त एवढंच करा - "बास्केट ऑफ डिप्लोरेबल्स" असं म्हणणं हे डिस्क्रिमिनेटरी नाही - असं सर्टिफाय करा. मग मुद्दा संपतो.

No, no, we need to discriminate against that basket of deplorables.

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

No, no, we need to discriminate against that basket of deplorables.

वावावा !!!

थोडक्यात काय की - तुम्ही केलेले डिस्क्रिमिनेशन बरोबर, सुयोग्य. आम्ही केलेले डिस्क्रिमिनेशन चूक, डिप्लोरेबल.

कोणीतरी ऐसीवरच लिहिलं होतं तसं, आपले वर्ल्ड व्ह्यू अजिबातच जुळणारे नाहीत. गब्बर, ही तुझ्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे अशातला भाग नाही. तरीही त्याच-त्या प्रकारच्या बातम्यांवर त्याच-त्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्याच-त्या सदस्यांकडून आल्या की तोच-तो किंचित कंटाळा यायला लागतो. मग मन रिझवण्यासाठी कायतरी विनोद करावे लागतात. त्यातून ते विनोद स्वतःवर किंवा परिस्थितीजन्य किंवा काही-बाही प्रकारे किमान काही बुद्धी दर्शवणारे असले तर दुधात विरजण. म्हणून माझा आपला क्षीण प्रयत्न हो!

१. सध्या खरडफळ्यावर ताकातून मिळणारी नशा असाही एक विषय सुरू आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती तै शी सहमत.

गब्बु - तू त्याच त्याच टाइपच्या बातम्या पुन्हा पुन्हा टाकतोस.

त्याच-त्या प्रकारच्या बातम्यांवर त्याच-त्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्याच-त्या सदस्यांकडून आल्या की तोच-तो किंचित कंटाळा यायला लागतो. मग मन रिझवण्यासाठी कायतरी विनोद करावे लागतात.

टोटली सहमत. इथे गब्बरला शहाणपणा दाखवला जातोय पण हेच अन्य विविक्षित आयडीनाही लागू आहे त्याचं काय?
काही कारण वा संबंध नसतांना अमेरिका वा अमेरिकेतले समाजकारण/ राजकारण यावर उगाच (आणि कधी कधी कपोलकल्पित) टीका इथे ऐसीवर केली जाते तेंव्हा आम्हालाही वाटतं की इतका तिटकारा असेल तर भरा तुमच्या बॅगा आणि जा की परत तुमच्या देशात, व्हॉटेव्हर कंट्री दॅट मे बी!
तुम्ही मन रिझवण्यासाठी विनोदाचा वापर करता, आम्ही मन रिझवण्यासाठी 'गेलांत भो**त' म्हणतो, इतकाच काय तो फरक!
सूज्ञांस अधिक सांगणे न लगे...

काकाश्री शावेला मोमेंट !!!

थोडक्यात काय की - तुम्ही केलेले डिस्क्रिमिनेशन बरोबर, सुयोग्य. आम्ही केलेले डिस्क्रिमिनेशन चूक, डिप्लोरेबल.

होय कारण तुम्ही मूठभर आहात = फडतूस आहात = बलहीन आहात Wink

"व्यक्तिस्वातंत्र्य , निवडीचे स्वातंत्र्य " या नावाखाली चातुर्वर्ण्य , जातपात, स्त्रियांची गळचेपी (ज्याला थोडक्यात "सनातनी-पणा" , किंवा प्रतिगामित्व म्हणता येईल अशा मूल्यांकडे जाण्याचा तुमचा (निदान वैचारिक!) प्रयत्न दिसतो- (किंवा तुमच्या विचारांची घसरगुंडी त्या दिशेने जाऊ शकते-तुमच्या मनात नसले तरीही) . तसे नसल्यास तसे ते का नाही हे स्पष्ट करावे! तसेच कशाला हिंसा म्हणावे आणि कशाला नाही , तेही ! उदा. दलितांचा वेगळा कप असणे हे सवर्णांचे "निवडीचे स्वातंत्र्य " असू शकते काय ? माझ्या मते ती मानसिक हिंसा आहे .

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

उदा. दलितांचा वेगळा कप असणे हे सवर्णांचे "निवडीचे स्वातंत्र्य " असू शकते काय ? माझ्या मते ती मानसिक हिंसा आहे .

माझ्या घरातला, माझ्या मालकीचा कप मी कसा क्लासिफाय करायचा ते सुद्धा मी ठरवू नये ?

(खरंतर "ती मानसिक हिंसा आहे" हे वाक्य निरर्थक आहे.) ... पण तुम्हाला युक्तीवाद हवा आहे तेव्हा तो पुरवतो --

दोन पर्यायी सिच्युएशन्स आहेत -

(१) एका व्यक्तीला तिच्या घरातले कप कसे क्लासीफाय करू नये ते बाहेरच्याने सांगणे व त्याबरहुकुम करवून घेणे.
(२) एका व्यक्तीने आपल्या घरातले कप तिला हवे तसे क्लासीफाय करणे ... जे दुसर्‍या (बाहेरच्या) व्यक्तीला मानहानीकारक वाटणे.

यात नेमकी हिंसा कोणत्या सिच्युएशन मधे आहे ?

--

"व्यक्तिस्वातंत्र्य , निवडीचे स्वातंत्र्य " या नावाखाली चातुर्वर्ण्य , जातपात, स्त्रियांची गळचेपी (ज्याला थोडक्यात "सनातनी-पणा" , किंवा प्रतिगामित्व म्हणता येईल अशा मूल्यांकडे जाण्याचा तुमचा (निदान वैचारिक!) प्रयत्न दिसतो- (किंवा तुमच्या विचारांची घसरगुंडी त्या दिशेने जाऊ शकते-तुमच्या मनात नसले तरीही) .

हिंसेच्या/किंवा धमकीबाजीच्या अनुपस्थितीत कोणाचेही शोषण, अत्याचार, गळचेपी घडू शकते का ?

(१) एका व्यक्तीला तिच्या घरातले कप कसे क्लासीफाय करू नये ते बाहेरच्याने सांगणे व त्याबरहुकुम करवून घेणे.
(२) एका व्यक्तीने आपल्या घरातले कप तिला हवे तसे क्लासीफाय करणे ... जे दुसर्‍या (बाहेरच्या) व्यक्तीला मानहानीकारक वाटणे.

यात नेमकी हिंसा कोणत्या सिच्युएशन मधे आहे ?

कशातच हिंसा नाहीये, कारण कोणाची मानहानी होत असेल तर चहा प्यायला त्या घरात न जाणे हा ऑप्शन आहेच की.
चहा तर पाहिजे आणि मी सांगींन त्या कपातच पाहिजे ही मागणी म्हणजेच खरी हिंसा, शोषण, स्वातंत्र्याची गळचेपी आहे.

तुम्हाला पटलेलं दिसतंय पण मिलिंदभाऊंचं मत हवंय मला.

दुसर्‍या भाषेत मुद्दा उपस्थित करतो - अनेकदा घरामधे शोकेस असते. किमान महाराष्ट्रात तरी मी ती अनेकदा पाहिलेली आहे. व त्या शोकेस मधे "उंची" crockery ठेवलेली असते. व खास पाहुण्यांसाठीच ती बाहेर काढली जाते व वापरली जाते. आता हे चूक आहे की बरोबर ?? इतर पाहुण्यांनी त्याचा अर्थ काय काढायचा ?? घरात आलेल्या पाहुण्यांपैकी काहींना उच्च, विशेष वागणूक दिली आणि काहींना समतल वागणूक दिली तर उरलेल्यांना "कमी" ची वागणूक दिली जाते - हे आपोआप होणार किंवा कसे ??

शत्रुपक्षाच्या लोकांना "डिप्लोरेबल" म्हणण्यात काय गैर आहे? "Everything is fair in .."
.
शत्रूस वाट्टेल ती नावे ठेवणे अजिबात गैर नाही.
.
काय हे गब्बर तुम्हीही शत्रूस नावे ठेवणे हे डिस्क्रिमिनेटरी आहे वगैरे म्हणताहात? तुम्ही बुद्धिस्ट झालात की काय? Wink

But didn't your other holy cow, capitalism, take enormous pride in being color-and-caste blind? (it actually never was, is or will be. Rule by coteries cannot ever be egalitarian!)

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

But didn't your other holy cow, capitalism, take enormous pride in being color-and-caste blind? (it actually never was, is or will be. Rule by coteries cannot ever be egalitarian!)

Being color-and-caste blind is not the goal of capitalism. Anybody who says that is "playing to some or the other gallery". As it turns out ... the fallout of capitalism may, in some cases, be "caste-or-color-neutral" behavior.

"being color-and-caste blind" हे काही फार महान, सकारात्मक कृत्य नाही (as long as one is being non-violent). त्यामु़ळे कॅपिटलिझम ने ते अचिव्ह केले काय आणि नाही केले काय .... !!!

भेदभाव करण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असावे (अर्थातच नॉन-व्हायोलंटली) असं मी म्हणतोय.

--

Rule by coteries cannot ever be egalitarian!

फक्त ते सोव्हिएत युनियन मधे किंवा भारतात नियोजन आयोगाने केले की तुम्हाला चालतं. नैका ??

मग मोदींनी नियोजन आयोग बरखास्त केला की - उत्तरपूर्वेचा विकास कसा होणार असा प्रश्न तुम्ही विचारता !!!

उत्तरपूर्वेचा विकास कसा होणार ?

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

१९४७ ते २०१४ या नियोजन आयोगाच्या अस्तित्वाच्या कालात किती विकास झाला ?

( आता तो नीतीआयोग पण असंच काहीबाही करत आहे ते क्षणभर बाजूला ठेवा. )

भेदभाव करण्याचे स्वातंत्र्य ... जरा लोकशाही वगैरे सारख्या गोष्टींबद्दल काही माहिती आहे का तुमच्या या कॅपिटलीसम च्या पुस्तकात ? (असायलाच पाहिजे असा आग्रह नाही)तसेच फार्फार पूर्वी काही व्यापाऱ्यांनी फडतूस गुलामांचा अत्यंत profitable व्यापार केला होता . त्याबद्दल या ग्रंथात काही दिशादर्शक माहिती आहे का ? ( हे आपलं सहज माहिती म्हणून विचारलं)याचा पोस्ट च्या title शी संबंध नाही . हा विषय थोडा समजून घ्यावा म्हणून माहिती विचारतोय.

(१) तुमच्या कॅपिटलिझम च्या ??? --- कॅपिटलिझम तुमचा पण आहेच की. जेव्हा जेव्हा तुम्ही लेबर ची गच्छंती करून मशीन आणता तेव्हा तेव्हा तुम्ही हायपर-कॅपिटलिस्ट निर्णय घेता. उदा. मोलकरीणीची गच्छंती करून वॉशिंग मशीन घेणे. One of the central points of capitalism is that individuals are free to deploy capital and labor as the individuals deem fit.

(२) आता भेदभावाबदल - स्वतःच्या घरात सुद्धा भेदभाव करायचा नाही ??? एखाद्या व्यक्तीने मित्र निवडताना, लग्नाचा जोडीदार निवडताना आपला धर्म हा क्रायटेरिया लावला तर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणाला असावा ?? आज या घडीला तरी कोणीही तसं करत नाही. पण मित्र निवडताना, लग्नाचा जोडीदार निवडताना आपण जे करतो तो भेदभावच असतो की. आक्षेप घेतला जात आही पण व्यक्ती भेदभाव करतेच की.

(३) तसंच म्हणतोय की स्वतःचे घर Airbnb वर भाड्याने देताना धर्माच्या आधारावर भेदभाव केला तर त्यात आक्षेप घेण्याचा अधिकार कोणाला व का असावा ? तीच बाब स्वतःच्या फ्लॅट ची.

(४) वर (२) मधे कोणाविरुद्धही हिंसा होत नाही. कोणालाही धमकी दिली जात नाही. तसंच (३) मधे करावे.

1.कॅपिटलीसम ला तुमच्या न म्हणता तुमच्या पुस्तकातला कॅपिटलीसम असे वाचावे.2. लोकशाही व गुलामांचा व्यापार याबद्दल मूळ प्रश्न होते.त्याच्या माहितीच्या प्रतीक्षेत.

2. लोकशाही व गुलामांचा व्यापार याबद्दल मूळ प्रश्न होते.त्याच्या माहितीच्या प्रतीक्षेत.

कॅपिटलिझम मधे स्वातंत्र्य हे महत्वाचं मूल्य आहे. (समानतेपेक्षा महत्वाचे). तेव्हा गुलामगिरी (म्हंजे मानवाला गुलाम बनवणे) ही आपोआप बाद ठरते. व्यापार्‍यांनी माणसांना गुलाम बनवले होते ते पण.

कॅपिटलिझम मधे स्वातंत्र्य हे महत्वाचं मूल्य का आहे ? उत्तर - स्वातंत्र्यात हे सुद्धा येते की व्यक्ती करार करू शकते. करार करण्याचे स्वातंत्र्य.

समानता/समता हे मूल्य कॅपिटॅलिसम मध्ये नाही का ? BTW तुम्ही कॅपिटॅलिसम या विषयावर कुठले पुस्तक त्यातल्या त्यात परिपूर्ण आहे असे मानता ? म्हणजे मोनोपली हे तत्व कॅपिटॅलिसम मध्ये ग्र्याह्य मानले जाते का ?

(१)समानता हा बकवास आहे असं मी मानतो.
(२) Capitalism and Freedom by Milton Friedman - हे पुस्तक. किंवा पोलिटिकली इन्करेक्ट गाईड टू कॅपिटलिझम हे जास्त बरे.
(३) मोनोपोली हे तत्व नाही. मोनोपोली ही एकतर नॅचरल असू शकते किंवा सरकारने निर्माण केलेली असू शकते (उदा. RBI, MSEB, Army, Navy, Air Force, Coast Guard). मोनोपोली नॅचरल असेल तर सहसा फार काल टिकत नाही. सरकार निर्मीत असेल तर कित्येक दशके टिकू शकते.

" मोनोपोली हे तत्व नाही "

अम्रीकेत मोनोपॉलिस्टीक प्रॅक्टिसेस च्या विरुध्ध कायदे आहेत असे ऐकतो . हि माहिती खरी आहे का ?

खरी असल्यास पुढील प्रश्न : म्हणजे अम्रीकेत पण कॅपिटॅलिसम ला अडथळे असणारे कायदे आहेत का ?
उत्तर हो असल्यास पुढील प्रश्न : म्हणजे अम्रिक शुध्ध कॅपिटॅलिस्ट देश नाही का
नाही असे उत्तर असल्यास पुढील प्रश्न : मग जगातील शुध्ध कॅपिटॅलिस्ट देश कुठला ?

अम्रीकेत मोनोपॉलिस्टीक प्रॅक्टिसेस च्या विरुध्ध कायदे आहेत असे ऐकतो . हि माहिती खरी आहे का ?
याचे उत्तर नाही असे असल्यास काही काळा पूर्वी मायक्रोसॉफ्ट कुठलीतरी केस ठरल्याचे ऐकले होते , ते नक्की काय होते.

disclaimer : हि उलट तपासणी घेत आहे असा गैरसमज कृपया करून घेऊ नये. genuine शंका आहेत . मी शास्त्र शाखेचा आहे . हे isms फारसे समजत नाहीत म्हणून हे प्रश्न . धन्यवाद

अम्रीकेत मोनोपॉलिस्टीक प्रॅक्टिसेस च्या विरुध्ध कायदे आहेत असे ऐकतो . हि माहिती खरी आहे का ?

हो.

तसा कायदा भारतात सुद्धा आहे.(अधिक माहीती इथे)

--

म्हणजे अम्रीकेत पण कॅपिटॅलिसम ला अडथळे असणारे कायदे आहेत का ?

हो. आहेतच. प्रश्नच नाही.

--

उत्तर हो असल्यास पुढील प्रश्न : म्हणजे अम्रिक शुध्ध कॅपिटॅलिस्ट देश नाही का

युएसए हा शुद्ध कॅपिटलिस्ट देश नाही.

--

मग जगातील शुध्ध कॅपिटॅलिस्ट देश कुठला ?

शुद्ध कॅपिटलिस्ट देश खरंतर नाहीये. पण अमेरिकेपेक्षाही जास्त कॅपिटलिस्ट म्हंजे --- स्विट्झर्लंड, सिंगापूर हे देश.

--

अम्रीकेत मोनोपॉलिस्टीक प्रॅक्टिसेस च्या विरुध्ध कायदे आहेत असे ऐकतो . हि माहिती खरी आहे का ?
याचे उत्तर नाही असे असल्यास काही काळा पूर्वी मायक्रोसॉफ्ट कुठलीतरी केस ठरल्याचे ऐकले होते , ते नक्की काय होते.

कायदे आहेतच. अँटीट्रस्ट म्हणतात त्याला.

आणि अमेरिकन सरकारच्या दोन भिन्न डिपार्टमेंट्स त्या कायद्याच्या अंमलबजावणीत गुंतलेल्या आहेत - Federal Trade Commission, and Dept of Justice.

मायक्रोसॉफ्ट प्रमाणे इतरही केसेस आहेत.

कॅपिटलिझम मधे मोनोपोली ला अवश्य वाव आहे. उदा फेसबुक ही जवळपास मोनोपोलीच आहे. तसं बघितलं तर कोणतेही पेटंट हे सुद्धा मर्यादित कालाची मोनोपोलीच आहे व असते. अमेरिकेत सुद्धा.

माझे व्यक्तीगत मत हे की मोनोपोलीबद्दल सरकारने टॉलरंट असायलाच हवे. कारण सरकार स्वतः प्रचंड मोनोपोलिस्टिक वागते.

कळीचा मुद्दा हा आहे की - (अमेरिकन कोर्टाच्या निर्वाळ्यानुसार) मोनोपोली असणे हे कायद्यानुसार कमी समस्याजनक आहे. मोनोपोलिस्टिक वागणे (उदा. अरेरावी) ह्याकडे कायदा जास्त लक्ष देतो. दुसरं म्हंजे त्या कायद्याची जबाबदारी स्पर्धकांचे रक्षण करणे ही नसून स्पर्धा प्रक्रियेचे रक्षण करणे ही आहे. मायक्रोसॉफ्ट वर नेमका हाच आरोप झाला होता की मोनोपोली आहे पण तिचा वापर स्पर्धा प्रक्रिया मारून टाकण्यासाठी केला गेला.

सिंगापूर एक अति छोटा देश आहे. त्यामुळे तिथे व्यवसाय , व्यापार, उत्पादन,संशोधन, यात फार जास्त complexity नसलेले व्यवहार होतात त्यामुळे तिथे विशुध्ध कॅपिटलीसम पाळणे जास्त सोपे/ सुकर आहे असे म्हटले तर योग्य ठरेल का ? का काही वेगळीच कारणे आहेत ( आणि वरची कारणे अजिबात बरोबर नाहीत )

हा अतिअपेक्षित, ठरलेला प्रतिवाद आहे.

मग उलट उदाहरण देतो. क्युबा. अतिछोटे राष्ट्र, फारशी धार्मिक, भाषिक, वांशिक विविधता नसलेले. पण आपण ते साम्यवादी राष्ट्र म्हणून स्वीकारतोच ना ?
उत्तर कोरिया सुद्धा तसाच ... खूप छोटा देश. फारशी धार्मिक, भाषिक, वांशिक विविधता नसलेला. त्याचं काय ?

--

तुमच्या विशुद्धतेवरील एम्फॅसिस च्या मागे तुमचं लाईन ऑफ थिंकिंग असं आहे -- (१) एखादा मोठाथोरला विशुद्ध कॅपिटलिझम राबवणारा देश असावा, (२) त्यामधे अनेक दशके (preferably शतके) कॅपिटलिझम प्रचलित असावा, (३) त्याचे रिझल्ट्स तपासावेत, (४) मग त्या रिझल्ट्स चा अभ्यास करून भारतात कितपत कॅपिटलिझम असावा (किंवा असावा की नसावा) याचा निर्णय** घ्यावा.

समस्या ही आहे की त्या मोठ्याथोरल्या देशातले लोक पण हीच अपेक्षा बाळगून असतील की त्यांना पण एखादी Tried, Tested, QA Certified व्यवस्था दुसर्‍या देशातून आयात करता यावी.

याचा परिणाम .... प्रत्येक देश ट्रायल-अँड-एरर पद्धत वापरण्यात होतो. व हीच वस्तुस्थिती आहे.

** आता कदाचित तुम्ही असं म्हणाल की --- "मी भारतात काय असावे व/वा नसावे याबद्दल काहीच बोलत नैय्ये. मी फक्त माझ्या माहीतीसाठी विचारतोय."

मग उलट उदाहरण देतो. क्युबा. अतिछोटे राष्ट्र, फारशी धार्मिक, भाषिक, वांशिक विविधता नसलेले. पण आपण ते साम्यवादी राष्ट्र म्हणून स्वीकारतोच ना ?

प्रश्न स्वीकारास्वीकाराचा नसावा; नाही. मोठ्या यू.एस.एस.आरमधल्या साम्यवादाचं काय झालं? चीनमधला साम्यवाद कितपत शुद्ध आहे? क्यूबा छोटं राष्ट्र आहे म्हणून कदाचित तिथे साम्यवाद त्यातल्यात्यात शुद्ध रूपात टिकला का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रश्न स्वीकारास्वीकाराचा नसावा; नाही. मोठ्या यू.एस.एस.आरमधल्या साम्यवादाचं काय झालं? चीनमधला साम्यवाद कितपत शुद्ध आहे? क्यूबा छोटं राष्ट्र आहे म्हणून कदाचित तिथे साम्यवाद त्यातल्यात्यात शुद्ध रूपात टिकला का?

उदाहरण ग्राह्य असणे किंवा नसणे हा उपमुद्दा आहे.

त्या उदाहरणातील व्यवस्था कितपत टिकली किंवा टिकली नाही तो पुढचा मुद्दा आहे.

आता तुम्ही म्हणाल की - का/कसे ? त्याचे उत्तर हे की त्याठिकाणचे रिझल्ट्स चेक करायचे व नंतर त्या रिझल्ट्स मधे आपल्याला हवे ते रिझल्ट्स मिळाले किंवा नाही ते पहायचे व नंतर कोणत्या उदाहरणाप्रमाणे चालायचे तो विचार करायचा.

हो तसेच , आणि उगा त्रागा करू नका.उत्तरे संपत आली कि चिडचिड होतेच.( तरी बरेच लढवलेत तुम्ही ) इथे cuba किंवा साम्यवादाचा प्रश्न नाहीये. कारण इथे कोणीही हिरीहीरींनी साम्यवाद कसा भारी हे सांगत नाहीये ( unlike)..तुमचे जर म्हणणे असेल कि साम्यवादापेक्षा कॅपिटलीसम जास्त बरा आहे तर मी पण डबल आवाजात तेच म्हणीन.क्रमश:

आणि जग इव्होल्व होतंय वगैरे काय अध्यात्मिक justification देताय. जग कायमच इव्होल्व होत आहे आणि होत राहणार. मग त्या कारणाने हे तुमचे सब बीमारी का इलाज कॅपिटलीसम कायमच मृगजळ ठरणार का ?आणि जर कॅपिटलीसम इव्होल्व होतोय वगैरे म्हणणे असेल तर होऊ दे कि इव्होल्व त्याला , पूर्ण तयार झाला कि कि बघेल जग त्याच्या कडे.

तुमचे दररोज बरेच मुद्दे कॅपिटलीसम च्या नियमावर घासून त्यावर जजमेंट पास करण्याची पध्धत बघून मला खरोखर संघ आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते यांची आठवण आली. तेही प्रत्येक गोष्ट बरोबर चूक पेक्षा त्यांच्या पोथीनुसार बरोबर आहे का पडताळून मगच त्याविषयी बोलतात.अजून खूप कॉमन सेन्स होल्स इन द अरगुमेन्ट आहेत ,पण लिहिण्यावर खूप मर्यादा आहेत कधी पुण्यात वगैरे आलात तर अजून चर्चा/वाद घालू शकतो.मी हा वाद कॅपिटलीसम विरोधक म्हणून घालत नव्हतो. पोथीनिष्ठा विरोध म्हणून घालत होतो.

तुमचे दररोज बरेच मुद्दे कॅपिटलीसम च्या नियमावर घासून त्यावर जजमेंट पास करण्याची पध्धत बघून

वावावा. अगदी शंभर टक्के रिटायर्ड सोशालिस्ट सारखे बोललात. समजलं नाही की लगेच "पोथीनिष्ठ", "अव्यवहार्य", "भारतास लागू नसणारे", "पाश्चिमात्यांचे अंधानुकरण" असल्या समाजवाद्यांच्या आवडत्या संज्ञा फेकायच्या. आणि आपणच कसे समाजनिष्ठ आहोत याची खुशीची गाजरं खात स्वतःचीच दाढी कुरवाळत बसायचं.

तुम्हाला सर्वगृहितकसम्राट हा किताब दिला पाहिजे.

गब्बर प्रत्येक मुद्दा हा कॅपिटलिझम च्या नियमावर घासून पाहतो हे तुमचे गृहितक आहे. विचार करायचाच नाही असा निर्धार केला की अशी गृहितकं करता येतात.

कॅपिटलिझम हे एक फ्रेमवर्क, अर्थशास्त्र हे दुसरे फ्रेमवर्क. ही दोन मी अनेकदा वापरतो. काही वेळा फक्त व्यक्तीवाद हे फ्रेमवर्क वापरतो. सामाजिक विषयांवर मी काही वेळा इन्स्टिट्युशनल विश्लेषणाचे फ्रेमवर्क वापरतो.

----

तुमचे दररोज बरेच मुद्दे कॅपिटलीसम च्या नियमावर घासून त्यावर जजमेंट पास करण्याची पध्धत बघून मला खरोखर संघ आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते यांची आठवण आली. तेही प्रत्येक गोष्ट बरोबर चूक पेक्षा त्यांच्या पोथीनुसार बरोबर आहे का पडताळून मगच त्याविषयी बोलतात.अजून खूप कॉमन सेन्स होल्स इन द अरगुमेन्ट आहेत ,पण लिहिण्यावर खूप मर्यादा आहेत कधी पुण्यात वगैरे आलात तर अजून चर्चा/वाद घालू शकतो.मी हा वाद कॅपिटलीसम विरोधक म्हणून घालत नव्हतो. पोथीनिष्ठा विरोध म्हणून घालत होतो.

तुमचा मुद्दा नखशिखांत हास्यास्पद आहे.

व्यवस्थेबद्दल पोथीनिष्ठा नसणे म्हंजे व्यवस्थेतील बदलाचे स्वागत करणे नाही का ? परिवर्तनशील, त्रुटी दूर करणारी and therefore ever-evolving विचारसरणी ही पोथिनिष्ठतेच्या नेमकी विरुद्ध असते हे तुम्हाला न समजण्याइतके तुम्ही अविचारी वाटत नाही.

पण सामोपचाराचा, समंजसतेचा आव आणायचा आणि घिश्यापिट्या संज्ञा फेकून आपण कसे वयस्कर, conciliator भिष्माचार्य आहोत हे ठसवायचा यत्न करायचा म्हंटला की हवे तसे प्रतिसाद टंकता येता.

मी रिटायर्ड नाही , सोशालिस्ट तर अजिबात नाही ( कालच अनुताईंनी मला भांडवल शाह हि पदवी दिली आहे ) पण तुमची पोथीनिष्ठा बघून गहिवरून आलं. बाकी चालू दे ,तुमच्या स्वतःच्याच एकेक स्टेटमेंट मध्ये स्वतःच गुरफटत गेलात तेव्हा चीड चीड साहजिक आहे . एक वेळ विशुध्ध कॅपिटालिस्ट (? ☺) किंवा अगदी कॅमुनिस्ट सुध्धा चालेल ... पोथीनिष्ठ हा प्रकार गंभीर...

तुमच्या स्वतःच्याच एकेक स्टेटमेंट मध्ये स्वतःच गुरफटत गेलात तेव्हा चीड चीड साहजिक आहे .

येस, लेफ्टनंट जनरल नियाझी.

वा वा , झकास !!! ( हे sarcastic नाही ) मन गये पोथीनिष्ठ ( हे आहे )अवांतर : आपण व्यवसाय करता कि नोकरी ?

मन गये पोथीनिष्ठ ( हे आहे )

तुमच्यासारखं मावा खाऊन पचापचा थुंकून नाक्यावर अर्वाच्य शिव्या देत टपोरीगिरी करण्यापेक्षा पोथिनिष्ठता केव्हाही बरी.

--

अवांतर : आपण व्यवसाय करता कि नोकरी ?

नोकरी.

>>>>>>तुमच्यासारखं मावा खाऊन पचापचा थुंकून नाक्यावर अर्वाच्य शिव्या देत टपोरीगिरी करण्यापेक्षा पोथिनिष्ठता केव्हाही बरी.

हे काय आहे गब्बर सिंग ? कोणाबद्दल लिहीत आहेत तुम्ही ? काय लिहिताय तुम्ही ?

या थराला कोणाहीबरोबर चर्चा करणे शक्य नाही .

असो .

या थराला कोणाहीबरोबर चर्चा करणे शक्य नाही .

उच्चस्तरीय चर्चा करण्याबद्दल तुम्हाला जर इतकी फिकीर असती तर तुम्ही - गब्बर चा कोणता प्रतिसाद हा पोथीनिष्ठ आहे, व तो कसा पोथीनिष्ठ आहे - त्याची कारणं दिली असतीत. दुसरा कुठला आक्षेप सापडला नाही म्हणून स्वतःला फार विचारी सिद्ध करण्यासाठी पोथिनिष्ठ हा शब्दप्रयोग केलात तुम्ही. वर आणि "तुमच्या स्वतःच्याच एकेक स्टेटमेंट मध्ये स्वतःच गुरफटत गेलात तेव्हा चीड चीड साहजिक आहे" असली डायलॉगबाजी केलीत. ती सुद्धा कोणतीही स्पेसिफिक उदाहरणं न देता. खरंतर तुम्ही चर्चा केलीच नाही. तुम्ही फक्त प्रश्न विचारलेत. मी तुम्हाला उत्तरं दिली. त्यातून तुम्ही स्वतःच्याच गृहितकांच्या आधारावर "पोथिनिष्ठ", "गुरफटत गेलात" असली डायलॉगबाजी केलीत. "जग इव्होल्व होतंय वगैरे काय अध्यात्मिक justification देताय" हा डायलॉग तुमचाच. इव्होल्युशन हा आध्यात्मिक मुद्दा कशावरून ?

तुमच्या या मवालीगिरीला चोख प्रत्युत्तर देणे भाग होते. There must be disincentives for bad behavior.

आणि जग इव्होल्व होतंय वगैरे काय अध्यात्मिक justification देताय. जग कायमच इव्होल्व होत आहे आणि होत राहणार. मग त्या कारणाने हे तुमचे सब बीमारी का इलाज कॅपिटलीसम कायमच मृगजळ ठरणार का ?आणि जर कॅपिटलीसम इव्होल्व होतोय वगैरे म्हणणे असेल तर होऊ दे कि इव्होल्व त्याला , पूर्ण तयार झाला कि कि बघेल जग त्याच्या कडे.

मज्जाच मज्जा. संज्ञा/शब्द हे कसे मजेशीर असतात ना !!!

मी इव्होल्युशन च्या ऐवजी "स्पाँटेनियस ऑर्डर" ही संज्ञा वापरली असती तर कदाचित तुम्ही "आणि जग इव्होल्व होतंय वगैरे काय अध्यात्मिक justification देताय. जग कायमच इव्होल्व होत आहे आणि होत राहणार." ही असली डायलॉगबाजी केली नसतीत.

माझं म्हणणं हे आहे की तुम्ही अत्यंत निरागसतेचा आव आणून प्रश्न विचारता आहात. पण त्यामागे दडलेली तुमची "इग्नोरन्स मधून आलेली होस्टिलिटी" लपवता येत नाहीये तुम्हाला.

-

आता उत्तर - परिवर्तनशील व्यवस्था असावी असा मुद्दा आहे. प्रत्येक विचारी व्यक्तीला ती हवीहवीशी वाटते. आणि कॅपिटलिझम इज रिस्पॉंडिंग टू दॅट. हे अनिष्ट आहे का ??

मग परिवर्तनशील व्यवस्था ही उत्क्रांतीच्या वाटेने जाईल की नाही ?

आणि त्या व्यवस्थेत त्रुटी असल्या (ज्याबद्दल मी आधीच बोललो आहे), व त्यांच्यावर तोडगे विकसीत होत असतील तर ते तुम्हाला नको आहे का ??

-

तर होऊ दे कि इव्होल्व त्याला , पूर्ण तयार झाला कि कि बघेल जग त्याच्या कडे.

हसावे की रडावे !!!

अहो आजच्या लोकांनी काय करावे ?? का जिंदगीभर वाट पाहत रहावी ?? की कब होगा कॅपिटलिझम इव्हॉल्व्ह और कब बनेगी हमारी बात ??

शुध्ध कॅपिटालिस्ट देश जगात नाही असे आपण म्हणता.याचे कारण काय असावे ? असे काही कारण आहे का , कि the world is not yet ready for capitalism का या इसम मध्ये काही मुलभूत त्रुटी आहेत ? इथे आपण एकटेच कॅपिटलीसम चा प्रामाणिकपणे आणि हिरीहीरीने पुरस्कार करताना दिसता. आपणास कॅपिटलीसम हि संपूर्ण निर्दोष, सर्वोत्तम आणि तरीही प्रॅक्टिकल व्यवस्था आहे असे वाटते का ?

(१) कॅपिटलिझम ही पूर्णपणे निर्दोष आहे असं कुणीच म्हणू शकणार नाही. भांडवलवादातील त्रुटी
(२) शुद्ध कॅपिटलिस्ट देश जगात नाही कारण उत्क्रांती होते आहे. भांडवलवाद हा इव्हॉल्व्ह होतोय. याच्या अनेक थियरीज असू शकतील. विल्यम बॉमॉल यांच्या थियरी नुसार या इव्होल्युशन चे खालील चार टप्पे आहेत -

___________(अ) state-guided capitalism
___________(ब) oligarchic capitalism
___________(क) big-firm capitalism
___________(ड) entrepreneurial capitalism

(३) सर्वोत्तम - हो. माझ्या माहीतीत तरी जास्त चांगली पर्यायी व्यवस्था नाही.
(४) यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारणार आहात की - भांडवलवादात अनेक त्रुटी असूनही ती सर्वोत्तम कशी ??

१) तुमच्या कॅपिटलिझम च्या ??? --- कॅपिटलिझम तुमचा पण आहेच की. जेव्हा जेव्हा तुम्ही लेबर ची गच्छंती करून मशीन आणता तेव्हा तेव्हा तुम्ही हायपर-कॅपिटलिस्ट निर्णय घेता. उदा

गब्बु - ऐसीवर कदाचित फक्त बापटाण्णा च भांडवलदार असतील. आपल्यासारखे उरलेले ९०-९५ टक्के लोक त्यांच्यासारख्या भांडवलदारांकडे नोकरी करतो.
स्वता भांडवलशहा असुन भांडवलशाही ला नावे ठेवणे ( उगाचच आणि खोटीखोटी ) हे भारतातल्या भांडवलशहांची जुनीच टॅक्टीस आहे.

भांडवल शहा म्हणजे नक्की काय ? ( किंवा आपल्याला काय अभिप्रेत आहे )?

कसलं हो तुमचं फडतूस Airbnb! चार गौरेतर ग्राहकांनी तक्रार केली तर लगेच पॉलिश्या बदलतं. असल्या फडतुसांची बाजू तुम्ही घ्याल असं वाटलं नव्हतं हो! उलट Airbnb हे क्रोनी क्यापिट्यालिस्ट कसं आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उलट Airbnb हे क्रोनी क्यापिट्यालिस्ट कसं आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं पाहिजे.

तुम्हाला अनुत्तीर्ण़ करण्यात येत आहे.

भलत्याच मुद्द्यामधे भलतीच संज्ञा वापरल्याबद्दल.

होय मी लगेच जाऊन क्रोनी कॅपिटॅलिझमची व्याख्या पाहीली ती अशी होती की सरकारने म्हणए कंपन्यांना मदत करणे, टॅक्स कपात वगैरे देऊन. म्हणजे सरकारने कंपन्यांना फेव्हर करणे. बरोबर आहे Airbnb मध्ये तसे काहीही झालेले नाहीये.

उलट Airbnb हे क्रोनी क्यापिट्यालिस्ट कसं आहे हे तुम्ही सिद्ध करून

तरीही त्याच-त्या प्रकारच्या बातम्यांवर त्याच-त्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्याच-त्या सदस्यांकडून आल्या की तोच-तो किंचित कंटाळा यायला लागतो. मग मन रिझवण्यासाठी कायतरी विनोद करावे लागतात. त्यातून ते विनोद स्वतःवर किंवा परिस्थितीजन्य किंवा

१. कधीतरी, आमच्यासारख्या फडतुसांची करमणूक म्हणून का होईना, एखादी कंपनी क्यापिटॅलिझमची पोथीचं योग्य रीतीने पठण करत नाहीये असं म्हणा की ओ!
२. तुमच्या गुडबुकात येण्यासाठी Airbnb ने 'दंड भरू पण गब्बरला खूष करूनच सोडू' असं अजिबातच म्हटलेलं नाही.
३. Airbnb तुम्हाला आवडेलसं वागत नाही तर तुम्ही कशाला त्यांची बाजू घेता? तुमच्या भावना दुखावलेल्या स्पष्टच दिसत आहेत; त्याचा निचरा होऊ दे. आंब्याची फोड खाताना खालच्या, मधल्या पटाशीच्या दातांमध्ये आंब्याच्या रेषा अडकल्या की फ्लॉस करेस्तोवर त्रास होत राहतो तसा तुम्हाला होऊ नये म्हणून त्यांना क्रोनी, फडतूस असं काहीबाही म्हणून टाका ना!

तुमचा हा त्रास मला आता बघवत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचा हा त्रास मला आता बघवत नाही.

मेरे लिये भी क्या कोई उदास बेकरार है !!!

माणसाने आपलं घर कुणाला भाड्याने द्यायचे व कुणाला नाही याचा निर्णय सुद्धा घेऊ नये ?

घरमालक आपलं घर कुणाला भाड्याने द्यायचे व कुणाला नाही याचा निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि तेव्हा फेअर हाउसिंगचे नियम लागू होत नाहीत. बघा. http://www.nolo.com/legal-encyclopedia/does-the-federal-fair-housing-act...

एअरबीएनबी ही तर खाजगी कंपनी आहे, त्यांनी ह्या डिसक्रीमीनेशनच्या लफड्यात पडायला नको होते, घरमालक काय ते बघून घेतील असं म्हणून सरळ हात वर करायला हवे होते. आता भोगा आपल्या कर्माची फळं.

खाज.

दुसरं काय ?

धागावरती अशा तडतडी फुलबाज्या पेटू लागल्या तर आम्ही घरी कसं जायचं? Sad मिलिंद यांचा मुद्दा मला १००% पटलेला होता तेवढ्यात तुम्ही २००% पटणारा मुद्दा आणुन ठेवलात आता मिलिन्द ३००% मग तुम्ही ४००. Sad
घरी जाऊ की नको आज? Smile

एअरबीएनबीविषयी मी गब्बरसाठी स्वतंत्र प्रतिसाद लिहितो आहे.

१. 'ब्रॅंड व्हॅल्यू' ही संकल्पना कॅपिटॅलिस्टिक आहे की सोशालिस्ट?
२. जर एखाद्या प्रकारच्या वर्तणुकीमुळे आपली ब्रॅंड व्हॅल्यू घटते आहे असं कंपनीला वाटत असेल तर कंपनीने ते रोखण्यासाठी पावलं उचलावी की नाही?
३. अशी पावलं उचलली तर त्याविरुद्ध तक्रार करण्याची सोय किंवा स्वातंत्र्य त्या कंपनीच्या स्टेकहोल्डर्सना आहे की नाही? अर्थातच त्या कंपनीचा स्टेकहोल्डर असण्या-नसण्याचा विकल्प अबाधित आहेच.
४. वरच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या संदर्भात - एअरबीएनबीने जे केलं त्यावर हरकत नक्की का घेता यावी?
५. वैयक्तिक डिस्क्रिमिनेशनचा हक्क जरी मान्य केला, तरी तसं डिस्क्रिमिनिशेन करतात की नाही यानुसार आपल्या कंपनीचे भाग असावेत की नाही हे डिस्क्रिमिनिशेन करता येण्याच्या एअरबीएनबीच्या अधिकाराचं काय?

गब्बरच्या वतीने पार्शियल प्रतिसादः
'ब्रॅंड व्हॅल्यू' ही संकल्पना कॅपिटॅलिस्टिक नाही आणि सोशालिस्टपण नाही. ती मार्केटिंग संकल्पना आहे.
सेथ गोडिनने थोडक्यात सांगितलेले असे: ‘A brand’s value is merely the sum total of how much extra people will pay, or how often they choose, the expectations, memories, stories and relationships of one brand over the alternatives.’

बाकी चालू द्या.

माझा प्रश्न असा आहे, की ब्रॅंड व्हॅल्यू हा एखाद्या कंपनीचा अॅसेट समजला जावा की नाही? जर तो अॅसेट असेल तर त्याला मार्केटचे नियम लागू होतात. याच अर्थाने मी कॅपिटॅलिस्ट की सोशालिस्ट असा प्रश्न विचारला होता.

ब्रॅंड व्हॅल्यू हा एखाद्या कंपनीचा अॅसेट समजला जावा की नाही? जर तो अॅसेट असेल तर त्याला मार्केटचे नियम लागू होतात.

ब्रँड व्हॅल्यु ही मार्केटिंग ची व अर्थशास्त्रीय संकल्पना आहे.

कंपनीचा अ‍ॅसेट आहे व असतो.

त्याला मार्केट चे नियम लागू होतातच. प्रश्नच नाही.

२. जर एखाद्या प्रकारच्या वर्तणुकीमुळे आपली ब्रॅंड व्हॅल्यू घटते आहे असं कंपनीला वाटत असेल तर कंपनीने ते रोखण्यासाठी पावलं उचलावी की नाही?
३. अशी पावलं उचलली तर त्याविरुद्ध तक्रार करण्याची सोय किंवा स्वातंत्र्य त्या कंपनीच्या स्टेकहोल्डर्सना आहे की नाही? अर्थातच त्या कंपनीचा स्टेकहोल्डर असण्या-नसण्याचा विकल्प अबाधित आहेच.
४. वरच्या प्रश्नांच्या उत्तरांच्या संदर्भात - एअरबीएनबीने जे केलं त्यावर हरकत नक्की का घेता यावी?
५. वैयक्तिक डिस्क्रिमिनेशनचा हक्क जरी मान्य केला, तरी तसं डिस्क्रिमिनिशेन करतात की नाही यानुसार आपल्या कंपनीचे भाग असावेत की नाही हे डिस्क्रिमिनिशेन करता येण्याच्या एअरबीएनबीच्या अधिकाराचं काय?

हरकत नाही ओ. घरमालकांना डिस्क्रिमिनेशन न करू देण्याचा निर्णय हा कंपनीचा आहे. ज्यांना आपले घर एअरबीएनबी वर भाड्याने द्यायचे नसेल त्यांनी देऊ नये. हे मी आधीच अप्रत्यक्ष ध्वनित केलेले आहेच.

खरंतर डिस्क्रिमिनेशन करणे हे डिस्क्रिमिनेशन करणार्‍याला सुद्धा तोटा करवणारे असते. उदा. घरमालकाने असे जर लिहिले की माझे घर मी अमक्या धर्माच्या लोकांना भाड्याने देणार नाही. त्यांच्याविरुद्ध मी भेदभाव करणार. असे जर त्याने लिहिले तर एका क्षणात त्याच्या कस्टमर्स ची संख्या घटते. कारण त्या विशिष्ठ धर्माचे ग्राहक (भाडेकरू) त्याने त्याच्या संभाव्य ग्राहकांच्या संचातून थेट काढून टाकले. कस्टमर ची संख्या घटली तर त्याने स्वतःहून आपली डिमांड कमी केली. व डिमांड कमी म्हंजे त्याला मिळणारी प्राईस कमी. याचा परिणाम त्याने स्वतःचे थेट नुकसान करून घेतले.

माझा मुद्दा अर्थशास्त्राच्या पलिकडचा आहे. प्रेफरन्सेस चा आहे. Technically economics does not take any position on the taste of people. व नेमका इथेच माझा मुद्दा सुरु होतो. इथे मी इन्फॉर्मल मुद्दा मांडत आहे की "विवाहाचा जोडीदार निवडताना आपण भेदभाव करतो ना ? कारण तो प्रायव्हेट निर्णय असतो" तसे माझे घर भाड्याने कुणाला द्यायचे व कुणाला नाही हा प्रायव्हेट निर्णय आहे. तिथे मी भेदभाव करू इच्छितो. मग तिथे मला "भेदभाव करण्यास मज्जाव का केला जावा ?".

माझा मुद्दा ना कॅपिटलिस्ट आहे ना अर्थशास्त्रीय. माझा मुद्दा या दोन्हीच्या बाहेरचा आहे. व्यक्तीगत प्रेफरन्सेस, टेस्ट चा आहे. प्रेफरन्सेस ची गळचेपी व्हावी का - हा आहे ?

उदा. घरमालकाने असे जर लिहिले की माझे घर मी अमक्या धर्माच्या लोकांना भाड्याने देणार नाही. त्यांच्याविरुद्ध मी भेदभाव करणार.

गब्बर, गब्बर. उत्तर तावातावाने द्यायचे नाही. लिहिले की पुन्हा एकदा वाचून बघायचे. Smile
धर्म हा प्रोटेक्टेड क्लास आहे.

गब्बर, गब्बर. उत्तर तावातावाने द्यायचे नाही. लिहिले की पुन्हा एकदा वाचून बघायचे.

मान्य. हॅट्स ऑफ्फ.

भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) हे वरवर पाहता बेकायदा (इल्लीगल) नाही जर ते प्रोटेक्टेड क्लासच्या विरुद्ध नसेल तर.
उदाहरणार्थ, १. जर एखाद्या स्टार्टअपमध्ये १५ पेक्षा कमी नोकर असतील, तर डिस्क्रिमिनेशन चालू शकते.
२. वयाच्या बाबतीत अट ४०+ आहे. मी ३९ वर्षाच्या व्यक्तीला तू म्हातारा/म्हातारी असल्याने वजन उचलायच्या कामाला लायक नाही असे म्हणून फायर करू शकतो.
३. मी टक्कल असलेल्यांना घर भाड्याने देणार नाही, असं म्हणू शकतो कारण टक्कल असणारी व्यक्ती प्रोटेक्टेड क्लासमध्ये येत नाही. फेडरल नियमानुसार प्रोटेक्टेड क्लास आहेत आणि स्टेट त्यात सुधारणा करून "भर" टाकू शकते (पण फेडरल प्रोटेक्टेड क्लास कमी करू शकत नाही.) अजून एक उदाहरण म्हणजे समजा मी हॉटेल चालवतो आणि म्हणालो की चांगले गायक/गायिका यांनाच नोकरी देईन, तर ते शक्य आहे कारण गाण्याची पात्रता ही प्रोटेक्टेड क्लास नाही. (पण मी पुरुष गायक आणि स्त्री गायिका यांच्यात भेदभाव करू शकणार नाही.)

प्रोटेक्टेड क्लासला पण अपवाद आहे. काही-काही कामे करायला पुरुषच हवे असतात किंवा स्त्रियाच हव्या असतात. अशा वेळी Bona Fide Occupational Qualification चा संबंध येतो. पुरुषांच्या कपड्याची जाहिरात करायला पुरुषच हवे असतात. तसेच व्हिक्टोरिया सिक्रेटची जाहिरात करायला स्त्रीयाच हव्या असतात. काही कंपन्या BFOQ चा वापर चतुरपणे करून घेतात. उदाहरणार्थः हूटर्स ते म्हणतात की ते हॉटेल/खाद्यपदार्थ पुरवण्याच्या उद्योगात नाहीत, तर entertainment business मध्ये आहेत. ते वेट्रेस म्हणत नाहीत, हूटर गर्ल्स म्हणतात. दर वेळी ही ट्रिक चालत नाही. साउथवेस्ट एअरलाइन्सने फक्त तोकडे कपडे घालणार्‍या मुलींना एअरहोस्टेस म्हणून घेतले आणि तेच आमचे ब्रँडिंग आहे, असा दावा केला. पण तो टिकला नाही कारण साउथवेस्ट एअरलाइन्स मुळात "वाहतूक" उद्योगात आहे आणि तिथे एअरहोस्टेसचे काम स्त्रिया आणि पुरुष दोघे करू शकतात.

एअरबीएनबी कंपनीने पण असा दावा करायला हवा होता की भाड्याने घर देऊ इच्छिणारे घरमालक आणि घर तात्पुरते घेऊ इच्छिणारे भाडेकरू यांना जुळवून देणारी ती इंटरमिडियरी कंपनी आहे. ते स्वतः घरे भाड्याने देणारे नाहीत कारण स्टेट लॉ काय आहे ते समजाऊन घ्यायची जबाबदारी घरमालकाची आहे, एअरबीएनबी ची नाही. उदाहरणार्थः मॅरिटल स्टेटस आणि सेक्शुअल ओरिएंटेशन कॅलिफोर्नियात प्रोटेक्टेड आहे, टेक्सासमधे नाही. टेक्सासमधला घरमालक म्हणाला की मी एका बेडरूममध्ये फक्त लग्न झालेल्या जोडप्यांनाच राहायला देईन, तर तो तसे करू शकतो, पण कॅलिफोर्नियात ते डिस्क्रिमिनेशन होईल. या सगळ्या भानगडीतून लांब राहणे एअरबीएनबीसाठी कदाचित योग्य ठरले असते. पण ती कंपनी स्वतः कॅलिफोर्नियातली आहे, खाजगी आहे आणि कंपनी मॅनेजमेंटच म्हणतीय की आम्ही या बाबतीत लक्ष घालू, मग इतर कोण काय म्हणणार?

तळटीपः घरमालकाला डिस्क्रिमिनेशन करायचेच असेल तर तो/ती ते करू शकतात. आजचाच अनुभवः २४ तासात घरमालकाने भाड्याची रिक्वेस्ट अक्सेप्ट केली नाही तर ती रद्द होते.

माझा मुद्दा अर्थशास्त्राच्या पलिकडचा आहे. प्रेफरन्सेस चा आहे. Technically economics does not take any position on the taste of people. व नेमका इथेच माझा मुद्दा सुरु होतो

बरोब्बर. मी यावरच चर्चा करण्याचा प्रयत्न करत होतो. व्यक्तीगत प्रेफरन्स ही एक वन-झीरो एंटिटी नसते. वेगवेगळ्या व्हेरिएबल्सचा तो परिपाक असतो. उदाहरणार्थ -
"विल यू स्लीप विथ मी इफ आय गिव्ह यू अ मिलियन डॉलर्स?"
"ओह, शुअर"
"व्हॉट इफ आय गिव्ह यू ट्वेंटी डॉलर्स?"
"आय अॅम नॉट अ होअर"
"वी ऑलरेडी डिसायडेड दॅट यू आर. नाउ वुई आर जस्ट हॅगलिंग द प्राइस"

त्या बाईचा वैयक्तिक प्रेफरन्स हा एका व्हेरिएबलच्या किमतीनुसार बदलला. तसे इतर अनेक व्हेरिएबल्स असतात - उदाहरणार्थ कदाचित तिने काही ड्रग घेतलेलं असेल, किंवा जगातल्या पुरुषांची संख्या घटून एकावर आली... वगैरे वगैरे तर ती फुकटातही तयार होऊ शकते. तुमच्या मते सर्व एक्स्टर्नल कंडिशन्स या फेअर असल्या पाहिजेत. म्हणजे इतरांनी जे आपले प्रेफरन्सेस निवडले आहेत त्यांचा काहीच परिणाम होता कामा नये. दुर्दैवाने हे शक्य नाही, कारण बऱ्याच वेळा एक्स्टर्नल कंडिशन्स या इतरांच्या प्रेफरन्समधून येतात. याला कन्सेसस प्रेफरन्स डिपेंडंट कन्स्ट्रेंट्स अशी तांत्रिक टर्म वापरता येईल. हे सी.पी.डी.सी. नाकारून चालत नाहीत कारण प्रत्येकच व्यक्तीच्या कुठच्याही प्रेफरन्स कन्फॉर्मंट अॅक्शनमुळे इतरांवर त्यांचा परिणाम होत असतो. अॅक्शन मान्य करायची पण रिअॅक्शन नाकारायची हे चालत नाही.

माझा मुद्दा ना कॅपिटलिस्ट आहे ना अर्थशास्त्रीय. माझा मुद्दा या दोन्हीच्या बाहेरचा आहे. व्यक्तीगत प्रेफरन्सेस, टेस्ट चा आहे. प्रेफरन्सेस ची गळचेपी व्हावी का - हा आहे ?

दॅट्स सो नाइव्ह. अर्थशास्त्राच्या पलिकडे काही नाही. कुठलीही ट्रॅंझॅक्शन झाली की तिचे नियम अर्थशास्त्राच्या अखत्यारीत येतात. दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन एकमेकांशी इलेक्ट्रॉन्स शेअर करून पोटेन्शियल मिनिमा गाठतात तेव्हाही त्यांना गव्हर्न करणारे नियम हे अर्थशास्त्राचेच असतात. तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला मायक्रो पातळीवर एखाद्या गॅस मोलेक्यूल हवा तसा भटकायला हवा आहे. मात्र संपूर्ण गॅसमुळे जे प्रेशर येतं, त्याचा त्या मोलेक्यूलवर परिणाम व्हायला नको आहे.

दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन एकमेकांशी इलेक्ट्रॉन्स शेअर करून पोटेन्शियल मिनिमा गाठतात तेव्हाही त्यांना गव्हर्न करणारे नियम हे अर्थशास्त्राचेच असतात.

उपमा जास्तच ताणली काय?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

त्या बाईचा वैयक्तिक प्रेफरन्स हा एका व्हेरिएबलच्या किमतीनुसार बदलला. तसे इतर अनेक व्हेरिएबल्स असतात - उदाहरणार्थ कदाचित तिने काही ड्रग घेतलेलं असेल, किंवा जगातल्या पुरुषांची संख्या घटून एकावर आली... वगैरे वगैरे तर ती फुकटातही तयार होऊ शकते. तुमच्या मते सर्व एक्स्टर्नल कंडिशन्स या फेअर असल्या पाहिजेत. म्हणजे इतरांनी जे आपले प्रेफरन्सेस निवडले आहेत त्यांचा काहीच परिणाम होता कामा नये. दुर्दैवाने हे शक्य नाही, कारण बऱ्याच वेळा एक्स्टर्नल कंडिशन्स या इतरांच्या प्रेफरन्समधून येतात. याला कन्सेसस प्रेफरन्स डिपेंडंट कन्स्ट्रेंट्स अशी तांत्रिक टर्म वापरता येईल. हे सी.पी.डी.सी. नाकारून चालत नाहीत कारण प्रत्येकच व्यक्तीच्या कुठच्याही प्रेफरन्स कन्फॉर्मंट अॅक्शनमुळे इतरांवर त्यांचा परिणाम होत असतो. अॅक्शन मान्य करायची पण रिअॅक्शन नाकारायची हे चालत नाही.

कारण बऱ्याच वेळा एक्स्टर्नल कंडिशन्स या इतरांच्या प्रेफरन्समधून येतात - हे इन्फर्मेशन कॅसकेड च्या जवळपास जाते असं मला वाटतंय. सुशील भिकचंदानींचे क्षेत्र.

---

दॅट्स सो नाइव्ह. अर्थशास्त्राच्या पलिकडे काही नाही. कुठलीही ट्रॅंझॅक्शन झाली की तिचे नियम अर्थशास्त्राच्या अखत्यारीत येतात. दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन एकमेकांशी इलेक्ट्रॉन्स शेअर करून पोटेन्शियल मिनिमा गाठतात तेव्हाही त्यांना गव्हर्न करणारे नियम हे अर्थशास्त्राचेच असतात. तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला मायक्रो पातळीवर एखाद्या गॅस मोलेक्यूल हवा तसा भटकायला हवा आहे. मात्र संपूर्ण गॅसमुळे जे प्रेशर येतं, त्याचा त्या मोलेक्यूलवर परिणाम व्हायला नको आहे.

कुठलीही ट्रॅंझॅक्शन झाली की तिचे नियम अर्थशास्त्राच्या अखत्यारीत येतात. - हे नाकारत नाहिये मी.

पण त्यापलिकडे जाऊन (वर तुम्हीच म्हंटलंच आहे तसं) प्रेफरन्सेस चा विचार व्हावा.

प्रेफरन्सेस चा विचार व्हावा म्हंजे - उदा. कोणते घटक ह्या प्रेफरन्सेस वर प्रभाव टाकतात ? हे असं किती प्रमाणावर आहे. यातून आणखी काय होऊ शकतं ?

जर इन्फर्मेशन कॅस्केड घडत असेल तर लोकं ही रॅशनल एजंट आहेत या मूलभूत गृहितकालाच धक्का पोचतो. एखाद्या सेमीरॅशनल माणसाला फारतर अशा इर्रॅशनल समाजात राहायचं की नाही हाच विकल्प हाती राहातो. पण आपल्या आणि समाजाच्या रॅशनॅलिटीच्या मर्यादा नाकारायच्या का? बहुतांश बाबतीत कॅसकेड होत नाही, पण तरीही मुद्दा लागू राहातोच.

एअरबीएनबीच्या बाबतीत सगळ्यांना डिस्क्रिमिनेट करण्याचा तत्त्वतः अधिकार आहे. पण 'कंपनी किंवा कंपनीतले लोक असं करतात' ही लोकांच्या मनातली प्रतिमा कंपनीच्या बॉटमलाइनला धक्का देणारी असेल तर? कंपनीसाठी ही एक्स्टर्नल कंडिशन आहे, पण ती इतर समाजातल्या लोकांच्या प्रेफरन्समुळे आलेली आहे. ते प्रेफरन्सेस बरोबर की चूक याबद्दल चर्चा करता येईल. मात्र सगळ्यांनाच ते प्रेफरन्सचं स्वातंत्र्य मिळाल्यावर काहींच्या स्वातंत्र्यावर परिणाम होणारच. गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असेल तर लाल सिग्नलला थांबण्याचं बंधन येतं तसंच.

मात्र सगळ्यांनाच ते प्रेफरन्सचं स्वातंत्र्य मिळाल्यावर काहींच्या स्वातंत्र्यावर परिणाम होणारच.

होय काळे लोक व एअरबीएनबीदोहोंना स्वातंत्र्य मिळाले, दोघे आपापल्या जागी adamant (अडून) राहीले तर खाली हायलाइट केलेली परिस्थिती उद्भवते -
.
https://scontent-ort2-1.xx.fbcdn.net/t31.0-8/14324274_1753532501587428_7121689075309846918_o.jpg
.
अशावेळी कोणीतरी नमते घेणे भाग आहे. आणि मग एअरबीएनबी ही मूठभर/इवलीशी असल्याने व त्यामानाने काळे लोक, एशिअन लोक हे जास्त असल्याने, कोणाच्या तरी हट्टाची पायमल्ली होणार. एअरबीएनबी तरीही अडून राहीली तर तिची प्रतिमा कोसळणारच, त्या कंपनीला बहुसंख्यांच्या विरोधाचा सामना करावा लागणार व अशा नाहीतर तशा रीतीने लॉस हा होणारच. तेव्हा एअरबीएनबी ला इकडे आड तिकडे विहीर आहे.

गाडी चालवण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असेल तर लाल सिग्नलला थांबण्याचं बंधन येतं तसंच.

ह्या बाबतीत असं वाचल्याचं आठवतंय की ट्रॅफिक सिग्नल सिस्टिम ही "को-ऑर्डिनेशन फेल्युअर" वर उपाय्/तोडगा आहे.

--

एअरबीएनबीच्या बाबतीत सगळ्यांना डिस्क्रिमिनेट करण्याचा तत्त्वतः अधिकार आहे. पण 'कंपनी किंवा कंपनीतले लोक असं करतात' ही लोकांच्या मनातली प्रतिमा कंपनीच्या बॉटमलाइनला धक्का देणारी असेल तर? कंपनीसाठी ही एक्स्टर्नल कंडिशन आहे, पण ती इतर समाजातल्या लोकांच्या प्रेफरन्समुळे आलेली आहे. ते प्रेफरन्सेस बरोबर की चूक याबद्दल चर्चा करता येईल. मात्र सगळ्यांनाच ते प्रेफरन्सचं स्वातंत्र्य मिळाल्यावर काहींच्या स्वातंत्र्यावर परिणाम होणारच.

केनेथ अ‍ॅरो च्या इम्पॉसिबिलिटी थेरम चा परिणाम असाच काहीतरी असावा. मला ते काही धड समजलेलं नाही. आमची गणितात नेहमीची बोंब असते ... त्याचा परिणाम.

प्र. का. टा. आ.

पाने