ही बातमी समजली का - ११८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____

भाजपच्या सोशल मीडीया स्ट्रॅटेजीचं एका आप कार्यकर्त्यानं विश्लेषण केलं तेव्हा त्याला काय आढळलं ह्याचा एक रोचक वृत्तांत -
I work for AAP: This is what tracking BJP on Twitter revealed to me

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

म्यूनिच , जर्मनी: इस्लामी टेरर हल्ल्यात सहा ठार.

म्यूनिच , जर्मनी: इस्लामी टेरर हल्ल्यात सहा ठार. तीन हल्लेखोर अजून मुक्तच !
http://www.cnn.com/2016/07/22/europe/germany-munich-shooting/index.html

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

http://swarajyamag.com/politi

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

तर अमेरिकेत लष्करी क्रांती होईल !

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

एकाकी लांडग्यांच्या (Lone Wolf Terrorist) हल्ल्यांविरुद्ध उपाय!

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

आयायटी आणि आयएसबी ग्रॅज्युएट मुलींचे पाळणाघर

ह्यात काय वाइट वाटण्यासारखे

ह्यात काय वाइट वाटण्यासारखे आहे ते कळले नाही. चर्चा त्याच संबंधात होती म्हणुन तसे म्हणले गेले असेल.
काही वाईट दिवस वगैरे आले नाहीयेत, चांगली इंव्हेस्टमेंट होइल. लोकांना जॉब मिळतील. तंत्रज्ञान अपडेट होइल.
समाजवादी चोर भुंकतील, त्यांच्याकडे लक्ष नसते द्यायचे.

आम्ही अमेरिकेचे पाळीव कुत्रे नाही

आम्ही अमेरिकेचे पाळीव कुत्रे नाही हे दाखविण्याचा एक केविलवाणा प्रयत्न !

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

जर्मनी : १७ वर्षाच्या अफगाण

जर्मनी : १७ वर्षाच्या अफगाण मुलाने केला प्रवाशांवर प्राणघातक हल्ला

http://www.loksatta.com/desh-videsh-news/germany-police-kill-afghan-teen...

हॉरिबल . भडव्यास ठार मारले हे योग्यच झाले.

हॉरिबल . भडव्यास ठार मारले हे योग्यच झाले. पण पाश्चिमात्य देशांनी आपल्या बॉम्बिंग मध्ये , ड्रोन हल्ल्यांमध्ये किती निरपराध नागरिक मारत आहेत याचाही विचार केला पाहिजे. इस्लामी हल्लेखोरांना इतिहास वगैरे ठाऊक नसते, त्यांचा राग सध्याच्या घटनांवर असतो.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

विमानातून असे "आंधळे" बॉम्बिंग करणे हा भ्याडपणा आहे!

https://www.yahoo.com/news/suspected-u-coalition-strikes-kill-56-civilia...
पाश्चिमात्यांच्या बॉम्बिंगमध्ये असे निरपराध्यांचे मृत्यू सतत घडत आहेत. विमानातून असे "आंधळे" बॉम्बिंग करणे हा भ्याडपणा आहे. सरळ सैनिक पाठवा आणि आयसिसचा पूर्ण पाडाव करा . 25,000 सैन्य पाठविल्यास हे एक महिन्यात करता येईल असे जनरल्सचे म्हणणे आहे .

दुसरी कडे बापट साहेबांच्या

दुसरी कडे बापट साहेबांच्या धाग्यावर मी लिहीले होते त्याचे हे उदाहरण. ज्या देशाचे नागरीक आहोत त्या देशाच्या विरुद्ध दुसर्‍या देशांच्या लोकांसमोर बोलु नये इतकी कमीत कमी अपेक्षा तरी नागरीकांकडुन करायला हरकत नाही.

कोणा भारतीयाने, पाकीस्तानच्या संस्थाळावर जाऊन, भारत आहेच युद्धखोर असे म्हणले तर बरे वाटेल का?

काय संबंध

हे कैच्या कै वाटले. अनु राव यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देशाच्या विरुद्ध लिहिले म्हणजे देशद्रोह केला आहे की काय? देशाचे एखादे धोरण पटत नसेल तर त्याविरुद्ध बोलण्याचीही सोय नसावी ही तर टीपिकली वाळवंटी पॉलिसी झाली.

हे कैच्या कै वाटले. अनु राव

हे कैच्या कै वाटले. अनु राव यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देशाच्या विरुद्ध लिहिले म्हणजे देशद्रोह केला आहे की काय? देशाचे एखादे धोरण पटत नसेल तर त्याविरुद्ध बोलण्याचीही सोय नसावी ही तर टीपिकली वाळवंटी पॉलिसी झाली.

बोलावे की. भारतीयांनी भारतीयांशी बोलताना भारताच्या पॉलिसी बद्दल नावे ठेवावीत की. पण भारताच्या पॉलिसींबद्दल पाकीस्तानी नागरीकांच्या सभेत जाऊन टीका करु नये.
मी देशद्रोह केला असे म्हणले नाही. पण घरातल्या गोष्टी घरातच चर्चेला घ्याव्यात. शेजार्‍याकडे जाऊन घरच्यांबद्दल वाईटसाईट बोलु नये.

:(

टीनएजर मुलांना इसिस इतकं आकर्षित का करतं याचा अभ्यास झाला पाहिजे. दोन तीन हिंदू मुलं सुद्धा इसिस मध्ये गेली असं मधे वाचलं होतं.

गर्दीतला दर्दी

मोठी, प्रसिद्धीपूर्ण संधी

धारावीच्या झोपडपट्टीत क्रिकेट खेळणाऱ्या एक पंधरा वर्षाच्या पोराला जर अचानक वर्ल्ड कप मध्ये सिक्सर मारून कप जिंकण्याची संधी दिली तर त्याला किती थोर वाटेल ? तितकीच मोठी, प्रसिद्धीपूर्ण संधी आयसिस आपल्या "योध्यांना" इस्लामचे ( "न्यायाचे"!!!) राज्य प्रस्थापित करण्यासाठी देते (निदान त्या कल्चर ला तरी तसे वाटते !). अतिरेकी हे आपल्या कल्चर कडून वाखाणणी होण्यासाठी हल्ले करतात हे माहिती आहेच. अशी वाखाणणी होणे बंद करणे हा एक महत्वाचा उपाय आहे. "तुझ्या हल्ल्यांमुळे आज आमच्यावर ड्रोन (किंवा बॉम्बहल्ला ) झाला " असे म्हटले जावे असा अमेरिकेचा प्रयत्न दिसतो.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

मुस्लिम मुलांना असं वाटावं हे

मुस्लिम मुलांना असं वाटावं हे ठीक पण हिंदू - ख्रिस्ती मुला-मुलींना ( भलेही संख्येने कमी का असेना ) हे याड का ?

गर्दीतला दर्दी

सभोवतालची सामाजिक,आर्थिक परिस्थिती अत्यंत नकोशी .

सभोवतालची सामाजिक,आर्थिक परिस्थिती अत्यंत नकोशी झालेली असणे ? (जे 'तिसऱ्या जगात" सहज शक्य असते!) "काहीतरी करून " तिच्यात बदल घडवून आणावासा वाटणे ?

पण पाश्चिमात्य देशांनी आपल्या

पण पाश्चिमात्य देशांनी आपल्या बॉम्बिंग मध्ये , ड्रोन हल्ल्यांमध्ये किती निरपराध नागरिक मारत आहेत याचाही विचार केला पाहिजे.

पाश्चिमात्य देश जगभर बाँम्ब टाकत असतात असा उगाचच समज ह्या वाक्यातुन तयार होतोय. ह्या देशांनी भारतावर बॉम्ब टाकले नाहीत, थायलंड वर नाही, भुतान वर नाहीत. काहीतरी कारण असेल ना की त्यांना वाळवंटातच बॉम्ब टाकावे असे वाटते.

बरं पाश्चिमात्य देशांचा गेल्या ४० वर्षातला ट्रॅक रेकॉर्ड असा नाही की त्या देशातले सरकारनी अजिबात विरोध केला नाही तरी हे देश गम्मत म्हणुन बॉम्ब टाकतात. सद्दाम नी सत्ता सोडली असती लगेच बुश नी सांगीतल्यावर तर कशाला कोणी बॉम्ब टाकले असते. म्हणजे सद्दाम च्या सत्तेला चिकटुन रहाण्याच्या मुळे इराक वर बॉम्ब पडणार असतील तर सद्दाम दोषी नाही का? त्याला त्याच्या सत्ते पुढे हजारो इराकी लोकांच्या आयुष्याबद्दल काहीही वाटले नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगाचे शहेनशहा लागतात काय ?

सद्दामनी सत्ता सोडली असती लगेच बुशनी सांगीतल्यावर तर कशाला कोणी बॉम्ब टाकले असते?
तुम्ही विनोद म्हणून ही अतिशयोक्ती करत आहात असे मी मानायला तयार आहे. नाहीतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगाचे शहेनशहा लागतात काय ? इराकी मरत होते, आणि ते बंद करणे आवश्यक होते हे मान्यच आहे . इस्राएल सकट सर्व देश याबाबत अपयशी ठरले होते किंवा ही हिम्मतच दाखवत नव्हते .पण "सर्जिकल स्ट्राईक " करून सद्दामला मारण्याऐवजी ज्या हडेलहप्पी प्रकाराने अमेरिकेने हे युद्ध हाताळले त्यामुळे लाखो लोक अधिक मेले आहेत.

हम्म

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगाचे शहेनशहा लागतात काय ?

या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर तुम्हीच दिलेय बॉ.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर तुम्हीच दिलेय बॉ.

बॉ, कारण इस्राएलसकट सर्व देश सद्दामला हटविण्यात अपयशी ठरले होते किंवा ही हिम्मतच दाखवत नव्हते. आसपासचे सर्व देश सद्दाममुळे अस्थिर झाले होते-इराणवर त्याने हल्ला केला होताच, कुवैतही बळकावले होते, सौदी त्याच्या प्लॅनमधले पुढचे लक्ष्य होते , आणि , इझ्राएललाही प्रचंड धोका निर्माण झाला होता .

भक्ती इज़ स्ट्राँग विथ धिस

भक्ती इज़ स्ट्राँग विथ धिस वन. तिकडे मिडल ईस्टमध्ये काहीही होऊदे, अमेरिकेला मॉरल राईट काहीही नव्हता तिथे जाऊन काड्या करायचा. हां आता दादागिरी केली म्हणत असाल तर कबूल आहे. त्याला फालतूचे लेबल कशाला लावायचे?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

लाखभर लोक मेल्यावरच असा "नैतिक" अधिकार निर्माण होतो ?

साधारणपणे सद्दामच्या जैविक किंवा रासायनिक शास्त्रांनी न्यूयॉर्क किंवा तेल अव्हीव मधले लाखभर लोक मेल्यावरच असा "नैतिक" अधिकार निर्माण होतो असे तुमचे म्हणणे दिसते. आणि इराकमध्ये कोणतीही महासंहारक अस्त्रे सापडली नाहीत हा अत्यन्त गैरलागू मुद्दा आहे . कोणताही केमिकल किंवा बायोलॉजिचा प्रोफेशनल माणूस तुम्हाला सांगेल की केमिकल खतांचा कारखाना एक आठवड्यात रासायनिक शस्त्रे बनविण्यासाठी बदलता येतो. तसेच व्हॅक्सिनचा कारखाना जैविक अस्त्रांसाठी . अशी सर्व तांत्रिक क्षमता, पैसा आणि राजकीय इछाशक्ती असलेली अरब जगात एकच राजवट होती, ती म्हणजे सद्दामची. रासायनिक अस्त्रे वापरण्याची त्याची तयारीही होती: पाच हजार कुर्द आणि पन्नास हजार इराणी त्याने रासायनिक शस्त्रांनी मारलेही होते. असो !

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

अहो झोपेचे सोंग घेतलेले

अहो झोपेचे सोंग घेतलेले साहेब, माझा मुद्दा सोपा आहे. सद्दामने लाख लोक मारले तरी अमेरिकेला तिथे जाऊन ** घालायचा शाटमारी अधिकार नाही. तुमच्या भक्तियोगाप्रमाणे असेल तर चालूद्यात बॉ. वॉशिंग्टनस्मरण जय जय आम्रिका!

पण ते अमेरिकेतही आज जॉर्ज बुशला शिव्या घालतात लोकं, तुम्ही कुठल्या काळात जगताहात? केमिकल वेपन्सचा पुरावा नै मिळाला म्हणतात. तुम्हांला इतकं कळतंय तर जाऊन सांगा की त्यांना, सगळे तपासणी करणारे लोक अडाणचोट आहेत म्हणून. कॉन्स्पिरशी थेरिस्ट कुठले. उद्या आरेसेसने आयसिसला पैसा पुरवला वगैरे शोधही तुम्ही लावाल याची पूर्ण खात्री आहे. शुभेच्छा!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

वाळवंटात फक्त टेररिष्टच राहतात , नॉर्मल लोक राहातच नाहीत ?

वाळवंटात फक्त टेररिष्टच राहतात , नॉर्मल लोक राहातच नाहीत असा समज या प्रतिक्रियेतून तयार होतोय .

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

हो, म्हणजे काय? ह्यात काहीच

हो, म्हणजे काय? ह्यात काहीच शंका नाहीये.

या बाईंना वाळवंटा सोडून यायला

या बाईंना वाळवंटात सोडून यायला पाहिजे . (स्माईल) हलके घेणे

गर्दीतला दर्दी

"बाई... वाळवंटात जा..." -

"बाई... वाळवंटात जा..."
- भगवू मुले

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

नाही हो, उलट वाळवंटी

नाही हो, उलट वाळवंटी प्रेमींना वाळवंटात सोडायला पाहिजे.

वाळवंटात फक्त टेररिष्टच

वाळवंटात फक्त टेररिष्टच राहतात / रहायला पाहिजेत असं तुम्ही म्हणालात म्हणून तसे म्हंटले हो. मला तुम्ही वैचारिक टेररिष्ट वाटता. (डोळा मारत)

गर्दीतला दर्दी

तुम्हाला वॉटबाउटरी हा शब्द

तुम्हाला वॉटबाउटरी हा शब्द माहिती आहे का ओ?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

शब्द माहिती आहे. त्याची सध्याच्या संदर्भातली प्रस्तुती ?

शब्द माहिती आहे. त्याची सध्याच्या संदर्भातली प्रस्तुती समजली नाही . निरपराधी मारले जाणे आणि त्याबद्दल सूडाचे अतिरेकी हल्ले होणे हा कार्यकारणभाव समजणे इतके अवघड नसावे!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

सद्दाम नी इराणचे लाखो निरपराध

सद्दाम नी इराणचे लाखो निरपराध लोक मारले, कीती इराणी लोकांनी इराक मधे बॉम्ब फोडले किंवा सुरे घेउन बस मधे लोकांना मारले?
अश्याच लाखो निरपराध लोकांना मारले गेल्याच्या सत्यकथा वाळवंटात आहेत. त्याचा बॅकलॅश असा आल्याचा बघितला नाहे.

कीती इराणी लोकांनी इराक मधे बॉम्ब फोडले ?

कारण ती दोन सार्वभौम देशातली समसमान लढाई होती . टेररिस्टांच्या बाबतीत शत्रूराष्ट्राची सर्व शक्ती त्यांच्या विरोधात असते . ते छुपे हल्लेच करू शकतात .( हे अतिरेक्यांचे समर्थन अजिबात नाही-फक्त वस्तुस्थितीचे दर्शन आहे .)

कोळसा बाजारातलं डिस्रप्शन

http://mobile.reuters.com/article/idUSKCN0ZT2UA

भारत कोळसा निर्यातदार होण्याची शक्यता.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मेक फॉर इंडिया प्लीज

मेक फॉर इंडिया प्लीज

हे नक्की बघा, मस्त आहे

हे नक्की बघा, मस्त आहे मजेशीर.

http://maharashtratimes.indiatimes.com/jokes/Social-Humour/listshow/5322...

हॅहॅहॅ, 'RBIची स्वायत्तता

हॅहॅहॅ,
'RBIची स्वायत्तता धोक्यात' असा आरडाओरडा करणारे चेपू-अर्थशास्त्री लोक याबद्दल काय मत देतात याबद्दल उत्सुक आहे.
http://www.hindustantimes.com/business-news/upa-pressed-rbi-to-cut-rates...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

"त्यांनी" गाय मारली की आपण वासरू मारलेच पाहिजे, नाही का?

"त्यांनी" गाय मारली की आपण वासरू मारलेच पाहिजे, नाही का? आर्थिक प्रगतीच्या बाबतीत कोण अधिक सुमार आहे/होते हे कळेनासे झाले आहे . अशा वेळी अर्थव्यवस्थेला नकली झळाळी देण्यासाठी अर्थपुरवठा वाढविण्याचा आग्रह केवळ अर्थमंत्री किंवा पंतप्रधानच नाही, तर पक्षाकडूनही होतो- हे होणे स्वाभाविक , पण चुकीचे आहे.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

पटले नाही

अर्थव्यवस्थेची काळजी केवळ आरबीआय गवर्नरांना आहे. अर्थमंत्री/पंतप्रधानांना त्याचे सोयरसुतक नाही या गृहितकावर आधारित अकलेला प्रतिसाद वाटतोय.

अर्थव्यवस्थेची काळजी केवळ

अर्थव्यवस्थेची काळजी केवळ आरबीआय गवर्नरांना आहे. अर्थमंत्री/पंतप्रधानांना त्याचे सोयरसुतक नाही या गृहितकावर आधारित अकलेला प्रतिसाद वाटतोय.

मुद्दा -- कोणाचा संबंध आहे यापेक्षा कशाचा संबंध आहे याचा आहे. नियम. रूल्स बेस्ड मॉनेटरी पॉलिसी ही जास्त परिणामकारक असते. Rules versus Discretion.

नाही- एकीकडे कमी कर,

नाही- एकीकडे कमी कर, अर्थपुरवठ्यात वाढ-त्यामुळे गुंतवणुकीला चालना, पण चलनफुगवटा आणि महागाई , तर विरुद्ध बाजूला कराचे अधिक प्रमाण , त्यामुळे पैशाचा पुरवठा कमी होऊन महागाईवर नियंत्रण -पण गुंतवणूक कमी होणे असे ते सनातन द्वंद्व आहे . ही रस्सीखेच कायम चालू असते . राजकारणी आणि आणि रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांचे रोल्स एकमेकांविरुद्ध असतात . दोन्ही बाजूंनी चर्चेतून देशहिताचा निर्णय घेणे अपेक्षित असते . अमेरिकेचा तथाकथित महान अर्थतज्द्न्य ऍलन ग्रीनस्पॅन याने व्याजाचे दर शून्यापाशी नेऊन ठेवले. त्यामुळे स्थावर मालमत्तेच्या बाजारात प्रचंड फुगा निर्माण होऊन तो एक दिवस फुटला (२००८) आणि अमेरिकाच काय, पण सर्व जग धोक्यात आले.

पुरावा

निळ्या भागाबद्दल - दोघांचे रोल्स एकमेकाविरुद्ध असतात व तरीही दोघांनी एकत्र यावे ?? कोल्युजन हे इष्ट आहे ??

--

तांबड्या भागाबद्दल - खालील प्रश्नांचे उत्तर द्याच.

मग गेली अनेक वर्षे जे व्याजदर शून्यापाशी आहेत (पुरावा) ते वाढवत का नाहीत येलेन बाई ? बाय द वे आज गेली अनेक वर्षे हे व्याज दर ग्रीनस्पॅन यांच्या कालातील (व विशेषतः २००० - २००७) दरांपेक्षा कमी आहेत. खूप कमी. (तोच पुरावा पुन्हा पहा. पुरावा).

आत्ता इतके कमी इंट्रेष्ट रेट्स आहेत (ग्रीन्सपॅन पेक्षा ही कमी) ... मग रियल इस्टेट मधे बबल होण्याची शक्यता नाहिये का ? मग येलेन बाई रेट्स वाढवत का नाहियेत ??

कोल्युजन हे इष्ट आहे ??

मग येलेन बाई रेट्स वाढवत का नाहियेत ??: अमेरिकेचा शेअर बाजार कोसळेल म्हणून !
दोघांचे रोल्स एकमेकाविरुद्ध असतात व तरीही दोघांनी एकत्र यावे ?? : हे चूक ठरेल हे मान्य आहे . पण मग राजकीय नेतृत्व पुरेसे सुजाण नसेल तर , तीव्र मतभेदांनंतर रिझर्व्ह बँक गव्हर्नरला पद सोडावे लागेल . (जे नुकतेच भारतात झाले आहे !)

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

मग येलेन बाई रेट्स वाढवत का

मग येलेन बाई रेट्स वाढवत का नाहियेत ??: अमेरिकेचा शेअर बाजार कोसळेल म्हणून !

पण शेअर बाजार कोसळू नये म्हणून राबवलेल्या धोरणांमुळे स्थावर मालमत्तेच्या बाजारात फुगा निर्माण होणार नाही का ?

फुगा निर्माण झाला, फुटला आणि क्रायसिस झाला तर कोण जबाबदार ? येलेन ह्या केनेशियन आहेत. ग्रीनस्पॅन हे फ्री मार्केट वाले आहेत. व येलेन यांच्या कालात व्याजदर हे ग्रीनस्पॅन यांच्या कालातील व्याजदरांपेक्षा खूप कमी आहेत. मग क्रायसिस येऊन मंदी आली तर तुम्ही येलेन ला सुद्धा "महान अर्थशास्त्री" अशी उपाधी देणार का ?

फुगा/"महान अर्थशास्त्री"

स्थावर मालमत्तेच्या बाजारात फुगा निर्माण होणार नाही का ?: अजून तरी फुगा आलेला नाही; 2008 च्या दाहक आठवणी जाग्या असाव्यात. मधून मधून "रेट वाढवणार" अशा वावड्या उठत असतातच .
तुम्ही येलेन ला सुद्धा "महान अर्थशास्त्री" अशी उपाधी देणार का ? मग क्रायसिस येऊन मंदी आली तर काळजी घेण्याचे काम कुणाचे ? हे भानामतीने रातोरात होत नाही . जो/जी कोणी अर्थव्यवस्थेची xई घालेल तिला लक्षणीय उपाध्या मिळणे स्वाभाविक आहे .

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

हे भानामतीने रातोरात होत नाही

हे भानामतीने रातोरात होत नाही . जो/जी कोणी अर्थव्यवस्थेची xई घालेल तिला लक्षणीय उपाध्या मिळणे स्वाभाविक आहे .

अर्थव्यवस्थेची xई घालणार्‍यांमधे अतिसामान्य बॉरोअर्स सुद्धा होते की. त्यांना कर्ज मिळताना मार्केट व्हॅल्यु च्या आधारावरच कर्ज मिळाले. व मार्केट व्हॅल्यु ही त्यांनीसुद्धा वाढवत वाढवत नेली. म्हंजे बबल च्या निर्मीतीत त्यांचेही योगदान होते. ती सुद्धा परतफेडीची क्षमता नसताना कर्जे काढून... व मार्केट मधे पैसा ओतून.

तपशील - (१) सबप्राईम रेट ची व्याख्या पहा व त्याला सबप्राईम का म्हणतात ते सुद्धा पहा - म्हंजे मला काय म्हणायचंय ते लक्षात येईल. (२) व जोडीला तुमच्या आवडत्या केन्स चे समर्थक असलेल्या हायमन मिन्स्की चा मिन्स्की मोमेंट म्हंजे काय ते इथे वाचलेत तर - परतफेड करण्याची क्षमता नसतानाही कर्जे काढून घरांमधे गुंतवणूकी करणार्‍यांचे "प्रताप" लक्षात येतील. त्यां अतिसामान्यांनीपण अर्थव्यवस्थेची *ई व बा* दोन्ही घातले होते ते उपाध्यांचे खरे हकदार आहेत.

----

अजून तरी फुगा आलेला नाही; 2008 च्या दाहक आठवणी जाग्या असाव्यात. मधून मधून "रेट वाढवणार" अशा वावड्या उठत असतातच .

Sound economic thinking also implies that rate increase will reduce the uncertainty around "when" the rates will rise.

"प्रिडेटरी लेन्डिंग " वगैरे कांगाव्यावर माझाही विश्वास नाही .

अर्थव्यवस्थेची xई घालणार्‍यांमधे अतिसामान्य बॉरोअर्स सुद्धा होते की. त्यांना कर्ज मिळताना मार्केट व्हॅल्यु च्या आधारावरच कर्ज मिळाले. व मार्केट व्हॅल्यु ही त्यांनीसुद्धा वाढवत वाढवत नेली. म्हंजे बबल च्या निर्मीतीत त्यांचेही योगदान होते.: पूर्णपणॅ मान्य! "प्रिडेटरी लेन्डिंग " वगैरे कांगाव्यावर माझाही विश्वास नाही . कर्ज घेणाऱ्याने आपल्याला ते झेपणार आहे का ते पाहायला हवे.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

दहशतवादाला धर्म नसतो.

फ्रान्समध्ये शांतिदूतांच्या स्नेहमेळाव्यात ८० लोक स्वर्गवासी झाले.

https://www.theguardian.com/world/live/2016/jul/14/nice-bastille-day-fra...

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

30 out of 84 victims of the Nice attack were Muslim

30 out of 84 victims of the Nice, France attack were Muslim, 20 being Tunisians like the killer.
http://www.la-croix.com/Religion/Islam/A-Nice-plus-d-un-tiers-des-victim...
It is also possible that he thought his estranged wife and kids will be at the venue and he could kill them.
He was a known homosexual with multiple partners.

काय किळसवाणा प्रकार आहे.

काय किळसवाणा प्रकार आहे. दहशतवादी मुसलमान आहे असे म्हणायचे नाही म्हणून व्हिक्टिम लिस्टमध्येही मुसलमान आहेत हेच ठासून सांगायचे, सो दॅट हल्लेखोराच्या आयडेंटिटीबद्दल लोकांची दिशाभूल करणे सोपे जाईल. अतिशय किळस येते या प्रकाराची.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

'सत्याची" इतकी ऍलर्जी असणे तब्येतीला वाईट!

'सत्याची" इतकी ऍलर्जी असणे तब्येतीला वाईट बरका ! खरे किळसवाणे आहे ते 1.6 अब्ज लोकांना दहशतवादी ठरविणे . परवाच भारतात 22,000 उलेमांनी दहशतवादाविरुद्ध निवेदन काढले, किंवा इजिप्तच्या माध्यमांतून सतत दहशतवादाविरुद्ध घोष चालू असतो या आणि अशा घटनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे , किंवा ते तुमची "मुद्दाम" दिशाभूल करत आहेत असा 'बिनतोड" प्रतिवाद करणे.
“A skeptic demands to be convinced, a cynic cannot be convinced”.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

सत्याची अ‍ॅलर्जी मला नाही,

सत्याची अ‍ॅलर्जी मला नाही, तुम्हांला आहे. दुटप्पी अर्ग्युमेंटे करणारांचे अच्छे दिन अलीकडे नाहीयेत ते एक बरेय पण तरी पीळ काही जाता जात नाही म्हणून वेळप्रसंगी टंकणे भाग पडते.

अशा हल्ल्यांच्या नॅरेटिव्हमध्ये आयडेंटिटी सांगायची, पण कन्व्हीनियंट असेल तेव्हाच. ज्याने अ‍ॅटॅक केला त्याची मुस्लिम आयडेंटिटी सांगायची नाही, फक्त बळी गेलेल्यांमधील मुस्लिमांची टक्केवारी सांगायची. बाकीचे लोक काय फुकट मेलेत का? की तुमच्या लेखी त्यांना किंमत नाही? मुसलमानांच्या जिवाची किंमत तुमच्या लेखी जास्त आहे असेच दिसते. शिवाय हल्लेखोर हा रियल मुस्लिम नव्हता छाप अर्ग्युमेंट तर आहेच पण खुद्द आयसिस ओरडून ओरडून सांगतेय की बाबा आम्ही खरे मुसलमान आहोत. दिवसरात्र कुराणाचा जप करणार्‍यांचे खरे मानायचे की चार भाषांतरित लेख वाचून इस्लामपंडित झालो असे मानणार्‍यांचे खरे मानायचे?

शिवाय बाकी काही झालं की १.६ अब्ज चे अर्ग्युमेंटही आहेच. याच्याइतके अडाणचोट लॉजिक आजवर पाहिले नाही. एक उदा. घेतो. ट्यांव ट्यांव करणार्‍यांच्या मते फक्त ३१% की कायशी मते मिळालीत मोदीला. म्हणजे किती असावीत बरे? सहज काही कोटींच्या घरात असावीत. इतक्या मोठ्या संख्येने ज्यांनी मोदीला निवडून दिले, त्यांना एकच एक लेबल लावलेले चालते. ते लोक मात्र सर्वच्या सर्व गोभक्त, मोदीभक्त आणि अजून कसले कसले भक्त असतात. इथे मात्र दरवेळेस १.६ अब्ज हा आकडा फेकायचा ही वैचारिक कोलांटउडी कळत नाही असं वाटतंय का?

परवाच भारतात 22,000 उलेमांनी दहशतवादाविरुद्ध निवेदन काढले, किंवा इजिप्तच्या माध्यमांतून सतत दहशतवादाविरुद्ध घोष चालू असतो या आणि अशा घटनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे ,

हे हजार उलेमांनी यांव केले अन त्यांव केले म्हणून नावाजणारे लोक खरे अडाणचोट आहेत. अशाने उलेमांचे समाजातील स्थान अजून बळकट होते, जे खरेतर आजिबात नको आहे. उलेमा काय, एक डिक्लरेशन करतील आणि पुढल्या फज्जरपर्यंत विसरूनही जातील. पेपरमध्ये एका बातमीशिवाय त्याला शष्प किंमत नसते. अशा डिक्लरेशनचा किती परिणाम झालाय ते कधी पाहिलंय का? ते पहायचे नाही आणि नुसतेच ओरडत रहायचे. कुणाला अ‍ॅलर्जी आहे ते दिसतेच आहे.

A skeptic demands to be convinced, a cynic cannot be convinced”

दिशाभूल करणार्‍या लोकांसमोर सिनिकच व्हायला पाहिजे कारण ते एकदम ढोंगी, दांभिक असतात.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

दिशाभूल करणार्‍या लोकांसमोर

दिशाभूल करणार्‍या लोकांसमोर सिनिकच व्हायला पाहिजे कारण ते एकदम ढोंगी, दांभिक असतात.

अगदी अगदी.

उदा. पर्फेक्ट हे विशेषण फक्त इस्लाम व मुस्लिमांसाठीच जन्माला आलेले आहे असं मानून चालायचं.

A skeptic demands to be convinced, a cynic cannot be convinced”

http://www.independent.co.uk/news/world/asia/70000-indian-muslim-clerics...

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

नुसतीच ट्यांव ट्यांव

वरच्या प्रतिसादातला हा परिच्छेद मुद्दाम दुर्लक्षित केलेला दिसतोय. चालायचेच, उत्तर नसल्यावर दुसरे काय होणार म्हणा.

हे हजार उलेमांनी यांव केले अन त्यांव केले म्हणून नावाजणारे लोक खरे अडाणचोट आहेत. अशाने उलेमांचे समाजातील स्थान अजून बळकट होते, जे खरेतर आजिबात नको आहे. उलेमा काय, एक डिक्लरेशन करतील आणि पुढल्या फज्जरपर्यंत विसरूनही जातील. पेपरमध्ये एका बातमीशिवाय त्याला शष्प किंमत नसते. अशा डिक्लरेशनचा किती परिणाम झालाय ते कधी पाहिलंय का? ते पहायचे नाही आणि नुसतेच ओरडत रहायचे. कुणाला अ‍ॅलर्जी आहे ते दिसतेच आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पण हे सर्व "सत्य" झाले, त्याचे तुम्हाला काय?

उलेमांच्या आवाहनाचा "किती परिणाम झालाय " याच्या इतका मूर्ख प्रश्न मी अजून ऐकला नव्हता . (एकीकडे मुसलमान समाज मुल्लांच्या फार प्रभावाखाली आहे असेही म्हणायचे!) पण आता उघड गोष्टी स्पष्ट करून सांगायची पाळी आली आहे. भारतात 15.5 कोटी मुसलमान आहेत. त्यातले 0.1% (15,500 माणसे ) जरी हिंसेला प्रवृत्त झाले, तर आजच्या टेरर अस्त्रांच्या आणि आयसिस च्या जमान्यात भारताची भयानक हानी होईल. (पंजाबात केवळ 5 हजार टेररिस्ट शिखांनी देश वेठीस धरला होता आणि एक पंतप्रधानही ठार मारला होता; जाऊ द्या-तो खरा इतिहास झाला-तो तुमच्यासाठी नाही !). मध्ये कसाबच्या हल्ल्यात मुंबईच्या मुसलमानांनी हल्लेखोरांचे दफन आपल्या दफनभूमीत करण्यास "ते मुसलमानच नाहीत" असे म्हणत नकार दिला होता. "गाईंची हत्या करू नका, त्याने आपल्या हिंदू बांधवांच्या भावना दुखावतात" असा फतवा देवबंदी उलेमांनी काढला आहे . पण हे सर्व सत्य झाले, त्याचे तुम्हाला काय?

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

उलेमांच्या आवाहनाचा "किती

उलेमांच्या आवाहनाचा "किती परिणाम झालाय " याच्या इतका मूर्ख प्रश्न मी अजून ऐकला नव्हता .

वकिली करायची ठरवलेली असल्यामुळे तसे वाटणारच. उगी उगी.

भारतात 15.5 कोटी मुसलमान आहेत. त्यातले 0.1% (15,500 माणसे ) जरी हिंसेला प्रवृत्त झाले, तर आजच्या टेरर अस्त्रांच्या आणि आयसिस च्या जमान्यात भारताची भयानक हानी होईल.

भारतात ९० कोटी (खरेतर जास्तच) हिंदू आहेत. त्यातले 0.०१६६% (15,500 माणसे ) जरी हिंसेला प्रवृत्त झाले, तर आजच्या दहशतवादाच्या जमान्यात भारताची भयानक हानी होईल.

जर इतके असूनही भगवा दहशतवाद या नावाने ट्यांव्ट्यांव करायची उबळ येते तर बाकीच्यांना इस्लामी दहशतवाद म्हटल्यावर तुमची का जळते?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हे उदाहरण पहा

वकिली करायची ठरवलेली असल्यामुळे तसे वाटणारच. उगी उगी.

अर्धेमुर्धे उत्तर् दिल्याबद्दल बॅट्याला शंभर पैकी पन्नासच मार्क.

उत्तर पूर्ण करतो - एका बाजूला मुसलमानांची वकीली करायची आणि दुसर्‍या बाजूला मुस्लिमेतरांच्या बाबतीत नेमके उलट करायचे. त्यांच्यावर कसेही आरोप कराय्चे. ते तसे खरोखर आहेत का ? किती टक्के आहेत ? त्यांचे विचार व आचरण विसंगत आहे की सुसंगत ? ते त्यांचे विचार त्यांच्यापुरते ठेवतात की त्या विचारांसाठी इतरांवर बलप्रयोग करतात ?? हिंसामार्गाचा अवलंब करतात का ? - याचे विश्लेषण करायचेच नाही. उदा हे उदाहरण पहा - तो रामचंद्र गुहा बोंबलून बोंबलून सांगतोय की भगवा दहशतवाद हा मुस्लिम दहशतवादापेक्षा जास्त खतरनाक आहे. डेटा-बिटा द्यायच्या भानगडीत पडतच नाही तो ... थेट आरोपच. भारतात ८५% हिंदु आहेत, आरेसेस ही हिंदु मेजॉरीटी संघटना आहे, भाजपा हिंदुत्ववादी आहे. And therefore - हा मेजॉरिटेरियनिझम म्हंजे च हिंदु टेरर व हे खतरनाक आहे. झालं संपलं. अनुमान, निष्कर्ष तय्यार.

फिनीस फिनीस फिनीस.

आणि प्रत्यक्ष बाँब फोडायची

आणि निव्वळ प्रत्यक्ष बाँब फोडायची गरज नसते. चिथावणीखोरही तितकेच दोषी असतात आणि त्यांना लाथा न घालणारी इकोसिस्टिमही तितकीच दोषी असते हे कळतंय पण तसे बोलायचे नाही असे ठरवलेलेच आहे त्याला काय करणार गब्बर?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

उलेमांच्या आवाहनाचा "किती

उलेमांच्या आवाहनाचा "किती परिणाम झालाय " याच्या इतका मूर्ख प्रश्न मी अजून ऐकला नव्हता . (एकीकडे मुसलमान समाज मुल्लांच्या फार प्रभावाखाली आहे असेही म्हणायचे!) पण आता उघड गोष्टी स्पष्ट करून सांगायची पाळी आली आहे. भारतात 15.5 कोटी मुसलमान आहेत. त्यातले 0.1% (15,500 माणसे ) जरी हिंसेला प्रवृत्त झाले, तर आजच्या टेरर अस्त्रांच्या आणि आयसिस च्या जमान्यात भारताची भयानक हानी होईल. (पंजाबात केवळ 5 हजार टेररिस्ट शिखांनी देश वेठीस धरला होता आणि एक पंतप्रधानही ठार मारला होता; जाऊ द्या-तो खरा इतिहास झाला-तो तुमच्यासाठी नाही !). मध्ये कसाबच्या हल्ल्यात मुंबईच्या मुसलमानांनी हल्लेखोरांचे दफन आपल्या दफनभूमीत करण्यास "ते मुसलमानच नाहीत" असे म्हणत नकार दिला होता. "गाईंची हत्या करू नका, त्याने आपल्या हिंदू बांधवांच्या भावना दुखावतात" असा फतवा देवबंदी उलेमांनी काढला आहे . पण हे सर्व सत्य झाले, त्याचे तुम्हाला काय?

खालीलपैकी तुमचे नेमके म्हणणे काय आहे, मिलिंदराव ?

तुमचे उत्तर खालीलपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते.

(१) इस्लाम मधे रिफॉर्म्स ची गरज आहे (म्हंजे त्यांच्या धर्मग्रंथांमधे, परंपरांमधे, धर्माचरणाच्या पद्धतीमधे, इस्लाम शिकवला जातो त्या कंटेंट मधे वगैरे)
(२) मुस्लिमांच्या मनोवृत्तीमधे रिफॉर्म्स ची गरज आहे
(३) इस्लामिक उलेमांच्या मनोवृत्ती मधे रिफॉर्म्स ची गरज आहे
(४) वरील (१), (२), (३) पैकी कोणामधेही रिफॉर्म्स ची गरज नाहीये
(५) रिफॉर्म बद्दल तुम्हाला काही म्हणायचंच नाहिये
(६) सर्व् धर्मांमधे रिफॉर्म्स ची गरज आहे
(७) कोणत्याही धर्मात रिफॉर्म ची गरज नाही
(८) धर्म ही संकल्पनाच अबोलिश करणे गरजेचे आहे
(९) मी कोण, कोणाला रिफॉर्म करणारा ?
(१०) इस्लाम, मुस्लिम्स, उलेमा यांच्यावर अजिबात टीका करू नये.
(११) जनरलाईझ करू नये.
(१२) यापेक्षा वेगळे

अगदी अगदी. (१) हिंसा

अगदी अगदी.

(१) हिंसा करणार्‍याची आयडेंटिटी
(२) हिंसा करण्यामागचा हेतू/प्रेरणा
(३) हिंसा ज्यांच्या विरुद्ध झाली त्यांची आयडेंटीटी (त्यातले बहुसंख्य व अल्पसंख्य)

याची "सोयीचा" व "गैर सोयीचा" हे दोन पॅरॅमिटर वापरून मेट्रिक्स बनवायचा. मग चर्चा जास्त meaningful होईल.
.
.
.
Analysis Box

'सत्याची" इतकी ऍलर्जी असणे तब्येतीला वाईट !

'सत्याची" इतकी ऍलर्जी असणे तब्येतीला वाईट बरका ! खरे किळसवाणे आहे ते 1.6 अब्ज लोकांना दहशतवादी ठरविणे . परवाच भारतात 22,000 उलेमांनी दहशतवादाविरुद्ध निवेदन काढले, किंवा इजिप्तच्या माध्यमांतून सतत दहशतवादाविरुद्ध घोष चालू असतो या आणि अशा घटनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे , किंवा ते तुमची "मुद्दाम" दिशाभूल करत आहेत असा 'बिनतोड" प्रतिवाद करणे.
“A skeptic demands to be convinced, a cynic cannot be convinced”.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

मूलभूत प्रश्न विचारण्यातले फ्रेंच सुरक्षेचे अपयशही मोठे आहे

हल्ला करणे हे हॉरिबलच! पण या गर्दीच्या जागी अतिरेकी हल्ला कसा होऊ शकतो आणि कसा थांबविता येईल हा साधा, उघड आणि मूलभूत प्रश्न विचारण्यातले फ्रेंच सुरक्षेचे अपयशही मोठे आहे

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

तुमचा प्रतिसाद वाचुन "मुलींनी

तुमचा प्रतिसाद वाचुन "मुलींनी जिन्स घातल्या तर त्यांच्या वर बलात्कार होणारच, चांगले कपडे घालावेत इतके पण कळत नाही ह्या मुलींना" असे काहीतरी वाचल्यासारखे वाटले.

चार्ली हेब्दो, पॅरिस, ब्रसेल्स या हल्ल्यांनंतर थोडीफार जाग ?

चार्ली हेब्दो, पॅरिस, ब्रसेल्स या हल्ल्यांनंतर सुरक्षा यंत्रणांना थोडीफार जाग येणे अपेक्षित आहे. सामान्य माणसाचा इतका सहज बळी जाणे योग्य नाही . फ्रान्स ची सुरक्षा व्यवस्था एक अतिशय गलथान व्यवस्था म्हणून प्रसिद्धी मिळवत आहे .

तेच की, तुमच्या मते जिन्स

तेच की, तुमच्या मते जिन्स घालणारी मुलगी दोषी आहे बलात्कारी नाही.

बलात्कारी बलात्कार करणारच त्यात त्यांची काहीच चुक नाही ( जसे अतिरेकी बॉम्ब फोडणारच ), मुलींनी नको का काळजी घ्यायला बलात्कार्‍याला संधी न देण्याची ( फ्रांस नी नको का सुरक्षा व्यवस्था वाढवायला? ).

???

त्या मुलीला संरक्षण देऊ न शकणारे पोलीस दोषी (अकार्यक्षम ) आहेत.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

ओके, म्हणजे बलात्कार

ओके, म्हणजे बलात्कार करणार्‍याचा दोष नाहीच. उत्तम आहे.

उपमा मांडताना तुमचा बराच वैचारिक गोंधळ झालेला दिसतो

उपमा मांडताना तुमचा बराच वैचारिक गोंधळ झालेला दिसतो:
बलात्कारी = टेररिस्ट,
मुली = फ्रेंच नागरिक ,
पोलीस = पोलीस
हे तर मान्य आहे? मग आपल्याच उपमेचा विचार करून बघा !
आणि मी टेररिस्ट दोषी नाहीत असे कुठे म्हटले तेही कृपया दाखवून द्या .

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

< हिलरी मोड ऑन > मी निवडुन

< हिलरी मोड ऑन >

मी निवडुन आले की आता "ट्रक कंट्रोल अ‍ॅक्ट" पण लागू करणार आहे. सध्याच्या ट्रक वापरण्याच्या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळेच फ्रांस मधे हा हल्ला झाला. पुढे वेळ पडली तर "कार कंट्रोल अ‍ॅक्ट" आणि मग "सायकल कंट्रोल अ‍ॅक्ट" पण आणणार मी.

< हिलरी मोड ऑफ >

-----------

< मिलिंद मोड ऑन >

बिच्चारे वाळवंटी संत!!!. हाम्रीके सारखी मुक्त-बंदुक पॉलिसी असती तर ह्या संत लोकांना ट्रक चा वापर करावा लागला नसता

< मिलिंद मोड ऑफ >

मरण पत्करायचें की प्रतिकार करायचा ?

< मिलिंद मोड ऑन > टेररिस्टांना जगात कुठेही शस्त्रे सहज मिळवता येतात हे चार्ली हेब्दो आणि पॅरिस हल्ल्यांवरून सिद्ध झाले आहेच. मुद्दा सर्वसामान्य नागरिकांनी आपल्यावर हल्ला होताना तो निमूटपणे स्वीकारून मरण पत्करायचें की प्रतिकार करायचा हा आहे. कोणत्याही हल्ल्यात पोलीस वेळेत कधीच पोचू शकत नाहीत.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

थोडं थांबा, निर्णयाला पोचायची घाई कशाला?

दहशतवादाला धर्म नसतो.

http://www.nbcnews.com/storyline/france-truck-attack/truck-reportedly-pl...
थोड्या दिवसांत कळेलच खरं काय आहे ते.
मुद्दाम एनबीसीची लिंक दिली. प्रेसिडेन्ट बी. हुसेन ओबामाचं पाळीव पेट आहे ते!!!

दहशतवादाला धर्म नसतो.

The increase in lone wolf terrorism in the United States in the last three decades can partly be explained by the adoption and dissemination of the lone wolf tactic by and amongst right wing extremists. For example, in the late 1990s the white supremacists Tom Metzger and Alex Curtis explicitly encouraged fellow extremists to act alone when committing violent crimes. A few years earlier, white supremacist Louis Beam, a former Ku Klux Klan and Aryan Nations member, popularized the strategy of leaderless resistance. He envisaged a scenario where ‘all individuals and groups operate independently of each other, and never report to a central headquarters or single leader for direction or instruction”.

दिशाभूल करण्याच्या

दिशाभूल करण्याच्या असिधाराव्रताबद्दल सादर प्रणाम. सुदैवाने हे गोमय आजकाल कुणी खरेदी करत नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

व्हाईट वर्चस्ववाद्यांबद्दलचा मजकूर सत्य आहे , हे मी विसरलोच होतो

"खऱ्या" ("पवित्र"!!!) गोमयाची मात्र भारतात जबरदस्त चलती आहे . असो. चालायचेच.
आणि वरचा व्हाईट वर्चस्ववाद्यांबद्दलचा मजकूर सत्य आहे , हे मी विसरलोच होतो!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

पुण्यातले रिक्षावाले माजुरडे

पुण्यातले रिक्षावाले माजुरडे आहेत हे विधानही सत्यच आहे हो. पण कुठले सत्य विधान कुठे चिकटवायचे त्याला काही तारतम्य असावे अशी माझी आपली भाबडी समजूत होती बॉ.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बरोबरे, पण

थोडं थांबा, निर्णयाला पोचायची घाई कशाला?

अहो काका, निर्णय काहीही झाला तरी यांची ट्यांवट्यांव तीच असणारे म्हणून त्यांचे वाक्य अगोदरच म्हणून टाकले, बाकी काही नाही.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ओह!

मग जाऊ दे.
च्यायला बॅट्या "तुही पोझिशन कंची? (तुही यत्ता कंची? च्या चालीवर)" असा माझा गोंधळ होतो कधीकधी....
(स्माईल)

च्यायला बॅट्या "तुही पोझिशन

च्यायला बॅट्या "तुही पोझिशन कंची? (तुही यत्ता कंची? च्या चालीवर)" असा माझा गोंधळ होतो कधीकधी....

बहुतांशी फिक्स्ड, अधूनमधून मूडप्रमाणे व्हॅरी होते. (स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

अधूनमधून मूडप्रमाणे व्हॅरी

अधूनमधून मूडप्रमाणे व्हॅरी होते.

त्यालाच गनिमी कावा म्हणतात ना!
शिवाजीचे वंशज तुम्ही!!!!
(स्माईल)

(No subject)

(स्माईल)

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पाशवी हास्य

काल एका पत्रकारामुळे आनंद झाला; आज एक पत्रकाराला सानिया मिर्झाने दिलेली उत्तरं वाचून आनंद झाला.
Watch Sania Mirza Demolish Rajdeep Sardesai When He Asked Her About Motherhood

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राजदीपसुद्धा छुपा MCP आहे हे

राजदीपसुद्धा छुपा MCP आहे हे दिसून आलं. सानियाचं कौतुक वाटलं.

गर्दीतला दर्दी

झालं ते झालं.

राजदीपने चूक मान्य केली आणि वारंवार माफी मागितली (त्या बातमीतच मुलाखतीचा व्हिडीओसुद्धा आहे); ही गोष्ट नाकारता येणार नाही. चूक दाखवल्यावर ती मान्य करून, माफी मागणाऱ्यांना नावं ठेवणं योग्य नाही.

असा प्रश्न विचारणारा फक्त राजदीप नाही, समाज असतो आणि त्यांतले बहुसंख्य लोक ही चूक आहे हे मान्यही करत नाहीत; ही अडचण आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हं

सानियापण बोल्ली की तो पहिलाच पत्रकार राष्ट्रीय वाहिनीवर माफी मागणारा म्हणून

गर्दीतला दर्दी

http://www.thehindu.com/data/

http://www.thehindu.com/data/many-dont-have-power-in-powersurplus-india/...

भारताकडे मागणीपेक्षा जास्तं वीज आहे. भारत पॉवर सरप्लस होईल आता. पण अजूनही अनेक लोक अंधारात आहेत. या विचित्र सिचुएशनबद्दल माहिती देणारा लेख!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ह हा हि ही हु हू ....

Theresa May’s husband steals the show in sexy navy suit as he starts new life as First Man

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग?

त्याने नागडं उपस्थित व्हायला हवं होतं का?
च्यामायला त्या मेट्रो च्या! कसल्या फालतू लिंका देताय!!!!
(स्माईल)