अल्बर्ट कामू वारीला गेला असता तर...

आषाढी १५जुलै ला आली...दरवर्षी आमच्या सोसायटीत दिंडी उतरते आणि दोन दिवस कीर्तन वगैरे करून सगळ कस संगीत-नृत्यमय करून टाकते. .. पण या वर्षी दिंडी आली होती खरी पण कीर्तन झाल नाही...जरा चुटपुट लागलीय...

दरवर्षी या सुमारास दि बा मोकाशींचे 'पालखी', १९६४ आठवत...काय पुस्तक आहे!...कसला अभिनिवेश नाही...फक्त डोळे/कान उघडे, भेटेलेल्याशी संवाद .. मधेच पानशेत...अल्बर्ट कामू वारीला गेला असता तर असच काहीतरी बाहेर आल असत...

दि बा 'माणूस' मध्ये 'संध्याकाळचे पुणे' सदर लिहीत...आम्ही ते दूर मिरजला वाचत असू...त्यावेळी पुण आवडायच त्या लेखनामुळे....

दि बा पालखी' अशी संपवतात:
"...पंढरपूरात शिरलो आहे. पण कुठून शिरलो ध्यानात येत नाही. वारकरी दाटीवाटीनं चालले आहेत. वाटतं आहे, ते चालत नाहीत, रस्ते चालत आहेत. रस्त्यावर मी पाऊल टाकलं आहे नि वाहू लागलो आहे.
मला कुठं जायचं आहे हे माहीत आहे. सासुरवाडीस जायचं आहे. तो बोळ, तो भला दरवाजा, चार दगडी पायर्या चढून कडी वाजवायची, संपलं.
पण तिकडे जाण्याचं भान नाही. गर्दीबरोबर मी ढकलला जात आहे. रस्ता वळला की शरीर वळत आहे. पंढरपूर निराळं दिसत आहे. रस्त्याचं भानच गेलं आहे. वारकर्यांच्या दाटीत नि शेकडो दिव्यांच्या प्रकाशात. सदरा उल्टा झालाय नि माझाच मला ओळखू येत नाही.
रात्री एकला सासुरवाडीचा दरवाजा ठोठावला आहे.
मला पाहताच सासुबाई विचारत आहेत,
"का रे, इतका का उशीर? पालखी केव्हाच आली."
पिशवी खाली टाकून काहीतरीच बोलतो,
"चालत आलो"."

"चालत आलो"...ह्या दोन शब्दाने दिबा हे लेखन वेगळ्या पातळी वर नेतात....

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

दिबा अतिशय आवडतात - फिक्शनलेखक म्हणूनही आणि 'अठरा लक्ष पावलं', 'पालखी' आणि 'संध्याकाळचे पुणे'सारख्या ललित लेखनासाठीही. त्यांची आठवण काढल्याबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>> अल्बर्ट कामू वारीला गेला असता तर...
--- त्याच्या वाळवंटी Pied-Noir प्रज्ञेचे एक्झिस्टेन्शियलिस्ट संदर्भ अधिक विस्तारले असते? (सिसीफसच्या वार्‍या Lol

बाकी दिबांच्या लेखनाबद्दल पूर्ण सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी...'सिसीफसच्या वार्‍या' तर फार सुंदर....काय मस्त शीर्षक आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

तुम्हाला इथे बघुन फार आनंद झाला.
मी तुम्हाला इथे ओळखलच नाही पण तुमचा धागा वाचुन तेव्हा काही तरी परीचीत वाटल्याने तुमचा प्रोफाइल चेक केला तर सुखद धक्का.
ग्रेट ग्रेट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स मारवा, तुमचे मिपा वरचे माझ्याबद्दलचे आपुलकीचे शब्द अजून विसरलो नाहीये...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

छानच विषय आहे, आणि जी. ए. बद्दलचा लेखाचा. जरा अजून सविस्तर लिहा की...वाचायला आवडेल...
प्रशांत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

थँक्स .... नक्की प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

स्वैर स्वगतः
दिबांच्या पालखीची ओळख अतिशहाणा या ऐसीकर सदस्याने (उपक्रमावर) करून दिली होती! (त्यानेच कॉन्रॅड रिक्टरही भेटवले. त्याच्यामुळेच सुदैवाने जीएंच्या (भयाण) अनुवादाआधी मुळ रिक्टर वाचले होते)
तेव्हा पालखी म्हटलं की अतिशहाणाबद्दल खूपच ममत्व दाटून येतं. नि मग ही अशी सगळीच पुस्तके डोळ्यासमोर येतात.
अशा बाबतीतल्या ऋणाईत रहायलाच आवडतं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पालखी म्हटलं की अतिशहाणाबद्दल खूपच ममत्व दाटून येतं.

ऐसीचे रेसिडेंट आलोकनाथ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<जीएंच्या (भयाण) अनुवादा>...हे हे हे...अगदी अगदी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."