पाऊस, पुस्तकं आणि कविता

पावसाचं आणि कवितेचं नातं अतुट आहे. २ दिवस झाले पाउस एकसारखा कोसळतोय. रविवार, सुट्टी, पाऊस आणि पुस्तकं म्हणजे एक जमून आलेली solitude मेहफील. मला आवडलेल्या काही कविता इथे टाकतेय आणि या धाग्यावर टाकत राहिन. तुम्हाला आवडलेल्या कविता देखील जरूर शेअर करा. पावसाच्या निमित्ताने सुरुवातीच्या काही कविता फक्त पावसाच्याच टाकतेय.
१.
मला नव्हते वाटले
असा येईल पाऊस
माझी कित्येक जन्माची
अशी पुरवील हौस

पाने तरारली सारी
लाख अंकुर फुटले
पाणी झेलता मातीला
नको नकोसे जाहले

बीजाबीजात सळाळे
कोंब नव्या जीवनाचा
माझ्या आत्म्याने भोगीला
शाप पुन्हा जगण्याचा

- शिरीष पै, ऋतुचित्र

२.
Once Again

Once again
The rain
Seeps

Through my skin,
Sinks

Into my soul,
Changes

The texure of
My life

- Deepti Naval, Black wind and other poems

३.
बाई या पावसानं, लाविली झीम झीम
भिजविलं माळरानं, उदासलं मन
बाई या पावसानं

दिनभर देई ठाणं, रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं कोवळं ऊन छान
बाई या पावसानं

फुलली ही जाईजुई, बहरुनी वाया जाई
पारिजातकाची बाई कशी केली दैन
मातीत पखरण
बाई या पावसानं !

नदीनाले एक झाले, पूर भरोनिया चाले
जिवलग कोठे बाई पडे अडकून
नच पडे चैन
बाई या पावसानं

- आ. रा. देशपांडे 'अनिल'

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

साभार - http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/90623.html?1160247713

हसू हिरवं फुटतं

वेळीअवेळी येतेस
जुईसारखी भरल्या
आणि तुझ्या हसण्याच्या
सांडतात लक्ष कळ्या

पोरी, अशी हसताना
दिसतेस सोनपरी
झिम्मा स्वातीचा डोळ्यांत
कळी फुलते अधूरी

हसू नकोस, वेडाबाई,
डोळा पाणी तरारतं
आणि काळ्या वावराला
हसू हिरवं फुटतं
______________________________
माझ्या अलंकारांकडे
केवळ माझंच लक्ष

आज काय बिंदी....
उद्या काय, तोडे....
परवा काय....
मग न राहवून म्हटलं,
" आता कोणता अलंकार?"
तर
शांतपणे म्हणालास
"सज ना, तुझा लाडका
सनेही पाऊस घेऊन...."

तुच इतका
स्तब्ध स्तब्ध
असताना
मी कुठून रे आणू त्याला
सजण्यासाठी?

तो सनेही काय तुझ्याहून वेगळा?

____________

कधी होतोस
मुलाहून मूल
तेव्हा
कळ उठते खोलवर
तुझ्या काळजीने

असा वेडावाकडा
नको बरसू....
मग धांदल होते ना
तुला भरवताना
चिऊचा....काऊचा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता सुंदर आहेत. शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद. (फक्त कवितेखाली कविचं नाव टाकत जा. तिथल्यातिथे बघायला बरं पडतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! शिरीष पैंची कविता अतिशय शृंगारीक आहे. खरं तर पाऊस आणि प्रियकर ही दोन्ही इन्टरचेंजेबलच रुपे आहेत. Smile
___
May अजुन अजुन टाका हो पावसाच्या कविता. याच धाग्यात डकवा प्लीज. मी ही मला सापडतील त्या देइन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिरीष पैंच्या ऋतुचित्र या पुस्तकावर माझं खुप म्हणजे खुपच प्रेम आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४.
पावसळ्यात

पावसळ्यात
पागोळ्यांतून रात्र ओघळून जाताना
पाऊस भोगणारी झाडे निथळत समोर येतात
आणि फुले पावसाने बेजार....
बुबुळे, हिरव्या रानावरून फिरुन आल्यासारखी,
ओलसर गार होतात,
ह्रदयात पावसाची अखंड टपटप
आणि स्वप्नात
पैलतीराचा संबंध तुटलेली बेभान नदी
आपल्या समोरूनच निमूट कोसळत जाते....

- ना.घ.देशपांडे, शीळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ही कविता फार आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५.
रिमझिम रिमझिम
शुभ्र पडतो पाऊस
जाईजुई सायलीची
जशी सांडते आरास

भिजू... भिजू का जराशी
मीच मला विचारले
जरा जरा भिजताना
अंग सारे ओलावले

चिंब भिजता भिजता
किती क्षण आले गेले
मातीवर पावलांचे
ठसे शेकडो उठले

नाही थांबत पाऊस
धारा किती ह्या कोवळ्या
माझ्या सार्‍या पायखुणा
जशातशाच राहिल्या

- शिरीष पै, ऋतुचित्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

६.
इतक्या पावसाळ्यांनी

इतक्या पावसाळ्यांनी शिकवलेले सावध शहाणपण
पावसाच्या पहिल्या सरीबरोबर कुठे वाहून जाते?
देहावरून गळून पडतात वर्षावर्षांचे निबर थर;
तळहाती झेललेल्या थेंबाबरोबर मन थरथरत राहाते.

आठवते वेळीअवेळी पावसात भटकणे, चिंब होणे,
पदर अंगाभोवती घट्ट वेढीत आतल्याआत शहारणे,
काळाभोर ढग होऊन आभाळभर स्वैर पसरणे,
हिरवळीसह हेलकावणे, झुलणे, स्वतःला पार विसरणे.

आठवतो अकारण उदासपणा, मनाची हुरहूर भोळी,
आठवतात पहिल्यावहिल्या कविता, अर्ध्यामुर्ध्या ओळी,
आठवते पावसाआड लपवलेले डोळ्यांतले खारे पाणी,
आठवतात अभावित रुजलेली एकूणएक पाऊसगाणी.

हिरवीगर्द राने उलगडत, विस्तारत जातात,
घनदाट होत जाते आभाळ, झिरपते खोलवर आत,
पाऊस कोसळत राहतो, घोंगावत येतो पूर
वाजू लागतात अज्ञात घंटा, आयुष्यापलीकडचे संदिग्ध सूर.

- शांता शेळके, अनोळख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

७.
पानांमधे रेंगाळणार्‍या संध्याकाळच्या
उन्हासारख्या
न लिहिलेल्या कितीतरी कविता
मनातच रेंगाळतात.
घुसमटून टाकतात जेव्हा कविताही अशा
तेव्हाही मी तुझ्याकडेच येते.

- अनुराधा पाटील, तरिही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Will you accept a heart that loves, But never yields? And burns, but Never melts?

किती सुंदर कविता. मे तुमची सहीदेखील फार आवडली. खरे आहे असेही लोक असतात .... तुमच्या सहीसारखे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शुचि.
>>असेही लोक असतात .... तुमच्या सहीसारखे..
असं जगणंही शापच असतं.. a heart that never yields love, असं heart कोणाच्याही वाटेला येऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This one pulls strings of my heart Sad कारण पावसाच्या जागी प्रेम हा शब्द टाकला तरी तोच अर्थ आहे.

पावसाने आपणहून यावं
असं खरं तर काय केलंय आपण
काही करू शकतो का तरी
आपण आपले त्याच्या येण्याचे साक्षी....
याहून काहीच नाही हाती

पण एखाददिवशी
अगदी एकटक पाहत राहिल्यावर
आपोआप
उघडतं क्षितिज
आणि भोवतालच्या वृक्षांच्या
फांद्या
जळधारांच्या असतात कितीकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेख आहे. आणि तुम्ही शेअर केलेल्या कविताही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घनघन माला नभी दाटल्या,कोसळती धारा
.
कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासरी,
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधार..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

८.
संध्याकाळी एकाकी झाडावर

संध्याकाळी एकाकी झाडावर हजार चिमण्यांचा किलबिलाट ऐकावा
इतकी ओळखीची तूं.

तुझ्याकडे यायचंय मला.
पाऊस पडून गेलेल्या संध्याकाळच्या मंद उदास प्रकाशांत
मी वाचीन माझी कविता
तुझ्या परवानगीशिवाय.

नको असलेले दिवस टाळून बोलायचंय आपल्याला
नंतरच्या उरल्या वेळांत.

मी परतेन तेव्हा किलबिलाट हरवून गेलेला असेल काळोखांत,
सारं शांत असेल
माझ्या पावलांच्या आवाजाशिवाय.

- वसंत पाटणकर, विजनांतील कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भेट क्षणाची. विरह युगांचा Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९.
उभी कोसळेल वास्तू

कधी कधी काचतात
धागे गौर खांद्यावर,
नकोनकोंसें वाटतें
अभ्र सुन्न माथ्यावर.

नातें जुळून गेलेलें
'नको नको'शी परंतू,
नको न रे हाक घालूं
उभी कोसळेल वास्तू.

- वासंती मुझुमदार, सहेला रे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0