..मला मात्र पत्नी गोरी हवी..

..मला मात्र पत्नी गोरी हवी..
-------------------------------------
तशी शक्यतोही कोरी हवी.
मला मात्र पत्नी गोरी हवी

जरा घेऊ वीम्याचा फायदा.
घरी एक साधी चोरी हवी.

( मला चोर अट्टल मानेन मी.
तिच्या स्पंदनांची चोरी हवी..)

असे एक संधी निसटायची.
जवळ फक्त बळकट दोरी हवी.

तुला भोगतो मी की तू मला?
कशाला हि मग शिरजोरी हवी?

हुश्श..आत घुसलो मी शेवटी
नको आणखी घुसखोरी हवी

किती प्रेम त्याचे काट्यांवरी
सरण म्हणुन बाभळिबोरी हवी.
---------------------------
+ कानडाऊ योगेशु

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

( मला चोर अट्टल मानेन मी.
तिच्या स्पंदनांची चोरी हवी..)

हां हृदयस्पंदने. म्हणजे तिच्या हृदयाचा ठोका चुकणे. जो तुम्ही चोरता. गॉट इट.
___

हुश्श..आत घुसलो मी शेवटी
नको आणखी घुसखोरी हवी

सॉलिड! अमेरीकेत इल्लिगल इमिग्रंट म्हणुन घुसायचं, लटपटी खटपटीनंतर वैध व्हायचं व मग घुसखोरीला मानभावी विरोध करायचा. वा वा. एका इल्लिगल मेक्सिकनच्या/अन्य कोणा देशाच्याही नागरिकाच्या वागण्यातील विसंगती छान टिपली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका इल्लिगल मेक्सिकनच्या/अन्य कोणा देशाच्याही नागरिकाच्या वागण्यातील विसंगती छान टिपली आहे.

हा हा. इतका इंटरनॅशनल लेवल चा विचार केला नव्हता.
माझ्या मनात
लोकलमध्ये आत शिरल्यावर पुढच्या स्टेशनवर आत शिरणार्यांना जागा नाही म्हणुन आत येऊ न देणे ...
शिक्षण/नोकरीमध्ये रिझर्वेशन दिले गेल आहे काही जातींना आता त्या जाती अजुन काही जातींना रिझरवेशन देऊ नये म्हणुन आकांडतांडवर करतात.. का तर त्यांची टक्केवारी कमी होईल..
असे काहीसे विचार होते.
एकदा आपण आतले झालो कि बाहेरच्यांना विरोध करणे हा आपला स्वभाव बनतो त्यावृत्तीवर केलेली ही टिपण्णी होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0