व्हॅलेंटाईन्स डे आणि आमचे रेड वेल्व्हेट पाककौशल्य

आयुष्यात आतापर्यंत व्हॅलेंटाईन्स डेची येथेच्छ टवाळी केल्यानंतर, आता आमच्या पोटी असे कन्यारत्न जन्मले आहे की ज्याची गणना 'जन्मतः रोमॅंटिक' या सदरात होते. त्यामुळे आजकाल त्यांच्या सामाधानासाठी आम्हाला व्हॅलेंटाईन्स स्पेशल बेकिंग वगैरे करावे लागते. तसे गोड खाण्याला काही कारणच असावे लागते असेही काही नाही म्हणा! असो. तर आज मी हे रेड वेल्व्हेट कपकेक बनवले, त्याची कृती खालीलप्रमाणे:

साहीत्य
१ १/४ कप (१२५ ग्रॅम) मैदा
१/४ छोटा चमचा बेकिंग पावडर
१/४ छोटा चमचा मीठ
१ मोठा चमचा (१० ग्रॅम) कोको पावडर
१/४ कप (५७ ग्रॅम) लोणी
३/४ कप (१५० ग्रॅम) साखर
१ मोठे अंडे
१/२ छोटा चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट
१/२ कप (१२० मिली) ताक
१ मोठा चमचा लाल रंग
१/२ छोटा चमचा पांढरे विनेगर
१/२ छोटा चमचा बेकिंग सोडा

बटरक्रीम आयसिंग साहित्य

२ कप (२३० ग्रॅम) आईसींग साखर
१/२ कप (११३ ग्रॅम) लोणी
१ छोटा चमचा व्हनीला एक्स्ट्रॅक्ट
२ मोठे चमचे दूध किंवा क्रीम

ओव्हन १८० से ला तापवून घ्यावा. मैदा, बेकिंग पावडर व कोको पावडर एकत्र चाळून ठेवावे.
एका भांड्यात ताकामध्ये लाल रंग मिसळून ठेवावा.लोणी आणि साखर एकत्र करून फेटावे, हलके झाल्यावर त्यात अंडे घालून पुन्हा फेटावे.
त्यात नंतर तीन टप्प्यात आळीपाळीने मैद्याचे मिश्रण व ताकाचे मिश्रण मिसळून घालावे. नंतर व्हनीला एक्स्ट्रॅक्ट घालावा. एका छोट्या वाटीत व्हिनेगर मध्ये सोडा मिसळावा वा तो फुगल्यावर त्वरित केकच्या मिश्रणात घालावा. मिश्रण कपकेकच्या साच्यांमध्ये घालून १५ ते १८ मिनिटे ओवन मध्ये ठेवावे. कपकेकच्या मधोमध काडी खुपसून बाहेर काढल्यास ती स्वच्छ बाहेर आली म्हणजे कपकेक तयार झाले असे समजावे. ओव्हनमधून बाहेर काढल्यावर केक्स पूर्णपणे गार होऊ द्यावेत. बटरक्रीम फ्रॉस्टिंगसाठी लोणी फेटून फलके झाल्यावर त्यात थोडीथोडी साखर मिसळत फेटत रहावी. पूर्ण फेटून झाल्यावर त्यात व्हनीला एक्स्ट्रॅक्ट व दूध मिसळून घ्यावे. मिश्रण आयसिंग बॅगमध्ये घालून कपकेकवर हवे तितके पसरावे,वरून चेरी वगैरे घालून सजवावे. मी कपकेकवर खास व्हॅलेंटाईन स्पेशल हृदयाच्या आकाराची चकमक(एडीबल) घालून आमच्या बाईसाहेबांना अतिशय खूश केले.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

आयुष्यात आतापर्यंत व्हॅलेंटाईन्स डेची येथेच्छ टवाळी केल्यानंतर ...

"अरे वा" असं अगदी मनात म्हणते आहे तोच वाक्याचा उत्तरार्ध वाचल्यावर त्याचं लगेच "अरेरे!" असं झालं. अपत्यांसाठी व्हॅलेंटाईन डेसाठी काहीबाही करावं लागतं खरं!

असो. पण केक अगदी झकास मस्त दिसतो आहे. पहिल्या फोटोतला पुढचा केक पटकन उचलून तोंडात टाकावासा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाह! संत व्ह्यालेंटाईन हे असेच उत्तमोत्तम केक बनवून इथे आम्हाला पाकृ देण्याची सद्बुद्धी वृद्धींगत करोत ही सदिच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिल्या फोटोतला कपकेत आत्ताच्या आत्ता उचलून खावासा वाटतोय!
छ्या. आता गोड काहीतरी खायची इच्छा आहे, पण ऑफिस जवळ बेकरी-बिकरी काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त मस्त!!!! ती चेरी कसली ग्लिसनींग (चमकदार) आहे. ऑस्सम!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कीच बनवून बघेन! आधी न जमल्यास पुढील वॅलेंटाईन्स डे ला नक्की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रेड वेल्व्हेटच्या पाककौशल्याबरोबर छायाचित्रणाच्या कौशल्याचीही तारीफ करायला हवी. पार्श्वभूमीची रंगसंगती, पिवळसर प्रकाश, पांढऱ्या प्लेट्स, आणि पहिल्या चित्रातला फोकस सगळं छान जमलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिप्रायांबद्दल सगळ्यांचे आभार. राजेश, मला खाद्यपदार्थांची छायाचित्रे काढायला खूप आवडतात पण त्यामुळे आमच्या कुटुंबावर मात्र भलताच जुलूम होतो. बिचाऱ्यांना माझी रंगसंगती आणि प्रकाशयोजना वगैरे जुळेपर्यंत ताटकळत वाट पहात रहावे लागते. माझ्या कन्येचा फ्रेममध्ये येऊ पहाणारा हात मला कित्येकदा मागे ढकलत रहावा लागतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो खरंच प्रेमाने आणि मन लावून काढलेले कळतात. रंगसंगतीसाठी विशेष प्रयत्न केलेले जाणवतात. लालपांढरं - त्यावर सोनेरी छटा एवढेच रंग... त्यातला एकसुरीपणा काढून टाकण्यासाठी एका फोटोत पॉइनसेटियाचं एक पान हलकेच आलेलं आहे.
बऱ्याच पाकृंमध्ये वरून काढलेले फोटो असतात. तुम्ही त्याविषयी विशेषतः पहिल्या फोटोत विचार केलेला दिसतो. तसंच फ्लॅश मारून काढलेले फोटो उपयुक्त असले तरी पदार्थातला जिवंतपणा कमी करतात.
तुम्ही इतर काही काढलेले दाखवण्यासारखे फोटो आहेत का? बघायला जरूर आवडतील.
त्याचबरोबर एक सूचना. या तीन फोटोंचे आकार वेगवेगळे आहेत. विशेषतः लहान फोटो कमी परिणामकारक वाटतात. ते आकार बदलता येतील का? फोटो टाकताना डावीकडे किंवा उजवीकडे अलाइन करण्याची सोय आहे. तसं केल्यास बाजूची जागा रिकामी न रहाता त्यात टेक्स्ट फ्लो होतं. तेही करून बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या एका फोटोग्राफर मित्राने एकदा मला म्हटले होते की "फ्लॅश किल्स द पिक्चर". मला ते मनोमन पटलं पण त्यामुळे कधीकधी फारच गोची होते. आमच्या इथे सध्या नैसर्गिक प्रकाश फारच कमी आणि "कूल" आहे त्यामुळे कृत्रिम प्रकाशयोजना करावी लागते आणि प्लेटवर वगैरे प्रतिबिंब न पाडता हवा तसा, हवा तिथे प्रकाश मिळवणे थोडे कष्टप्रद होते. पण तरी एखादा फोटो हवा तसा आला की मजा येते. तुमच्या सूचनेप्रमाणे मी फोटो अलाइन करायचा प्रयत्न केला होता पण फ्लिकरवरून इथे फोटो आणायचे म्हणजे थोडे कटकटीचे वाटले. ते नीट काही दिसेनात म्हणून शेवटी कंटाळून असे लावले, शिवाय त्यातला एक फोटो क्रॉप केला आहे त्यामुळे वेगळा आकार!
मी खिरापत इथे एक मराठी फूड ब्लॉग लिहिते. तिथे थोडे फोटो आहेत (ते दाखविण्यासारखे आहेत की नाही ते देव जाणे Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान ब्लॉग आहे रुची. "कमलाबाईंच्या मुली" हा लेख तर अतिशय सुरेख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही ब्लॉग आवडला. पण मी पुन्हा पहाणार नाही. त्रास होतो हो!

कुल्फीचा फोटो खत्तरनाक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पिस्ता कुल्फी ना .... कसली मखमली अन टेप्टींग आहे. रंग तर इतका देखणा आला आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>"फ्लॅश किल्स द पिक्चर". मला ते मनोमन पटलं पण त्यामुळे कधीकधी फारच गोची होते.<<

सहमत, पॉईंट एन शूट प्रकारात बॅकलाईट नावाचा फ्लॅश प्रकार आहे, तो प्रखर प्रकाशाच्या सावल्यांना कमी करतो, तरी देखील प्रखर प्रकाशामुळे रंगातील शेड्स हरवून जातात, तुमच्या चित्रांवरुन तुमचा कॅमेरा कॅनन डीएसएलआर (५००डी??) असावा असे वाटते आहे, ट्रायपॉड वापरून कमी प्रकाशात मॅन्युअल सेटींग्सवर उत्तम चित्र काढता येते, अर्थात तुमच्या चित्रांवरुन तुम्हाला ही किंवा अधिक माहिती आहेच हे लक्षात येते.

पण छायाचित्रकाराएवढा धीर इतरांना धरवत नाही, त्यामुळे बर्‍याचवेळा मनाजोगते चित्र न निघाल्याने वैताग येतो.

वरची चित्रे फारच सुंदर आहेत.

You don't make a photograph just with a camera. You bring to the act of photography all the pictures you have seen, the books you have read, the music you have heard, the people you have loved - ansel adams

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केक खरोखर मस्त आहे. पाणी सुटले अशा भुकेच्या वेळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अरे वा
एकदम टेम्पटिंग वाटतात
ऐसीवर केकावलीची सुरुवात मस्त झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

यावर्षीही तेच, फक्त चोवीस मुलांच्या आख्ख्या वर्गासाठी... :tired:

002

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यम्मी, तोंपासू, वगैरे श्रेण्या करता येतील का हो???

(केकबुभुक्षित) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्ञानेश्वरीत एक ओळ आहे, ज्यात 'नाकाचे वास होणे, जिभेचे चव होणे, कानाञ्चे आवाज होणे, इ. इ. गोष्टी दाखला म्हणून दिल्या आहेत.
आज या चित्राम्मुळे 'डोळ्याञ्चे कप् केक' होणे अनुभवास आले.
एक तरी कप केक अनुभवावा ! Wink
अतिशयच अतोनात अगणित धन्यवाद !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशयच अतोनात अगणित धन्यवाद !!

आभार मान, अनुप्रास साधेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता जवळच्या कपकेकरीत जाऊन रेड वेल्वेट हादडणे आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव मस्त दिसताहेत कपकेक आणि ब्लॉगदेखील अप्रतिम _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

हे असे जर काही खायला मिळणार तर रोजच व्हँलेटाईन साजरा करायला हरकत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

झकास केक. खायला हवा एखादा. गणेश जयंतीमुळे काल अंड्याचे काही खाण्यास आम्हाला सक्त मनाई करण्यात आली होती. Sad आज सुदैवाने परवानगी मिळाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपकेक मस्त दिसताहेत! एकदा कॅरट कपकेक करून पहायची खूप इच्छा आहे.

रुचीनेच दिलेली कृती थोडीशी बदलून, काल केलेले नाचणी-राजगिरा बिस्किटः
P1020771

वॅलेंटाइन डे च्या निमित्ताने वेगेवेगळ्या आकाराचे कुकी कटर वापरले:
P1020773

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच दिसताहेत.. कृती कुठाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कृती माझ्या ईमेल मध्ये आहे! Smile

मी रुचीने सुचवलेली, आणि या ब्लॉगवर दिलेल्या कृती चे मिश्रण करून बिस्किट असे बनवले:
सामग्री:
१/३ कप नाचणीचं पीठ (हे सकस चं होतं, साखर आणि वेल्दोडा घातलेलं)
१/३ कप राजगीरा पीठ
१/३ कप साधी कणीक
५० ग्रॅम लोणी (अमुलचं)
१/४ कप नोतून गूड (१/४ कप पिठीसाखरे ऐवजी सध्या सीजन मध्ये असलेला खजूराचा पातळ गूळ वापरला; साखरयुक्त नाचणी पीठ वापरत नसलात तर १/२ कप पिठीसाखर घ्यावी)
१/२ चमचा बेकिंग पावडर
१/४ चमचा बेकिंग सोडा
१/२ चमचा वॅनिला एसेन्स
कणिक मळायला थोडेसे दूध

ओवन २०० डि. ला तापवून घ्यावा.
एका भांड्यात लोणी आणि गूळ (अथवा पिठीसाखर) एकत्र चांगले फेटून घ्यावेत. त्यात वॅनिला एसेन्स घालावे.
हळू हळू सगळी पिठं, आणि बेकिंग पावडर व सोडा त्यात मिसळावे.
कणीक थोडी कोरडी असेल, दुघाचा हात लावून चांगली एकत्र करून घ्यावी. अर्धा तास झाकण टाकून फ्रिज मध्ये ठेवावी.
जाड प्लास्टिकवर, अथवा असल्यास बटर पेपर वर कणीक लाटण्याने हवी त्या जाडीची (मी जेमतेम अर्धा सेंटिमीटर करायचा प्रयत्न केला) लाटून घ्यावी.
गोल वाटीने, किंवा अन्य कुकी कटर्सकापून बिस्किटाचे आकार कापून, बटर पेपर अथवा अलुमिनियम फॉइल लावलेल्या ओवनच्या ताटात एक-दोन सेंटिमीटर लांबलांब ठेवावेत.
ओवन मध्ये २० मिनिटं भाजावेत.

मी डबल प्रमाण वापरल्यावर २५-एक बिस्किटं तयार झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा! आभार! उद्याच करायचा प्रयत्न करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा धागा मागच्या वर्षी माझ्या नजरेतून सुटला होता वाटतं. कसले मोहून टाकणारे फोटो आहेत. बघतच रहावसं वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...