प्राणिसंग्रहलयांवर (zoo)बंदी आणावी का?

टोकीयोच्या प्राणी संग्रहलयामध्ये अत्यंत कमी जागेत आपले ६० वर्षांचे आयुष्य खर्ची घातलेल्या ट्राजिक हनाको या हत्तीणीचा एकाकीपणामुळे मृतु झाला आहे.
ही हत्तीण दोन वर्षांची असताना तिला थायलंड ने जपान सरकारला भेट म्हणून दिले होते.तेव्हापासून ति काँक्रीटच्या एका छोट्या जागेत आपले आयुष्य व्यतीत करत होती.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जम्नठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे.
http://m.huffpost.com/us/entry/hanako-loneliest-elephant-dies_us_57475cb...
आपण आज पासून ही शपथ घेऊयात की कोणत्याही प्राणी संग्रहलयाला आपण भेट देनार नाही,
जिथे अत्यंत तोकड्या जागेत प्राणी डांबुण ठेवलेले दिसल्यास PETA वा तस्तम प्राणिमित्र संघटनांना निदर्शनास आणुन देऊ
प्राण्यांनाही मन असते ,या भावनेतून अशी वागणुक कुठल्याच प्राण्याला देऊ नये
फिशटॅंक मध्ये मासे पाळणे ,पिंजर्यात पक्षी पाळणे वा तत्सम क्रूर गोष्टी घरी आनू नयेत .

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयामधील प्रसंग

येथे ही वावदूक चर्चा चालू असतांनाच काल सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयामध्ये एक लहान मूल गोरिलाच्या राहण्याच्या जागेत पडले. (कसे ते स्पष्ट झालेले नाही.) गोरिलाने मुलाला उचलले आणि थोडे दूर नेले. इतका भाग कालच टीवीवर पाहिला. तेथेच असेहि कळले मुलाचा जीव वाचविण्यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने गोरिलाला गोळी घालून मारून टाकले कारण त्यांच्या मते गोरिलाला बेशुद्ध करणे हा उपाय सुरक्षित नव्हता. बेशुद्ध होईपर्यंतच्या थोड्या वेळात गोरिला काय करेल ह्याचा नेम नव्हता. आता ह्यावर दोन्ही बाजूने चर्चा सुरू झाली आहे. हा प्रसंग यूटयूबवर येथे पहा.

प्रस्तुत धाग्यावरून पुढील चुटका आठवला. एका गावामध्ये पाळीव कुत्री रात्री भुंकत असतात आणि गावाबाहेरील जंगलात राहणारी रानकुत्री उलट भुंकून त्याला जबाब देत असतात. जंगली कुत्री म्हणतात, "या या, माणसांची गुलामगिरी फेकून बाहेर आमच्यामध्ये मोकळ्या वातावरणात या. येथे तुम्हाला पूर्ण स्वातन्त्र्य मिळेल. मोकळा वारा मिळेल. शिकार करून हवं ते खाता येईल." ह्यावर गावातल्या पाळीव कुत्र्यांचे उत्तर, "ते सगळं ठीक आहे हो, पण आम्हाला इथं रोज सॉसेजेस खायची स्वय लागली आहे. ती तिथे मिळतील का?"

वावदूक श्ब्द खूप दिवसांनी

वावदूक श्ब्द खूप दिवसांनी ऐकला. याचा अर्थ काय कोल्हटकरजी? शेंडा बुडखा नसलेली का? (स्माईल)

याच न्यायाने

तुरुंगांवरही बंदी घालावी. कारण श्वापदांसारखी किंवा त्याहूनही वाईट वागणारी माणसे, हे देखील एक प्रकारचे पशुच आहेत. त्यांना मुक्त समाजात सुधारण्याची संधी द्यावी.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

पशुंची बदनामी थांबवा!!!

पशुंची बदनामी थांबवा!!!

केवळ 'मार्मिक' अशी श्रेणी देऊन भागेना म्हणून...

...ही पोच!

वांझोटी चर्चा. भूतदया वगैरे

वांझोटी चर्चा.
भूतदया वगैरे ढोंग आहे,मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे,जो प्राणी बलशाली,बुद्धीमान असेल तो इतर प्राण्यांवर राज्य करेल त्या उक्तीप्रमाणेच आज आपण प्रगत प्राणी म्हणून वावरत आहोत आणि आपल्या मनोरंजनासाठी म्हणून आपण काही प्राणी कैद केले तर मला त्यात काही वावगं वाटत नाही.
जंगलामध्ये माणूस गेल्यावर इतर प्राणी माणसावर दया दाखवत नाहीत,तर आपण का दाखवावी.

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

जंगलामध्ये माणूस गेल्यावर इतर

जंगलामध्ये माणूस गेल्यावर इतर प्राणी माणसावर दया दाखवत
नाहीत,तर आपण का दाखवावी.>>>>>>>>> माणुस हा बुद्धीमान प्राणि आहे,इतर प्राण्यांमध्ये बुद्धीमत्ता असती तर त्यांनीही विचारपुर्वक निर्णय घेतले असते.दया ,सहसंवेदना या भावना प्रगत मेंदुची लक्षण आहेत,माणुस ईतर प्राण्यांचा विचार करु शकतो,इतर प्राण्यांकडे ती क्षमता नाही.

™ ग्रेटथिंकर™

माणुस हा बुद्धीमान प्राणि

माणुस हा
बुद्धीमान प्राणि आहे,इतर प्राण्यांमध्ये बुद्धीमत्ता
असती तर त्यांनीही विचारपुर्वक निर्णय घेतले असते.

खरे तर माणूस हा परिस्थितिपुढे हतबल प्राणी आहे तो इतर माण्सासोबतच व्यवस्थित वागत नाही तर इतर प्राणी तसे वागले असते त्यांच्या शारीरिक सामर्थ्याचा व विकसित बुध्दी कौशल्याचा त्यांनी गैर फायदा घेतला नसता याचा काय पुरावा ?

actions not reactions..!...!

दया ,सहसंवेदना या भावना प्रगत

दया ,सहसंवेदना या भावना प्रगत मेंदुची लक्षण आहेत,माणुस ईतर प्राण्यांचा विचार करु शकतो,इतर प्राण्यांकडे ती क्षमता नाही.

इतर प्राण्यांकडे प्रगत मेंदू नाही. मग त्यांना अस्तित्व का असावे ? पुढेमागे त्यांच्यात प्रगत मेंदू इव्हॉल्व्ह होईल म्हणून का ?

पुढेमागे

पुढेमागे होमो सेपियन्स्पेक्षा प्रगत असा एखादा प्राणी निर्माण झाला तर तेव्हा त्या मानाने प्रगत मेंदू नसलेल्या होमो सेपिय्न्सचे काय करावे? की थेट अस्तित्वविनाश? कलिन्ग? की गॅस चेम्बर?

ऑलरेडी कोणीतरी आपल्या

ऑलरेडी कोणीतरी आपल्या मानवजातीला कल्टिव्हेट (शेती) करुन प्रयोग करत नाहीये हे कशवरुन? (डोळा मारत)

ते आपण होमो सेपियन्स कसे

ते आपण होमो सेपियन्स कसे ठरवणार? ते प्रगत प्राणीच ठरवतील काय करायचे ते, नैका?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

माणुस हा बुद्धीमान प्राणि

माणुस हा बुद्धीमान प्राणि आहे,इतर प्राण्यांमध्ये बुद्धीमत्ता असती तर त्यांनीही विचारपुर्वक निर्णय घेतले असते.दया ,सहसंवेदना या भावना प्रगत मेंदुची लक्षण आहेत,माणुस ईतर प्राण्यांचा विचार करु शकतो,इतर प्राण्यांकडे ती क्षमता नाही.

▶मग बैलांना शेतामध्ये राबवून घेवू नये,मोकळं सोडून द्यावं
▶गायी/म्हशी मोकळ्या रानात सोडून द्याव्यात,कशाला हवयं दूध? उगाच का गोठ्यामध्ये डांबून ठेवायचं?
▶कुत्री,मांजरं,कोंबड्या,शेळ्या पाळू नयेत.(ते पाळीव प्राणी आहेत असं उलटं उत्तर देवू नये)
▶आणि सगळ्यात महत्वाचं,मांसाहार वर्ज्य करावा.

दया,संवेदनाच्या गप्पा मारणारे जेव्हा तंगडी फोडत असतात तेव्हा लै गंमत वाटते.

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

बैलांचा वापर शेतीसाठी

बैलांचा वापर शेतीसाठी करण्यावर बंदी असावी ह्याच्याशी सहमत
सध्या माणुस सोडला तर कूठलाच प्राणि आयुष्यभर दूध पीत नाही,सिंथेटीक दूध जो पर्यंत तयार् करता येत नाही तो पर्यंत प्राणिज दूध वापरणे अपरिहार्य ठरत आहे ,पण तुमचा मुद्दा मान्य आहे,दुधासाठी प्राण्यांना बांधुन ठेवने चूकच आहे
कुत्री मांजरं पाळण्यावर प्रतिबंध घालता येऊ शकतो
मी मांसाहारी नाही ,त्यामुळे मांसाहार करणे चूक आहे या मताचा मी आहे,व मांस उत्पाद्नासाठी प्राण्यांना डांबुण ठेवने चूक आहे या मताचा मी आहे,नुकतेच गुगलने आर्थिक मदद देऊन कृत्रिम मांस तयार केले आहे,हा पर्याय पुढे वापरता येईल

™ ग्रेटथिंकर™

सुपर लाइक

जंगलामध्ये माणूस गेल्यावर इतर प्राणी माणसावर दया दाखवत
नाहीत,तर आपण का दाखवावी.

+1 (स्माईल)

actions not reactions..!...!

हे आठवले: "तो क्या जानवर

हे आठवले:

"तो क्या जानवर इन्सान नही होते है क्या?" - इति रोसेश साराभाई

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोल!

लोल!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

ऐसीवरती प्राण्याचे आयडी

ऐसीवरती प्राण्याचे आयडी घेण्यास पण बंदी घालायला पाहिजे.
गरीब बिचार्‍या इनोसंट प्राण्यांचे आयडी घेउन लोक माणसासारखे वागतात.

चांगले झू पण असतील की. सरसकट

चांगले झू पण असतील की. सरसकट सगळ्यांवर बंदी का मुळे?

तुम्ही क्रूर म्हणून नमूद

तुम्ही क्रूर म्हणून नमूद केलेल्या सर्व गोष्टींचे मी थेट, निसंदिग्ध समर्थन करतो. प्राण्यांना मन असतं हा बकवास अनेक वर्षांपूर्वी सुरु झाला होता त्यारून आजकाल गाडी "प्राण्यांना सुद्धा अधिकार असतात" पर्यंत आलेली आहे. कैच्याकै प्रकार.

+१००

सगळ्या माणसांना मन असतं हेच अद्याप सिद्ध झालेलं नाही तर प्राण्यांच्या मनाबद्दल कोण काळजी करणार?

Hope is NOT a plan!

आमच्या घरात एक मांजर असते.

आमच्या घरात एक मांजर असते. तिने आमच्या छोट्या घरात न राहता मोठ्या मोकळ्या जगात जावे असे आम्हाला फार वाटते. आम्ही त्यासाठी खूप प्रयत्न करतो. पण त्या मांजरीला आमच्या घराच्या खुराड्यातच रहायला आवडते. PETA वाले काही मदत करू शकतील का?
--------------------------------
आमच्या जवळच एक चाळ आहे. तिथे एका छोट्या खोलीत ८-९ माणसे राहतात. PETA ला कळवल्यास ते त्यांना मदत करतील का?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

त्याने काय होईल? झू हा प्रकार

त्याने काय होईल? झू हा प्रकार मानवी सिव्हिलायझेशनमुळे इतर जीवांना होणार्‍या त्रासातला अतिक्षुल्लक भाग आहे.

Hope is NOT a plan!