मी सुद्धा तसा संतप्तच!
गरीब काळ्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत पोलिसाला
सोडून दिल्यामुळे आज अमेरिकेतले बाल्टिमोर शहर संतप्त आहे .
मी सुद्धा तसा संतप्तच .
जर न्यू यॉर्क मधली निदर्शने
वीक-एंड ला
दुपारी तीन ते सहाच्या दरम्यान
फार उन्ह किंवा पाउस नसताना
लोकल गाडीच्या स्टेशन जवळ
आणि गुन्हेगार , धोकादायक काळ्या वस्त्यांपासून दूर
झालीच ,
तर सामील होईन म्हणतो !
---
प्रतिक्रिया
ऑ
काळ्या माणसाला मारले म्हणून संतंप्त!!!
दलित माणसाला मारले म्हणून संतंप्त!!
स्त्रीला मारले म्हणून संतंप्त!!!
एकंदरीतच वैयक्तिक काही दुश्मनी होती का?
काय कार्यकारणभाव होता म्हणून मारले?याच्या खोलाशी न जाता आजकाल नुस्ताच धुरळा उडवायचा काम चालू आहे,इकडे मोदी आल्यापासून आणि तिकडे ट्रंप येण्याची चिन्हे दिसतायत म्हणून!!
जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी
ते तुम्हाला चालते का?
काळ्या माणसाला/दलित माणसाला/स्त्रीला मारले ते तुम्हाला चालते का?
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
यापैकी कोणालाही मारलेलं मला
यापैकी कोणालाही मारलेलं मला चालणार नाही.
मला चालेल असे का वाटले तुम्हाला?
फक्त मारण्यापाठीमागचा कार्यकारणभाव समजून न घेता तो काळा/दलित/स्त्री आहे म्हणूनच त्याला मारले असे बुडबुडे सोडले जातात आणि निष्कर्षापर्यंत न पोहचता फुफाटा उडवून वातावरण दुषित केलं जातायं त्याला माझा विरोध आहे.
जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी