..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास ४

तशी तू देवभोळी नाहीस
पण नास्तिक नक्कीच नाहीस..
अन मी कुंपणावरच्या सरड्यासारखा...
सोयीनुसार आस्तिक
सोयीनुसार नास्तिक असा.
कुठल्या टुरिस्ट स्थळी फिरताना
माझे नेहेमीचे द्वंद्व..
देवळे टाळावीत का नको...?
तू मात्र अश्यावेळी..
माहेरी आल्यागत...
अन आईला वा बापाला
भेटायला जाण्यागत उत्सुक...
इथवर आलोच आहोत तर
जाऊन येऊ...
अन एरवी संपूर्ण प्रवास
टी शर्ट-जीन्स अथवा
सलवार सुट अश्या
सुटसुटीत..
पोशाखात करणारी तू..
देवी दर्शनाला जाताना मात्र..
नखशिखांत पारंपारिक
पोशाखात निघतेस..
साडी चोळी सोबत..
इतर दाक्षिण्यात स्त्रियांप्रमाणे.
एक टनाचा गजरा केसात माळतेस..
खरेतर माझे देवीदर्शन तुला त्या
परिपूर्ण पवित्र रूपात पाहील्यावरच होते..
पुढचा केवळ उपचार उरतो..
देवीच्या आजुबाजुला फिरणार्या
नंदीबैलागत
मी तुझ्या मागेमागे निघतो..
मंदीरात गर्दीत ही तु माझ्या पुढेच असते
व गर्दी माफक असली तरीही..
तुझा गजर्याचा वास नेहेमीच..
माझ्या श्वासातुन अंगांगात भिनेल..
एवढे अंतर तू आपल्या
दोघात ठेवतेच ठेवते..
गाभार्यासमोर आल्यावर..
समयांच्या मंद प्रकाशात तुझा
चेहरा उजळुन निघतो..
(बाप रे काय सुंदर दिसतेस तु तेव्हा!)
देवीचे प्रतिरूपच तू..
मी एकदा देवीकडे अन डोळे मिटुन शांत उभारलेल्या
तुझ्याकडे आळीपाळीने पाहतो...
अन मग पुढे आलेले हळद कुंकु तु कपाळावर लावतेस..
अलगदपणे..
माझ्याकडे पाहत..
डोळ्यात हसत..
गालातल्या गालात हसत..
अन मुद्दामुन असे लावतेस
कि थोडे तुझ्या
सरळ नाकावर सांडेल..
अन पुढे आरती घेतल्यावर म्हणतेस..
चेहरा ठिक आहे ना...
तुला माहीती आहे..
मला फार आवडते...
माझ्या पांढर्याशुभ्र रूमालावर..
तुझा चेहरा नाजूकपणे साफ करताना...
हळदी कुंकवाचे रंग उमटवुन घेणे...
अन ते करताना मुद्दामुन
गजर्यातल्या दोनचार कळ्या..
रूमालात सरकावतेस..
अन पुढे मागे वळून..
जरा गजरा ठिक करायला लावतेस..
मनाचा गाभारा सुगंधाने भरुन निघतो..
(हे होताना गाभार्यातली देवी मंद हसल्याचा मला भास होतो..)
मंदीरातल्या पावित्र्यासोबतही प्रेम जपणारी तू..
गाभार्यातल्या शांत पण खट्याळ समईसारखी तू..
तेव्हा मला फार फार आवडतेस...

- कानडाऊ योगेशु

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खट्याळ समईसारखी

खट्याळ समई नक्की कशी असेल ह्याचा विचार चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाभार्यातली समई आणि गाभार्याबाहेरचा टेंभा अशी प्रतीके आधी वापरली होती.समई शांत राहुन टेंभ्याला पेटवते असे काहीसे.पण म्हटले इथेही तसा प्रकार लिहिला तर अनु राव आता माझी सोलकढी बनवतील म्हणुन टेंभ्याला सोडुन दिले आणि समईला तसेच खट्याळ ठेवले. (ह.घ्या. Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो योगेशु, मी कायम हलकेच घेते. काळजीच नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेंभा हर वख्त पेटनेपे तुला रहता है तो समई का करे बेचारी? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तू मात्र अश्यावेळी..
माहेरी आल्यागत...
अन आईला वा बापाला
भेटायला जाण्यागत उत्सुक..>>

हे मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0