तेव्हा मला तू फार फार आवडतेस - प्रवास ३

वैधानिक इशारा : खालील कवितेतील पात्रांचे विचार्/दृष्टीकोन सर्वस्वी कवीचे आहेत.सदर घटना सत्य आहे का काल्पनिक ह्याबाबतीत कवी मौन बाळगत आहे.

------------------------------------------
गोव्याच्या त्या तत्सम एक्झॉटीक बीच वर
उघडाबंब मी..
शार्कच्या नजरेप्रमाणे..
कपड्यांना चिकटलेली..
नितळ शरीरे पाहण्यात बिझी असताना...
"अहो जास्त पुढे जाऊ नका.
तुम्हाला साडेचार फुटात पोहायची सवय आहे..."
असा डायरेक्ट
आत्म्याशीच संवाद साधणारा
आवाज येतो...!
ती तूच असतेस.
समुद्राच्या पाण्यात तू
अलगद
अंदाज घेत उतरतेस....
एक एक पाऊल
पुढे टाकत..!
अन पावलागणिक
ओले होणारे
तुझे अंग पाहत...
मी स्तब्ध राह्तो...!
अन मग हळुहळू तू ही
त्या नितळ अंगांसारखीच
एक ओलेती अप्सरा बनुन..
माझ्याजवळ येऊन..
अंगाला खेटुन....
त्या दुसर्या नितळ अंगाकडे पाहत..
मिशिकलपणे म्हणतेस...
वा अगदी मरमेड वाटती आहे ना..
दिल खुश हो गया..!
मी नकळतपणे हो म्ह्णतो...!
तिचा बॉयफ्रेंड पाहीलात का?
अन मग माझे लक्ष जाते..
एक दणकट सांड
लाटेसोबत
तिला कवेत घ्यायचा
ट्राय मारत असतो..
अन मग तू म्हणतेस..
मेड फॉर इच आदर कपल..
डिट्टो आपल्यासारखेच..
हँडसम आहे ना तो ही...?
हे ऐकुन मी माझे नुकतेच
सुटु लागलेले पोट
मुद्दामुन
आत घ्यायचा प्रयत्न करतो
अन तेव्हाच एक लाट
मुद्दामुन..
टपली मारल्यागत येते
आणि तुला
अलगद
माझ्या
बाहुपाशात आणुन सोडते.
एरवी घरंदाजपणा जपणारी तू
तिथे
अलगद
माझ्या
मिठीत निथळतेस..
मला समजते.....
मिठीत घ्यायला अवघड असते..
पण मिठित जायला सोपे असते..
(हँडसम हंक ट्राय मारतोय..)
तेव्हा तू मला समुद्राच्या निळाईगत फार फार आवडतेस..
लाट किनार्याच्या बाहुपाशात हसत हसत विरल्याचा मला भास होतो..!
.
.
.
.
.
(नंतर तू आणि ते नितळ अंग किनार्यावर उन्हात एकत्र केस वाळ्वत असताना
मैत्रिणीप्रमाणे काय बोलत असता देव जाणे..)
(तो हँडसम हंक आणि मी तेव्हा चड्डीत घुसलेली वाळु कशी साफ करायची याचा विचार करत असतो..)

- कानडाऊ योगेशु

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)