तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

..
..
रात्रीच्या रेल्वे प्रवासात
नेहेमीसारखेच
तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो..
झोपायच्या आधी मी पुन्हा
समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले
सुंदर प्रकरण
किलकिल्या डोळ्यांनी
बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात..
न्याहाळण्याचा
प्रयत्न करत असतो..
थोडा वेळ जातो आणि अचानक
कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु)
तुझा हात येतो..
अन पाठोपाठ तुझा आवाज...
..अहो... झोपलात का?
...नाही?
...हात द्या हातात...!
हे नेहेमीचेच असते!
मी ही हातात हात देतो..
माझ्या बोटांशी लडिवाळपणे तू खेळत राहतेस..
थोडा वेळ जातो अन समजते..
मी तुझ्या प्रत्येक बोटांचे हलकेच चुंबन घेतो...
मग तू हात खाली घेत म्हणतेस..
झोपा आता निवांत..आंणि सांभाळून..
नाहीतर खाली पडाल..!
समोरचे सुंदर प्रकरण
किंचित हसल्यासारखे वाटते.....
बर्रर्रर्र ..माझ्या फोनवर मेसेज येतो..
..ती झोपली...आता झोपा तुम्हीसुध्दा...!
तेव्हाच इंजिनची शिटी वाजते...
अन रेल्वेच्या खडखडात मला
गडगडाटाचा भास होतो..
मला तिथे तेव्हा तू खरोखरच
एखाद्या पल्लेदार प्रवासासारखी
खूप खूप आवडतेस....!

- कानडाऊ योगेशु

(टू बी कंटीन्युड....)तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास १

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

दोन्ही आवडल्या.
१ आणि २ वाचून, कवितेतली बायको बर्‍यापैकी आधुनिक वाटली, तरी नवर्‍याला अहो-जाहो करते, हे जरा वेगळं वाटलं (चूक नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हीच तर गम्मत आहे. एरवी नवर्याला अरे तुरे करणार्या बायकांंना अश्या काही प्रसंगात नेहेमी ट्रॅडिशनल भूमिका घेताना व काही अहो जाहो करणार्या स्त्रियांना ट्रॅडिशनलतेचा आणि आधुनिकतेचा योग्य समन्वय साधताना पाहीले आहे. त्यामुळे संबोधनात काहीही ठेवले नाही ह्या निष्कर्षाप्रत आलेलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा आयडी एक नंबर आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुमचे सदस्य नाम वाचुन
मनसोक्त हसलो.
हे कस सुचल हो तुम्हाला ?
खरोखरीची आहे का अशी कंपनी एखादी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक छोटे खोपटे कम दुकान होते, तिथे मी माझी सायकल दुरुस्तीला टाकायचो. त्या काकांचे आडनाव लोळगे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे सदस्य नाम वाचुन
मनसोक्त हसलो.
हे कस सुचल हो तुम्हाला ?
खरोखरीची आहे का अशी कंपनी एखादी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही दुसर्‍या बायकांकडे बघत असणार, आणि तरी पण त्याच वेळी तुम्हाला सोलुन काढायच्या ऐवजी तुमची बायको तुमचे लाड करणार. ह्याच गोडमिट्ट कथावस्तु कम बासुंदीचे अजुन कीती भाग शिल्ल्कक आहेत? त्यात मिठाचा खडा पडण्याची काही शक्यता आहे का? असली तर वाचण्यात पॉईंट आहे, नाहीतर २:१ प्रमाणात साखर घातलेली बासुंदी घश्याखाली उतरत नाहीये.

हे काही तत्वज्ञान/अध्यात्मा विषयी असले तर पण आधीच सांगा.

संपादक मंडळ आणि कवि : तुमच्या पैकी कोणालाही हा प्रतिसाद आवडला नाही, हतोत्साही करणारा, वैयक्तीक टिका करणारा वाटला तर खव मधे सांगा. लगेच काढण्यात येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी पोटातुन आलेला प्रतिसाद आहे. राहु द्या! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला सोलुन काढायच्या ऐवजी

सोलुन कशाला काढायला हवं? तुला तो जोक माहीत आहे ना. मला नीट आठवत नाहीये पण - नवरा बायकोला विचारतो मी इतक्या सुंदर पोरी न्याहाळतो, तुला जराही मत्सर वाटत नाही? बायको म्हणते - त्यात काय रस्त्यावरची कुत्रीही गाड्यांच्या मागे धावतात. त्यांना गाडी थोडीच मिळते? Wink
____
थोडी ढील द्यायची ग त्याला. आपलाच असतोय. पण असं भासवायचं की तू स्वतंत्र आहेस, तुला स्वातंत्र्य आहे. :). फार करकचुन बांधलं तर मजा जाते. इट डिफीटस द पर्पझ.
___
गाडीवरुन एक नॉनव्हेज जोक आठवलाय तुला व्यनि करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

बादवे तुमच्या कविता एखाद्या जाहिरातमालिके सारख्या आहेत, म्हणजे ३० से. च्या ऍड मधे मावतील अशा. प्रॉडक्ट कोणते नाही माहीत पण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता अजुन मोठी करता आली असती मान्य आहे. पण मग तिथे फक्त रेल्वेचा खडखडाटच लिहावा लागला असता ना! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या फोनवर मेसेज येतो..
..ती झोपली...आता झोपा तुम्हीसुध्दा...!

हाहाहा
____

कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु)

Biggrin
_____

थोडा वेळ जातो अन समजते..
मी तुझ्या प्रत्येक बोटांचे हलकेच चुंबन घेतो...

या समजण्यावर एकदम फिदा!!! खाऊन टाकलत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0