अलीकडे काय पाहिलंत? - २३

रघुराम राजन यांनी दिलेले रामनाथ गोएंका भाषण. पण सध्याचा आर्थिक (भारतीय व जागतिक) वातावरणाबद्दल ची त्यांची टिप्पणी. जरा जास्तच टेक्निकल आहे. (मला यातल्या काही गोष्टी समजल्या नाहीत. पण तरीही त्यांनी अर्थशास्त्राची पार्श्वभूमी नसलेल्यांच्यासाठी काही वाक्ये पेरलेली आहेत. )
.
.
.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

एकच प्याला

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

हा फोटो पाहिला

a

मस्तं आहे हे!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अलीकडे काय पाहिलंत? - २३

सध्या न्यु जर्सीत मुक्काम असल्याने, २६ तारखेला झालेली, अमेरिकन प्रेसिडेंट च्या निवडणूकी संदर्भातील, दोघा उमेदवारांची 'जुगलबंदी' टीव्ही वर बघता आली. त्यामानाने हिलरी क्लिंटन यांची उत्तरे देण्याची तयारी खूपच चांगली होती, त्यामानाने डोनाल्ड ट्रंप, फारच कच्चा वाटला. स्थानिक व्रुत्तपत्रातुन सुद्धा, डोनाल्ड ट्रंप ची तयारी कशी भरकटलेली होती याचे रकाने च्या रकाने भरून माहीती येत आहे. त्यावर नवीन धागा टाकण्याचा विचार आहे.

जरूर

हिलरी ही शिक्षणाने वकील आहे आणि त्यातही बिलबरोबर अनेक वर्षे राहून आणि स्वतः न्यूयॉर्क राज्याची सिनेटर म्हणून तिला डिबेटिंगचा बराच अनुभव आहे...
त्याउलट डॉनल्ड ट्रंप हा आजवरचं आयुष्य बिझिनेसमन म्हणून जगला आहे, ह्या इलेक्शनचा अनुभव हा त्याचा पहिलाच डिबेटिंगचा (प्रायमरीज धरून) अनुभव...
ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत.

त्यावर नवीन धागा टाकण्याचा विचार आहे.

जरूर टाका, धमाल येईल....
(स्माईल)

हिलरी ही शिक्षणाने वकील आहे

हिलरी ही शिक्षणाने वकील आहे आणि त्यातही बिलबरोबर अनेक वर्षे राहून आणि स्वतः न्यूयॉर्क राज्याची सिनेटर म्हणून तिला डिबेटिंगचा बराच अनुभव आहे...

महत्वाचे म्हणजे She is Evil. ती भारतातल्या एका माणसाचा अमेरीकन अवतार आहे.

महत्वाचे म्हणजे She is

महत्वाचे म्हणजे She is Evil.

माझी बायको पण म्हणते की हिलरी ही Evil आहे.

गब्बु - कीती सेंसिबल बायको

गब्बु - कीती सेंसिबल बायको मिळालीय तुला. तू तुझ्या बायकोचे थोडे ऐकलेस तर कीती प्रगती करशील ( म्हणजे आता केली नाहीयेस असे नाही पण एकदम बुस्टर रॉकेट मिळेल तुला )

गब्बु - कीती सेंसिबल बायको

गब्बु - कीती सेंसिबल बायको मिळालीय तुला. तू तुझ्या बायकोचे थोडे ऐकलेस तर कीती प्रगती करशील ( म्हणजे आता केली नाहीयेस असे नाही पण एकदम बुस्टर रॉकेट मिळेल तुला )

आणखी एक रॉकेट लावले तर आणखी जोरात प्रगती होईल.

आणखी एक रॉकेट लावले तर आणखी

आणखी एक रॉकेट लावले तर आणखी जोरात प्रगती होईल.

तुझ्या बायकोच्या पुढे ही आयडिया मांड.
आणि मग तुझा गब्बरचा रामलाल होतो की नाही ते सांग!!!!
(लोळून हसत)

आणि मग तुझा गब्बरचा रामलाल

आणि मग तुझा गब्बरचा रामलाल होतो की नाही ते सांग!!!!

गब्बर चा अहमदमियाँ झालेला आहे आधीच.

अमेरिकेची लालू यादव!

अमेरिकेची लालू यादव!

नाही ओ पिडाकाका. लालू सज्जन

नाही ओ पिडाकाका. लालू सज्जन म्हणायला लागेल असे व्यक्तीमत्व आहे ते. नाव घेण्याची भिती वाटते. लालु चे नाव घ्यायला भीती नसती वाटली. हॅरी पॉटर मधे नव्हते का He Who Cannot Be Named

नाव घेण्याची भिती

नाव घेण्याची भिती वाटते.

व्यनि करा, आम्हाला जर पटलं तर आम्ही घेऊ की ते नांव!
आम्हाला भीती वाटत नाही
कारण ९२वी एअरबॉर्न प्रोटेक्ट्स मी!!!
(स्माईल)

अवांतरः गेल्या वर्षी आमच्या नंदनच्या कृपेने मिरामार सान डियागोला अमेरिकन एअर फोर्सचा पॉवर शो पाहिला. आयच्यान सांगतो, ते सामर्थ्य पाहून मनोमन थरारून गेलो. तेंव्हापासून कोणी फुटकळ अन्य देशीयांनी अमेरिकेला आव्हान द्यायची भाषा केली की राग यायच्याऐवजी हसूच येतं.
(स्माईल)

आम्हाला भीती वाटत नाही कारण

आम्हाला भीती वाटत नाही
कारण ९२वी एअरबॉर्न प्रोटेक्ट्स मी!!!

मला अजुन थोडी वर्ष काढायची आहेत ना इथे त्यामुळे घाबरुन रहावे लागते. नंतर मग डॉल्बी लावुन घेइन की नाव.

मग कोण? अहमद पटेल?

मग कोण? अहमद पटेल?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

खाकेत कळसा आणि गावाला वळसा ही

खाकेत कळसा आणि गावाला वळसा ही म्हण माहीती आहे का ढेरेशास्त्री?

खाकेत कळसा आणि गावाला वळसा

खाकेत कळसा आणि गावाला वळसा

कोणा ऐसीकराबद्दल बोलताय काय? (दात काढत)

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मग कोण? साहेब का?

मग कोण? साहेब का?

दुख्तर हा सिनेमा

दुख्तर हा सिनेमा नेटफ्लिक्सवरती पाहीला. कथा इवलीशी आहे पण सर्वांचा अभिनय व चित्रीकरण आवडले. विशेषतः काबूल व सिंधु यांबद्दलची काव्यमय दंतकथा आवडली.

ट्रेसपास अगेन्स्ट अस

मायकल फास्बेंडर आणि ब्रेंडन ग्लीसन यांच्या भूमिका असलेला 'ट्रेसपास अगेन्स्ट अस' हा सिनेमा अलिकडे एका फिल्म फेस्टिवलमधे पाहिला. वास्तविक या सिनेमाला बर्याच समीक्षकांनी झोडपलंय आणि त्यांच्यावर विश्वास टाकला असता तर मी सिनेमा पहायला गेलेच नसते. पण गेले ते बरं झालं कारण मला सिनेमा आवडला मे बी धिस इज जस्ट माय आयरिश प्रिज्युडिस! , मायकल फास्बेंडरच्या मी प्रेमात आहे आणि ब्रेंडन ग्लीसनला कोणतीही भिकार भूमिका दिली तरी तो त्याचं सोनं करतो असा अनुभव आहे म्हणून गेले. काही थरारक चेसेस, गुन्हेगारी विश्वातल्या सदस्यांचे परस्परसंबंंध दाखविणारी किंचित विनोदी पटकथा, उत्तम अभिनय अशा बर्याच जमेच्या बाजू या सिनेमात दिसतात. समीक्षकांचा मुख्य आक्षेप आहेत की ही पात्रे फार ढोबळ रंगात रंगविली आहेत आणि ती पुरेशी इंटरेस्टिंग नाहीत, हा आक्षेप मला फारसा पटलेला नाही. त्याचं मुख्य कारण असं की ज्या ट्राव्हलर कम्युनिटीजच्या गुन्हेगारी विश्वाबद्दल हा सिनेमा आहे त्याच्या मानसिकतेबद्दल, त्या समाजाच्या विशिष्ट जीवनपद्धतींबद्दल, नातेसंबंधांबद्दल दिग्दर्शकाला पुरेशी जाण आहे असं मला सिनेमा पहाताना जाणवलं आणि त्यातल्या काही छोट्या छोट्या प्रसंगांमधून, विनोदांमधून ही पात्रे आपल्या तॄटींंसह पण बर्याच दिलखेचक रंगात मला भेटली. अर्थात हा निव्वळ कलात्मक दॄष्टीकोनातून जोखायचा झाला तर बराच ढोबळ आहे हे खरंच आहे पण निरस मात्र नक्कीच नाही. फास्बेंडर किंवा ग्लीसन फॅन असाल आणि गुन्हेगारी विश्वावर आधारित सिनेमे पहायला आवडत असतील तर सिनेमा अवश्य पहावा असा आहे.

+१

ग्लीसन सारख्यांचे सिनेमे समीक्षकांनी कितीही झोडपले तरीही पाहावेच. मी आवर्जून पाहणार.

सहमत, त्याचा ट्रॉयमधला

सहमत, त्याचा ट्रॉयमधला मेनेलॉस आणि ब्रेव्हहार्टमधला यिमिश हे दोन्ही एकदम आवडते रोल्स. नक्कीच पाहीन हाही पिच्चर.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

लाखाची गोष्ट

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

लेमन ट्री

लेमन ट्री (२००८) दिग्दर्शक :इरान रिकलीस
इझरायली सीमेलगतच्या पॅलेस्टिनी गावात रहाणारी विधवा सलमा, आपल्या पूर्वजांनी लावलेल्या लिंबाच्या बागेची प्रेमाने काळजी घेत, तुटपुंज्या उत्पन्नावर समाधानात एकटीच रहात असते. रसरशीत लिंबाने लगडलेल्या बागेतून लिंब तोडून त्याच लोणचं, सरबत करते.निगुतीने केलेलं चवदार सरबत तिने आलेल्या पाहुण्याला दिलं की तो तृप्त होऊन त्याची तारीफ केल्याशिवाय रहात नाही.त्या देखण्या ,कणखर स्त्रीच्या हातून सरबत प्यायला मिळावे असा क्षणिक मोह आपल्यालाही पडू लागतो . अकस्मात सीमेपलीकडे एक नवनियुक्त,इझरायली संरक्षण मंत्री रहायला येतो आणि या शांततेचा अंत होतो. सुरक्षेच्या कारणास्तव सत्ता थंडपणे आपली दहशत जमवू लागते. लिंबाच्या झाडांना कुंपण लागतं आणि मधोमध वॉच टाॅवरची स्थापना होते.सलमाला तिच्या बगिच्यात जायची परवानगी नसते.ती कुंपणावर चढून हट्टाने जाते तेंव्हा सतर्क गार्ड तिला बाहेर काढतात आणि अशाने तिला चुकून (?) गोळी लागून हकनाक मृत्यू येईल की काय अशी भीती वाटते .
ती वकिलाकडे जाते आणि झाडे तोडण्याच्या नोटीसला कोर्टात आव्हान देते. या कणखर आणि अबोल स्त्रीचा इझरायली सत्तेशी संघर्ष सुरु होतो. मंत्र्याची पत्नी मीरा ,झाडे तोडण्याची कारवाई कठोर आणि अनावश्यक आहे असे म्हणते. मीराला तिच्याविषयी सहानुभूती वाटते.सत्तेपुढे शहाणपण चालत नाही याचा प्रत्यय येतो. सलमाला तिची मुलं आणि काही गावकरी केस मागे घेण्याचा सल्ला देतात पण तिचा निश्चय ठाम असतो.तरुण वकील तिला साथ देतो आणि त्यांच्यात अनोखा बंध निर्माण होतो. तिचं सुसंस्कृत, मर्यादशील वावरणं अतिशय मोहक आहे.
दोन देशांना विभागणार्या प्रचंड भिंतीचे बांधकाम,सिनेमात प्रत्यक्ष हिंसा नसतानाही दहशत निर्माण करतं.सलमाच्या भूमिकेत 'हिअम अब्बास' हिने अद्वितीय काम केलं आहे. कमीत कमी संवाद असूनही विलक्षण बोलका चेहेरा आणि देहबोलीने ती मंत्रमुग्ध करते.सत्यकथेवर आधारित हा सिनेमा अविस्मरणीय आहे.

आभार.

कल्पनाच्या रेकमेंडेशनमुळे हा चित्रपट बघितला.

ह्या चित्रपटाबद्दल नक्की काय लिहावं असाही प्रश्न पडला होता. त्यात काय आणि किती आवडलं आहे ह्याची यादी द्यायची तर आख्खा चित्रपटच लिहून काढावा लागेल.

सलमा अरब, कमी शिकलेली, रीतभात पाळून परपुरुषांसमोर डोकं झाकणारी, गरीब पण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही स्वाभिमानी आणि पाठीचा कणा कायम ताठ असणारी. मिरा ज्यू, सुशिक्षित, इस्रायली संरक्षण मंत्र्याची बायको, तंग जीन्स-शर्ट घालणारी, सुस्थित आणि तरीही स्वतःच्या भावनाही नीट व्यक्त करू न शकणारी. असे फरक असले तरीही दोघींची आयुष्यं शेवटी उजाड होणार का काय, अशी भीती सतत लागून राहते. पण चित्रपट तसा नकारार्थी नाही. सलमाच्या छाटलेल्या लिंबांना पालवी फुटते, मिरा आपल्या नवऱ्याला सोडून स्वतःचं आयुष्य शोधायला घराबाहेर पडते.

कल्पना म्हणते ते अगदी पटलं, दोन देशांना विभागणाऱ्या प्रचंड भिंतीचे बांधकाम, सिनेमात प्रत्यक्ष हिंसा नसतानाही दहशत निर्माण करतं. संवेदनशील माणसाला ही हिंसा अंगावर येईल अशी आहे. मिराचा नवरा, संरक्षणमंत्री, हा संपूर्ण चित्रपटभर जबाबदारी टाळणारा, बालिश वागणारा, पाचपोच कमीच असलेला इसम; त्यानेच ती भिंत बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला असतो. पण भिंत तयार होते तेव्हा ती त्याच्याही अंगावर येते.

---

हा चित्रपट बघून अतिशय सुन्न झाले होते. आणि दीड तासांत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी हिलरी आणि ट्रंपचा पहिला वादविवाद सुरू झाला. तो संपूर्ण बघितला. मला बरेचदा हसू आवरत नव्हतं; सोबत कोणी टवाळ लोक असते तर कॉमेंट्स करून दंगा केला असता. मग वाटलं, ट्रंप निवडून आला किंवा न आला, त्याच्या रेसिस्ट, सेक्सिस्ट, मुस्लिमविरोधी, हिस्पॅनिकद्वेष्ट्या भूमिकेला केवढा पाठिंबा मिळत आहे! हे सगळं दिसतंय, ट्रंप चारचौघांत बिनदिक्कत थापा मारतो, खोटं बोलतो आणि तरीही मोठ्या प्रमाणावर लोकांना तो राष्ट्राध्यक्षपदी हवा आहे. तो जिंकेल का नाही, ह्या प्रश्नाला फार महत्त्व नाहीच. त्याची बुद्धीद्वेष्टी, माणूसघाणी भूमिका कधीच जिंकायला लागली आहे.

ह्या अशा काळात आपण राहतोय आणि त्यामुळे फार कोणी खचून गेले आहेत असं दिसत नाही. 'लेमन ट्री'मधल्या सलमाला, इस्रायली संरक्षणमंत्र्याविरोधात कज्जे करण्याचं, समोर बंदूकधारी शिपाई असतानाही स्वतःच्याच लिंबाच्या बागेत चोरून जाऊन पाणी घालण्याचं धैर्य कुठून येतं; हा प्रश्न थोडासा सुटला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.cinemasofindia.com

http://www.cinemasofindia.com/

हे फिल्म्स डिव्हिजनचे संस्थळ पाहाण्यात आले. फिल्म्स डिव्हिजनचे बहुतेक सर्व नवे-जुने चित्रपट येथे चकटफु पाहायला मिळतील. नाममात्र पैसे देऊन डाऊनलोडही करता येतील. (फिल्म्स डिव्हिजन म्हणजेच एन.एफ.डी.सी. ना?)

आभार उत्तम उअपयुक्त

आभार उत्तम उअपयुक्त माहिती.
मात्र मला डाउनलोड करायचा पर्याय येत नाहिये. वर्षभरासाठी सबस्क्राईब करायचा पर्याय येतोय.

आकडे डॉलर्समध्ये का आहेत कोण जाणे! इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड लागेल की काय Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मि. सेल्फरिज

ही ब्रिटिश सिरीयल, अमेरिकेत अ‍ॅमेझॉन प्राइम वर आहे. एकाच एपिसोड मधे टोटली हुक्ड! जबरदस्त नाट्य आहे. जेरेमी पिवेन (Entourage मधला आरी गोल्ड. किंवा कार्स मधे सुरूवातीला मॅक्वीन ट्रक मधून चाललेला असताना त्याच्याशी बोलणारा हायपर एजंट - त्याचा आवाज अनेकांच्या लक्षात असेल) लीड रोल मधे आहे. बरोबर अनेक ब्रिटिश लोक. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला लंडन मधे डिपार्टमेण्टल स्टोअर चालू करतो तो (तो स्वतः अमेरिकन असतो). अतिशय चार्मिंग दिसणारे (त्यातली अ‍ॅग्नेस टाउलर कोणालाही आवडेल अशी आहे), ब्रिटिश मॅनर्स सतत दाखवत वावरणारे लोक, १९१० च्या आसपासचे लंडन हे सगळे खिळवून ठेवते. त्याचबरोबर कथेतील ड्रामाही चांगला आहे. लोक "कन्व्हेन्शनली" प्रसंगानुसार, सवयीनुसार चांगले वा वाईट दाखवले आहेत, उगाच ओढूनताणून ग्रे शेड्स वगैरे प्रकार नाही. त्यांचा वाईटपणाही स्वाभाविक्/सहज वाटतो. संवादही मस्त आहेत. एका कंपनीचा, लोकांचा लीडर म्हणून सेल्फरिज ची इमेज जबरदस्त दाखवली आहे. जेरेमी पिवेन आरी म्हणूनही आवडला होता, इथेही प्रचंड प्रभावी रोल आहे.

सेल्फ्रिजिस नामक डिपारमेण्टल

सेल्फ्रिजिस नामक डिपारमेण्टल स्टोर्सचा फौण्डर तोच का हा प्राणी? माझं लंडनमध्ये याचं वर्णन वाचून खूप भारी वाटलेलं. जमल्यास अवश्य पाहीन ही सीरियल, अनेक धन्यवाद.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हो त्याच्याबद्दलच असावी

असे विकिवरून तरी वाटते

खालील व्हिडिओ. . .

खालील व्हिडिओ.
.
.

प्रत्येक धर्म स्त्रियांचे दमन

प्रत्येक धर्म स्त्रियांचे दमन करतो. फक्त दहशतवादाचा धर्माशी काहीही संबंध नसतो. धर्म ही अफूची गोळी असते. फक्त दहशतवाद्यांना ती अफू चढली, आणि त्यांनी निष्पापांना मारले की ती अफू नसते. कारण धर्माचा व दहशतवादाचा काहीही संबंध नसतो.

एक विशिष्ट शांतीप्रिय धर्म सोडून बाकी सगळे धर्म अगदी दुष्ष्ष्ट वैट्ट वगैरे आहेत. त्यात हिंदू धर्म तर फारच वैट्ट.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

एक विशिष्ट शांतीप्रिय धर्म

एक विशिष्ट शांतीप्रिय धर्म

क्या बोल रहे हो आप भाईजान? कुछ पल्ले नही पडा|

सैराट!

सैराट पाहिला. भारी आवडला.

हे पाहावे वरचे परिक्षण

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सैराट पाहिला. भारी आवडला. मला

सैराट पाहिला. भारी आवडला.

मला चांगला वाटला, पण अगदी काही legendary किंवा highest grossing च्या लायकीचा नव्हता. फँड्री आणि टाईमपास बघितला असेल तर सैराट मध्ये नवीन असे काहीच नव्हते. जमेची बाजू फक्त गाणी. अजय-अतुल रॉक्स...

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

काल सैराट पहावा लागला

मी नेहमीच रडत असतो की मराठी चित्रपटाना कलात्मकतेचे फार येड. हां चित्रपट त्याचे मूर्तिमंत उदाहरण. चित्रपट पुरस्कार मिळवणार सर्व लोक वाहवा करणार आम प्रेक्षक चित्रपट दुर्लक्षीत करणार हे सर्व असेच चालत राहणार म्हणून मी अजुन रडणार...

परंतु एखादी मसाला प्रेमकथा निवडावी अन ते सर्व प्रसंग मात्र समांतर सिनेमाच्या पध्दतीने चित्रीत करावेत म्हणजे कलात्मकता कुरवाळणारे पब्लिक खुश. अख्खा चित्रपट कलात्मक काढायचा अन वर एकदम व्यावसायिक गाण्याची फोडणी द्यायची म्हणजे आम जनता खुश... मराठी चित्रपटासाठी यशाचा हां नवा फोर्म्युला सैराट सेट करणार.

मला चित्रपट आवडला. न्हवे आर्ची आवडली. शी इज डिफिकल्ट, कुल. तिचे डोळे अतिशय बोलके. ती सोडली तर इतर कोणालाही चार पेक्षा जास्त शब्द असलेली संवादवाक्ये वाट्याला नाहित. आणि झींगाट गाणे तर जबराट. गाणे थेटर डोक्यावर घेते. चित्रपटगृहात हे गाणे दोनदा लावत होते( प्रताप सांगली) परंतु याआठवाड्यापासून ते बंद केले आहे आणि ती सुचना लेखी स्वरूपात तिकिट काढताना व्यवस्थित दिसेल आशा मोठ्या अक्षरात फ्लेक्स करून लावली आहे.गाणे सुरु होण्यापूर्वी थेटरमधे लाईट लागतात आणि सर्व लोक आपल्या खुर्चीसमोर अथवा मोकळ्या जागेत उभे राहतात क्षणात लाईट बंद होतात अन पडद्यावर गाण्याला सुरुवात होते अन अचानक थेट्रात विशेष डिस्कोलाईटची योजना कार्यन्वित केलि जाते त्यानंतर जो एकच जल्लोष सुरु होतो थेटर डोक्यावर घेतले जाते लोक बेभानपणे नाचत आहे अन या गदारोळात डिस्कोलाईटमुळे पडद्यावर एक सेकंदही गाणे बघता येत नाहित याचे वैषम्य फारउशीरा लक्षात येते

actions not reactions..!...!

आम्हीपण पाहिला. श्टोरीत काय

आम्हीपण पाहिला. श्टोरीत काय नवीन नाही (बडे बाप की बेटी + गरीब बेटा). जरासा बॉलिवुडी मसालाही आहे, तो आवडला नाही, पण टिपिकल हिंदी सिनेमापेक्षा बराच अधिक वास्तववादी वाटल्याने एकंदर पिच्चर आवडला. ते समीक्षक लोक चित्रभाषा चित्रभाषा म्हणतात ती छान वापरली आहे. काही ठिकाणी सत्यजित रायांची नक्कल केल्यासारखी वाटली, उदा. रेल्वेचे दृश्य, शेतातले (उसाचे?) तुरे. बोलीभाषेचा सहज वापर आवडला (आव न आणता/ अतिशयोक्ती न करता/ विडंबन न करता). कथेचा शेवट आणि शेवटचं दृश्य फार फार अंगावर आलं, फँड्रीसारखंच. काही ठिकाणी नेहमीची गोड लव्ह स्टोरी वाटत असणार्‍या या पिक्चरला शेवटामुळे खोल अर्थ/परिमाण मिळतं असं मनात आलं. खूप बारीक सारीक गोष्टी दाखवल्या आहेत, त्या अगदी चपखल वाटल्या, उदा. स्कूटरवर मुलाचं नाव लिहिलेलं असणं.

सैराटची एक समीक्षा

सैराट बघितलेला नाही. त्याबद्दल एक लेख वाचनात आला.

“Sairat”… An epic reimagining of the typical love story touches (and crushes) the heart

सैराटबद्दल नागराज मंजुळे - अशी साकारली ‘सैराट’मधील स्ट्राँग आर्ची

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

He takes your money and sends

He takes your money and sends you home with a slap on the face.

अगदी अगदी.

Hope is NOT a plan!

सैराट बघितलेला नाही (फँड्री सुध्दा).

बघायची इछ्चा नाही, कारण ग्रामीण पार्श्वभुमीचे चित्रपट आवडत नाहीत. पण दबावाला बळी पडुन कदाचीत हा बघेनही. स्ट्राँग आर्ची लेख मात्र आवडला, (मुळातच) निर्मळ व्रुत्तीच्या असणार्‍या पुरुषांना अ‍ॅब्युज करण्यात स्त्रिअभिव्यक्तीच्या करमणूकप्रधान टाळ्या घेणार्‍या कंगणा रणॉट स्टाइल अविष्कारापेक्षा हे ३.१४ पट चांगले आहे.

actions not reactions..!...!

टायगर चा बागी बघितला.

एकदम तगडी अ‍ॅक्शन. द-रेड, एंटर द न्यु ड्रेगॉन शी समानता दाखवणारी अ‍ॅक्शन असली तरीही एकदम अप्रतिम...! आणी छम छम छम गाण्यातल्या स्टेप्स सुधा मस्त. खुप दिवसांनी एखादा मार्शल आर्ट चित्रपट बघताना मजा आली. मारधाडपट आवडणार्‍यांनी चुकवु नये असा चित्रपट. तोडलस/ जिंकलंस मित्रा टायगर. हिरोपंती बघितल्यानंतर टायगर बायकी हिरो वगैरे वगैरे भासला होता ती इमेज त्याने संपुर्ण पुसुन टाकली.

actions not reactions..!...!

अलिकडेच पाहिलेले व्यंगचित्र

Journalism or Donky

Frank Lloyd Wright — 'I'm all

Frank Lloyd Wright — 'I'm all in favor of keeping dangerous weapons out of the hands of fools. Let's start with typewriters.'

अकल गयी...

लिहिणारे सर्व गाढव (त्यात गब्बरही आला) असा मी त्याचा अर्थ घेतला. किंवा, लिखनेवालों की अकल घास चरने गयी है असाही एक अर्थ होईल पण म्हणजे जवळजवळ तसंच.
जाता जाता : माझ्या मते गाढवं सुंदर असतात (डोळा मारत)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गब्बर ला गाढव असे संबोधून

गब्बर ला गाढव असे संबोधून गाढवांची बदनामी केल्याबद्दल चिंजं चे खाते निस्सारित का काय ते करण्यात यावे अशी व्यवस्थापनास विनंती.

आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही दोन चार दिवस आमरण उपोषण करणार आहोत. डॉ. सतीश सरदेसाई सरांची शप्पथ.

तपशीलात दडलेली गाढवे

>> गब्बर ला गाढव असे संबोधून गाढवांची बदनामी केल्याबद्दल चिंजं चे खाते निस्सारित का काय ते करण्यात यावे अशी व्यवस्थापनास विनंती. <<

चूक. 'हे चित्र प्रसृत करून गब्बरच गब्बरला गाढव म्हणू पाहतोय' असं मी म्हटलंय. त्याउलट, 'मला गाढवं सुंदर वाटतात' असंही मी म्हटलंय (डोळा मारत)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सख्या चला धाग्यामंदी ...

ह्या लिहिणाऱ्या गाढवाच्या हातावर फार केस आहेत. बायकांच्या अंगावर एवढे केस नसतात सहसा. हे चित्र पुरुषांनी काढलेलं आहे; स्त्रियांना लिहिता येत नाही असा स्त्रीद्वेष पसरवण्यासाठी!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण संदर माणसे "गाढवे" नसतात

पण संदर माणसे "गाढवे" नसतात असे मधे कोणीतरी सिद्ध केलय डेटा वापरुन.

मानवतावादी, वगैरे शिव्या

>> पण संदर माणसे "गाढवे" नसतात <<

अधोरेखिताकडे लक्ष वेधून खाली बसतो.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(No subject)

क्या बोल्या रे तू क्या

Interview of Camille Paglia.

Interview of Camille Paglia. Camille Paglia ह्या लेखिका आहेत. अनेक विषयांवर त्यांनी लिहिलेले आहे असे मी ऐकून आहे. कला, सांस्कृतिकता, राजकारण, स्त्रीवाद वगैरे. प्रखर स्त्रीवादी अशी काहीशी ओळख आहे त्यांची.

३ पर्याय आहेत -

१) वरील लिंक वर मुलाखत वाचू शकता
२) वरील लिंक वर मुलाखतीचा ऑडिओ (पॉड्कास्ट) ऐकू शकता
३) खाली व्हिडिओ पाहू शकता
.
.
.
.

पूर्ण मुलाखत ऐका-वाचायचा

पूर्ण मुलाखत ऐका-वाचायचा कंटाळा आला आहे कारण विषय पॉप कल्चर, सिनेमा वगैरे फार आवडीचा नाही. पण पहील्या ३१/२ मिनीटातच चमक्दार वाक्ये सापडली-

I think a true intellectual should be always beyond partisanship and always critiquing the premises of your own friends and allies.

beauty is an incredibly important human principle

काल "कलर ऑफ मनि" बघितला

काल "कलर ऑफ मनि" बघितला मार्टीचा. ठीकठाक वाटला, कथानकातच काही रोमांचक क्षण नसल्यामुळे असेल कदाचित.
पॉल न्युमन मात्र एकदम फीट बसतो रोल मधे आणी टॉम क्रुझ सुद्धा.

ब्रोकन एरो...जेम्स स्टुअर्टचा

गेल्या अाठवड़्यात सर जेम्स स्टुअर्टचा ब्रोकन एरो बघितला...
देव आनंद च्या हिंदुस्तान हमारा है, राज कपूर च्या जिस देश में गंगा बहती है ची नकळत आठवण आली...
हालीवुड मधे देखील याच धर्तीवर पिक्चर बनलेत.

मनरोच्या रिवर आफ नो रिटर्न मधे John Wayne होता....

रवींद्र दत्तात्रय तेलंग

Robert Mitchum आहे रिव्हर ऑफ

Robert Mitchum आहे रिव्हर ऑफ नो रिटर्न मध्ये.

काल अलुअर्जुनचा सरैनोडु पाहिला

धमाल नृत्ये, तडाखेबंद अ‍ॅक्शन च्या जिवावर अलु अर्जुनने अक्षरशः चित्रपट तोलला आहे. कथा विशेष नाही पण पर्फॉर्मन्स जबरा. मोठ्यापडद्यावर डोळ्याचे पारणे फिटले. सब्टायटल्स सोबत असल्यामुळे ओळ अन ओळ कळत होती. हॄतीक वगैरे बच्चे पण नाहीत याच्या समोर. मज्या आली. मंध्यंतरापुर्वीचा अ‍ॅक्शन सिन जबरा.

actions not reactions..!...!

Game ऑफ Thrones 5th

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

River of no return - मर्लिन मन्रो

मर्लिन मन्रो चा River of no return आता जस्ट पाहीला. मस्त आहे. गाणी तर इतकी गोड आहेत. एकदम मधुर. वेस्टर्न (काऊबॉय) सिनेमा आहे, खूप आवडला.

प्रशांत दामले आणि राहुल

प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेले गो.ब.देवलांचे 'संगीत संशयकल्लोळ' कालच पाहिले. खरतर राहुल देशपांडेला लाइव्ह ऐकणे हा मुख्य हेतु होता तो सार्थ झालाच पण प्रशांत दामलेनेही त्याच्या खास टचने नाटकातील विनोदाला चारचाँद लावले.. फार पूर्वी दूरदर्शनवर बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीला संगीत नाटकं दाखवण्याचा सपाटा लावला होता, तेव्हा कंटाळवाणे वाटले होते (अर्थात वयानुरूप कमी समज असल्यानेही असेल तेव्हा.. ). पण या संचाने खूपच रंगतदार प्रयोग केला..

http://www.esakal.com/NewsDet

माझी भाची

माझी भाची आहे त्या नाटकात . उमा पळसुले-देसाई (रेवती)

http://www.loksatta.com/manoranjan-news/sangeet-sanshaykallol-natak-laun...

Mandar Katre

त्यांनीही छान काम केले आहे या

त्यांनीही छान काम केले आहे या नाटकात.. आवाजही उत्तम आहे..

So which is it liberals, do

उंगली

नेटफ्लिक्स वर 'उंगली' पाहिला. होम डीव्हीडी साठी चित्रपट असतात तसा म्हणून टाईमपास आहे. क्लायमॅक्स फारसा प्रभावी नाही पण एकूण बघताना कंटाळा येत नाही.

"स्पॉटलाईट"

नुकताच "स्पॉटलाईट" पाहिला

खूप चांगला चित्रपट

अशा चित्रपटाना ऑस्कर दिल्यास ऑस्कर पुरस्काराचे सार्थक होत असावे,असे म्हणावेसे वाटते !

Mandar Katre

कुठे मिळेल

बंदी आली होती ना यावर ?

actions not reactions..!...!

टॉरेन्ट

टॉरेन्ट

Mandar Katre

मौनराग

महेश एलकुंचवार ह्यांच्या "मौनराग" ह्या ललित-लेखसंग्रहातील दोन लेखांवर आधारित "मौनराग" हा आविष्कारनिर्मित कार्यक्रम काल संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे मिनीथेटरात पाहिला. आधी चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी लेखकाला बालपणापासून मृत्युबद्दल वाटणार्‍या गूढ आकर्षणाविषयी लेखाचे अभिवाचन केले. पाऊण तासाच्या अभिवाचनानंतर पाच मिनिटांचे मध्यांतर झाले. मग आले सचिन खेडेकर. वयाच्या बाराव्या वर्षीच कुटुंबाने केलेल्या स्थलांतरामुळे गावच्या घराची झालेली ताटातूट, व त्यामुळे पुढील ३८ वर्षे उरी वागवलेली भळभळती, दुखरी जखम; ही घालमेल, ह्या वेदना ह्या केवळ आपल्या आहेत, कुटुंबातील इतरांना आपली इतकी तगमग का होते आहे हे समजतही नाही, आपणच अती हळवे आहोत की इतर माणसे कोडगी हा सतत पडणारा प्रश्न; तब्बल ३८ वर्षांनंतर गावी जाऊन ते घर पुन्हा पाहिल्यावर उचंबळून आलेल्या भावना; हे सारे खेडेकरांनी अत्यंत जुजबी नेपथ्य असलेल्या त्या छोट्या रंगमंचावर आपल्या अभिनयसामर्थ्याच्या बळावर ज्या विलक्षण ताकदीने उभे केले आहे त्याला तोड नाही.

"मौनराग" हा लेखसंग्रह मी पूर्वी वाचला होता, व तो मला अतिशय आवडला होता. एलकुंचवारांची भाषा, त्यांची लेखनशैली ह्यांचा मी चाहता आहे. तेव्हा कार्यक्रमाला जाताना मनात धाकधुक होतीच. कुलकर्णी व खेडेकर त्यांच्या लेखनाला न्याय देऊ शकतील का? "मौनरागा"च्या माझ्या मनावरील ठशाला गालबोट तर लागणार नाही ना? उत्तम साहित्याच्या रंगमंचीय किंवा पडद्यावरील आविष्काराविषयी तो पाहण्याआधी कोणत्याही वाचकाच्या मनात असे अनेक प्रश्न उठतातच. माझी भीती साफ खोटी ठरली. खेडेकरांनी आपण काय ताकदीचे व संवेदनशील नट आहोत हे सिद्ध केलेच; पण एका जागी मांडी घालून बसलेल्या चंद्रकांत कुलकर्णींनी केवळ आवाजाच्या चढ-उतारातून, लयीतील बदलातून, शब्दफेकीतून, शब्दांबरोबरच शब्दा-शब्दातील व वाक्या-वाक्यामधील अवकाशातून एलकुंचवरांच्या मौनरागाचे व्यक्तापलीकडील अव्यक्त, मौन अंतरंग देखील प्रभावीपणे उलगडून दाखवले.

गेलो होतो काहीशा साशंक मनाने, परंतु एक विलक्षण, समृद्ध करणारा, भारावून टाकणारा कार्यक्रम पाहिल्याचे समाधान घेऊन घरी परतलो.

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

ट्रेलर

सुदर्शनला हा प्रयोग बर्‍याच

सुदर्शनला हा प्रयोग बर्‍याच आधी झाला होता. तो मला आवडला नव्हता इतकेच आठवतेय. त्यानंतर याच पुस्तकावरील चित्रपट पिफ मध्ये लागला होता तेव्हा मी तो बघितलाच नाही.
काही गोष्टी लेखनातच छान वाटतात.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मौनराग

प्रयोग मलाही तसा ठीकठाकच वाटला होता. वैभव आबनावे दिग्दर्शित 'मौनराग' चित्रपट मात्र मराठी चित्रपटाची रुळलेली वाट सोडून देऊन वेगळं काही करू पाहणारा होता. त्यामुळे व्यक्तिगत आवडीनिवडीच्या निकषांपलीकडे जाऊन महत्त्वाचा होता, असं म्हणेन.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ट्रेलर

मी पाहिलाय हा चित्रपट.

मी पाहिलाय हा चित्रपट. पूर्णपणे समजला नाही, चित्रपटाला कथा नाही तर भावना होती असा वाटला. विचित्र म्हणजे प्रत्येक संवाद सहा वेळेस होता! मुंबई फिल्म फेस्टिवलला बघितला, माझा नवरा पेंगत होता, दर वेळेस उठला कि तोच संवाद Shock

ये सब क्या है? ते कुजबुजत

ये सब क्या है? ते कुजबुजत बोलताहेत की माझ्या हेडफोनमध्ये काही लोचा आहे? आणि मौनरागचं भाषांतर मोनोलॉग असं कसं होईल?

बघायलाच पाहिजे हा सिनेमा.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

वैभव आबनावे दिग्दर्शित

वैभव आबनावे दिग्दर्शित 'मौनराग' चित्रपट मात्र मराठी चित्रपटाची रुळलेली वाट सोडून देऊन वेगळं काही करू पाहणारा होता.

रमताराम अजूनही इथे डोकावत असतील तर त्यांनी (चवताळून) याचा समाचार घ्यावा - पिफच्या वेळी घ्तलावता तसा - अशी मनःपूर्वक इच्छा! (स्माईल) (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वैभव आबनावे दिग्दर्शित

वैभव आबनावे दिग्दर्शित 'मौनराग' चित्रपट

कुठे पहायला मिळेल?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

Eye in the Sky नावाचा एक

Eye in the Sky नावाचा एक चित्रपट पाहिला. काही दहशतवादी जे एका घरात एकत्र आलेले असतात त्यांना ड्रोन मधून एक बाँब टाकून मारण्याची (अमेरिकन व ब्रिटिश सैन्याची) तयारी चाललेली असते व त्याच वेळी त्या घराजवळ एक लहान मुलगी ब्रेड विकायला आपले दुकान थाटून बसते. व ती त्या बाँब च्या परिघाच्या क्षेत्रात येणार असते व म्हणून - बाँब टाकायचा की नाही व केव्हा टाकायचा यावरून एक प्रचंड मूल्यसंघर्ष होतो त्याबद्दलचा चित्रपट.

हाउस ऑफ लाईज - अ‍ॅमेझॉन प्राईम वर ही सिरीज

अ‍ॅमेझॉन प्राईम वर ही सिरीज आहे. त्याचा पहिला सीझन पाहिला. मॅनेजमेण्ट कन्सल्टण्ट्स च्या रोजच्या कामातले बारकावे उपहासाने/विनोदाने दाखवले असतील असे सुरूवातीला वाटले. पण तेवढे प्रभावी झालेले नाही. ऑथेण्टिक वाटत नाही. दुसरे म्हणजे टॉप लेव्हल मॅनेजमेण्ट कन्सल्टिंग हा टीपिकल व्हाईट मॅन जॉब आहे (ते 'ओल्ड बॉइज क्लब' वगैरे). तेथे ब्लॅक लीड कॅरेक्टर हे 'प्रातिनिधीक' वाटत नाही. डॉन चीडल मला आवडतो पण इथे तो मिसकास्ट वाटतो (जॉन हॅम किंवा व्हाईट कॉलर मधल्या निक सारख्या लोकांना परफेक्ट होईल रोल हा). त्यात एका एपिसोड मधे सगळी धमाल बसवायची म्हणून प्रत्येक मॅनेजमेण्ट असाइनमेण्ट खूप सुलभीकरण (oversimplification) केलेली वाटते. प्रत्येक क्लायंट कंपनीत मुख्य पदावरच्या बायका म्हणजे टोटल निंफो. तो सगळा मॅनेजमेण्ट, कन्सलटन्सी 'गेम' खूप ट्रिवियलाइज करून दाखवला आहे.

मॅनेजमेण्ट कन्सलटन्सी मधे चालणारे असंख्य प्रकार खूप डीटेल मधे, अगदी डिलबर्ट सारखे नाही तरी किमान नर्मविनोद, उपहास वापरून दाखवता आले असते. तसे काही आहेतही. पहिला सीझन बर्‍यापैकी बघणेबल वाटला. पण आता कंटाळा आला.

सुरूवातील आवडल्याने याचे मूळ पुस्तकही आणले आहे. ते कसे आहे ते वाचून सांगतो.

दारु पिऊन चालत जाणे हे दारू पिऊन गाडी चालवण्यापेक्षा जास्त प्राण


.
.
.
दारु पिऊन चालत जाणे हे दारू पिऊन गाडी चालवण्यापेक्षा जास्त प्राणघातक आहे !!!

ऐसी तैसी...

मला ऐसी तैसी डेमोक्रसीचे तुमच्या मते सर्वात विनोदी भाग कोणते ते लोक रेकमेंड करू शकतील का? मी जे थोडं पाहिलं होतं ते मला अंमळ कंटाळवाणं वाटलं होतं. पण लोक म्हणतात खूपच चांगलं असतं.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वरूण ग्रोव्हर फार रटाळ बोलतो.

वरूण ग्रोव्हर फार रटाळ बोलतो. काही निवडक बिट्सच चांगले असतात.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

प्रिसाइजली

म्हणून तर रेकमेंडेशन हवी आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुनिक ,बावरिया, जर्मानी मध्ये

मुनिक ,बावरिया, जर्मानी मध्ये टोरेंट ला दूसरा पर्याय काय?

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

दृश्यम

नुकताच हिंदी 'दृश्यम' पाहिला. मागच्या वर्षी पहायचा राहिला होता. खूपच आवडला. त्यानंतर रिव्ह्यू वाचले. त्यानंतर मूळ मल्याळम पाहिला. त्यातले मोहनलालचे काम तुलनेने जास्त आवडले. एक वेगळा अनुभव.

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

मूळभूत प्रश्न

  1. मूळ मल्याळम सबटायटल्ससहित मिळाला का?
  2. त्याची प्रिंट चांगली आहे का? (म्हणजे लॅपटॉपवर एकट्यानं नाही, तर चांगला प्रोजेक्टर वापरून ५० लोकांना एका खोलीत दाखवण्यासाठी)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाही

सबटायटल्स नव्हती. प्रिंट चांगली होती. सायटीचं नांव हॉटस्टार का काहीतरी होतं,

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

आभार

सबटायटल्स नसतील तर उपयोग नाही. असो. आभार.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डौनलोडही करता येतात की.

डौनलोडही करता येतात की.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

2.त्याची प्रिंट चांगली आहे

2.त्याची प्रिंट चांगली आहे का? (म्हणजे लॅपटॉपवर एकट्यानं नाही, तर चांगला प्रोजेक्टर वापरून ५० लोकांना एका खोलीत दाखवण्यासाठी)

असा प्रकार बेकायदेशीर नसेल का चिंजं?