झुरळे ,रेल्वे आणि अच्छे दिन

अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे.
हा माझ्या मित्राच्या बाबतीत आज (२५ फेब्रुवारी रोजी) घडलेला किस्सा आणि हा त्याने मला स्वतः सांगितलेला आहे (व्हॉट्सअ‍ॅपवर). मित्र तपोवन एक्स्प्रेस ने मुंबईला चालला होता. बोगी मध्ये मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. दुसर्‍या मित्राने त्वरित रेल्वे हेल्प्लाइन वर तक्रार करायला सांगितली. याने पॉर्टल वर तक्रार केली. थोड्याच वेळात तक्रारीत लक्ष घालत आहोत म्हणुन संदेश आला, त्यानंतर थोड्याच वेळात फोन आला, त्यानंतर पुढच्या स्टेशनवर कर्मचारी येउन स्वच्छता करुन आणि हिट मारुन गेला.
मेसेज केला,पोर्टलवर तक्रार बुक केली - 14:31
Indian Railways-CD (संदेश): Thank you for sending your complaint/suggestion to Indian Railways. We will revert to you after due investigation. ! : 14:40
रेल्वे कडून कॉल आला होता,कोणी क्लिनिंग करणारी माणसे आलीत का ? अशी विचारणा केली गेली.कोणी आले नाही तर कॉल करा असे म्हणाले.: 14:53
रेल्वेचा माणूस आला: 14:57
थोडक्यात सांगायचे तर ३० मिनिटात तक्रारीचे निवारण झाले. हा बदल सुरेश प्रभु आल्यावर झाला आहे. म्हणजेच भाजपा आल्यावर झाला आहे. आधीची सरकारे असताना रेल्वे ढिम्म असायची. शष्प परिणाम व्हायचा नाही तक्रारींचा. हा बदल आहे. हे अच्छे दिन आहेत. पण ज्यांना करवादयचेच असेल ते अजुनही म्हणतील की "मुळात बोगी मध्ये झुरळे आलीच कशी? म्हणजे स्वच्छताच नव्हती. हेच का अच्छे दिन? हीच का प्रभुंची कार्यक्षमता? काय झाले मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे जर रेल्वेत झुरळे फिरत असतील तर?". त्यातुन एकच स्पष्ट होइल की ज्याला फक्त बोंबाच मारायच्या आहेत तो फक्त बोंबाच मारेल. एकदा का पिवळे चष्मे घातले की लाल गुलाब सुद्धा केशरीच दिसेल wink emoticon
( © मिपा मित्रांच्या व्हाट्सअ‍ॅप पोस्ट वरुन साभार )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

यापेक्षा हा धागा वाचा.
http://www.misalpav.com/node/35082

हाच किस्सा व्यवस्थित लिहिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे कसले अच्छे दिन. आमच्या लालु , नितिश आणि ममता च्या काळात सर्व गाड्या पूर्ण एसी असायच्या, आणि तिकीट पण नसायचे.

ह्या सरकारच्या लोकांनी सगळे एसी काढुन आपापल्या घरी नेऊन बसवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जसं संपत्ती ही अस्तित्वातच असते आणि तिचे "न्याय्य" वाटप कसं करायचं एवढा एकच प्रश्न उरलेला असतो असं गृहित धरलं की मग विषमतानिवारण, सर्वसमावेशकता, दुर्बलघटकांना दिलासा, संधीची समानता, कामगारांचे शोषणापासून रक्षण, शेतमजूरांना किमान वेतन वगैरे आभाळात गोळ्या माराव्या लागतात. त्याचप्रमाणे - आजच्या समस्या ह्या फक्त आजच्या सरकारने निर्माण केलेल्या आहेत व त्यांचे मूळ मागच्या सरकारच्या कार्यपद्धतीत असूच शकत नाही हे गृहितक असले की मग - तुम्ही फक्त सेक्युलर असलं म्हंजे झालं बाकी फार काही करायची गरज नसते..... वाटल्यास वंचितांसाठी कैतरी चारपाच योजना डिक्लेअर करा म्हंजे झालं - अशा मनोधारणा जन्मास येतात. नैतर - "अहो किती दिवस तुम्ही मागच्या सरकारच्या त्रुटी दाखवणार आहात ?" असे विचारले की काम होऊन जाते.

( आता यावर मनोबा मला - किती दिवस थियरॉटिकल, हस्तिदंती मनोर्‍यातलं, पुस्तकी, अतिबेसिक प्रश्न विचारणारेस - असा प्रश्न विचारेलच. प्रशासकीय समस्या या विषयावर मुद्दा मांडण्यासाठी गव्हर्नन्स, इन्स्टिट्युशन्स, रेग्युलेशन, वेल्फेअर यावर अभ्यास करण्याची कोणतीही गरज नसते. अभ्यास करणे म्हंजे पुस्तकी. प्रॅक्टिकल बोला, गब्बरसिंग, प्रॅक्टिकल. मुलायम/लालू नैका बोलत ? मग आम्ही का नको ?? आणि एनिवे अभ्यास करणार्‍यांनी असे काय दिवे लावलेत आजतागायत ??? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यांच्याविषयी कोणीच वाईट बोलत नाही. कोण कार्यक्षम आणि कोण अकार्यक्षम हे सगळ्यांना, अगदी काड्या टाकणार्‍यांनाही व्यवस्थित समजते आणि ते अशा विधायक कामांवर टीका कधीच करीत नाहीत.
किस्सा आधीच वायरल झालेला आहे. आणि अर्थात प्रसार होण्याजोगाच आहे, पण, खालील वाक्य लेखाच्या सुरुवातीला नसते, किंबहुना लेखामध्येच नसते तर तुमचा लेख सकारात्मक झाला असता. (रेल--मंत्रालयाचे मूळ कृत्य खूपच विधायक/सकारात्मक आहे.)
"अच्छे दिन कधी येणार अश्या काड्या टाकणार्‍या माणसांना घडत असलेले बदल कधीच दिसत नाहित त्यांना फक्त शिव्या घालणे जमेल. भारतात सध्या काय क्रांतिकारी बदल घडत आहेत हे कधीच कळणार नाही म्हणुन लिहितो आहे''

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण कार्यक्षम आणि कोण अकार्यक्षम हे सगळ्यांना, अगदी काड्या टाकणार्‍यांनाही व्यवस्थित समजते

फारच विनोदी लिहीता बै तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंतर ही फोन करून तक्रार सेवा दोन वर्षांपासून आहे.आता याचं श्रेय कोणाला घ्यायचं द्यायचं ते तुम्ही ठरवा.मुळात "पब्लिक"च खैयके पान बनारसवाला असल्याने त्यांना स्वच्छतेची चाड नाही.
औरंगाबादच्याही हॅाटेलात झुरळं होती. रुम सर्विसचे दुष्परिणाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0