श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती अर्थात यू अ‍ॅटीट्यूड

संवाद कौशल्याच्या प्रशिक्षण क्षेत्रात "you attitude" "यू अ‍ॅटीट्यूड" नावाची संकल्पना आहे. याला मराठीत काय शब्द योजना वापरावी या बद्दल मिपा संस्थळावर चर्चा घेतल्यानंतर 'श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती' हि पारिभाषिक संज्ञा अधिक योग्य वाटली. कदाचित 'श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख द्वितीयपुरुषी मांडणी असे जमू शकेल.

You आणि attitude हे शब्द इंग्रजी भाषेत सोबत पण वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा येतात त्यामुळे "You attitude" करता गूगल सर्च केला तर नवागत व्यक्तिचा गोंधळही होऊ शकतो म्हणून "You attitude" संकल्पना विषद करण्याचा माझ्या पद्धतीने जरासा प्रयत्न करतो आहे; थोडासा व्यापक पट मांडण्याचा प्रयत्न आहे. यू अ‍ॅटीट्यूड संकल्पना जाहीरात विश्वाने जाहीरात प्रभावी कशी होईल या दृष्टीने पुढे आणली पण पुढे व्यावसायिक संवाद कौशल्ये, लेखन आणि संभाषण कौशल्याच्या प्रशिक्षणासाठीही एक तंत्र म्हणूनही विकसित झाली आहे.

कोणत्याही व्यक्तीला स्वतःबद्दल बोललेल आवडते. तुम्हाला कुठेतरी जायच आहे आणि तुमचा बालवयातला मुलगा कुठेतरी झाडावर अथवा जंगलजीमवर चढून बसलेला आहे किंवा स्वतःच्याच खेळात मश्गुल आहे. एखादी गोष्ट तुम्हाला स्वतःकरता करून हवी आहे म्हटल्या नंतर कदाचित एकणार नाही; पण तेच त्याच्या आवडीची गोष्ट आहे, असे सांगितले तर लगेच तयार होईल. अगदी लहान बाळही त्याच्या चिउकाऊच्या विचारात रमलेल असते, त्याला भरवताना चिउकाऊच्या गोष्टी सांगत खाऊ घातले कि पटकन एकते किंवा एक घास ताईचा एक घास दादाचा म्हणूनही आई जेवण भरवते म्हणजे काय करते तर त्याच्या भूमिकेत जाते गोष्ट त्याच्या करताच करावयाची असते मात्र उद्देश मात्र आपला सफल करून घेते. हे उदाहरण लहान मुलांबद्दलच उदाहरण मानवी स्वभावास हे किती स्वाभाविक आहे हे लक्षात येण्या करता दिल. प्रत्येकवेळी लहान मुलांशी बोलतो तसेच बोलावयास हवे असे नाही मोठ्या माणसांनी परस्परांशी संवाद साधताना केवळ मला काय पाहीजे हे सांगण्या पे़क्षा, समोरच्या व्यक्तीला काय हवे आहे हे विचारात घेऊन असेच स्वाभाविकपणे संवाद साधले तर ?

एखादी व्यक्ती परगावहून येते तेव्हा आपण प्रवास कसा झाला इत्यादी प्रश्न विचारून विचारपुस करतो काय हव नको याच्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतो तेव्हा ते आपण किती स्वाभाविकपणे करत असतो. तेव्हा ते आपण प्रत्येक वेळी केवळ तंत्र म्हणून वापरतो का? नाही तो आपल्या स्वभवाचा आपल्या वृत्तीत आलेल्या सकारात्मकतेचा अविष्कार असतो. समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांच्यां कामा करता अपाँईटमेंट मागते, तुम्हाला स्वतःला त्यातून काही फायदा नसतानाही बर्‍याचदा दिलेली वेळ पाळत असता तेव्हा ते काय असते ? केवळ एक कौशल्य असते, केवळ एक तंत्र असते, की एक स्वतःत बाणवलेली सकारात्मक वृत्ती असते. आणि म्हणूनच यू अ‍ॅटीट्यूड संकल्पनेत स्कील अथवा टेकनीक शब्द न वापरता अ‍ॅटीट्यूड शब्द वापरला असेल का ?

वाचककेंद्रित दॄष्टीकोन / मांडणी हे शब्द जवळ जातात, वाचकाच्या अथवा श्रोत्यास युक्त आणि भावेल अशा दृष्टीने मला काय आवडते, मला काय पाहिजे, माझे प्राधान्य काय, हे सगळे स्वतः बद्दल बोलत राहण्या पेक्षा समोरच्या व्यक्तीच्या आवडी गरजा प्राधान्य इत्यादी लक्षात घेण्यासाठी अथवा लेक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं. पण यात परार्थ किंवा नि:स्वार्थीपणाची altruism ग्वाही नाही अथवा पुर्णत्वाने दुसर्‍यासाठी स्वतःला वाहून घेणे नाही. यू अ‍ॅटीट्यूड मध्ये श्रोत्यास युक्त आणि भावेल अशा पण स्वतःसही आवडतील अथवा उपयूक्त अशा गोष्टींची चर्चा करून अप्रत्यक्ष महत्व पटवून देण्याची कृती सुद्धा सम्मीलीत असू शकते. त्या दृष्टीने श्रोत्याचा दृष्टीकोण लक्षात घेतला जातो पण श्रोत्याच मन वळवण्याची क्रिया स्वतःच्या दृष्टीकोणाकडे करण्याची क्रिया अथवा स्वतःचा हेतु साधून घेण हेही असु शकत खासकरून संवाद व्यावसायिक कारणासाठी साधला जात असेल तर. ज्याला बर्‍याचदा आपल्याकडे गोड बोलण म्हणतात. पुर्वीच्या काळात चारूवाक असाच एक शब्द समोरच्यास गोडवाटेल असे बोलण्या बद्दल वापरला जात असे त्याची आठवण झाली.

मह्णून 'श्रोत्यास युक्त आणि भावेल असा' आणि 'श्रोता/वाचककेंद्रित' यात अर्थछटा अभ्यासावयास हव्यात. अनुनय आणि लोकानुनय च्या काही छटा मॅच होतात पण काही अर्थछटा अपीझ लांगूलचालन या राजकीय छटे जवळही जातात की अनुनय आणि लोकानुनय किंवा हे शब्द you attitude सुयोग्य वाटतात का? हेही तपासण्याची आवश्यकता असावी. आपण या मुद्याकडे पुन्हा येऊ.

पत्र लेखनाच तंत्रात सांगतात तसे "द्वितीयपुरुषी मांडणी" म्हणजे 'तुम्ही' या अर्थाने वापरलेला 'आपण' आणि आपण या शब्दांचा तर इंग्रजीत यू या शब्दाचा उपयोग हा या तंत्राचा अगदी अवश्यमेव भाग आहे. 'आपण' हा शब्द आला की कस छान वाटत ना वाचताना.

अर्थात "समोरच्याचा दृष्टीकोण" "द्वितीयपुरुषी मांडणी" सोबतच "सकारात्मक मांडणी" हे महत्वाचे भाग आहेत. "समोरच्याचा दृष्टीकोण"मध्ये आपण समजा व्यवसायाने अकौंटंट आहात हे माहीत असेल आणि शक्य असेल तर ते लक्षात घेतही मांडणी करणे. एका अकौंटंटशी संवाद साधताना मी जर्नल लेजर ते ऑडीट वगैरे या विषयांबद्दल लिहिन किंवा बोलेन तर समोर डॉक्टर आला तर लगेच वैद्यकीय क्षेत्राबद्दल तेही त्यांच्या दृष्टीकोणातून चर्चा करेन. मार्केटींग मध्ये याचा उपयोग त्याच क्षेत्रातले दुसरे कोण कस्टमर आहेत याची माहिती देत केला जातो. म्हणजे मी तुमच्या कडे इंश्युरन्स विकण्याकरता आलो असेल तर अजून कोण कोणत्या अकौंटंटनी माझ्याकडून इंश्युरन्स विकत घेतला हे सांगेन किंवा तुमच्या ओळखीतल्या कुणी कुणी इन्श्युरन्स घेतला सांगेन हाही यु अ‍ॅटीट्युडचाच प्रयोग झाला .

त्या शिवाय शंका निरसन किंवा ऑब्जेक्शन हँडलींग मध्येही त्याच क्षेत्रातील उदाहरण देण चांगल जस की सॉफ्टवेअर विकणार्‍या व्यक्तीला सॉफ्टवेअर मध्ये टेकनीकली एखादी गोष्ट होऊच शकत नाही हे एका अकौंटंटना सांगायच आहे तर डबल एंट्री अकाऊंटींग मध्ये एखादी चुकीची एंट्री करणे किती घातक आहे तसेच सॉफ्टवेअरमध्येही चुकीचा तांत्रीक बदल घातक ठरू शकतो हे सांगितल्या नंतर अकाऊंटट ती अडचण चटकन लक्षात घेईल; पण समजा मी बांधकाम व्यवसायातल्या सिव्हील इंजीनीयरशी बोलत असेन तर तयार झालेल्या आरसिसी स्ट्रक्चर मध्ये बदल करताना येणार्‍या अडचंणींची माहिती दिली कि ते त्यांच्या सहज पचनी पडेल.

शनिशिंगणापूर महिलाप्रवेशा बद्दलच्या मी लावलेल्या मिपा चर्चेत मासिकपाळी दरम्यान एका मुर्तीपुजा श्रद्धावान महिला सदस्याचा एक प्रतिसाद(भाग) आला तो असा.

ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या शरीरात खूप हार्मोनल चेंजेस होतात . ह्या दिवसांमध्ये स्त्री शरीरामध्ये पूर्णता : रजोगुण असतो . देवाच्या जवळ जाण्यासाठी सात्विक भावाची गरज असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये देवाच्या जवळ येवू नये .
संदर्भ

त्यावर मुर्तीपुजेबद्दल साशंक असलेल्या महिला सदस्याने माझ्या श्रोता अभिमुख प्रतिसादाला दुजोरा दिला पण सोबतच मुर्तीपुजेवर त्या कड्डक टिका करून मोकळ्या झाल्या.

नाहीयासाठी देवाजवळ न जाणे इ शुध्द भंपकपणा आहे.
रजोगुण तमोगुण हे स्वभाव विकार आहेत.त्याबद्दल देव काय करु शकणार आहे ? दगडाला तसेही काय कळते समोर बाई आली का बुवा,तिची पाळी सुरु आहे की नाही.

टिकेत तथ्य असेल पण ती पुरेशी श्रोताभिमुख आहे का ? समोरच्या व्यक्तिचा विश्वास अतुट असेल तर टिकेने विचार बदलेल याची शाश्वती देता येतेच असे नाही काही वेळा तो बदलेल काही वेळा समोरची व्यक्ति ऑफेंड होऊन अधिकच डिफेन्सीव्हवर जाईल.

आता आपण श्रोताभिमुख ऑब्जेक्शन हँडलींग कसे असू शकेल पाहुया

तो वेळ (मासीकपाळीचा काळ) आपल्यासाठी कठीण असेल त्यावेळी आपली श्रद्धास्थान असलेली देवमुर्ती अधीक जवळ असावयास आणि त्या श्रद्धेतून त्यानां फुल न फुलाची पाकळी साहाय्य व्हावयास नको का ?

पण श्रोताभिमुख ऑब्जेक्शन हँडलींग करताना श्रोता डिफेन्सीव्ह वर जाऊ शकेल अशी कठोर टिका सहसा टाळलेली बरी (अर्थात काही वेळा कठोर टिकेच्या मात्रेचा वापर करता येतच नाही असे नाही)

मिपाचर्चेत एक प्रतिसाद माज= अ‍ॅटीट्यूड Smile असा आला. मला वाटते अ‍ॅटीट्यूड दोनचार अर्थछटा आहेत.मुख्य अर्थ वृत्ती असा असावा असे वाटते वृत्ती शब्द पण अ‍ॅटीट्यूड शब्दाच्या बर्‍याच अर्थछटा दाखवू शकतो.आपण म्हणता तसे "अ‍ॅटीट्यूड दाखवणे" ची एक अर्थ छटा "माज दाखवणेच्या" जवळ जात असावी. भाषा प्रवाही असते हल्ली "माज आहे मला मराठी असल्याचा" अशी एक उद्घोषणा वाचण्यात येते. इथे "माज" शब्द हिंदी गर्व शब्दाच्या अर्था जवळ जातो अभिमान पेक्षा अधिक पण मराठी गर्व शब्दा पेक्षा कमी आणि अल्पसा अ‍ॅटीट्यूड च्या अर्थछटे जवळही जाणारा आहे असे वाटते.

निव्वळ "माज" या शब्दाची एक अर्थ छटा इंग्रजी Rut या शब्दाशीही मिळते. Rut चा गूगल ने दाखवलेला अर्थ a habit or pattern of behaviour that has become dull and unproductive but is hard to change. असा आहे.

माज या शब्दाची दुसर्‍या दोन महत्वाच्या अर्थछटा "स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना" "धन, विद्या, सत्ता इत्यादीतील प्रभुत्वामुळे चढलेला कैफ" संदर्भ मराठी शाब्दबांध.

माज या शब्दाची एक अर्थछटा ताठा या मराठी शब्दाशी साम्य दाखवते तेव्हा सुद्धा अ‍ॅटीट्यूडच्या एका अर्थछटेशी मॅचकरत असावी असे वाटते.

"यू अ‍ॅटीट्यूड" हि पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे यात वक्ता आणि श्रोता दोघांच्याही माज असण्या नसण्याशी खूप संबंध नाही. अर्थात ऐन संवाद साधताना "माज" मध्येच डोकावला नाही हि किमान अपेक्षा असू शकते.

एनी वे त्यांनी माज हा शब्द सुचवल्या मुळे मी ऑनलाईन डिक्शनर्‍या बर्‍या पैकी पालथ्या घातल्या आणि त्या संशोधनातून "अभिवृत्ती" हा शब्द "यू अ‍ॅटीट्यूड" मधील अ‍ॅटीट्यूडच्या जवळ जातो हे लक्षात आले. अभि या प्रत्ययामुळे अर्थछटेस एक निश्चित सकारात्मकता येते असे वाटते.

अनुसरण, अनुवर्तन, अनुकूल, अनुयोग, आणि अनुरंजन हे शब्द अर्थछटांच्या तुलने करता लक्षात घेता येतील असे वाटते. अनुनय या शब्दाची व्युत्पत्ती आंतरजालावर आढळली नाही परंतु अनु हा उपसर्ग संस्कृतात इतर उपयोगां सोबतच one after another या अर्थाने सुद्धा येतो नय शब्दही बर्‍याच अर्थांनी येतो त्यात conduct आणि behaviour यांचाही समावेश आहे. अनुनयची व्युत्पत्ती अभ्यासण्याचे कारण अनुनय श्रोता-अनुनय हा शब्द यू अ‍ॅटीट्यूड करता कितीच चपखल बसतो. पण लोकानुनय किंवा प्रियकरांनी परस्परांचा केलेला अनुनय, अनुसरण, अनुवर्तन या प्रकारात मोडतो असे वाटते.

वर नमुद केल्या प्रमाणे संवाद साधणार्‍या व्यक्तीकडून अनुसरण, अनुवर्तन अभिप्रेत नाहीत. अनुयोग हा हिंदी शब्द उपलब्ध आहे पण तो विनंती दर्शक म्हणून अधिक वापरला जातो. *अनुयोग = पुं० १. नम्रतापूर्वक कुछ आग्रह करते हुए किसी से कोई काम करने के लिए कहना (सोलिसिटेशन)

आणि म्हणून वर 'तिमा' यांनी सुचवलेला लोकाभिमुख मध्ये जरासा बदल करून श्रोताभिमुख हा शब्द अधिक चपखल वाटतो . वर म्हटल्या प्रमाणे वृत्ती शब्दा सोबत अभि हा उपसर्ग सकारात्मकता सूचीत करतो म्हणून श्रोताभिमुख अभिवृत्ती असा शब्द प्रयोग आणि
आता पर्यंतच्या चर्चेच्या आधारावर यू अ‍ॅटीट्यूडची व्याख्या "समोरच्याचा दृष्टीकोण लक्षात घेऊन श्रोत्यास युक्त आणि भावेल अशी श्रोता अथवा वाचककेंद्रित सकारात्मक आणि द्वितीयपुरुषी संवादाच्या तंत्राचे कौशल्यपुर्वक उपयोजना करणारी श्रोताभिमूख अभिवृत्ती'' अशी करता येईल का ?

श्रोताभिमुख अभिवृत्ती हि संकल्पना लेखन आणि मार्केटींगच्या क्षेत्रात कशी वापरली जाते याची संक्षीप्त माहिती आपण करून घेतली. व्यवस्थापन क्षेत्रातच ह्युमन रिसोर्स-मानव संसाधन अंतर्गत प्रेरणेचे तंत्र म्हणूनही "श्रोताभिमुख अभिवृत्ती" यू अ‍ॅटीट्यूड चे कौशल्य अत्यंत उपयूक्त ठरू शकते. व्यवस्थापनातच (तुम्ही मार्केटींग किंवा सेल्स मध्ये नसला तरीही) तुमचे डायरेक्ट कस्टमर नाहीत त्यांना सुद्धा म्हणजे तुमच्या संस्थे अंतर्गत इतर सहयोगी वरीष्ठ आणि कनीष्ठ सर्व तसेच व्हेंडॉर बँकर्स या सर्वांनाच तुम्ही कस्टमरशी संभाषण साधता तसे संभाषण साधण्याचा सल्लाही दिला जातो येथे ही मुलतः श्रोताभिमुख अभिवृत्ती अथवा यू अ‍ॅटीट्यूड अभिप्रेत असावे असे वाटते.

बर्‍याच व्यक्तीगत सामाजिक आणि इतर अनेकविध संघर्षांच्या मूळाशी बर्‍याचदा प्रत्येकजण दुसर्‍याची बाजू न समजून घेता स्वतःस काय हवे हेच बोलत असतो असे संघर्ष अंशतः का होईना कमी करण्या करता स्वतःच कमीत कमी गमवत दुसर्‍या बाजूच मन आपल्याकडे वळवण्याकरता एक चांगल सकारात्मक तंत्र म्हणून श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडू शकते. राजकीय क्षेत्रात लोकानुनया पेक्षा श्रोताभिमुख अभिवृत्ती चे तंत्र अवगत करणे शक्य नसलेल्या गोष्टींचे वचन देण्या पेक्षा राजकीय नेत्यास स्वतःची विश्वासार्हता टिकवण्याच्या दृष्टीने उपयूक्त असू शकते.

*व्यावहारीक सीमारेषा

पण जगातल्या चांगल्या गोष्टी सुद्धा चिमुटभर मिठा सोबत घेतलेल्या चांगल्या भारतिय सांस्कृतीक इतिहासात वचन देणे आणि अतीथ्य देवोभवच्या मर्यादांना सीमा रेषा नव्हती त्या मानाने श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती तुम्हाला प्रॅक्टीकल सीमारेषेत राहून त्याच गोष्टी करू देते अर्थात यू अ‍ॅटीट्यूड काय नाही आणि त्याच्या मर्यादाही नीट पणे समजून घ्यावयास हव्यात. यू अ‍ॅटीट्यूड म्हणजे कोणत्याही पद्धतीने भाटगिरी, चमचेगिरी, लांगूलचालन, लोकानुनय, लोकानुरंजन इत्यादी नव्हे; श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती मध्ये समोरच्याच्या दृष्टीकोणातून त्याच्याशी संवाद साधणे अथवा विचारपूस करणे म्हणजे दुसर्‍यांच्या व्यक्तीगत खासगी जीवनात/प्रश्नात अवाजवी लक्ष घालणे आणि चांभार चौकशी सुद्धा अभिप्रेत नसते हेही ल़क्षात घ्यावयास हवे. हे लक्षात घ्यावयास हवे.

**श्रोता अथवा वाचकाने घ्यावयाची काळजी
सोबतच वाचक आणि श्रोत्याच्या आवडणार्‍या गोष्टींना दुसर्‍या बाजूची व्यक्ती कुरवाळत असतेच सोबतच केवळ सकारात्मक बाबी दाखवलेले असण्याची शक्यता असते, प्रत्येक संवाद वाचताना ऐकताना आपल्या स्वतःच्या सीमा रेषा स्पष्ट असाव्यात एक श्रोता म्हणून समोरची व्यक्ती कितीही गोड आणि प्रीय शब्दात सांगत असली तरी जोखीम आणि परिणामांचा सर्वंकष अभ्यास न करता कोणतीही गोष्ट स्विकारू नये. आणि गोड आणि प्रीय शब्द बोलणारी प्रत्येक व्यक्ती वाईट असते हे टोकही गाठू नये असे वाटते.

यू अ‍ॅटीट्यूड अर्थात श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती या विषयावर तुम्हाला काय वाटते तसेच या तंत्र कौशल्य आणि अभिवृत्ती बद्दल तुमच्याकडे काही शेअर करण्या सारखे असल्यास शंका असल्यास या धागा चर्चेच्या निमीत्ताने अजून चर्चा झाल्यास आनंदच वाटेल.

* मिपासंस्थळावर मी केलेल्या चर्चेवर आधारीत अर्थात तेथे चर्चेत सहभाग नोंदवणार्‍यांचे श्रेय निश्चितच

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मी जेवढा विचार करु शकले तो सर्व तुम्ही व्यवस्थित कव्हर केल्याने. नो कमेंटस. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोक्यावरुन गेले. इतके मोठ्हे लेख वाचणे ही शक्य नाही म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग तुम्ही तो गालिब वाला धागा वाचाच. तो तर खूपच मोठा व क्लिष्ट आहे.
पण त्यात असे ३-४ मोती सापडतात की ज्याचं नाव ते. समुद्रतळ गाठण्याचं सार्थक होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोक्यावरुन गेले. इतके मोठ्हे लेख वाचणे ही शक्य नाही म्हणा.

गंम्बा, मनाचा खुलेपणा धागा आणि श्रोताभिमुखते बद्दलचा हा धागा या दोन धाग्यांवरच्या तक्रार प्रतिसादांना तरी मी मनमोकळेपणाने स्विकारावयास हवे तेव्हा आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी सर्व प्रथम आभार. संकल्पना कंसेप्ट तशी साधी सोपी आहे पण थेअरॉटीकल मांडणी मुळे क्लिष्ट झाली आहे; संवादाची अधिक युनिव्हर्सल स्वरुपाची उदाहरणे आणि जमल्यास सचित्र सुद्धा या धागाचर्चेतून पुढे आल्यास क्लिष्टता कमी होण्यास मदत नक्कीच होऊ शकेल.

तुमचा तक्रारवजा प्रतिसाद आल्यानंतर त्याची मी माझ्या मनाचा खुलेपणा दाखवतो आणि हम्म.. माझ्या लेखनात काही समस्या खरेच असू शकेल की वाचकाला लेख समजला नाही, वाचकाभिमुखता म्हणून तुमचे लेखन प्रमाण मराठीत आहे की नाही हे तपासत बसणार नाही, तुमची समस्या नेमकी लक्षात नाही आली तर 'गम्बा, तुम्हाला ... असे म्हणावयाचे आहे का ?' हे विचारुन घेऊन समस्या समजून घेण्याचा अजून एक प्रयत्न करुन पाहीन. समस्येची शक्यता स्विकारेन, तातडीची उपाय योजना म्हणून मग लेख मोठा असल्यामुळे द्रुत वाचनासाठी महत्वाच्या असू शकणार्‍या वाक्यांना अंडरलाईन करेन, पंक्चुएशन मार्क जोडेन, विभागांना शीर्षके देईन, तुम्हाला लक्षात येईल असे उदाहरणे देण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने तुमची ऐसिवरील प्रोफाईल पाहून तुमची व्यावसायिक पार्श्वभूमीची काही माहिती मिळते का पाहीन, ती नाही मिळाली ठिक आहे, तुम्ही इतरत्र लेख चर्चांमध्ये घेतलेला सहभाग अभ्यासेन आणि तुमच्या आणि अभिनव यांच्यात लिनक्स बद्दल झालेली चर्चा मिळवेन त्या चर्चेत तुम्ही म्हणताय अभिनव साहेब, हा तर एक मोठ्ठा दोष आहे ना. आता अभिनवचे उत्तर पहा " "अतिसामान्य" विचारसरणीच्या माणसांचा हा दोष आहे खरा. " आता तुम्ही उपरोक्त मांडलेल्या समस्येची दखल घेऊन मी ज्या स्टेप्स घेण्याचा खुलेपणाने मनातून विचार केला आणि स्टेप्स घेतल्या ती वाचकाभिमुखता, सरावाने अंगवळणी पडणे अथवा स्वभावात बाणवणे म्हणजे वृत्ती - त्याएवजी अभिनव प्रमाणे काही उत्तर देऊन समस्येचे अस्तीत्व नाकारले तर ती वाचकाभिमुखता असणार नाही. -आणि तुम्ही मांडलेल्या समस्येवर काही फलनिष्पत्ती न होता नुसतेच तू-मी वितंडवाद चालू राहील (हि सर्व चर्चा करुनही अभिनव सारख्या त्रुटी माझ्याकडूनही होत असू शकतात तेव्हा उदाहरण देण्याचा उद्देश मी अधिक उजवा हे दाखवण्याचा नाही केवळ एक उदाहरण प्रस्तुत करण्याचा आहे)- आता तेच अभिनव किंवा लिनक्सचा अजून कुणी वाचकाभिमूख समर्थक असेल तर तुमच्या "वैयक्तीक फायदा नसेल तर एकुणच उत्पादन आणि सेवेच्या दर्जा बद्दत शंका निर्माण होते." या मतावर वाद घालणार नाही, तर वाचकाभिमुख उत्तर "हम्म, तुम्ही म्हणता तसे बर्‍याचदा होत असावे, पण लिनक्सची 'अमुक तमूक आवृत्ती' आम्ही स्वतःही वापरतो, शिवाय तुमच्या व्यवसायातच कार्यरत असलेले .... आणि .... हे सुद्धा वापरतात मुख्य म्हणजे त्यांना संगणकावर ज्या ज्या गोष्टीत विंडोज मदत करण्यास मागे पडते तेव्हा तेव्हा लिनक्स हाताशी असणे त्यांना अत्यंत उपयूक्त पडले, आणि मुख्य म्हणजे वापरण्यास अत्यंत सोपे आहे, पण खरच सांगू का गम्बासेठ हे सर्व महत्वाच नाहीए, लिनक्स ज्या गोष्टीत तुम्हाला/उपयोगकर्त्याला उपयूक्त नसेल त्या बाबत मला तुमच्या/किंवा इतर कुणाच्या गळ्यातही बांधायच नाहीए, सगळ्यात आधी तुम्ही, तुमचे कुटूंबीय, तुम्ही कार्यरत असलेल्या संस्थेत संगणक कशा कशासाठी वापरला जातो हे सांगितलेत तर मी लिनक्सचा उपयोग कुठे होऊ शकत असेल तर सांगेन उपयोग नसेन तर प्रांजळपणे तसेही सांगेन. आता समोरची व्यक्ती उगाच गळ्यात बांधणार नाही याची शास्वती झाली म्हणजे तुम्ही हुश्श करणार आणि संगणकावर काय काय करता हे मोकळेपणाने सांगणार ते एकदा तुम्ही सांगितले की तुमच्या शक्य समस्या काय असू शकतील यावर तुमच्याशी चर्चा करेल तुम्ही ज्या समस्यांना अ‍ॅग्रीकरत नाही त्यांना सोडून देईल ज्या समस्यांना तुम्ही अ‍ॅग्रीकराल त्या समस्या येऊ नयेत म्हणून लिनक्स कुठे कसे उपयूक्त पडू शकेल की जे विंडोज मध्ये शक्य असणार नाही हे सांगितले जाईल' -हे सर्व मी लिनक्सबद्दल तांत्रिक दृष्ट्या बरोबर लिहितोय असे नाही हे लिनक्सची जाणकार व्यक्तीच करू शकेल- वाचकाभिमूख अभिव्यक्ती अभिनव किंवा इतर कुणीही स्वतःत एकदाका वृत्ती म्हणून स्विकारली की संवादाची दिशा बदलुन परस्पर संवाद अधिक सकारात्मक आणि रचनात्मक वातावरणात साधले जाऊ शकतात. तेच प्रत्येक जण केवळ मला काय पाहिजे एवढेच सांगत राहीला तर ?

गम्बासेठ, आणि हा प्रतिसाद वाचणारे इतर जण, एक प्रयोग करुन पाहता येईल का की हा प्रतिसाद वाचल्यापासून तुमच्या सोबत होणार्‍या प्रत्येक संवादात समोरची व्यक्ती त्यांना काय पाहिजे हे सांगते आहे का की तुम्हाला काय पाहीजे आहे ते विचारते आहे ह्यावर लक्ष ठेवा आणि स्वतःला काय पाहीजे तेवढेच बोलणारे किती जण असतात आणि तुम्हाला काय पाहीजे हे सुद्धा लक्षात घेणारे श्रोताभिमुख किती जण असतात- याचा ढोबळ अंदाज आणि कुणाला असे संवाद लक्षात रहात असतील तर त्यांची उदाहरणेही या धागा लेखात प्रतिसादात दिल्यास या लेखासाठी अधिक उदाहरणे गोळा होऊ शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ऐकणारा त्यावेळेस अमुक एक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक आहे का हे जाणून घेण्याचे तंत्रही तितकेच महत्त्वाचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा बरोबर आहे, काही बाजू आहेत. या बद्दलची एक बाजू -मी सवडीने प्रयत्न करेनच तथापि- कदाचित आपण स्वतःच कदाचित अधिक चांगली मांडू शकाल असे वाटते. इथे संवादाची सुरवात कशी केली जाते ते महत्वाचे ठरावे - यशस्वी संवाद साधण्यामधल्या सर्व अडचणी आणि सोल्यूशन्स हा संपुर्ण एक वेगळा धागा लेख होऊ शकेल इतपत मोठा लेख होईल- असे वाटते.

आपल्या मुद्द्याशी संबंधीत अजून एक बाजू आहे -जी अधिक कठीण आहे- त्या बद्दलचा माझा धागा लेख मिपावर आहेच, -पण पुन्हा तो एक मोठा स्वतंत्र विषयही आहे म्हणून मी अदमासे दोन-एक आठवड्यांनी इकडे आणेन.

शिवाय मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) ची गरज काय असा प्रश्न मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? या धाग्यावर उपस्थित केला गेला, मनाचा खुलेपणा असेल तर उत्सुकतेचे निश्चित सांगता येणार नाही पण श्रोत्याच्या मनाचा खुलेपणा आणि संवाद साधणार्‍याची श्रोताभिमुखता असेल तर किमानपक्षी संवाद होऊ शकण्यात अंशतः तरी साहाय्य मिळावे असे वाटते.

म्हणजे वक्त्याच्या संवादसाधण्याची सुरवात यशस्वीपणे झाली + श्रोत्याच्या मनाचा खुलेपणा + वक्त्याची श्रोताभिमुखता हे तीन घटक एकत्र आले तर काठीण्य पातळी कमीत कमी असेल (अर्थात तरीही काही कठीण बाजू राहतात पण समस्येचा सगळा केक एकदम खाण्या पेक्षा त्याचे तुकडे करुन खाणे सोपे जावे म्हणून कठीण गोष्टी पुढच्या टप्प्यात)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.