व्हॅलेन्टाईन्स डे - एक पारंपरिक निबंधस्पर्धा

'व्हॅलेन्टाईन्स डे' या पवित्र दिवसाच्या निमित्ताला टेकून गेल्या वर्षी जी स्पर्धा आयोजित केली गेली होती त्याने झालेल्या करमणूकीच्या आठवणींनी मन हेलावून गेल्याने, ऐसीवर ही समृद्ध परंपरा चालू रहावी म्हणून याही वर्षी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचं स्वरूप मागच्या वर्षीप्रमाणेच व्यापक आहे. शीर्षकात निबंधस्पर्धा असा उल्लेख आहे, पण स्पर्धेसाठी गद्य, पद्य, फोटो, चित्रं, व्हिडीओ अशा कोणत्याही प्रकारची एंट्री चालेल. या वर्षीचा विषय गेल्या ‌वर्षापेक्षा थोडा निराळा आहे, नीट वाचणे : व्हॅलेन्टाईन्स डे - काल आणि आज. आपण सादर करत असणाऱ्या व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी असण्याची अथवा लांबून पाहण्याची आवश्यकता नाही. कल्पनेतला किंवा आपल्याला कायम हवाहवासा वाटलेला व्हॅलेन्टाईन्स डे याबद्दल आपण लेखन, चित्रण करू शकता. इतरांच्या व्हॅलेन्टाईन्स डे कलाकृतीही सदस्यांच्या रसास्वादासाठी आणि/किंवा स्पर्धकांचा हुरूप वाढवण्यासाठी प्रतिसादांमधून शेअर कराव्यात.

स्पर्धेचे नियम -
१. स्पर्धेसाठी फक्त स्वतःचं लेखन, स्वतः काढलेली चित्रंच द्यावीत. इतरांच्या कलाकृती शेअर केल्यास त्या स्पर्धेत मोजल्या जाणार नाहीत.
२. स्पर्धेसाठी एंट्री देण्याची अंतिम तारीख, भावेप्र मंगळवार, १६ फेब्रुवारी संध्याकाळ ६:००
३. शक्यतो या धाग्यात प्रतिसाद म्हणूनच एंट्री द्याव्यात. पण लेखन पुरेसं मोठं (>२०० शब्द) असल्यास स्वतंत्र धागा काढायलाही हरकत नाही.
४. स्पर्धाकाळात आलेले यथोचित धागे, 'स्पर्धेसाठी' असा उल्लेख नसला तरीही स्पर्धेत मोजले जातील. त्यामुळे ज्या सदस्यांना स्पर्धेबाहेर रहायचे असेल त्यांनी स्पर्धाकाळात ऐसीवर या प्रकारात बसेल असं लेखन, चित्रण प्रकाशित करू नये; १६ फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत थांबावे.
५. स्पर्धेसाठी निदान एक एंट्री देणे बंधनकारक आहे, पण कमाल मर्यादा नाही.
६. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ऐसीसदस्या रुची काम पाहतील. पण त्यांना मदत करण्याची इच्छा आल्यास जरूर मदत करावी. त्याला वशीलेबाजी म्हणणार नाही.
७. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल; पण इच्छा असल्यास सदस्यांनाही मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल.
८. रुची यांनाही स्पर्धेत भाग घेण्याची मुभा असेल.
९. स्पर्धेतली गंमत वाढवण्यासाठी एकमेकांना खरडवह्या आणि व्यनिंमधून उत्तेजन देण्याचे प्रयत्न करावेत. हे उदारमतवादी परंपरेला साजेसंही ठरेल.
१०. महत्वाचा मुद्दा : ऐसीसदस्य श्री. निळे यांनी स्पर्धेत भाग न घेतल्यास त्यांना संस्थळावरून बॅन करण्यात येणार आहे.

आता काही गावगप्पा -
यावर्षी विजेत्यांना फ्लेक्सबोर्ड बरोबरच रुची यांच्याकडून काही खरीखुरी बक्षिसे आणि प्रथम क्रमांकासाठी वारुणीची एक बाटली मिळण्याची शक्यता आहे अशी अफवा पसरविण्यात येत आहे. या संदर्भात रुची यांनी सध्या त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळून "पाहू कशा एंट्र्या येताहेत ते" असले गुळमुळीत विधान केले आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

I am in.
कुथुन कुथुन ( ROFL ) एक कथा अर्धी सुचली आहे पण पुढे अज्जिबातच सुचत नाहीये. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुथुकली नाच करा, म्हणजे सुचेल.

(सॉरी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सॉरी काय? ROFL मजा आहे ती कळते की मला.
बरं, बरच पुश करुन Wink कथा प्रसवली आहे. मला मूड आला व कल्पना सुचली की थांबता येत नाही Sad
अब जैसी है वैसी है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेरे मी या धाग्यात न देता वेगळ्या धाग्यात दिली आहे. कथा इथे हलवली तरी चालेल. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त काल आणि आज पर्यंतच जायचे आहे पण ती कथा उद्या परवापर्यंत ताणली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती (कथा किंवा शुचि) राहत असेल इ.स. ३००० मध्ये! आपल्याला काय माहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मी ढिस्क्वालिफाय झाले ऑलरेडी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापूर्वी - सावधान!

व्ही. ए. फॉरवर्ड नावाच्या थोर विचारवंताने प्रसारीत केलेले हे वमननीय, दयनीय, कारूण्यरसपूर्ण, जाज्ज्वल्य विचार पहिल्यांदी वाचून त्याप्रमाणे कार्यवाही करा.

"❤तोच आठवडा त्यांच्यासाठी पण❤

❤तोच आठवडा त्यांच्यासाठी पण❤

"Rose" तर तिला पण द्या जी तुमच्यासाठी "रोज" दुःखांशी संघर्ष करुन झगडत असते.

"Propose"तर तीला पण करा जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या "pose" ची खरी शिल्पकार असते.

"Chocolate" तर तीला पण द्या जी स्वतः झटुन तुम्हाला आयुष्यात"ready&set" करते.

"Teddy" तर तीला पण द्या जी तुम्हाला लहानपणापासुनच "teddy" सारख जपत असते.

"Promise" तर तीला पण करा जिने तुमच्या करीता सगळी सुखे "miss" केलेले असते.

"Kiss" तर तीच्या पण पायांना करा जिने तुमच्यासाठी पाय झिजवले असते.

"Hug" तर तिला पण करा जिने तुम्हाला तिच्या "कुशीत" मौल्यवान वस्तु सारखे जपले असते.

"VALENTINE" तर तिच्या सोबत पण साजरा करा जिने तुम्हाला प्रेम करायला शिकवले असते.

"girlfriend" नावाच्या बाईच्या आधी पण एक बाई असते.
तिचे नाव "आई"असते.
अडाणी जरी असली तरी १०० girlfriend च्या प्रेमाला भारी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातल्या प्रत्येक शब्दावरून खरेतर आम्ही आमच्या खर्‍याखुर्‍या वॅलेंटाईनसाठी एक सेन्सेशनल मेसेज टाईपला आहे.
'पोज' आणि 'चॉकलेट' शब्दांवरून सूज्ञांच्या ध्यानी यावा.
पण संस्थळाच्या मर्यादा लक्षात घेता आणि आमची 'महापकाऊ'अशी अभ्यासू प्रतिमा लक्षात घेता आम्ही तो मेसेज इथे टाकू शकत नाही.
इ. स. ३००० साली हे संस्थळ शैशवातून प्रौढावस्थेकडे सरकेल तेव्हा नक्कीच तो 'फक्त प्रौढांसाठीचा' व्हॅलेंटाईन मेसेज इथे चिकटवला जाईल.

तोपर्यंत तो मेसेज वाचायची इच्छा झालीच तर आमच्या वैयक्तिक संस्थळाला इथे भेट द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांनी, स्त्री-पुरुषांनी आईबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करावा असं सुचवणाऱ्या थोर उदारमतवादी इसमाचा सत्कारच केला पाहिजे. पण एकदा आईची परवानगी आहे का नाही, हे ही तपासून बघा. आई असली तरी ती ही माणूसच असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'आईचे हृदय' की अशाच कायश्याश्या नावाची (चूभूद्याघ्या) सानेगुरुजींची एक अत्यंत पकाऊ गोष्ट या निमित्ताने आठवली. (ती गोष्ट वाचल्यानंतर, त्या गोष्टीच्या लेखकाने पुढे जीव दिला, हे नंतर केव्हातरी कळले, तेव्हा अजिबात आश्चर्य वाटले नव्हते.)

तसली पकाऊ जनरेशन (किंवा त्या परंपरेची आधुनिक आवृत्ती) अजूनही शिल्लक आहे, याचे मात्र राहूनराहून वाईट वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुद्द पाकिस्तानच्या अध्यक्षांकडून!

पैकी, उर्वरित मालमसाला नेहमीचाच यशस्वी आहे, पण एक मौक्तिक विशेष उल्लेखनीय वाटले.

He said drawbacks of western culture had adversely affected one of our neighbouring countries.

हा इसम जे काही (अर्थातच चोरून) पितो, ते मलासुद्धा पाहिजे! आत्ताच्या आत्ता!! वँऽऽऽऽऽऽ!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'संत्री' कथेचे स्वैर विस्तार आणि अ‍ॅडाप्टेशन केले आहे. मी प्रमाण भाषेचा आग्रह न स्विकारण्याबाबत आग्रही असतो तरीही तुम्हाला स्विकार्य असेल तर स्वंतत्र कथा धाग्यापेक्षा या धाग्याचा प्रतिसाद म्हणून अधिक प्रिफर करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पूर्वेमेघोत्तर आणि उत्तरोत्तर मेघ
अर्थात
वॅलेंटाइन डे उर्फ वल्लभदिनः कालचा आणि आजचा
कालिदासाच्या मेघदूताचे 'पूर्वमेघ' आणि 'उत्तरमेघ' असे दोन भाग आहेत. आमच्या लाडक्या कवयित्री शांताबाई शांता शेळके यांनी त्याचे सरस भाषांतरही केलेले आहे. सध्या आपण आधुनिकोत्तरोत्तर काळात जगत असल्यामुळे नुसते पूर्व आणि उत्तरमेघ काय कामाचे? म्हणून 'पूर्वेमेघोत्तर आणि उत्तरोत्तर मेघ' इयें ऐसी अक्षरे रसिकांच्या चरणी सेवेसी सादर करत आहोत.
डिस्क्लेमर: अनेक शब्दांचे, वाक्यांचे आणि फ्रेजांचे चौर्य केल्याबद्दल आम्ही आमच्या लाडक्या कवयित्रींची मनापासून क्षमा मागत आहोत.

पूर्वेमेघोत्तर उर्फ वॅलेंटाइन डे: कालचा
National archives मधल्या 'Private papers' या सेक्शनमधे अनेक शतकांपूर्वीच्या चॅट हिस्टरीतली संभाषणांच्या काही प्रिंट आउट्स सापडल्या. त्यातील वॅलेंटाइन डे स्पेशल चॅट्स इथे देत आहे:
Yaxa: hey, u der?
Sakhiiii: yup..
Yaxa: miss u darling…Happy V’ Day!
Sakhiiii: miss u too my valentine…. बदाम <3<3<3<3<3<3<3<3<3 e, skype var ye na
Yaxa: अगं रामगिरीवर यवढा चांगला speed नाहीये, net connectn sarkha गंडतं. बघून काय बघशील? जाम slim zaloy गं मी विरहामुळे. तू तो सोन्याचा wrist band dilelas na magchya V day la, to pan sarkha galatoy hahatun. तू kay kartyes sweetheart?
Sakhiiii: वीणा घेऊन बसलेवते. तुझं नाव गुंफलेलं गाणं म्हणायचं असतं ना विरहात. पन रदु येते आनि गला choke hoto… Cray 2
Yaxa: रडू बिडू नकोस. तूझे डोळे सूजतात मग. आणि गरम निश्वासान्नी ओठ कोरडे होतात. ते लोध्र फुलांचं कोल्ड क्रीम लावतेस ना?
Sakhiiii: कधी येणार रे तू? कुबेराला request करायला हवी होतीस की निदान आजच्या दिवशी तरी मला अलका नगरीला येऊ द्या म्हणून. सगलए बॉस मएलए असएच दउष्ट Sad
Yaxa: शाप आहे तो. त्यात कशी leave milnar? shaap sampalyavar lagech yein.
Sakhiiii: मला सारखा मागच्या वर्षीचा v’ day आठवतोय .... तू कुरबक फुलांचा मोठ्ठा बुके दिलेलास मला आणि ती वैदूर्याच्या देठाची सोन्याची कमळं gift दिलेलीस. Smile
Yaxa: ani tu ashokavar wine chi चूळ टाकलि होतिस.
Sakhiiii: नाही रे, वाइनची चूळ केसर व्रुक्शावर. अशोकाला फुलण्यासाठी लाथ मारावी लागते. नएहमि कस रए विसरतोस तु?
Yaxa: ते वृक्षांचं मि कशाला लक्षात ठेउ? रात्री टेरेसवर आपण wine pyaylyavar kay kay kele te matra visaralo nahiye Wink
Sakhiiii: hmmmm…..कशाला त्या आठवणी काढतोस?
Yaxa: बर, tuला ya varshi काय gift hava स्संग. tya Megh courier walya बरोबर पाठवीन. जरा ऊशीरा delivery deto to, पण चांगलाय.
Sakhiiii: तू मला भेटशील तर तीच मला भेट. love you re.
Yaxa: Lv u. Muaah.
Sakhiiii: muuuuuuuuuuuaaaaaaaaaaaaah :^*

उत्तरोत्तर मेघ अर्थात वल्लभदिनः आजचा
मधुमालतीच्या फुलांनी सजलेल्या, जाईच्या वेलींनी लगडलेल्या कोण्या एका कुंजवनात कोणी एक हतभागी अशी विरहिणी रमणी कमलपत्रावर नखांनी कोरेलेले, आपल्या प्रियाकडून प्राप्त झालेले हे प्रेमपत्र विरहतापामुळे आलेल्या ग्लानीमुळे विसरून, सोडून गेली:
एमेन्सिसेवक यक्ष एक कुणिं, अखेर आले मनोरथ फळां
प्रियावियोगे जरिहीं दु:सह, वर्षाचा त्यां व्हिसा मिळाला
समीप येतां मधुमासातिल चतुर्दशी ती प्रणयउत्सवी
उरी तयाच्या लागे हुरहुर प्रिया सखीचा आठव होई

रक्तवर्ण ती पुष्पें फुललीं, कितिक अर्पिलीं वल्लभसखिला
मधुमिष्टान्नें, बालअस्वलें, मृदु-हृद्-खेलन हृदयेश्वरीला
मीलनसुख सेविले तिच्यासह गतवर्षीच्या वल्लभदिनी तें
स्मरता सखिसहवास तसा तो व्याकुळ नयनी जळ ओघळते!

स्फटिकधवल ते वर्षतिं हिमकण, मेघ नच दिसे परि आकाशीं
संदेशातें वाहुन नेइल कोण माझिया प्रियसखिपाशी?
आर्यवर्षविपणनकेंद्रातुन कमलपत्र हे विकत घेउनीं
वल्लभसखिला पत्र आपुले यक्ष कोरतो नखक्षतांनीं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्यवर्षविपणनकेंद्रातुन कमलपत्र हे विकत घेउनीं
वल्लभसखिला पत्र आपुले यक्ष कोरतो नखक्षतांनीं

हे डोक्यावरून गेले.

(आर्यवर्षविपणनकेंद्र, कमलपत्र बोले तो?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आर्यवर्षविपणनकेंद्रातुन कमलपत्र

ग्रीटिंगकार्ड असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आर्यवर्षविपणनकेंद्र = हॉलमार्क आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...बोले तो 'इंडियन ग्रोसरी स्टोअर'असावे, अशी शंका येते. (आर्यवर्ष =भारतवर्ष असे काही? किंवा, 'आर्यावर्त' आणि 'भारतवर्ष' यांचा पोर्टम्याण्टो शब्द वगैरे? विपणनकेंद्र बोले तो स्टोअर, इतपत कळते.)

पण मग 'कमलपत्र' ही भानगड काय असावी? अगोदर 'लोटस नोट्स' डोक्यास चाटून गेले होते, पण त्याचा इंडियन ग्रोसरी स्टोअरांशी काय संबंध? तेव्हा ते नसावे.

काही कळत नाही ब्वॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विपणन=मार्केटिंग?
विपणनकेंद्र=मार्केटिंग सेंटर? कॉल सेंटर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मल्लिनाथी
वर्ष = खंड, (हिंदू पुराणमते) जगाचा एक भाग. जसे, भारतवर्ष, कुरुवर्ष.
आर्यवर्ष = इंडिया
विपणन = विक्री
आर्यवर्षविपणनकेंद्र = इंडियन स्टोअर
[मला आर्यावर्त किंवा भारतवर्ष यापैकी एक शब्द वापरायचा होता, पण तो वृत्तात बसेना.]
आपला 'आज'चा यक्ष हा आधुनिकोत्तरोत्तर काळातील असल्यामुळे अर्थातच गोंधळलेल्या पिढीचा पाईक आहे. त्यामुळे तो एकीकडे व्हिसा मिळवून (प्रगत) परदेशात जाण्याचे (आधुनिक) स्वप्न पाहतो, तर कधी त्याला आपल्या 'रूट्स'कडे जावेसे वाटते. म्हणून तो सखीला निरोप पाठवण्यासाठी कमलपत्र अर्थात कमळाच्या पानावर पत्र लिहून पाठवतो, तेही कालिदासीय शैलीत. [कालिदासाची शकुंतला मदनलेख (=प्रेमपत्र) कमळपानावर नखांनी कोरते.] हे देशी कमळपान त्याला इंडियन स्टोअरात विकत मिळते. कमळाच्या पानावर शाई अर्थातच टिकणार नाही, त्यामुळे त्यावर निरोप कोरावा लागतो. यक्ष आपल्या नखांनी हे कोरीवकाम करतो. [नखक्षतांचा सिग्निफिकन्स - प्रेमाच्या भरात आपल्या प्रियेच्या अंगावर नखांनी ओरखडणे (=क्षत) हे संस्कृत साहित्यातील पुरुषांचे आवडते काम दिसते.]
हे रविवर्म्याचे चित्र पहा (त्यात तिच्या हातात लेखणीसदृश काहीतरी आहे वाटतं):
हे रविवर्म्याचे चित्र पहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे देशी कमळपान त्याला इंडियन स्टोअरात विकत मिळते.

...गेल्या तेवीसएक वर्षांत किमानपक्षी यूएसएत तरी जितक्या म्हणून इण्डियन ग्रोसरी स्टोअरांशी पाला पडला, त्यांपैकी एकातही कमळाचे पान विक्रीस ठेवलेले दृष्टीस पडले नाही.

(अर्थात, नॉट द्याट आय ह्याड बीन पर्टिक्यूलरली लुकिंग फॉर इट, हेही आहेच म्हणा.)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा मस्त..

मधुमासातिल चतुर्दशी ती प्रणयउत्सवी

सॉलिड!!

बालअस्वलें

जेव्हा कळले तेव्हा हहपुवा झाली
.
नबांसारखच मलाही आर्यवर्षविपणनकेंद्रातुन म्हणजे काय ते कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही सुधारणा:
चॅट हिस्टरीतली संभाषाणांच्या ऐवजी चॅट हिस्टरीतील संभाषाणांच्या असे हवे होते
वृत्ताच्या सोयीसाठी
हृदयेश्वरीला ऐवजी हृदयेश्वरिला असे हवे होते
वल्लभदिनी ऐवजी वल्लभदिनि असे हवे होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

VaLat नाही मनाला कळत असलं तरीही
Aani दाटून येतात कडवटलेल्या आठवणी,
Loveसिकलेलं हृदय माझं खपवून घेत नाही
Ekतर्फी प्रणयाची ही खोटीखोटी खुर्दानाणी

Natadrashta कुलटा अशी माझी प्रिया
Taakun गेली मला एका मास्तराबरोबर
Iblis तो थेरडा तिला दाखवीत नाही दया
Nau वर्षांत करून टाकलीन सातदा गरोदर

Ekaantaat मी ढोसत राहतो, O’Shea
‘s व्हिस्कीचे प्याले, पण दु:ख माझं कुठे ठेऊ?
Saang तुझं काय करू फेब्रुवारी कृष्ण चतुर्दशे?!
Daaraआडून तेव्हाच दिसली माझी काळी मनीमाऊ!

Akher चा उपाय म्हणून तिलाच आता विचारून पाहीन
Yedaबाई तू लाडाची, विल यू बी माय व्हॅलंटाईन?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

माजा व्यालंटाईन बन्नार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रटुल्याला विणूसाठी काही सुचलं नाही का अजून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भल्या पहाटे साडेसात वाजता फोन वाजला तेव्हा मी अर्थातच वैतागाने कपाळावर आठ्या घालून डोळे किलकिले केले. आज रविवार आहे, सुट्टी आहे वगैरेची तमा न बाळगता तो निर्लज्जपणे तसाच वाजत राहिला. हात लांब करून, तो उचलून बंद करण्याची क्षमता नसल्याने मी नुसतीच एक उशी त्यावर टाकली आणि एक माझ्या डोक्यावर घेतली. तोच वाजून वाजून कंंटाळला आणि बंद झाला. डोळे मिटतोय न मिटतोय तोच पुन्हा वाजला. 'भेंचोत, गबस ना!' भडव्याला माझ्या साध्या शिव्या कळत नाहीत, आणि म्हणे स्मार्टफोन! मी उशी डोक्यावर दाबून दुर्लक्ष घट्ट केलं.

मात्र तिसऱ्यांदा वाजला तेव्हा मात्र तिरीमिरीत उठलो. तोंडात थुंकी गोळा करावी तशा शेलक्या शिव्या गोळा करून मी फोन बघितला - अजय! आता या कोकराला काय शिव्या देणार? मुकाट्याने गिळून टाकल्या. उजेडाचा त्रास होत होता म्हणून डोळ्यांवर हात ठेवून जड आवाज शक्य तितका उचलत म्हटलं
"बोल..."
तो नेहेमीपेक्षा जास्त कोकरी अवस्थेत होता.
"अरे यार थोडी गडबड झाली." मी जरा सावरलो. बेडमध्ये अनिता डाराडूर झोपलेली होती. तिला डिस्टर्ब होऊ नये म्हणून स्वयंपाकघरात आलो.
"काय झालं?"
उत्तर देताना त्याला कसनुसं होत होतं. काल स्मिताबरोबर डेटवर गेला होता हे मला माहीत होतं. पण त्याने पुढचं सांगितलं. म्हणजे अगदी डायरेक्टली नाही, पण आडवळणाने, अडखळत अडखळत.
"आणि तू सरळ..."
"हो" त्याचा आवाज अपराधी, नरम झालेला होता.
"अरे असं काय केलंस? जरा विचार करायचा ना!"
"...."
"आणि तिनेसुद्धा...?"
"हो."
ऐकून माझ्या डोक्याचं भजं झालं. अजय ज्यांच्यावर लाईन मारायचा त्यांच्यापैकी स्मिता ही सगळ्यात खालच्या वीस पर्सेंटाइलमधली. दिसायला तशी बरी पण डोक्याने थोडी सटकच. गेल्या दोन वर्षात तिने तीन नोकऱ्या सोडल्या. सोडल्या म्हणजे सोडाव्या लागल्या, कारण ती खुशाल मॅनेजिंग डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन कंपनी सुधारण्यासाठी काय करायला हवं याबद्दल लेक्चर झोडायची, कस्टमरांबरोबर वादावादी करायची. बरं, कामाच्या नावाने बोंबच. निदान वेळेवर तरी यावं. तर तेही नाही. आज काय तिला योगाचा क्लास होता म्हणून उशीर झाला, उद्या काय दिवाळीसाठी खरेदी करायचीय म्हणून लवकर जायचंय. अशा तरशिणीबरोबर आपलं कोकरू...

मगाशी गोळा केलेल्या सगळ्या शिव्या त्याला दिल्या. वर आणखीही काही. मी फोन ठेवला तेव्हा तो पारच घायाळ झाला होता. पण नंतर हलाल होण्यापेक्षा बरं. भेंचोत एकत्र झोपायचं, झोपा की. त्यासाठी तरशीण काय, वाघीण काय... कोणी पण चालेल. पण एकत्र झोपल्यानंतर निमूटपणे डोळे मिटून झोपून जायचं की नाही? तर नाही.

अईशप्पथ सांगतो, उगाच प्रेमाच्या भरात येऊन नको त्याला नको तिला 'आय लव्ह यू' म्हणणारांसाठी एखादी डे-आफ्टर पिल आली तर व्हॅलेंटाइनच्या दुसऱ्या दिवशी तिचा खप बेसुमार होईल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा! छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'आय लव्ह यू' म्हणणारांसाठी एखादी डे-आफ्टर पिल

Smile Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुसखुशीत. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0