मुमुक्षु

निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात
सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या
सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या
सगळ्यात शेवटच्या मजल्यावर
मुमुक्षु राहतो.

रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर
अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि
निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत
न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत
तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर.

ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन
हल्ला करतात अचानक दिसेल तिथे
अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

डमरू डीएनेश्वर वाजवतो कधी गगनभेदी
दैवी प्रयोजनाची रासायनिक कारंजी उसळतात
डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात
नव्या त्रैलोक्याची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो मुमुक्षु पोटात गुडघे घेऊन

बलवान नव्या मुमुक्षुच्या जन्माची प्रार्थना करतो.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

!
नै झेपली सॉरी! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली.

मर्ढेकरांची कविता 'शिवलिंग - माझे लिंग' आठवली. तीत आध्यात्मिक प्रवृत्ती आणि नैसर्गिक ऊर्मींची खायखाय यांचा झगडा दाखवला आहे. यात माणसाची ओढाताण होते. एका व्यापक अर्थाने सखाराम बाइंडरही तसंच काहीसं आहे. इथे या दोहोंशी किंचित साम्य जाणवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता पूर्ण कळली नाही, पण आवडली.
एक शंका - "केमिकल"च्या जागी रासायनिक.. असे मराठी प्रतिशब्द मुद्दाम टाळले आहेत का? अर्थात न्यूरल-डोपेमाईन ला काहीच प्रतिशब्द नाहीत म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

कवितेचा एकच एक अर्थ नसतोच. मला समजला तो सांगतो. माझा अर्थ बरोबरही नाही नि चूकही नाही. तो आपला माझा अर्थ आहे. कुणाला पटला आवडला तर मस्त. नाही पटला तरी ठीकच Smile

मुमुक्षु म्हणजे विवेक. आपला रॅशनल भाग. तो मेंदूतल्या सर्वात प्रगत भागातल्या सर्वात उच्च स्थानी विराजमान आहे. डीएनएचा ईश्वर - म्हणजे आपल्या आदिम प्रेरणांचा स्वामी - म्हणजे आपल्यातला आदिम भाग जो आहे त्याची सत्ता रेप्टिलियन आणि लिंबिक या मेंदूच्या तीन पैकीच्या दोन स्तरांवर चालते. रेप्टिलियन म्हणजे सगळ्यात आदिम, सगळ्यात आतला, आणि म्हणून पाताळातला. त्यावरचा लिंबिक म्हणून धरतीवरचा भाग. तर आदिमतेच्या ईश्वराची सत्ता या दोन "लोका"वर चालते. निओकॉर्टेक्स या प्रगत - म्हणजे विचारशील - भागावर सत्ता चालत नसली तरी त्याचे "फिरतात दूत - न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत". आदिमत्वाच्या स्वामीचे - डीएनए च्या ईश्वराचे एजंट - म्हणजे आपल्या आदिम प्रेरणांचे, वासनांचे उमाळे अधूनमधून आपल्या वैचारिक प्रदेशामधे बंदूका घेऊन फिरतात, वैचारिकतेवर हल्ले करतात. जणू आदिम प्रेरणांचा स्वामी म्हणजे दहशतवादी संघटना आहे नि "प्रगत" जगामधे येऊन त्याचे सैनिक गनिमी कावा करून जातात.

तर असा हा मुमुक्षु म्हणजे आपला विवेक हा "ईश्वरपुत्र सैतान" आहे, थोडक्यात आदिमतेच्या पोटी जन्माला आला तरी आदिमतेचा शत्रू आहे. देवाच्या पोटी जन्मलेला नास्तिक आहे. तो आदिमतेला जुमानत नाही. त्याचा सामना करतो.

मात्र एरवीची ही सत्ता विभागणी - बॅलन्स ऑफ पावर - ढळतो. आदिम प्रेरणांचा जोर वाढतो, वासनांचे, हिंसेचे, सत्तांधतेचे, दुसर्‍याचं शोषण करण्याचे, सर्वांचं दमन करण्याचे विचार डोक्यात थैमान घालतात. विवेकाचा पराभव होतो. आपण काहीतरी भयंकर करून बसतो.

पराभूत झालेला विवेक "सबको सन्मती दे भगवान" असं म्हणतो. पुढच्या पिढ्या विवेकी निघतील, अतिरेकाचे, वासनांचे, हिंसेचे, व्यसनांचे थैमान कधीतरी संपेल अशी करुणा भाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

प्रतिसाद आवडला. मुमुक्षु म्हणजे अर्थातच मुक्तिची इच्छा धरणारा. पण तेवढी क्षमता कदाचित नाही म्हणून हतबल होऊन नव्या बलवान मुमुक्षूची प्रतीक्षा करणारा. मुक्ती ऐश्वरीय साम्राज्यापासून, संज्ञा-संकल्पना-संकेतांपासून. विवेकाची, बुद्धिप्रामाण्याची प्रस्थापना करण्यासाठी. जेव्हढं समजल्यासारखं वाटतंय ते जसं समजलंय तसंच असेल तर कविता अतिशय आवडली. संगणकीय शब्दांची रेलचेल असलेला अनेक उत्तम कविता आहेत. त्या नव्या मनूचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले जाते. ही जैवरासायनिक कविताही तशीच प्रातिनिधिक ठरावी. कविता भन्नाट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदर्भ कळायला जड गेले.... पण जे म्हणायचेय ते माझ्या परीने मला कळले.

ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात
पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन
हल्ला करतात अचानक दिसेल तिथे
अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू.
मुमुक्षु. ईश्वरपुत्र सैतान.

हा कळसबिंदू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधिक उन्नत गुणसूत्रांच्या निर्मितीसाठी निसर्गाने मेंदूत योजलेली रासायनिक कार्यप्रणाली ही एक जाळं / चक्र आहे आणि ह्या जाळ्यातून / चक्रातून मुक्तता मिळणे म्हणजेच मोक्ष अशी कवितेत कल्पना केलेली आहे का ? म्हणजे उत्क्रांतीकरता चाललेली नवीन निर्मिती थांबली की ती मोक्षावस्था असेल ?

बाकी

रेप्टिलियन पाताळ -लीम्बिक धरतीवर- निओकॉर्टेक्स स्वर्ग ह्या त्रैलोक्याचा स्वामी डीएनेश्वर -- भारी कल्पना केली आहे

'डमरू डीएनेश्वर वाजवतो कधी गगनभेदी
दैवी प्रयोजनाची रासायनिक कारंजी उसळतात
डोपॅमाईनचे चषकच्या चषक फेसाळतात
नव्या त्रैलोक्याची कुदळ मारली जाते पुन:पुन्हा
रडतो मुमुक्षु पोटात गुडघे घेऊन'

संभोगाचं चपखल मेटाफोरिक वर्णन जमलंय वरच्या कडव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उन्नत? योजलेली? उत्क्रांतीसाठी चाललेली निर्मिती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा रोख कळला. कवितेच्या अनुषंगाने पडलेला काव्यात्म प्रश्न एव्हढंच वरच्या प्रतिसादाचं महत्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी दुरुस्ती म्हणून नाही विचारले प्रश्न. निर्मितीचा निरर्थकपणा व प्रयोजनहीनत्व नजरअंदाज केल्यास मुमुक्षुची तगमग आणि त्यच्यावरचे हल्ले तितकेसे गंभीर वाटत नाहीत एवढेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला कवितेत अभिप्रेत अर्थ पोचला होताच. निर्मितीचा निरर्थकपणा व प्रयोजनहीनत्व हे देवाच्या / निसर्ग नामक शक्तीच्या नास्तित्वाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. हे ज्यांना कळेल ते सगळेच मुमुक्षु सैतान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0