पोर्ट्रेट

पोर्ट्रेट :

पोर्ट्रेट म्हणजे रूढार्थाने चेहरा चितारणे
पेन्सिल, चारकोल , शाई , रंग असं काहीही वापरून
पोर्ट्रेट म्हणजे सर्वसाधारणपणे
एक कपाळ ,
भव्य ( भव्य कपाळ वाले लोक भाग्यवान किंवा श्रीमंत असतात असं म्हणतात)
किंवा अरुंद ,
आठ्यांनी भरलेलं किंवा अगदी सपाट
जी ए कुलकर्णींच्या कथेतली कपाळावरची तटाटलेली शीर दाखवणारं
कपाळावर आलेली केसांची बट
किंवा चक्क टक्कल

दोन भुवया
पांढऱ्या किंवा काळ्या कुळकुळीत
सुबक कापलेल्या किंवा
शरीरावरील सर्वात दुर्लक्षित भागांपैकी एक
एकमेकींना न जोडलेल्या
एकमेकींना जोडलेल्या ( असे लोक भाग्यवान किंवा श्रीमंत असतात असं म्हणतात)

दोन नाकपुड्या असलेलं एक नाक
बसकं,फेंदाडं, चाफेकळी,
इत्यादी
नाकाचं काम आहे श्वास घेणं ,
संपूर्ण शरीरयंत्र जिवंत ठेवणं
नाकाखाली दोन ओठ
मग ते कसेही असोत
पातळ , जाड , फाटलेले , लिपस्टिक लावलेले ,
खरं बोलणारे , खोटं बोलणारे
ओठांवर मिशी किंवा लव किंवा काहीच नाही

ओठांखाली हनुवटी
दोन बाजूला दोन गाल ,
मऊ , भरड , देवीचे वन असलेले , सुरकुतलेले ,
पावडर चोपडलेले,
कल्ले असलेले , बिनकल्ली, एककल्ली
बिन दाढीचे , दाढी वाले , नुकतीच दाढी केलेले

दोन बाजूला दोन कान
कानाची रचना कॉम्प्लीकेटेड च
कानाच्या पाळ्या
लांब , ओघळलेल्या, घट्ट , टोचलेल्या , बिन टोचलेल्या वगैरे
तिखट कान , बहिरे कान , बिरबलाच्या गोष्टीतले कान
कान ऐकत राहतात जे कानावर पडते ते ,
बंद पडेपर्यंत कायम ऐकत राहतात

दोन डोळे ,
खोबणीत बसवलेले
पापण्यांखाली सुरक्षित
झोपाळू , संशयी ,
आसुसलेले , विरहानं व्याकूळ झालेले
चतुर , लोभस , अनुरक्त ,
क्रोधाग्नि नं लाल झालेले
भावविभोर , चिंताग्रस्त , दूरवर पाहणारे , वाट पाहून थकलेले
निराश , आशा-निराशेच्या गोंधळात अडकलेले , धसमुसळे
विचारी , स्वार्थसंपृक्त, अर्धोन्मीलित
मनासारखा स्वर लागल्यावर आपोआप बंद होणारे , किंवा आभाळाकडे पाहणारे
अश्रू लपवणारे , अश्रूंना झटकन वाट करून देणारे
स्मरणरंजनात रमलेले, करारी
व्यवहारी ,
काळे, तपकिरी , हिरवे , करडे , कोरडे , निळे
अगदी कुठल्याही रंगाचे

पोर्ट्रेट करत असताना उतरतो मी चेहऱ्याच्या तंतुंमध्ये
त्वचेचे अणुरेणु , पोट , रंग , प्रकाश, सावल्या , वास
हे सगळं जवळून पाहतो , अगदी एकरूप होऊन
कधी अंतर ठेवून

चेहऱ्याच्या मागे खल कुठेतरी बुडी मारतो ,
दृश्य चेहरा बनवणाऱ्या अदृश्य चेहऱ्यात

in short

मी पोर्ट्रेट बनवतो - @सर्व_संचारी

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

चित्रकाराच्या दृष्टीतून टिपलेली विविधता छानच उतरली आहे. डोळ्यांमधील विविधता जास्त भावली. डोळ्यांचा हक्काचा गुणधर्म "स्वप्नाळूपणा" मात्र राहूनच गेला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम कविता !
अश्रू लपवणारे , अश्रूंना झटकन वाट करून देणारे
स्मरणरंजनात रमलेले, करारी
व्यवहारी ,
काळे, तपकिरी , हिरवे , करडे , कोरडे , निळे
अगदी कुठल्याही रंगाचे
हे फारच छान !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me