हवीच असते मी!

न्यूयॉर्कच्या अतिप्रगत रस्त्यांवर
सिंगापूरच्या अदृष्य गल्ल्यांमध्ये
रोमच्या ऐतिहासिक चौकाचौकात
आणि मुंबईच्या प्रत्येक फुटपाथवर
निवांत लोळत पडून असते मी

तुमच्या दिशादर्शक नाकाखाली
गाडीच्या पारदर्शक काचेबाहेर
हवं तेच पाहणार्‍या डोळ्यांसमोर
आणि तुमच्या घरामागच्या बोळीत
सुखेनैव विहरत असते मी

उंची मखमली बैठकींवर बसून
सिंगल मॉल्टच्या घुटक्यांबरोबर
कबाबसोबत तोंडी लावायला
मला हटवायच्या गप्पा करतात
तेव्हा पांढर्‍या गणवेशात 'सर्व्ह' करते मी

अ‍ॅपलपासून बर्गरपर्यंत
आणि केकपासून पिझ्झ्यापर्यंत
ठासून भरलेल्या फ्रीजसमोर
आमचा बबडू काही खातच नाही म्हणतात
तिथेच अर्धपोटी भांडी घासते मी

कचरा काढायला, गाड्या धुवायला
मेहनत करायला न् ओझी वाहायला
माणसं असणं अत्यावश्यकच असतं
म्हणूनच घरात नको असले तरी
बाहेर सगळ्यांना हवीच असते मी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

गरीबी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0