इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न

विवीध भारतीय देवतांच्या संदर्भाने वेगवेगळ्या ध्वजस्तंभांचे उल्लेख येतात. त्यातील संस्कृत साहित्यातून मोठ्या प्रमाणावर उल्लेख येणारा एक ध्वजस्तंभ म्हणजे इंद्रध्वज होय. इंद्राचे पर्यायी नाव शक्र (पाली भाषा: सक्क) आणि ध्वज (पाली भाषा: धज?) चा पर्यायी शब्द 'केतु' मिळून इंद्रध्वजास शक्रध्वज, इंद्रकेतु, शक्रकेतु असे पर्यायी शब्द आहेत. बौद्ध वाङमयात या पर्यायांसोबतच सक्क आणि धज शब्दांसोबतसुद्धा अधिक शब्द बनवून वापरले जात असण्याची शक्यता वाटते. (दुजोरा हवा)

भारतीय देवतांच्या संदर्भाने येणारे ध्वज-स्तंभ जसे ध्वजांचे मुख्य काम करतात तसे ते विशेष प्रसंगी अथवा उत्सवांमधून काठी पूजा स्वरूपानेही भारतीय संस्कृतीत महत्वाचे राहीले आहेत.

अर्थात देवक-स्तंभ आणि काठी पूजा परंपरा या जगभरच्या मानवी संस्कृतीसोबत अतीप्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. यातील बहुसंख्य काठी पूजा प्रकारांचे पुजन देवीस्वरूपात होत असावे पण भारतात इंद्रध्वजाप्रमाणे पुरुष देवतांच्या ध्वजस्तंभांचेही पुजन होतानाही दिसून येते. माझे मिसळपाव संस्थळावर आधीपासूनच गुढी उभारनी आणि महाभारतातील प्रक्षिप्त कथानकांची चर्चा असे दोन धागे आहेत. या धाग्यात त्या विषयाची अंशतः चर्चा असली तरी इंद्रध्वज हा स्वतंत्र धाग्याच्या रुपाने दखल घेण्या इतपत नक्कीच मोठा विषय असल्यामुळे वेगळा धागा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

शक्रोत्सव: इंद्रध्वजपुजनाच्या सामुदायिक उत्सवास शक्रोत्सव असे म्हणत. महाभारतात आदिपर्वात शक्रोत्सव साजरा करण्यासाठी इंद्र चेदीराज उपरिचरास सुचवतो असे वर्णन आहे. महाभारतातच खिलपर्वात श्रीकृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला आपल्या संवगड्यांना देतो. महाभारतातल्या आदीपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. तसेच इंद्रध्वज नेमका कसा दिसतो ते प्रतिमाविद्या (आयकॉनोग्राफी) च्या अनुषंगाने अभ्यासास उपलब्ध वर्णने कमी वाटतात जी उपलब्ध आहेत त्यात फरक जाणवतो. त्याशिवाय इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही उत्साहाने केली जाताना दिसते.

शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंश, भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ नाटकांमधून येतात हि नाटके बहुधा सहाव्या शतकापुर्वी लिहिली गेली असावीत (दुजोरा हवा). उल्लेख रामायण, महाभारत आणि पुराणे असोत अथवा नाटके इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात (अगदी ठोकळेबाजपणा वाटेल एवढ्या मोठ्याप्रमाणावर) आले असावेत. हिरोंना तर इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्तीपडणार्‍या व्हीलनपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा कुठे कुठे दिली आहे हे पाहून गंमत वाटते.

प्रामाणिकपणे सांगावयाचे झाल्यास मी मराठी विकिपीडियावर लिहिलेल्या संबंधीत लेखांना या निमीत्ताने भेट दिली जावी म्हणून, ह्या धागालेखाची रोचकता वाढवण्यासाठी इंद्रध्वजाची आणि शक्रोत्सवाची सर्व माहिती येथेच देणे शक्य असूनही टाळले आहे तेव्हा ती माहिती मराठी विकिपीडियावर वाचावी अथवा आवड आणि आवश्यकते प्रमाणे या धागा लेखाच्या प्रतिसादातून नकलवण्यास हरकत नाही.

इंद्रध्वज आणि शक्रोत्सव विषयक माहिती आंतरजालावरून शोधताना मला पडलेले काही प्रश्न असे:

१) महाभारत आदिपर्वातील शक्रोत्सवाचा उल्लेख या दुव्यावर संस्कृतातून उपलब्ध आहे. आणि हा मराठी अनुवादाचा वेगळा दुवा आहे. आंजावर अनुवाद उपलब्ध असूनही शक्रोत्सव विषयक श्लोकातील प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगवेगळे लक्षात येत नाहीत. मला प्रत्येक संबंधीत श्लोकाचा शब्दवार अर्थ हवा आहे. किमान त्यातील मराठीत सध्या वापरात नसलेल्या, संस्कृत शब्दांचे मराठी अर्थ हवे आहेत. खास करून काही भाषांतरकार कोणत्यातरी संस्कृत शब्दाचा अनुवाद वेळू करत आहेत तर कोणत्या शब्दाचा अनुवाद वेळू केला जातो आहे ? वेळू आणि बांबू एकच का वेगवेगळ्या वनस्पती आहेत.

२) आदिपर्वातील शक्रोत्सवाचा आंतर्भाव भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रमाणीत केलेल्या आवृत्तीत आहे का ह्याची माहिती हवी आहे.

३) कृष्णाने शक्रोत्सव बंद करण्याचे सुचवले ते खिलपर्व प्रक्षिप्त असल्याचे आणि सौतीने लिहिले असण्याची शक्यता काही अभ्यासकांच्या लेखनातून दिसून आली पण एकुण आदिपर्वात चेदीराजास शक्रोत्सव चालू करण्याची सुचवणी वाचण्यासाठी कितीही रोचक असली तरी महाभारताच्या मुख्य कथानकाच्या अनुषंगाने, एकतर आदिपर्वात शक्रोत्सव उल्लेखाचे प्रयोजन समजत नाही. दुसरे असे कि खिलपर्वातील कृष्णाने शक्रोत्सव बंद करण्याचे सुचवले हा प्रक्षिप्त भाग सौतीकृत असेल तर आदिपर्वात शक्रोत्सव आरंभाचा उल्लेख प्रक्षिप्त असण्याची शक्यता असल्यास सौतीकडूनच आला असेल का त्या आधीच प्रक्षिप्त स्वरूपात आला असेल ?

४) रघुवंश, भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ नाटकांमधून इंद्रध्वज आणि शक्रोत्सवाचे आलेले उल्लेख मुळसंस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद या स्वरूपात मिळाल्यास हवे आहेत.

५) खालील पुराणादी संस्कृत ग्रंथातून इंद्रध्वज आणि शक्रोत्सवाचे आलेले उल्लेख मुळसंस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद या स्वरूपात मिळाल्यास हवे आहेत.
पुराणादी संस्कृत ग्रंथातील उल्लेखांची यादी श्लोक क्रमांकासहीत आंजावर सापडली ती अशी:

* इन्द्रध्वज ब्रह्मवैवर्त्त ४.२१
* भविष्य ४.१३८.४९ , ४.१३९.१
* भागवत १०.४४.२३
* मत्स्य २४२.९, २४२.२४
* वराह १६४.३९ ,१६४.४०
* विष्णुधर्मोत्तर २.१५४.१३, २.१५५.५, २.१५६.१, २.१५७.१, २.१६०.१०
* हरिवंश २.१५.४ , २.१६.१+, ३.२६.१५
* वा.रामायण ४.१६.३७, ४.१७.२ , ५.४८.२४
* महाभारत आदि १७२.३ , वन ४२.८ , १४६.७० , उद्योग ५९.१५ , भीष्म ११९.९१ , द्रोण १०५.११ , शल्य ४.१६, १७.५३ , सौप्तिक ६.१६

६) बौद्ध वाङमयात इंद्र, इंद्रध्वज आणि शक्रोत्सवांचे उल्लेख असण्याची प्रथम दर्शनी शक्यता वाटते त्या दृष्टीने माहिती कुणास असल्यास हवी आहे.

७) जैन धर्मात इंद्र, इंद्रध्वज आणि शक्रोत्सवांचे सक्रीय उपयोजन आणि साहित्यातील उल्लेख असण्याची शक्यता आहे त्या संबंधी सुद्धा माहिती हवी आहे.

८) सातवाहन कालीन नाण्यावर इंद्रध्वजाचे चित्र असल्याचा आणि चित्तोढगढ येथील एका स्तंभावर इंद्रध्वजाच्या आयकॉनोग्राफीची माहिती असल्याचा उल्लेख वाचण्यात आला अशी पुरातत्व विषयक छायाचित्रे कुणास मिळाल्यास या धाग्यावर अवश्य द्यावीत

९) अजून एक शंका इंद्रास पर्यायवाची शब्द शक्र (पाली भाषा: सक्क) या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ? अथवा काय असू शकते ? इंद्राच्या विरोधी दानव गटाचे आचार्च शुक्र यांच्या नावात आणि शक्र या इंद्राच्या नावात बर्‍यापैकी साम्य आहे ते कसे काय ?

* मि.पा. सदस्य प्रचेतस यांच्या भाजे लेणीतील गूढ शिल्प लेखातून खालील छायाचित्र (त्यांच्या पुर्वानुमतीने त्यांचा कॉपीराइट असण्याची शक्यता) गजारूढ राजाच्या मागे एका सेवकाच्या हातात एक ध्वज दाखवला आहे. (मला हा ध्वज लक्षात येण्यास जरासा अवधी लागला Smile ) स. आ. जोगळेकरांच्या हालाच्या गाथा सत्तसईवरील भाष्यात हत्तीवरील राजा इंद्र आणि मागील ध्वज इंद्रध्वज असण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु सदस्य प्रचेतस यांच्या भाजे लेणीतील गूढ शिल्प या लेखात या विषयावर तज्ञांमध्ये वेगवेगळी मते असल्याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध आहे. प्रचेतस यांनी आत्ताच दिलेल्या मिपा प्रतिसादानुसार खालील छायाचित्रातील त्या ध्वजावरील चिन्ह 'त्रिरत्न' हे आहे. बुद्द, धम्म आणि संघ ह्या तीन रत्नांचे ते प्रतीक असावे.

indradhvaja bhaje-prachetas

उपरोक्त प्रश्नातील क्रमांक ३ आणि ९ जनरल काथ्याकूटस्वरूपाचा आहे तो सोडून क्रमांक १, २, ४, ५, ६, ७ प्रश्नांच्या अनुषंगाने आलेले प्रतिसाद आणि प्रतिसादांश विकिप्रकल्पातून वापरले जाण्याची शक्यता असु शकते म्हणून प्रताधिकारमुक्त समजले जातील. क्रमांक ८ आणि छायाचित्रे नमुद करणार्‍याने प्रताधिकारमुक्ती विशेषत्वाने नमुद न केल्यास कॉपीराईट संबंधीत कॉपीराइट मालकाचा.

आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

शक्र(ताक) इंद्राला दुर्लभ त्यातले शक्र आहे की काय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा थोडा गोंधळ होतो आहे. शक्र म्हणजे ताक तर तक्र म्हणजे इन्द्र. ते शक्राला - म्हणजेच इन्द्राला - दुर्लभ आहे असा हा 'चित्रश्लोक' आहे.

भोजनान्ते च किं पेयं जयन्त: कस्य वै सुत:।
कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम्॥

ह्या श्लोकामध्ये तीन वेगवेगळे प्रश्न आहेत. भोजनान्ते च किं पेयं? उत्तर तक्रं, जयन्त: कस्य वै सुत:? उत्तर - शक्रस्य, कथं विष्णुपदं प्रोक्तं? उत्तर - दुर्लभम्. ही तीन उत्तरे एकापुढे एक लिहिली तर त्यातून 'तक्रं शक्रस्य दुर्लभम्' ताक इन्द्राला दुर्मिळ आहे असा मजेदार अर्थ निघतो.

ह्याच धर्तीचे डझनावारी चित्रश्लोक उपलब्ध आहेत. पैकी हा श्लोक शाळांच्या पाठयपुस्तकांमधून प्रारम्भीच भेटतो म्हणून तो पुष्कळांना ठाऊक असतो इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा थोडा गोंधळ होतो आहे. शक्र म्हणजे ताक तर तक्र म्हणजे इन्द्र. ते शक्राला - म्हणजेच इन्द्राला - दुर्लभ आहे असा हा 'चित्रश्लोक' आहे.

अरविंदजी तुमचाही थोडा गोंधळ होतोय!
शक्र म्हणजे ताक नव्हे, शक्र म्हणजे इंद्रच
तक्र म्हणजे ताक!
तक्रं शक्रस्य दुर्लभम् म्हणणे इंद्राला (शक्रस्य) ताक (तक्रं) दुर्लभम्!!

ता. क. = खाली राहीचा प्रतिसाद आधी वाचला नव्हता म्हणून हा प्रतिसाद दिला. आता काढून टाकला तरी चालेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद कोल्हटकरजी. बरोब्बर आई हाच श्लोक सांगायची-
तक्रं शक्रस्य दुर्लभम्॥
___

शक्र म्हणजे ताक तर तक्र म्हणजे इन्द्र.

हे माहीत नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादास बूच बसू नये म्हणून स्वतंत्र प्रतिसाद लिहीत आहे. पण श्री कोल्हटकर यांच्याकडून अनवधानाने बहुतेक, एक बारीकशी अक्षरांची उलटापालट झाली आहे. तक्र म्हणजे इंद्र आणि शक्र म्हणजे ताक असे लिहिले आहे ते नेमके उलट हवे. तक्र म्हणजे ताक आणि शक्र म्हणजे इंद्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय तसेच वाटले म्हणूनच उपप्रतिसद दिला नाही. व तोच प्रश्न अधोरेखित केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0