तुरे

नमस्कार मंडळी! मी बऱ्याच दिवसांपासून ‘ऐसी अक्षरे’ची वाचक आहें आणि आता सदस्यत्वही घेतले आहें. माझी ओळख म्हणून मी माझी एक कविता समोर ठेवते आहें. मी फार कमी लिहिते (आणि जे लिहिते तेही पुष्कळदा ‘फुटकळ’ सदरांतच मोडते याची मला पूर्ण कल्पना आहें) पण जाणकारांच्या प्रतिक्रियांनी लिखाणात सकारात्मक फरक पडेल आणि अधिक लिहिले जाईल अशी अपेक्षा आहें म्हणून हा प्रपंच.

तरारून फडकणारे उसाचे तुरे
मला तुझ्या डोळ्यांत ओझरते दिसले.
ओठांच्या किनारींतून ठिबकणारे किंचितसे हसू
अन् तू बोटांनी कोरलेल्या नक्षीदार कमानीही,
नजरेस पडल्या माझ्या.
अन् मी वाट पहात राहिले बहराची;
चहुबाजुंनी रंग उधळणाऱ्या, गंध विखुरणाऱ्या,
तुझ्या आवेगी फुलण्याची.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

छोटीशी पण चित्रदर्शी कविता आवडली. एका कळीच्या उमलण्याची वाट बघण्याची आतुरता दिसते.

अजून येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता समजली आणि आवडलीही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छोटेखानी चांगली कविता.
कल्पना चांगली आहे मात्र ती फुलण्याआधीच कविता संपते. ही कल्पना अधिक फुलवली असतीत तर जास्त मजा आली असती

असो. ऐसी वर स्वागत! Smile येत रहा, वाचत रहा अन लिहित रहा! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

व्वा!खासच!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0