ग्रीसचा प्रश्न

दूरीकुर्यु उरोभारं शरचापरिरक्षव: |
अथवा जलदेवीयं हिनस्ति तुरकासुरम्|

पुन्हा एकदा सेक्युलर लोकांची खोटारडी तोंडे बंद झाली आहेत. अमेरिकेची हुजरेगिरी करण्यात धन्यता मानणारे आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा द्वेष करणारे देशद्रोही सेक्युलर एजंट्स इतकी वर्षे खोटा प्रचार करत होते त्याला शेवटी काल एका आंतरराष्ट्रीय पुन्हा एकदा सडेतोड उत्तर मिळाले.
भारतीय प्राचीन संस्कृती आणि विद्या किती प्रगत होती हे या ग्रीसच्या उदाहरणावरून आपोआपच सिद्ध होते आहे. पुराणात जे काही ज्ञान आहे त्याला हसायचं आणि कुराणाचे मात्र गोडवे गायचे असा यांचा कावा, पण आपल्या पूर्वजांनी जे वेद लिहून ठेवले आहेत ते त्रिकालदर्शी आहेत, हे असे वारंवार सिद्ध झाले की मग मात्र हे सेक्युलर तोंडे लपवत फिरतात.
जर्मनीच्या लुसैल या शहरामध्ये कॉथे युनिवर्सिटीत संस्कृत आणि प्राचीन भारतीय वेद व पुराणांचा अभ्यास करण्यासाठी असलेल्या विभागाचे प्रमुख डॉ. कॉव्हे बॉर्ज यांनी चारहजार वर्षे जुन्या प्रक्षिप्तपुराणातील काही श्लोकांचा अभ्यास करून त्याचा आताच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संदर्भाने नवीन अर्थ समोर आणला आहे. या श्लोकांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राची फक्त तत्वेच नव्हेत तर त्या तत्वांचा आधुनिक आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम आणि महत्वाच्या घडामोडींवर भाष्यही केले आहे, त्यातील काही महत्वाचे श्लोक उदाहरण म्हणून आपण बघितले तरी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या बुद्धीमत्तेची कल्पना येते आणि अभिमानाने आपला ऊर भरून येतो.
उदाहराणार्थ खालील श्लोक (प्रक्षिप्तपुराण, सर्ग २, श्लोक १२ )

“दूरीकुर्यु उरोभारं शरचापरिरक्षव:
अथवा जलदेवीयं हिनस्ति तुरकासुरम्|”

अर्थ - “शरचापाचे रक्षण करू इच्छिणार्यांनी उरावरचा भार दूर करावा. नाहीतर ही जलदेवी तुरकासुराचा नाश करते”

आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना माहिती असेलच की युरोपातील देशांची युरोझोन हि संघटना आहे आणि त्याला स्थानिक लोक “युरो” असा शब्दही वापरतात, अर्थशास्त्राच्या निकषानुसार जेव्हा एखादे आर्थिक कर्तव्य खूप तोट्याचे ठरणार असेल तेव्हा अशा वेळी राज्यव्यवस्थेने, हे ओझे वेळीच झुगारून देऊन आणखी तोट्यात न जाण्याचा प्रयत्न करायचा असतो आधुनिक अर्थशास्त्रात यालाच ‘ डोंट थ्रो गुड मनी आफ्टर बैड मनी’ असे म्हणतात, या श्लोकात ‘ चापशर हा शब्द आला आहे, तो वरवर संदर्भहीन वाटतो, किंवा त्याचा युद्धाशी संबंध असल्याचा समाज याआधी दृढ होता, पण डॉ. कॉव्हे यांच्या प्रबंधामुळे एक नवीन अर्थ समोर आला आहे, जर आपण युरो या त्यांच्या चलनाचे चिन्ह नीट निरखून पाहिलेत तर ते ताणलेल्या धनुष्याला लावलेल्या बाणासारखे दिसते, तेव्हा असा धनुष्यबाण किंवा चापशर म्हणजेच युरो हे चलन नष्ट होऊ शकेल असा स्पष्ट इशारा आपल्या पूर्वजांनी चारहजार वर्षापूर्वीच देऊन ठेवला आहे.
आता या संदर्भामुळे पुढचा अर्थ स्पष्ट होतो, जलदेवी म्हणजे अर्थातच जर्मनीच्या नेत्या एं’जला’ मार्केल यांनी कठोर बुमिका घेऊन चापशर म्हणजेच युरो वाचवण्यासाठी प्रयत्न आरंभले आहेत हे आपल्याला आता माहिती झाले आहेच, इतका स्पष्ट पुरावा समोर असतानाही सेक्युलर मूर्ख त्याकडे दुर्लक्ष करून “ पण यामध्ये ग्रीसचा उल्लेख कुठे आहे’ असा प्रश्न विचारणारच. डॉ. कॉव्हे यांच्या शोधप्रबंधामध्ये असल्या लोकांना परस्पर करारा जवाब दिलेला आहे, या श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये ‘तुरासूर’ हा शब्द आलेला आहे, हा तुरासूर कोण हे आतापर्यंत ज्ञात नव्हते, हा शब्द इथे एका असुराला वापरलेला नसून संपूर्ण देशाला वापरलेला आहे, आधीचे संदर्भ घेऊन अर्थ लावल्यास हा शब्द ग्रीस या देशासाठी वापरला आहे हे स्पष्ट होते, जीज्ञासुंनी प्राचीन ग्रीस योद्ध्यांच्या युनिफॉर्मचे चित्र शोधून पहावे. म्हणजे याचा उगम स्पष्ट होईल.
प्राचीन संस्कुतीमधले असे उपयोगी शास्त्र आणि प्रगत ज्ञान सरळ फेकून द्यावे आणि पाश्चात्यांचे गुलाम होऊन राहावे, असा सेक्युलरांचा डाव पूर्वीपासूनच आहे, पण पाश्चात्यच आपल्या प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करून त्यातलं ज्ञान आपल्याला दाखवून देतात तेव्हा मात्र या लोकांची तोंडे बंद होतात ती अशी.
विकल्या गेलेल्या प्रेस्टीट्युड मिडियामध्ये हि माहिती अजिबात येणार नाही म्हणून, हिंदुस्तानचा अभिमान असलेल्या प्रत्येकाने हा लेख शक्य तितका शेअर कराच, कारण आपली उज्ज्वल आणि प्रगत प्राचीन संस्कृती आपणच आता लोकांपर्यंत पोचवायला हवी. खरे भारतीय असाल तर शेअर कराच.

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

>>खरे भारतीय असाल तर शेअर कराच.

एक शेअरमागे किती रुपये ऐसी अक्षरेतर्फे गरजू मुलांना दिले जाणार आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डॉळे पाणावले, उघडले, आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हॅहॅहॅ, मस्तं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"खरे भारतीय आणि विराट हिंदू असाल तर" असे पाहिजे.

तदुपरि तुरासूर हे खासच. ग्रीक योद्ध्यांच्या शिरस्त्राणाला तिआरा असे म्हणत, तो तुराचाच अपभ्रंश आहे यात शंकाच नाही.

आणि पुनरेकवार पुराणांची महती सिद्ध झालेली आहे. म्हणा, गर्व से कहो....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जरा, ललित मोदींवर पण काही श्लोक आहे का पहाना. सुषमा,वसुंधरेच्या कामाला येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा. आपल्या संस्कृतीत सगळं ज्ञान आधीच साठवून ठेवलं होतं याची पुन्हा एकदा प्रचिती आल्यामुळे मनाला धन्य वाटलं. पण हे शोधून काढण्यातही या युरोपिअनांनी पुढाकार घ्यावा हे आपल्याला लांच्छनास्पद आहे. आपण जेव्हा भव्यदिव्य गोष्टी करत होतो, आपल्याकडे जेव्हा पुष्पक विमानं प्रवासासाठी वापरात होती, द्रोण (ड्रोन हा अपभ्रंश) घिरट्या घालत होते तेव्हा हे युरोपिअन भटके विमुक्त म्हणून फिरत होते. हे ज्ञान आपण गमावून बसलो म्हणून आपला ऱ्हास झाला. आणि त्या ज्ञानावरच कानामागून आलेले युरोपिय तिखट झाले. त्यांनी आपल्यावर राज्य करून आपल्याला खच्ची केलं. त्यांचीच वैचारिक अवलाद आज स्वतःला पुरोगामी म्हणवत त्यांचे गोडवे गात आहे ही शोकांतिकाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण हे शोधून काढण्यातही या युरोपिअनांनी पुढाकार घ्यावा हे आपल्याला लांच्छनास्पद आहे.

ते बहुधा रिव्हर्स औटसोर्सिंग असावं. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आउटसोर्सिंगसारख्या पाश्चात्य, धोकादायक, टाकाऊ सवयींपोटीच आपला सर्वनाश झाला. 'तैनाती फौज' घेऊन काय वाटोळं झालं माहीत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते एकतर्फी औटसोर्सिंग झाल्यामुळे झालं तसं. इथे तर उभयपक्षी औटसोर्सिंग आहे. आपण त्यांची कामे हडपायची अन बदल्यात त्यांनी आपल्या संस्कॄतीची महती गायची. इतना तो बनताइच है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

युरोपियनांनी पुढाकार वगैरे काही घेतलेला नाही. इथले दर्शक, चिंतक ह्यांनी मुद्दामूनच अशा खुणा लावून ठेवल्या होत्या. कसंय, इथे सोन्याचा धूर आणि ते भटके-बिचारे हे काही त्यांना बघवलं नाही. मग ते म्हटले, की आता काहीकाळ आपण अधोगतीचं सॉंग घेऊ आणि त्यांना प्रगती केल्यासारखं वाटू देऊ. पुढे २०२० सालापर्यंत भारतीयांना आपोआपच हे निखालस सांस्कृतिक सत्य कळेल. त्यामुळे ते कानामागून आलेले नाहीत, तिखटही झालेले नाहीत. आपणच कान झुलवत त्यांना आणलंय आणि त्यांचं तोंड गोड केलंय.
हे ग्रीस, चीनच्या शेअर बाजारात १/३ घसरण, अमेरिकेने व्याजदर वाढवणं हे संस्कृतीच्या विराट रुपाची निव्वळ जांभई आहे. आहात कुठे!! मोदी, भागवत, बात्रा हे तिघं मिळून योगासनाला बसतील तेव्हा सारे प्रश्न सुटतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदी, भागवत, बात्रा हे तिघं मिळून योगासनाला बसतील तेव्हा सारे प्रश्न सुटतील.

खूब जमेगा रंग जब बैठेंगे तीन यार...

लेकिन इसको नाम क्या दें सरदार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

योगपायपर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

है शाबास! एकच नंबर सरजी.

शिवाय योग(केल्याने)(अपने)पाय पर असा अर्थही चपखल जमतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आई ग्ग! सर्व प्रतिसाद वाचून प्रचंड हसते आहे Smile अन बॅट्या तू कविता कशाला करतोयस?
यार-सरदार वगैरे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय ग्रीसिंग द पाम चासुद्धा प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छायाचित्रातल्या पामसाठी ग्रीस हा एक मोठाच प्रश्न आहे खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रीसचं काय करावं यावर गब्बरसिंग यांच मत जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मौजमजेचा धागा असल्याने प्रतिसाद मर्यादित ठेवतो. ग्रीस चं काय करायचं याचा निर्णय ग्रीस च्या सार्वमतातूनच होईलच (५ जुलै). Broadly speaking - Voters (Citizen) are principal. Leaders (elected representatives) are agents. व या महत्वाच्या दृष्टीकोनातून पाहिलेत तर सार्वमतातून च हा निर्णय होणे सुयोग्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सार्वमत प्रक्रियेत खऱ्या अर्थाने लोकशाही निर्णय होतो असं म्हणू शकतो का आपण? सध्याच्या तंत्रज्ञान युगात सार्वमत घेणं ही प्रक्रिया तुलनेने सोपी झाल्याने काही प्रश्नांमध्ये सरकारने प्रतिनिधी म्हणून निर्णय घेण्यापेक्षा जनतेने सहभागी होऊन निर्णय घेणं अधिक योग्य असं म्हणता येईल का? मी स्वतः सार्वमताच्या बाजूने आहे. पण मग मुळात निवडणुकांमध्ये नागरिकांनी कौल दिलाच होता असंही म्हणता येईल. मग परत कशाला? म्हणजे सरकारला खरोखरीच आपण जनतेच्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतो का ह्याची शंका आहे असं म्हणता येईल. माझ्या मते ग्रीस मधील जनतेला ऑस्टॅरिटी नकोय आणि युरोचा भाग पण रहायचं आहे. (अर्थात सार्वमतात 'नो' आल्यावर ग्रीस युरोमधून बाहेर जाईलच असं नाही.) पण असं होऊ तर शकत नाही. रविवारी मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराला हे स्पष्ट कळत असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे प्रश्न अत्यंत उचित आहेत.

-----

The theoretical work done during these decades [1960s and 1970s] has provided explanations for the poor actual performance of government in solving social problems. Many specific studies … cite problems inherent in the existing incentive structure embodied in political institutions. The suggestion is that existing political institutions are not well suited for allocating economic resources. More far-reaching are general studies, such as Arrow’s that show the general inappropriateness of any political institution as a mechanism for choosing social conditions. (Kenneth) Arrow showed that under reasonable conditions, collective decision making in any form is not capable of making rational choices among alternative social states. ________ Randy Holcombe’s 1985 book, An Economic Analysis of Democracy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रीस हा शब्दही गिरीशचा अपभ्रंश आहे. त्यांची नावंही अलेक्सोपौलोस, स्तेफानोस, दमित्रियोस अशी वेदघोस करत म्हणायची असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हितेसभायने गिरीषला फोन केला.
'अरे गिरीस, तु बँक्रप्ट हो गयेला है ऐसा मने बहोत लोगों के मुंह से सुना. लै वाईट वाटला बग.'
गिरीष : अरे बाबा, वह 'ग्रीस' नामका देश है और बहुत जुना है वह !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण ग्रीसमध्ये सगळीकडे नुसते डोंगरच डोंगर आहेत. त्यामुळे गिरीश हे नाव अगदी चपखल आहे.

बादवे ट्रोजन युद्धातल्या ग्रीक पार्टीचा नेता आगामेम्नॉन हा दत्तसंप्रदायी होता, कारण त्याच्या बापाचे नाव आत्रेउस होते. त्यामुळे तो आपसूकच अत्रिगोत्रीय ठरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कारण त्याच्या बापाचे नाव आत्रेउस होते. त्यामुळे तो आपसूकच अत्रिगोत्रीय ठरतो.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नावे बनावताना काही विचार केला तो असा

खोटी यूनिवर्सिटीची कॉथे यूनिवर्सिटी केली
डॉ. कावेबाजचे डॉ. कॉव्हे बार्ज झाले

आणि लसैल हे शहर आत्ता कुणाला माहिती नसेल तरी काही वर्षात सगळ्यांना नक्की माहिती होणार आहे.
कसं ते तुम्हीच शोधा, गंमत म्हणून

तो संस्कृत श्लोक मात्र एका संस्कृत पंडित मित्राकडून चक्क पाडवून घेतला आहे, हव्या त्या अर्थाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्यासारखे प्रकांडपंडीत आमच्यासारख्या क्षुद्रातिक्षुद्रांसाठी लिहिण्याचे कष्ट घेतात म्हणून हे सौंस्कृत का काय ते समजतं हो. नाहीतर जगात काय चाललंय ते कुठलं आम्हांला समजायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.