रॉय किणिकरांच्या कविता

रॉय किणिकरांच्या जबरदस्त मराठी कविता वाचनात आल्या. उत्तररात्र व्यतिरिक्त त्यांची अजून कांही पुस्तके/ कवितासंग्रह आहेत का? ऐसी वरील जाणकार वाचकांनी क्रुपया अधिक महिती द्यावी. (ऐसी वर या आधी चर्चा/ उल्लेख झालाय? क्रुपया दुवा द्या). श्रुन्गारा (टायपो बद्दल माफी, खालचा रफार लिहीता आला नाही) बरोबर इतर रसही ताकदीने मांडणारा हा कवी खूप प्रसिद्ध झालाच नाही, असे वाटते. 'या पाणवठ्यावर' यातील आणि इतर कवितेतील कांही भन्नाट ओळी इथे देण्याचा मोह होतोय.

"या इथे घेतली त्या दोघांनी शपथ, चुरगळले पदराआड जरासे हात
घातली मिठी आवळून दोन्ही बाहू, अडवून म्हणाली, नका ना जाऊ ॥

घेतली शपथ मावळत्या सूर्यफुलाची, घेतली शपथ सुकलेल्या निशिगंधाची
मोहाचे फुटले मोहळ संभोगार्थ, निर्माल्य प्रीतिचे झाले अश्रू तीर्थ॥"

"भरदार कुसुंबी काठ दाटली चोळी, येतसे अपूर्वा उषा सावळी भोळी
रांगोळी घालुन जाई दाराआड, रंगला इथे संध्येचा पश्चिम माड॥

रोमांचित झाले कितीक येथे युगलं, चुंबने दिली घेतली बिलगुनी जवळ
रंगली एकदा रेंगाळत अपरात्र, वाकले लाजुनी पदराखाली नेत्र॥"

"ओठांत अडकले चुंबन रुसले गाल, कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल
घालता उखाणा फणा रुपेरी खोल, अंकुरले अम्रुत ढळता नाभीकमळ॥

वितळली निळाई काळोखातील आज, अन अज्ञाताच्या कुशीत पडले बीज
अंकुरला चढला एकांताचा वेल, एकदाच येते या स्वप्नाला फूल॥"

किंवा हा मास्टरस्ट्रोक...
"काळोख खुळा अन् खुळीच काळी राणी, संकोच मावला मिठीत सुटली वेणी
अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ, ओठांत चुंबने भरली काठोकाठ॥

गदमरली काजळकाठावरची धुंदी, कळवळली हिरवी तळटाचेवरची मेंदी
पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ, पदरातुनी फिरली एक तान्हुली मूठ॥"

3
Your rating: None Average: 3 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

काळोख खुळा अन् खुळीचहा शेर

काळोख खुळा अन् खुळीच ....

हा शेर लई आवडला.

ही कविताही बुकमार्क करता येत

ही कविताही बुकमार्क करता येत नाहीये.

अंकुरला चढला एकांताचा वेल,

अंकुरला चढला एकांताचा वेल, एकदाच येते या स्वप्नाला फूल॥"

अन

रांगोळी घालुन जाई दाराआड, रंगला इथे संध्येचा पश्चिम माड॥

या ओळी फार आवडल्या.

किणीकरांची पुस्तके

किणीकरांच्या चार-चार ओळींच्या कविता कधी काळी आवडल्या होत्या. मात्र त्यांनी चार ओळींच्या बंधनातून सुटून वेगळे काही काव्य लिहावे असे बरेचदा वाटत असे.

रॉय किणीकरांची अनेक पुस्तके इथे उपलब्ध आहेत.

धन्यवाद अमुक!

धन्यवाद अमुक!

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

ओहो! उत्तररात्र!

रॉय किणीकर एक अवलिया व्यक्तिमत्व होते. दलाल-किणीकर या जोडगोळीने 'दीपावली' नावलौकिकाला आणली.
खूप वर्षांपूर्वी निवडक 'उत्तररात्र' चे सादरीकरण ऐकले/पाहिले होते, ते अजूनही आठवते. जबरदस्त, ताकदीची कविता.
पुत्र अनिल किणीकर यांनी रॉय यांच्यावर चरित्र आणि समीक्षात्मक पुस्तक लिहिले आहे तेही छान आहे. आणखीही एक पुस्तक आहे पण आता आठवत नाही. गूगलबाबा 'किती रंगला खेळ' हे नाव दाखवीत आहे.

@राही - 'उत्तररात्र' चे सादरीकरण

निवडक 'उत्तररात्र' चे सादरीकरण ऐकले/पाहिले होते
.......काही तपशील आठवतात का ?
म्हणजे सादरीकरण कशा प्रकारचे - कवितावाचन की चाली लावून - होते? सादरकर्ते कोण ? साधारण कुठला काळ ?

फारसे नाही

व्य.नि. के.आ.