त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

श्रावणबेळगोळचा ज्ञात इतिहास हा शकवर्ष 8०० ते ११०० च्या कालावधीतील आहे. गंग राजे राचमल्ल (४ थे) यांच्या कालावधीत शक्यतो शकवर्ष ९५० च्या पुढे-मागे या गोमटेश्वराच्या मुर्तीचे निर्माण केले गेले. ही मुर्ती ५७ फूट उंचीची आहे व ती एका अखंड पाषाणातून बनवली गेलेली आहे. श्री चामुंडराय हे गंग राजे राचमल्ल (४) यांचे सेनापती होते, त्यांनी या मुर्तीची स्थापना केली होती. गोम्मटराय हे श्रीचामुंडराय यांचेच नाव म्हणून या मुर्तीला गोमटेश्वर असे नाव पडले. मुळ मुर्ती ही बाहुबली यांची आहे ( बाहुबली = सम्राट भरतचा लहान भाऊ).

मुर्ती एवढी उंच असल्या कारणाने या मंदिराला फक्त तटबंदी आहे, छत नाही. तटबंदीच्या दोन्ही बाजूला सभापंडप, मुनींच्या राहण्याची व्यवस्था आहे. या पुर्ण विंध्यगिरी पर्वतावर अनेक शिलालेख आहे, व त्या शिलालेखांची पुर्णपणे नीट काळजी घेतली जात आहे.

सिध्दर बस्ती
मुख्यमुर्ती स्थानाच्या बाहेर असलेल्या सर्व पाषाणातून निर्माण केलेल्या गृहांना/ मंडपांना सिध्दर बस्ती असे म्हटले जाते. ज्याचे निर्माण शकवर्ष १७००-१८०० मध्ये केले गेले. या सर्वभागात अनेक शिलालेख असून त्यावर मंदिरासंबधी माहिती, निर्माते व दानासंबधी उल्लेख केलेला आहे.

गुल्लेकायी - अज्जी मंडप
पांच गोलाकार स्तंभ, एक शिलालेख व एका अज्जीची साडी नेसलेली मुर्ती. असलेला हा मंडप अनेक दंतकथेमुळे प्रसिध्द आहे, चामुंडराय यांचा घमंड तोडण्यासाठी देवी पद्मावती तेथे अज्जीच्या रूपात गेली होती ही सर्वात प्रसिध्द दंतकथा आहे. हा मंडप शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेला असून याचे स्तंभ मात्र शकवर्ष १२०० च्या काळातील आहेत.

विंध्यगिरी पर्वतावर त्रिकुट बस्ती (ओदेगल बस्ती) म्हणून एकमात्र त्रिमंदिर आहे. पुर्वीच्याकाळी तळघर बांधण्यासाठी कणाश्म शिला नावाच्या दगडाचा विषेशतः वापर केला जात असे त्याच दगडातून हे मंदिर उभारले गेले आहे. शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेले हे गोलाकार स्तंभ असलेले मंदिर बाहेरून जरी साधे वाटले तरी विषेश दगडांच्या वापरामुळे व याच्या अतंर्गत रचनेमुळे विशिष्ठ ठरते. आता तीन गर्भगृह असून प्रत्येक गर्भगृहात स्तरितशिला (संगमरवर) चा वापरून करून अत्यंत सुरेख व रेखीव अश्या तीर्थंकरांच्या मुर्त्या आहेत.

त्यागदं स्तंभ
कलात्मक सौंदर्याचे अनुपम उदाहरण असलेला त्यागदं स्तंभाचे ऐतिहासिक दृष्ट्यादेखील अनन्य साधारण महत्त्व आहे. एक छोटा मंडप व त्यामध्ये मध्यभागी हा स्तंभ आहे. याचे निर्माण शकवर्ष ९५०-१००० मध्ये केले गेले असून या वापर श्री चामुंडराय दान-धर्म करण्यासाठी करत (तेथे उभे राहून दे डोळे बंद करून दान देत असत). व शेवटी शेवटी त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचे दान येथे उभे राहूनच केले व सन्यास घेतला. स्तंभावर लतावेली यांचे सुरेख रेखाटन केले असून पुर्ण स्तंभ रेखीव आहे.

विंध्यगिरी पर्वतावरून दिसणारा सुर्यास्त.

पुढील भागात आपण पाहू विजयनगर साम्राजाची राजधानी व भारताच्या प्राचीन इतिहासाच्या मुकटातील मुख्य हिर्‍याचे स्थान देता येईल असे ठीकाण - हंप्पी.

क्रमशः

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

खूप लहानपणी श्रवणबेळगोळला गेले होते. तेव्हाच्या अगदी धूसर, चित्रमय आठवणी आहेत.
राजे, 'अज्जी' म्हणजे आजी का इतर काही? मला हे समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटो सुंदर आले आहेत. माहिती अपुरी वाटते. जास्त विस्ताराने लिहिले असते तर लेख खूप वाचनीय झाला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे स्थान पाहीलेले आहे. नक्षीदार खांबाचा फोटो अतिशय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'श्रीचावुण्डराजें करवियलें' हे वाक्य आता विकीपुरतेतरी मराठी म्हणवले जात नाही कारण कोंकणी भाषेने त्यावर मालकीहक्क सांगितला आहे. कोंकणीवरच्या जुन्या विकीलेखात याविषयी म्हटले होते की 'करवियलें' मधली 'वियलें' हे क्रियापदाचे रूप कोंकणी आहे, मराठी नाही. खरे तर मराठीत गेल्या शतकापर्यंतच्या साहित्यात अशी रूपे सापडतात. 'लावियलें नंदादीपा, तुवां मंदिरात' किंवा 'बहुत छळियलें' ही काही उदाहरणे. इतरही अनेक काव्यात अशी उदाहरणे सापडतात. तरीही कोंकणीच्या दाव्याचा झडझडून प्रतिवाद केला गेलेला नाहीय. शिवाय मराठीसंबंधीचा विकीलेख ढिसाळ, विस्कळित, योय ती माहिती न देणारा आणि चांगल्या इंग्लिशमध्ये न लिहिलेला वाटतो. या उलट कोंकणीवरच्या विकीलेखाची इंग्लिश भाषा उत्तम आहे आणि कोंकणीचे महत्त्व आणि प्राचीनता सिद्ध करताना किरकोळ मुद्देसुद्धा मोठे करून लिहिले आहेत. उत्तम भाषेमुळे ही वैगुण्ये आणि विरोधी मते वगळण्याचे कसब वाचकाच्या ध्यानात येत नाही. कोंकणीचा लेख समोर ठेवून त्यानुसार मराठीवरचा लेख पुनर्लेखित करण्याची गरज आहे. (अशी वेळ यावी हे खरे तर दुर्दैव कारण मराठीचा आवाका आणि पसारा कोंकणीपेक्षा खूपच मोठा आहे.)
मला कोंकणीविषयी अजिबात आकस नाही. उलट ती भाषा आवडते. ऐकताना गोड वाटते, शिवाय प्राचीन मराठीतील काही रूपे अजूनही कोंकणीत टिकून राहिल्याचे पाहून अचानक काही शोध लागल्याचे आश्चर्यमिश्रित समाधानही मिळते. पण केवळ भाषेच्या या जुन्या रूपांमुळे उद्या जर कोणी अन्यभाषक म्हणेल की ज्ञानेश्वरीची मराठी ही आमचीच मराठी, तर तो दावा जितका फोल असेल तसेच हेही आहे.
बाकी प्रकाशचित्रे छानच आहेत. मला वाटते 'मी मराठी'वर हा लेख आला होता, तेव्हा यावर लिहिले होते बहुतेक. शिवाय श्रावणबेळगोळ, गोम्मटेश्वर ही मूळ नामे कळली. मराठीत क्वचित श्रवणबेळगोळ, गोमटे/तेश्वर असे लिहिले जाते. गोम्मटराय हे चामुंडराय यांचेच नाव, म्हणून गोम्मटेश्वर; हे माहीत नव्हते. बाकी अज्जी, आत्ती/आत्ते अशी रूपे अन्यत्र ऐकली/वाचली आणि आपल्या लिखाणात इतरत्र वाचली होती आणि तो वापर आवडला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो दावा काहीही आणि उगीचच आहे. कोणा कोकणी फॅनॅटिक माणसाने केलेला दावा यापलीकडे त्याचे वट्ट महत्त्व नाही. कायम आयडेंटिटी क्रायसिसने ग्रस्त लोक्स आहेत हे. नेटवर यांपैकी काही लोकांशी झालेल्या इंटर अ‍ॅक्शनमधून हे मत कायम झालेले आहे. अगदी भाषाशास्त्र शिकलेले लोकही उगीच नको तितके पॅरानॉईड असतात.

शिवाय दुसरा एक मुद्दा म्ह. कोकणीभाषिक जैन लोक असे होते किती? तो चावुंडराय उगीच मजा म्हणून भर कर्नाटकी मुलुखात कशाला मराठी शिलालेख कोरवून घेईल जर मराठी जैनांची संख्या बर्‍यापैकी नसेल तर?

बायदवे kamat's potpourri या वेबसाईटवर तर ज्ञानेश्वरीदेखील कोकणी भाषेत लिहिलेली आहे असे म्हटलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गंगराजे राचमल्ल यांच्या शासित प्रदेशात जर बेळगाव, धारवाड, कारवार, विजापूर वगैरे मराठीभाषिक प्रदेश येत होता असेल तर ते वाक्य या मराठी/कोंकणी भाषकांच्या सोयीसाठी कानडीबरोबर मराठीतही आणि नागरी लिपीत कोरले गेलेले असू शकते.
जैन लोक हे श्रेष्ठीवर्गातले अधिक असल्यामुळे धनाची चणचण त्यांना नव्हतीच. त्यामुळे त्यांचे आर्किटेक्चर लोकसंख्येच्या विषम प्रमाणात अधिक आणि भव्य आहे.
बाकी सहमतच. 'पॅरानॉइड' या विशेषणाशी तर सहमतच सहमत. अधिकारक्षेत्र किंवा व्याप्तिक्षेत्र जितके संकुचित, तितकी अस्मिता अधिक आक्रमक, किंवा छोटेपणामुळे दुर्लक्षिले जाण्याचा धोका जाणवल्यामुळे अवास्तव दावे करून लक्ष्य वेधून घेण्याचा प्रकार असावा.
इंग्रजी विकीवरच्या मराठी भाषेच्या लेखात सुधारणा आवश्यक आहे आणि हे वाक्य मराठीच असल्याचे पुरावेही समाविष्ट व्हायला हवेत, तसेच मराठीच्या कालानुसार उत्क्रान्तीच्या अथवा बदलाच्या पायर्‍याही त्यात अवतरणांसह/निशी दर्शविल्या जाव्यात, की ज्यायोगे हा दावा आपोआपच पोकळ ठरेल; असे मनापासून वाटते.
आणि होय, ज्ञानेश्वरीवरही दावा सांगितला गेल्याचे ठाउक आहे. पण याचा प्रतिवाद मराठीच्या उत्क्रांतीच्या शास्त्रशुद्ध दर्शनातूनच होऊ शकेल. अस्मितेच्या आवेशातून नव्हे. हे वाक्य आपल्याला उद्देशून अर्थातच नाही. मराठीला 'अभिजात' दर्जा मिळवून देण्यासाठी जितके प्रयत्न झाले त्याच्या शतांशानेही प्रयत्न असे दावे खोडून काढण्यासाठी होत नाहीत. विकीवरचे लेखन किंवा त्यातला एखादा मुद्दा ही बाब किरकोळ आणि अनधिकृत म्हणून दुर्लक्ष्य करण्याजोगी राहिलेली नाही कारण तोच मुख्य स्रोत मानण्याचे प्रमाण वाढते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्णच सहमत. मध्ये मी तो विकी स्वतः एडिट केला होता पण त्यानंतर तो पुन्हा एडिट केला गेला. त्यामुळे हा खेळ किती वेळा करायचा असे वाटले. एखादा लेख लॉक केलेला नसेल तर असेच होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही केला होता का तो संपादित? संपादित केलेला पाहिला तेव्हा आनंद आणि आश्चर्य वाटले होते. पुनर्संपादित झाला तेव्हा आश्चर्य वाटून दु:ख झाले.
धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, मी एकदा तरी केला होता तो. बाकी नंतर कुणी प्रो-मराठी मजकुराने एडिट केला असल्यास कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख मला ठीक वाटला अशासाठी की या प्रसिद्ध ठिकाणाला बरेचजण भेट देऊन येतात आणि बरीच माहिती विकीवगैरेवर असतेच.काही नवीन म्हणून द्यावे तर तेही लोकांना ठावूक असते.मला तिथे काय दिसले ,जाणवले हे वाचायला आवडतं.
बाकी प्रसिद्ध /मान्यवर आमच्याच गावचो वगैरे ठरल्यानंतर मग तो वरच्या /खालच्या आळीचो इत्यादी नवा वाद /प्रतिष्ठा पणाला लागते.
बाकी त्या नावाचा चोर दरवडेखोर लफंगा निघाल्यास मात्र आमच्या गावचो नसा तो पलिकडचो हे आपोआपच सिद्ध होते त्यासाठी पुरावे लागत नाहीत.
बा रवळनाथा तुलाच काळजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अवांतर: श्रेणीपटावर बोट ठेवतांना चुकून "श्रेणी द्या"वर गेले आणि स्मार्टफोनने आपले काम चोख केले-'सर्वसाधारण' ही नाइलाजास्तव वैकल्पिक( =default ?) ही श्रेणी चिकटली पोस्टातल्या खळीसारखी नको तिथे. आता बदलता येत नाही.कृपया default श्रेणी चांगली ठेवा.)
तसे वट्टात इकडे श्रेणींना कोणी गर्दभ---घालतो इत्यादी वाचले आहे परंतू सोयीचा उपयोग करता आला नाही ही खंत वाटली.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे वट्टात इकडे श्रेणींना कोणी गर्दभ---घालतो इत्यादी वाचले आहे

कोणी कशाला, तो मीच!

बाकी राजा, फोटो मस्त आले आहेत. श्रवणबेळगोळला (आणि हळेबीड/ बेलूरलाही) पूर्वी जाणं झालं आहे. गोमटेश्वराची ती मूर्ती मनास भावली आले, तशीच तिथली स्वच्छता देखील!
पुढील भागाची वाट पाहतोय.
आणि हो, बर्‍याच दिवसांनंतर तुझं लिखाण बघूनही आनंद झाला.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाऊन आलोय! मस्तच!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0