सध्या काय वाचताय? - भाग १६

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========
कोणी मराठी पुस्तकांबद्दल लिहीले की मला नहमी वाटते त्यातील उतारे द्या. आम्हा मराठीची उपासमार असलेल्यांना वाचू द्यात Wink आज मी मराठी पुस्तकाचा परिचय लिहीते आहे, अन खूप उतारे देणार आहे. Stay Tuned.

"पारवा" - जी ए कुलकर्णी
.

.
.
कथांमधील, मृगजळाच्या मागे लागलेली दुर्गी, अन स्वतःच्या बहीणीचाच मित्र जाळ्यात ओढून खुशाल थेरं करणारी अन अतिशय माजोरी शकी, सरड्याच्या पावलांची काशी सर्व पात्रे आवडत आहेत असं नक्कीच म्हणता येणार नाही परंतु त्यांची दु:खे, व्यथा अन घुसमट खरं तर विषारी जीवने वाचताना, आपण कोणत्या हस्तिदंती मनोर्‍यात वावरतो असे वाटते.
शलॉट मधली सरड्याच्या पावलाची काशी तर एकदम चटका लावून जाते.
"काकणे" कथेतील भटांच्या बायकांची जीवनपद्धती अतिशय बारकाव्याने वर्णन केलेली आहे. आता कोणी म्हणेल त्यात "भटांच्या" हा उल्लेख करण्याचं कारण काय? तर कारण आहे- जेव्हा कावेरी घुमी घुमी बसून रहाते तेव्हा काकू म्हणतात - महाशिवरात्रीच्या चूलीसारखी बसलीये.
जेव्हा काकू अंगाचे मुटकुळे करुन पडलेल्या दिसतात तेव्हा कावेरीला त्यांना पाहून, मुटकुळे केलेल्या कदाची आठवण येते. या सार्‍या वर्णनात, सोन्याला मंगलधातू हा शब्द वापरला आहे. तर रेशीम इतके घरंदाज असावे की प्रकाश त्याचेवरुन सरकताना जरा काळ थांबावा.
जी ए, उपमा अन रुपके तर इतकी अनवट वापरतात जसे -
वडीलांचे शब्द ऐकून तिला, तिला स्वतःच्या अंगावर सरडे चढू - उतरु लागल्याचा भास होणे,
रस्ता पापड फुलल्यासारखा गजबजू लागणे,
आंधळ्या डोळ्याच्या खोबणीसारखी विहीर,
सुरकुत्या पडलेला, वाळक्या भोपळ्यासारखा चेहरा,
चिमण्यांच्या विटक्या प्रकाशाप्रमाणे तेथे बर्‍याच माणसांचे आयुष्य धुरकटत संपत होते,
माझ्याच ओट्यात सोन्याची माती झाली.

.
स्किझोफ्रेनिया (पुस्तकात तसा थेट उल्लेख नाही) झालेल्या बापूला जे काही दिसत असे त्याचे भयावह चित्रण येते - तो शून्य नजरेने वर पहात पडला होता. कडेपाटाच्या लाकडावर अनेक साप, वेडेवाकडे होऊन पळत होते, एकमेकात अडकत होते. त्यांच्यामध्ये डोहासारखे एक वर्तुळ होते, त्यावरील पांढरट डाग एखाद्या डोळ्याप्रमाणे दिसत होता. तो डोळा आपल्याकडे पहातो....मग आपला डोळा त्याच्याकडे पहातो मग पुन्हा तो डोळा आपल्याकडे पहातो, ही गंमत पाहून, बापू स्वतःशीच हसत होता.त्या डोहातले पाणी मधेच थरथरु लागले, त्याच्या लाटा पसरत खाली आल्या.बापूने हात उंचावून एका लाटेला हळूच स्पर्श केला, तिला चाकूची थंड धार होती.तो उठला व त्या लाटांच्या वर्तुळांना ढकलत स्वयंपाकघरापुढे आला. चालताना त्याची सावली, सावज हेरल्याप्रमाणे सावकाश सरकत होती. बापू तिच्याकडे तिरप्या नजरेने पहात होता.दरवाज्यातून आत शिरताना ती भिंतीवरुन पुढे येऊन आपल्याला धरणार असे त्याला वाटू लागले व त्याने टुण्णदिशी उंबर्‍यावरुन आत उडी घेतली. बाजूलाच व्हरांड्यात स्वयंपाकीण काकू रमाबाई शाल पांघरुन गाढ झोपल्या होत्या. त्यांच्या शालीचा रंग आमसोलासारखा होता. पाय दुमडून झोपलेल्या त्या आकृतीकडे पहाताच त्याच्या सार्‍या शिरा ताणल्यासारख्या झाल्या, डोक्यात एकदम गोळा येऊन, लालभडक फुटला. त्याचे अंग दिवटीसारखे पेटले. त्याने कोपर्‍यातली सोवळे घालण्याची काठी उचलली व तो रमाकाकूंवर ताड-ताड प्रहार करु लागला.
.
बलात्कार केल्यानंतर, मेस्त्री कावेरीला घराबाहेर ढकलून देतो अन दरवाजादेखील लाथेनेच लोटतो. त्यातील "देखील" शब्दाने काळीज अक्षरक्षः चरकते कारण "देखील" म्हणजे तो कावेरीला देखील लाथच घालतो. एकंदर त्या प्रसंगातील कावेरीची विटंबना काळजाला डागण्या देऊन जाते. असहाय, अगतिक, नियतीच्या भोवर्‍यात सापडलेले लोक, त्यांच्या मानसिकतेचे सूक्ष्म वर्णन अन अत्यंत चित्रमय भाषा.

___
अवांतर खरं तर पुस्तके बसमधून न्यायला आणायला, लहान नीटस पिशवी हवी आहे. अन इथे पाऊस असल्याने प्लास्टिकची उत्तम. आज खालील आकाराची, एक कापडी विकत घेणार आहे. योग्य त्या पिशवीशिवाय पुस्तक प्रवासात नेऊच नये असे वाटते. उगाच अक्षम्य हेळसांड करायची.

.
"पारवा" संग्रहातील "व्यथा" नावाची अत्युच्च कथा वाचली. वयाने वाढलेल्या मुलीचे लग्न होत नाही अन तिच्या पगारावर घर चालतय, गरीबी तर इतकी आहे की विरलेलं पातळ घ्यायला पैसा नाही, नवरा स्वप्नाळू वृत्तीचा अशा गांजलेल्या पण अतिशय मानी राधाबाई अक्षरक्षः चटका लावून जातात. अन किती प्रेम करतात त्या मुलीवर. "बाहुलीच्या गळ्यातील काळा मणी हरवला काय अन शाळेजवळ लंगडी शेळी दिसली काय" अशा लहानसहान गोष्टी भरभरुन आईला सांगणारी कालिंदी आता घुमी झाली, डोळ्याभोवती काळी वर्तुळं निर्माण झाली, कोपर्‍यात खंगून पडून रहाते अन मुलीचा हा अनावस्था कायापालट होण्याचं दुर्भाग्य नशीबी आलेल्या राधाबाईंचे हृदय तीळ्तीळ तुटते.
ही कथा मला सर्वात चटका लावून गेली. अक्षरक्षः बसमध्ये डोळ्यांना धारा लागतील असे वाटून गेले.
.
"निरोप" कथेतील म्रूत्युपश्चात विजुचा वावर अन त्या वावरात तिच्या मनात आलेले विचार - फार गूढ अन वेगळीच पण चटका लावणारी कहाणी आहे. त्यातील काही अंश पुढे -

स्वयंपाकघरात आल्यावर विजुच्या मनावरुन एकदम बरीच वर्षे गळून पडली. लोलकातून पाहील्याप्रमाणे, अगदी परिचित वस्तुभोवती हळूवार भावनेची शलाका तिला दिसू लागली. कशाची तरी उत्कटतेने वाट पहात असल्याप्रमाणे, स्वयंपाकघर जिवंत वाटत होते. एका बाजूला ठेवलेल्या देव्हार्‍यातील समईचा तृप्त प्रकाश तलम पणे ताटापाटांवर, भांड्यांवर, स्वच्छ सारवलेल्या चूलीवर पसरला होता आनि कोनाड्यात ठेवलेल्या गंध उगाळण्याच्या खोडामुळे त्याला नाजूक वासाचा स्पर्श झाला होता. जिन्याची एकेक पायरी उतरावी त्याप्रमाणे निरनिराळ्या वस्तूंनी विजूच्या आयुष्याची वर्षे कमी झाली. लहानपणी खास तिच्यासाठी घेतलेला चांदीची फुले असलेला हिरवा पाट तिथे उभा होता. त्याचा रंग कित्येक जागी उडालेला, चांदीची फुले किंचित झिजलेली; पण प्रामाणिकपणे आपला पाचपा़कळी आकार सांभाळून बसलेली ..... समईतील प्रकाशात देव्हार्‍यातील मूर्ती विश्रब्धपणे झळाळत होत्या. त्यातील चांदीच्या नागाची मूर्ती विजूने एकदा आईला नकळत आपल्या दप्तरात घालून शाळेतील मुलांना दाखवायला नेली होती. एका मूर्तीवर, मूठभर जाळ हातात घेऊन गोठवल्याप्रमाणे दिसणारे एक लालभडक द्राशाळाचे फूल होते. .......
.
जी एंच्या उपमा तर इतक्या अनवट अन वेगळ्याच असतात उदाहरणच द्यायचे झाले तर -
.
विजू मनाने माधववरती प्रेम करते अन लग्न अन्य कोणाशी होते. अन तिच्या मनात विचार येतो - माधव आता तुला माझी कधी आठवण होत असेल की नाही कुणास ठाऊक! पण मला मात्र सारं आठवतं. प्रेतावरील फुलाच्या गंधाप्रमाणे ते मला त्रस्त , उद्विग्न करतं.
.
"ऊभे गंध लावणारे, बसल्याबसल्या चंदनाचे खोड पाठीत घालणारे, स्वतः शेंगदाणे खात आपल्याकडून रामरक्षा म्हणवून घेणारे दादा तिला आठवेले आणि शांत , अबोल, पैठणीवरील कोयरीप्रमाणे वाटणारी वहीनी दिसली.

___________

जी एं चे सांजशकुन सुरु केले आहे. जर पारवा सामान्य लोकांच्या व्यथेबद्दल होते तर "सांजशकुन" मध्ये अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, गूढ, सत्याचा शोध आदि काही विषय जी एंनी हाताळले आहेत असे प्रथमदर्शनी वाटते. पैकी अनंत, अहम अन प्रसाद या गोष्टी वाचून झाल्या. सर्वच सरस आहेत. पण "अनंत" फारच आवडली विशेषतः मला कुंडलिनी योग मधील, सातापैकी ३ चक्रांशी ती रिलेट करता आली. अर्थात जी एं ना तसा अर्थ अभिप्रेत नसेलही. "प्रसाद" कथेतील खालील परिच्छेद आवडला. अन्य परिच्छेद येतीलच.

ते समोर झुडुप दिसते ना, तिथे भर पावसाळ्यात एक हिरवा दांडा उगवतो व त्यावर लाल सुगंधी जखमेप्रमाणे फुलांचा गुच्छ येतो. रात्री त्याचा वास पसरतो. तो वास येतोदेखील एखाद्या सरदाराच्या तालेवार दिमाखाने - इतरांना जिंकण्यासाठीच, नम्र करण्यासाठीच. त्यावेळी मात्र तू म्हणतोस तसे वाटते खरे.त्या स्त्रीला आपल्या रुपाचा गर्व असावा. तिच्यात अद्यापही थोडा प्रतिकार असावा. तिने हिर्‍यांची कर्णभूषणे घातलेली असावीत आणि तिचे डोळे - ते मात्र निळे नसावेत.निळे डोळे रिते , वेडसर वाटतात. हरीणीच्या मांडीवर सूर्यप्रकाश पडला की जो धुंद तपकिरी रंग दिसतो, तसे ते असावेत. आणि त्यातही ती असावी केवळ मादी. केवळ आपले उष्ण रक्त, मदिर शरीर यांच्या इशार्‍यांनी जगणारी; आत्मा, मन, पापपुण्य असल्या कोळिष्टिकांपासून स्वच्छ असलेली, एक निरंजन, केवळ स्त्री. - सांजशकुन (जी ए)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

'पंच' ह्या व्यंगचित्रांच्या मासिकातली निवडक व्यंगचित्र पहात वाचत आहे. आठराशे एक्केचाळीस मध्ये जेव्हा हे मासिक सुरू झालं तेव्हा पासूनची व्यंगचित्र पहाणं फारच रोचक आहे. एक चित्र आठराशे सत्तवन्न मधलं हे पहा :

काही चित्रांचे संदर्भ लागत नाहीत. बरीच चित्र आंतर जालावर आहेत असं दिसतय.
अलिकडे वसंत सरवट्यांची पुस्तके वाचली त्यात पंचबद्द्ल उल्लेख होता आणि त्यामुळे हे पुस्तक मिळताच वाचायला घेतलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हरिश्चंद्र थोरातांचा कादंबरीविषयी लेखसंग्रह वाचतेय. गौरी देशपांडे, नेमाडे, सारंग वगैरेंसारख्या अनेक लेखकांच्या कादंबर्‍यांवर समीक्षकीय लेख. बरेच नवीन पैलू जाणवले. प्रखर टीकेचा किंवा उपरोधाचा सूर न लावता संथ, विथ अ स्ट्रेट फेस म्हणावी अशा शैलीत बरेच काही सांगून जातात. गौरी देशपांड्यांच्या कादंबर्‍यांवरचा लेख अतिशय लांबला असला (आणि सगळेच काही पटले नसले तरी) आवडला. कोसलातील कालावकाशाच्या मांडणीचे विवेचन ही मार्मिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकावरही आहेत ते. माहिती असेलच पण जस्ट इन केस सांगावं म्हटलं. तिकडेही लिहीत असतात छोटेसे प्यारेग्राफ इ.इ. चांगले असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंट्रेष्टिंग. ऍडवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम" ही कविता महाजनांची कादंबरी वाचली. आवडली की नाही हे चट्कन कळेना. आवडणे/नावडणे या बायनरी कप्प्यांत एखादं लेखन बसवणं किती अवघड आहे हे जाणवलं. अधिक विचार करता जाणवलेलं खालीलप्रमाणे:

कादंबरीचे दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे पद्मजा सप्रे या अभिनेत्रीचं आत्मचरित्र + एकपात्री प्रयोग + मुक्तचिंतन. (हा भाग जनरली आवडला. या भागाविषयी अजून विचार करतो आहे, त्यामुळे नंतर कधीतरी.)

दुसरा भाग ***स्पॉयलर अलर्ट सुरू*** शेवटच्या पन्नास पानांचा आहे. त्यात कथेला एक वेगळाच टर्न दिला आहे. पद्मजा सप्रे तरूणपणीच मनोरुग्ण - स्किझोफ्रेनिक होते, स्वतःला थोर अभिनेत्री वगैरे समजू लागते. प्रसिद्ध अभिनेत्रींच्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याच आहेत असं मानते. स्किझोफ्रेनियाच्या भरात आईचा खून करते. मनोरुग्ण असल्याने शिक्षा होत नाही. एका मनोरुग्णालयात तिला आणून टाकलं जातं. तिथल्या एका डॉक्टरच्या सहृदयपणामुळे तिला लिहायला कागद-पेन दिलं जातं. ते जे लिखाण आहे, ते पहिल्या भागातलं आत्मचरित्र वगैरे.

ही वाचकाची शुद्ध फसवणूक आहे. समजा जे के रोलिंगने सातव्या पुस्तकाच्या शेवटच्या भागात लिहिलं असतं - "व्होल्डेमोर्टच्या वाँडच्या आवाजाने हॅरीला जाग आली. आन्ट पेटूनिया त्याच्या जिन्याखालच्या कपाटाचं दार खडखडावत होती. आळस देत हॅरी उठला. एका रात्रीत आपण केवढं मोठं, चित्रमय स्वप्न पाहिलं याची त्याला मौज वाटली. पण त्यात रंगून जायला त्याला वेळ नव्ह्ता. आन्ट पेटूनिया चिडायच्या आत त्याला डडलीसाठी नाश्ता बनवणं भाग होतं".

कसं वाटलं असतं? ***स्पॉयलर अलर्ट बंद***

नाय जमलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

स्पॉयलर अलर्टशी सहमत. मलाही पहिला भाग अतिशय आवडला. पण उत्तरार्धाबद्दल माझीही चिडचिड झाली:-

आधीची कल्पनेतली डायरी होती म्हणजे? ही शुद्ध हुलाहूल आहे. एकदा एखादं पात्र मनोरुग्ण आहे असं दाखवलं की बर्‍याच गुंतागुंती विनासायास संपतात. मग कुणीही काहीही वागावं नि बोलावं, स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी खतम. अनरिलाएबल नॅरेटर हे परिणामकारक तंत्र असू शकतं, पण ते वाट्टेल ते करायला वापरलं की त्यातली गंमत खलास होते. तसंच माझं त्या शेवटामुळे झालं. हेच तंत्र पुरेशी गुंतागुंत कायम ठेवून सुरुवातीपासून वापरलं असतं, तरी माझी तक्रार तितकीशी नसती, असं आता वाटतं आहे. संभ्रमात ठेवा, की हे खरं आहे की खोटं आहे - आणि मग आपापल्या मगदुरानुसार त्यांतलं अ‍ॅबसॉल्यूट सत्य आणि रिलेटिव सत्य तपासू द्यात. त्या संभ्रमांच्या ताना-पलट्यांतून निराळी गंमत निर्माण होईल. पण 'हे हे घडलं- आणि मग - नाहीच्च मुळी - फसवलं' हे काही परिणामकारक तंत्र नव्हे. निदान माझ्यावरचा तरी पहिल्या भागानं पडलेला प्रभाव नाहीसा झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हेच तंत्र पुरेशी गुंतागुंत कायम ठेवून सुरुवातीपासून वापरलं असतं, तरी माझी तक्रार तितकीशी नसती, असं आता वाटतं आहे. संभ्रमात ठेवा...

सहमत आहे. [संभ्रमात ठेवणं नीटसं जमलेलं नाही. तरी एकदोनदा शंका आली बरंका - "लंडनमधले हिरवेगार डोंगर" किंवा "ब्याण्णव हजार यूएस डॉलर्सची पर्स" (म्हणजे अठ्ठावन्न लाख झाले की हो!) - पण तितकं पुरेसं नाही.]

अजून एक बारीकसं निरीक्षणः श्री ना पेंडशांच्या कथनशैलीचा प्रभाव पद्मजा सप्रेच्या डायरीवर जाणवला. "...त्याचं मूळ इथे होतं" किंवा "...त्याचा उगम इथे होता." अशा वाक्यांतून तर जास्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हो, हो. एकदम सहमत. मलापण फसवणूक झाल्यासारखं वाटलं. पहिल्या भागात जे जे काय मांडलं आहे, त्याचं गांभीर्य आणि परिणामकारकता दुसर्‍या भागामुळे नाहीशी होते असं माझं मत झालं.

तसंच, लेखिकेचा कथन करण्यामागचा हेतू काय असावा असा गोंधळ दुसर्‍या भागामुळे निर्माण होतो. दोन भागांचे दोन वेगवेगळे हेतू आहेत, आणि ते एकमेकांशी असंबद्ध आहेत असं काहीसं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आनंदवनभुवनी लेखिका लीला गोळे, समर्थ रामदास हा विषय आहे पुस्तकाचा अतिशय अप्रतिम आहे पुस्तक.
तसेच
टिकलीएवढं तळं - निर्मला देशपांडे
पोहरा - ह. मो. मराठे
बाकी शुन्य - कमलेश वालावलकर
हीदेखील काही सुरेख पुस्तके आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही दिवसांपूर्वी नेमाड्यांची कोसला परत एकदा वाचली. मागच्या वेळेपेक्षा जास्त आवडली. त्यामुळे उत्सुकतेने 'बिढार' हा चांगदेव चतुष्टयाचा पहिला भाग मागवला होता. पुस्तक छान आहे. लेखक-प्रकाशक संबंध, साहित्यात क्रांतिकारक बदल घडवण्याची मनीषा बाळगणारे व वेगवेगळी मॅगझिने चालवणारे मित्र, कम्युनिष्ट मित्र, चांगदेवचे आजारपण, मुंबईची आवड तरीही ती सोडण्याची इच्छा हे सगळेच रोचक आहे. बिढार आवडल्याने आता हूल, जरीला, झूल हे पुढचे भाग मागवले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुसलमान

कहते हैं वे विपत्ति की तरह आए
कहते हैं वे प्रदूषण की तरह फैले
वे व्याधि थे

ब्राह्मण कहते थे वे मलेच्छ थे

वे मुसलमान थे

उन्होंने अपने घोड़े सिन्धु में उतारे
और पुकारते रहे हिन्दू! हिन्दू!! हिन्दू!!!

बड़ी जाति को उन्होंने बड़ा नाम दिया
नदी का नाम दिया

वे हर गहरी और अविरल नदी को
पार करना चाहते थे

वे मुसलमान थे लेकिन वे भी
यदि कबीर की समझदारी का सहारा लिया जाए तो
हिन्दुओं की तरह पैदा होते थे

उनके पास बड़ी-बड़ी कहानियाँ थीं
चलने की
ठहरने की
पिटने की
और मृत्यु की

प्रतिपक्षी के ख़ून में घुटनों तक
और अपने ख़ून में कन्धों तक
वे डूबे होते थे
उनकी मुट्ठियों में घोड़ों की लगामें
और म्यानों में सभ्यता के
नक्शे होते थे

न! मृत्यु के लिए नहीं
वे मृत्यु के लिए युद्ध नहीं लड़ते थे

वे मुसलमान थे

वे फ़ारस से आए
तूरान से आए
समरकन्द, फ़रग़ना, सीस्तान से आए
तुर्किस्तान से आए

वे बहुत दूर से आए
फिर भी वे पृथ्वी के ही कुछ हिस्सों से आए
वे आए क्योंकि वे आ सकते थे

वे मुसलमान थे

वे मुसलमान थे कि या ख़ुदा उनकी शक्लें
आदमियों से मिलती थीं हूबहू
हूबहू

वे महत्त्वपूर्ण अप्रवासी थे
क्योंकि उनके पास दुख की स्मृतियां थीं

वे घोड़ों के साथ सोते थे
और चट्टानों पर वीर्य बिख़ेर देते थे
निर्माण के लिए वे बेचैन थे

वे मुसलमान थे

यदि सच को सच की तरह कहा जा सकता है
तो सच को सच की तरह सुना जाना चाहिए

कि वे प्रायः इस तरह होते थे
कि प्रायः पता ही नहीं लगता था
कि वे मुसलमान थे या नहीं थे

वे मुसलमान थे

वे न होते तो लखनऊ न होता
आधा इलाहाबाद न होता
मेहराबें न होतीं, गुम्बद न होता
आदाब न होता

मीर मक़दूम मोमिन न होते
शबाना न होती

वे न होते तो उपमहाद्वीप के संगीत को सुननेवाला ख़ुसरो न होता
वे न होते तो पूरे देश के गुस्से से बेचैन होनेवाला कबीर न होता
वे न होते तो भारतीय उपमहाद्वीप के दुख को कहनेवाला ग़ालिब न होता

मुसलमान न होते तो अट्ठारह सौ सत्तावन न होता

वे थे तो चचा हसन थे
वे थे तो पतंगों से रंगीन होते आसमान थे
वे मुसलमान थे

वे मुसलमान थे और हिन्दुस्तान में थे
और उनके रिश्तेदार पाकिस्तान में थे

वे सोचते थे कि काश वे एक बार पाकिस्तान जा सकते
वे सोचते थे और सोचकर डरते थे

इमरान ख़ान को देखकर वे ख़ुश होते थे
वे ख़ुश होते थे और ख़ुश होकर डरते थे

वे जितना पी०ए०सी० के सिपाही से डरते थे
उतना ही राम से
वे मुरादाबाद से डरते थे

वे मेरठ से डरते थे
वे भागलपुर से डरते थे
वे अकड़ते थे लेकिन डरते थे

वे पवित्र रंगों से डरते थे
वे अपने मुसलमान होने से डरते थे

वे फ़िलीस्तीनी नहीं थे लेकिन अपने घर को लेकर घर में
देश को लेकर देश में
ख़ुद को लेकर आश्वस्त नहीं थे

वे उखड़ा-उखड़ा राग-द्वेष थे
वे मुसलमान थे

वे कपड़े बुनते थे
वे कपड़े सिलते थे
वे ताले बनाते थे
वे बक्से बनाते थे
उनके श्रम की आवाज़ें
पूरे शहर में गूँजती रहती थीं

वे शहर के बाहर रहते थे

वे मुसलमान थे लेकिन दमिश्क उनका शहर नहीं था
वे मुसलमान थे अरब का पैट्रोल उनका नहीं था
वे दज़ला का नहीं यमुना का पानी पीते थे

वे मुसलमान थे

वे मुसलमान थे इसलिए बचके निकलते थे
वे मुसलमान थे इसलिए कुछ कहते थे तो हिचकते थे
देश के ज़्यादातर अख़बार यह कहते थे
कि मुसलमान के कारण ही कर्फ़्यू लगते हैं
कर्फ़्यू लगते थे और एक के बाद दूसरे हादसे की
ख़बरें आती थीं

उनकी औरतें
बिना दहाड़ मारे पछाड़ें खाती थीं
बच्चे दीवारों से चिपके रहते थे
वे मुसलमान थे

वे मुसलमान थे इसलिए
जंग लगे तालों की तरह वे खुलते नहीं थे

वे अगर पाँच बार नमाज़ पढ़ते थे
तो उससे कई गुना ज़्यादा बार
सिर पटकते थे
वे मुसलमान थे

वे पूछना चाहते थे कि इस लालकिले का हम क्या करें
वे पूछना चाहते थे कि इस हुमायूं के मक़बरे का हम क्या करें
हम क्या करें इस मस्जिद का जिसका नाम
कुव्वत-उल-इस्लाम है

इस्लाम की ताक़त है

अदरक की तरह वे बहुत कड़वे थे
वे मुसलमान थे

वे सोचते थे कि कहीं और चले जाएँ
लेकिन नहीं जा सकते थे
वे सोचते थे यहीं रह जाएँ
तो नहीं रह सकते थे
वे आधा जिबह बकरे की तरह तकलीफ़ के झटके महसूस करते थे

वे मुसलमान थे इसलिए
तूफ़ान में फंसे जहाज़ के मुसाफ़िरों की तरह
एक दूसरे को भींचे रहते थे

कुछ लोगों ने यह बहस चलाई थी कि
उन्हें फेंका जाए तो

किस समुद्र में फेंका जाए
बहस यह थी
कि उन्हें धकेला जाए
तो किस पहाड़ से धकेला जाए

वे मुसलमान थे लेकिन वे चींटियां नहीं थे
वे मुसलमान थे वे चूजे नहीं थे

सावधान!
सिन्धु के दक्षिण में
सैंकड़ों सालों की नागरिकता के बाद
मिट्टी के ढेले नहीं थे वे

वे चट्टान और ऊन की तरह सच थे
वे सिन्धु और हिन्दुकुश की तरह सच थे
सच को जिस तरह भी समझा जा सकता हो
उस तरह वे सच थे
वे सभ्यता का अनिवार्य नियम थे

वे मुसलमान थे अफ़वाह नहीं थे

वे मुसलमान थे
वे मुसलमान थे
वे मुसलमान थे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
फ़ासिस्ट
मैंने कहा कि आप फ़ासिस्ट हैं
तो उसने कहा कि वह मनुष्य है

मैंने कहा कि आप फ़ासिस्ट हैं
तो उसने कहा कि वह जनप्रतिनिधि है

मैंने कहा कि आप फ़ासिस्ट हैं
तो उसने कहा कि उसके पास आधार-कार्ड है

मैंने कहा कि आप फ़ासिस्ट हैं
तो उसने कहा कि वह शाकाहारी है

मैंने कहा कि आप फ़ासिस्ट हैं
तो उसने कहा कि मुद्दा विकास है

(मैंने बिनास सुना)

मैंने कहा कि आप फ़ासिस्ट हैं
तो उसने कहा कि उसके पास तीस फ़ीसदी का बहुमत है
सत्तर फ़ीसदी के अल्पमत की तुलना में

मैंने कहा कि आप फ़ासिस्ट हैं तो उसने कहा कि
गांधी को हमने नहीं मारा हममें से किसी ने उन पर गोली चला दी

मैंने कहा कि आप फ़ासिस्ट हैं
तो उसने कहा कि अब जो कुछ हैं हमीं हैं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कविताकोश वर जाऊन "मुसलमान" या विषयावरच्या कविता वाचून आले. पैकी काही आवडल्या त्यातली वरच्या दोन्ही येतात.
एका ब्लॉगवरती जाऊन पहील्या कवितेबद्दलची काही टिपणं वाचली. त्यात त्यांनी लिहीलेले २ मुद्दे कळले. पैकी पहीला पटला अन दुसरा पटला नाही.
.
मुद्दा १-

उन्होंने अपने घोड़े सिन्धु में उतारे
और पुकारते रहे हिन्दू! हिन्दू!! हिन्दू!!!
बड़ी जाति को उन्होंने बड़ा नाम दिया
नदी का नाम दिया

.
त्या ब्लॉगवर म्हटले आहे की- मुसलमानांनी नाव फक्त नदीला दिले. त्यांनी "हिंदू" जातीस काही नाव दिले नाही. खरं काय ते इतिहासकारच जाणतात परंतु माझ्याही माहीतीत मुसलमानांनी हिंदूंचे नामकरण केले असे वाचनात नाही. तरी वरील कडव्याला "पोएटिक लायसन्स" म्हणता येइल.
_________
मुद्दा२-

मीर मक़दूम मोमिन न होते
शबाना न होती
वे न होते तो उपमहाद्वीप के संगीत को सुननेवाला ख़ुसरो न होता
वे न होते तो पूरे देश के गुस्से से बेचैन होनेवाला कबीर न होता
वे न होते तो भारतीय उपमहाद्वीप के दुख को कहनेवाला ग़ालिब न होता

त्या ब्लॉगमध्ये या ओळींवर असा आक्षेप घेतला आहे की "मोमीन, गालिब, आमीर खुस्रो" वगैरे मंडळी मुसलमान होते म्हणून आली नाहीत तर त्या त्या सामाजिक्/आर्थिक परिस्थितीतून ते जन्मास आले.
मला तो आक्षेप नीट पटला नाही. कारण कदाचित कविला "मुसलमान" कौममधील बुद्धीमान, कलाकार, निर्मितीक्षम उदाहरणे द्यायची असावीत म्हणून ते कडवे आले असावे.
__________
एकंदर कविता फारच छान आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुसलमान न होते तो अट्ठारह सौ सत्तावन न होता

राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे हे मुसलमान होते ही नवीन माहिती कळाली. धन्यवाद!

(आता लगेच- नेमकी एक ओळ धरून उगाळण्याचा आरोप होईलच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'अगर शिवाजी ना होते तो सुनति होती सब की'च्याच पठडीतले वाक्य म्हणून वाचायचे, नि सोडून द्यायचे झाले.

कोणाला - बोले तो कोणालाही - स्वतःबद्दल बरे वाटण्यासाठी (ही बादवे एक मूलभूत मानवी गरज असावी.) अशा कल्पनांचा आधार घ्यावा लागत असेल - घ्यावासा वाटत असेल - तर त्याच्या/तिच्या त्या आनंदाच्या आड आपण का यावे, नाही का?

राहता राहिली गोष्ट अठराशे सत्तावन्नकरिता मुसलमानांच्या (किंवा, फॉर द्याट म्याटर, हिंदूंच्या) अनिवार्यतेची.

(१) मला वाटते त्या बंडाचा/उठावाचा/स्वातंत्र्यसमराचा/तुम्ही-त्याला-जे-काही-म्हणत-असाल-त्याचा नाममात्र (किंवा हवे तर उभारलेला म्हणा.) का होईना, पण नेता (वाटले तर म्होरक्या म्हणा.) बहादुरशाह ज़फ़र होता, जो मुघल तथा मुसलमान होता. तत्त्वतः मला वाटते त्याच्या नावाने ही सर्व मारामारी चालू होती. बहुधा या बाबीकडे प्रस्तुत काव्यपंक्तीचा (फॉर व्हॉटेवर इट मे बी वर्थ) रोख असावासे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(२) अनिवार्यतेबद्दलच बोलायचे झाले, तर १८५७ होण्याकरिता जर एकमेव कोणती बाजू अनिवार्य असेलच, तर ती माझ्या मते इंग्रजांची. बाकी मुसलमान काय किंवा हिंदू काय, यांच्यापैकी कोणतीही एक बाजू बाय इटसेल्फ अनिवार्य होतीच, असे म्हणता येईलसे वाटत नाही. बोले तो, पैकी कोणतीही एक बाजू नसती, तरी फारसा फरक पडला असता, असे वाटत नाही. (मात्र, पैकी किमान एक बाजू असणे बहुधा अनिवार्य असावे. नाहीतर इंग्रज तिच्यामारी लढणार कोणाशी?)

(३) राहता राहिली गोष्ट श्री. ब.शा. ज़फ़र यांच्या नेतृत्वाची.

आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीबद्दल असे म्हटले जाते, की त्या निवडणुकीत श्रीमती इंदिरा गांधींविरुद्ध एखादा टेलिफोनचा खांब जरी उभा केला असता, तरी तो खांब सहज निवडून आला असता. माहौलच तसा होता.

तद्वत, श्री. ब.शा. ज़फ़र यांच्या अनुपस्थितीत बंडखोरांनी/क्रांतिकारकांनी/स्वातंत्र्ययोद्ध्यांनी/त्यांना-तुम्ही-जे-काही-म्हणत-असाल-त्यांनी एखादा टेलिफोनचा खांब उभा करण्याकरिता अलेक्झाण्डर ग्र्याहम बेलसाहेबाच्या जन्माची वाट खचितच पाहिली नसती, असा अंदाज आहे. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ख़तरे में इस्लाम नहीं
ख़तरा है जरदारों को
गिरती हुई दीवारों को
सदियों के बीमारों को
ख़तरे में इस्लाम नहीं

सारी जमीं को घेरे हुए हैं आख़िर चंद घराने क्यों
नाम नबी का लेने वाले उल्फ़त से बेगाने क्यों

ख़तरा है खूंखारों को
रंग बिरंगी कारों को
अमरीका के प्यारों को
ख़तरे में इस्लाम नहीं

आज हमारे नारों से लज़ी है बया ऐवानों में
बिक न सकेंगे हसरतों अमों ऊँची सजी दुकानों में

ख़तरा है बटमारों को
मग़रिब के बाज़ारों को
चोरों को मक्कारों को
ख़तरे में इस्लाम नहीं

अम्न का परचम लेकर उठो हर इंसाँ से प्यार करो
अपना तो मंशूर1 है ‘जालिब’ सारे जहाँ से प्यार करो

ख़तरा है दरबारों को
शाहों के ग़मख़ारों को
नव्वाबों ग़द्दारों को
ख़तरे में इस्लाम नहीं
1. घोषणा पत्र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

लेखक व सिनेदिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी ब्लॉग चालू केला आहे. त्यावरचा पहिला लेख 'प्रकरण' वाचला. 'माहेर'च्या २०१३च्या दिवाळी अंकात तो पूर्वी प्रकाशित झाला होता. जोडपी, सहजीवन, लफडी (उर्फ अफेअर्स किंवा प्रकरणं) वगैरेंकडे पाहण्याचा दृष्टिकोन रोचक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरे वा, कुंडलकर इंट्रेष्टिंग आहे. शिवाय हा लेखही वाचला नव्हता, म्हणून उत्सुकतेनं गेले. इंट्रिष्टिंग आहेच. पण मधेच 'अफेअर कशाला म्हणायचं? याच्याइतकं फेअर दुसरं काय आहे?' हा पाडगावकरी वळसा वाचून एकदम विरस झाला. मग पुढचं सगळं पुनरावृत्त वाटायला लागलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छानच! लेख चांगला आहे पण...
-- लांबी बरीच जास्त आहे, काही गोष्टींचे पाल्हाळ वाटते.
-- ब्लॉगचा लुक- फिल अगदीच प्राथमिक आहे. फिकट आहे, निर्जीव वाटतो. कुंडलकरांकडून डोळ्यांना अधिक सुखकर ब्लॉगची अपेक्षा होती.
-- काही टंकनदोषही जाणवले उदा.

एकमेकांना काही वेगळ्या जाणिवांची तेजस्वी करत असतात.

म्हणजे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://www.maayboli.com/node/54017 इथे चर्चा चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेम या विषयावरचे "युनिव्हर्सल थिअरीज" मांडणारे लेख वाचायचा अतिशय कंटाळा येतो. फक्त लेखकाच्या स्वतःच्या कॅलिडोस्कोप मधून दिसणारे कवडसे आवडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दी गोल्डफिंच नामक पुस्तक वाचते आहे. खूप महिन्यांनी एखाद्या गोष्ट असलेल्या पुस्तकात खेचले गेल्याचा अनुभव घेतला. प्रचंड गडबडीत असतानाही थोडी पाने - आणि मग आणि थोडी पाने. करता करता एकदम पहाट. घात झाला घात! - असे करत पुस्तक पुढे सरकत जावे, हे खूपच दिवसांनी अनुभवले.

गोष्ट एका प्रसिद्ध-थोर-महामूल्यवान इत्यादी चित्राभोवती फिरते. मला चित्रकलेतले ओ-की-ठो कळत नाही. पण त्या पुस्तकाने चित्र, चित्रप्रेमींचे विश्व, रसिक-समीक्षक-विक्रेते-ठग या तपशिलांचे जे काही सुरेख जिवंत वर्णन केले आहे, त्याने मला अजिबात परक्यासारखे वाटू दिले नाही. सुरुवातीला एका लहान मुलाच्या नजरेतून गोष्ट दिसत असते. चित्राच्या साथीने आणि साक्षीने त्या मुलाच्या आयुष्याची जी काही फरफट होते, तिच्यासोबत आपणही खेचले जातो. त्याच्यासोबत कडवट निबर होत वाढत राहतो.

आता मी अखेरच्या टप्प्यात आहे. इतके दिवस वाढवून ठेवलेल्या अपेक्षा शेवटाने उद्ध्वस्त होऊ नयेत, अशी नियतीपाशी प्रार्थना आहे! पण ते काही झाले, तरी या लेखिकेची उरलेली दोन पुस्तकेही मिळवून वाचीनच.

मागे कधीसे जंतूंनीही याबद्दल लिहिले होतेसे वाचल्याचे आठवते. आता पुस्तक पुरे झाल्यावर तो लेख पुन्हा वाचून पाहिला पाहिजे.

***

पुस्तक अतिशय आवडले. शेवटामुळे रसभंग वगैरे झाला नाही. जंतू म्हणतात तशी सुविचारवजा वाक्ये आहेत खरी. पण ते पुस्तक वाचताना जाणवले नाही. लेख वाचल्यावर जाणवले. हे पुस्तकाचे यश किंवा माझा भोटपणा, यांपैकी काहीही असू शकेल. त्याच लेखिकेचे 'दी लिटिल फ्रेंड' हे पुस्तक लगेच वाचायला घेतले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्टिफन किंगच 'मिस्टर मर्सिडीज' वाचतेय. सोफारसोगुड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचे थोर न्येते अमिताव घोष यांचं "फ्लड ऑफ फायर" गेल्या बुधवारी प्रकाशित झालं.

कादंबरीचा शेवट "ओपन एंडेड" आहे. कादंबरी संपते त्या बिंदूपासून त्या पात्रांच्या आयुष्यात जे घडतं तेही कादंबरीइतकंच रोचक असू शकतं. पण हा काही कादंबरीचा दोष नव्हे. ("तुंबाडचे खोत" बद्दलही मला नेहेमी असंच वाटतं.)

मुख्य सलाम आहे तो अमिताव घोषच्या रिसर्चला. अत्यंत अभ्यासपूर्ण कादंबरी. अमिताव उत्कृष्ट स्टोरीटेलर आहे. पण याचा अर्थ वाचकांना कथेत गुंगवून तपशिलांकडे दुर्लक्ष करायचं असा होत नाही, हे शिकाय मिळालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सचिन कुंडलकरच्या ब्लॉगवर दोन नवे लेख आले आहेत. एक आत्महत्येच्या प्रयत्नाविषयी आहे. स्वतःकडे पाहणं मूलतःच आत्ममग्न असतं हे गृहितच आहे; तरीही स्वतःबद्दलचा एक नितळ दृष्टिकोन त्यात दिसतो. दुसरा लेख तेंडुलकरांच्या मृत्यूनंतरचा आहे. एका मोठ्या लेखकाच्या मृत्यूच्या निमित्तानं सद्य परिस्थितीत लेखकाचं काय होतं ह्याविषयीचं चिंतन त्यात आहे. दोन्ही लेख रोचक वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

My Soul is A Witness: African-American Women's Spirituality

या पुस्तकात एक अतिशय प्रभावी कविता आहे.Dolores Kendrick यांची "Hattie on the Block." यातील Hattie या आफ्रिकन-अमेरिकन स्त्रीस लीलावाकरता उभे केलेले आहे. बरोबर तिची मुलगी Carrie ही आहे. अन आता प्रसंग असा आहे की एक तर दोघींना कोणीतरी एकत्र विकत घेइल किंवा थोडे पैसे वाचविण्याकरता कोणी ग्राहक फक्त हॅटी ला किंवा कॅरी ला वेगवेगळे विकत घेतील. अर्थात या ताटातूटीच्या आशंकेमुळे मुलगी अगदी रडकुंडीला आलेली आहे. अन ही कविता हे हॅटीच्या मनातील विचार व तिचे मुलीस समजाविणे याचे द्वंद्व आहे.
हॅटी मुलीला समजावते आहे की रडू नकोस त्या (माकडांना) तुझे अश्रू दाखवू नकोस, पराभूत होऊ नकोस. माझा झगा घट्ट धर बाळा, मग भलेही तो का फाटेना पण त्यांना तुझे अश्रू दाखवू नकोस.
मधेमधे तिला शंका येते की मुलीला ताप आहे का? अन मग ती कल्पना करते की तो ताप तिला हॅटीला स्वतःला होइल अन मग जो ग्राहक हॅटीला विकत घेइल त्या ग्राहकाला व पूर्ण कुटुंबाला होइल अन त्यांचा वंशविच्छेद होइल. -

Carrie you be still now, don't make no noise
mama will protect you
from all shoutin' and screamin'
.
Still Carrie be still child don't cry
don't let them see you cry, honey
there is a victory in that.
keep the tears inward outtaa their sight

अन हे समजावत असताना तिच्या मनात किती प्रक्षोभ अन वेदना उचंबळून येताहेत त्याचे विलक्षण चित्रण या कवितेत आहे. तिच्या मनात येते आहे की मी भलेही गुलाम असेन, तुमच्याकरता एक बाजारु वस्तु असेन पण माझ्याजवळ फिरकू नका. माझं मन तर तुम्ही विकत घेऊ शकत नाही अन जर माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलत तर मी देखील कुचकामी होइन, अधू अपंग होऊन जाइन-

Happens that I be a slave woman,
may be that makes me property,
not a human being at all
.
Don't come near me! Stay away!
I am not buyable yet,
I am a bit unleavened
.
Souls can't be bought,
I won't be much of use to anybody
who buys me without my Carrie here
I will be crippled , needing crutches
.
when you bought me without my Carrie
for a few dollars cheaper
No, don't I beg you, don't touch me!
Stay back, I can't leave this block

ती मुलीला सांगते -

We be sold, but we ain't bought."

खरं तिचा प्रक्षोभ अन वेदना त्या कवितेच्या माध्यमातून = कमीत कमी शब्दात इतक्या कौशल्याने मांडल्या आहेत. हेलावून टाकते ती कविता. मला इथे ती पूर्ण कविता द्यायची इच्छा आहे. पण न जाणो कॉपीराइट्चा भंग होइल. पण खालील दुव्यावरती पान २७-२९ ही कविता वाचता येईल.
https://books.google.com/books?id=sHWo85uY7TkC&pg=PR7&lpg=PR7&dq=hattie+...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम परिणामकारक आहे कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पहीली कविता माया अँजेलु यांची आहे कारण त्या इंग्रजी साहीत्यातील एक प्रातिनिधिक आफ्रिकन-अमेरीकन कवि आहेत. त्यांची कविता ही छान आहे. विशेषतः हे कडवं चटका लावतं -

She heard the names,
swirling ribbons in the wind of history:
nigger, nigger bitch, heifer,
mammy, property, creature, ape, baboon,
whore, hot tail, thing, it.
She said, But my description cannot
fit your tongue, for
I have a certain way of being in this world,

.
and I shall not, I shall not be moved.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे माझ्या पिकासावरुन पेस्ट करतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.washingtonpost.com/local/obituaries/dolores-kendrick-washing...

"Still, Carrie, be still, child. Don't cry," Ms. Kendrick wrote in "Hattie on the Block," about a mother and daughter who are nearly separated as they're sold into slavery:

See. They finished the biddin'. Money
be paid. We's together, God heard my
haltin' words through the ears of these
deafened people; you an' me from this strange
pulpit. Look lively, child. We be sold,
but we ain't bought.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्युत गोडबोले यांचं प्रचंड गाजलेलं 'मुसाफिर' एकदाचं वाचते आहे.

पुस्तकाचा ऐवज तसा बरा आहे. आय. आय. टी. मधले किस्से, थोरामोठ्यांच्या ओळखी, शास्त्रीय संगीत, वाचन, डाव्या चळवळी, संकटं, कर्तृत्व.... हे सगळं तसं नवी माहिती म्हणून रंजक आहे. पण त्या मजकुरात शैलीदारपणा अजिबात नाही. शैली नसणं हीदेखील एक शैली असू शकते हे मान्य. पण तेही इथे नाही. सतत मोठाली नावं घेत राहणं, अमुक गरीब कुटुंबातला / म.व. कुटुंबातला तमुक, आयायटीच्या या वर्गातला तमुक - आता मोठ्ठ्या पदावर / मोठ्ठा लेखक / मोठ्ठा श्रीमंत आहे असं सतत सांगत राहणं, 'मी किती बावळट, नि मेहनती, नि तर्री तसा प्रामाणिक' याचा कंटाळा येतो.

झालंच तर - '१५० हून जास्त वेळा कामानिमित्त जगप्रवास' हे आणि अशीच इतर स्वप्रेमानं भारलेली कर्तबगारी सांगणारा बायोडेटा पुस्तकाच्या सुरुवातीला देण्याचं काय बरं कारण? गोडबोल्यांच्या पुस्तकांची लोकप्रियता आणि त्यांचा 'विकी'पणा याबद्दल ऐकलं होतं, पण मुदलात पुस्तक वाचलं नव्हतं. ते एकदाचं घडलं, इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अच्युत गोडबोल्यांबरोबर प्रत्यक्ष काम केलेले काही लोक भेटले आहेत / मित्र आहेत. त्यांच्या अनुभवाप्रमाणे ते एकदम astute व्यावसायिक आहेत. बायोडेटागिरी हाही त्याचाच भाग असू शकतो, असा मी समज करून घेतला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

असेल बॉ. पण मला ते जाम विनोदी वाटलं. उद्या माझी एक मैत्रीण तिच्या कवितांच्या ब्लॉगवर लिहू लागली - कामानिमित्त १६८ वेळा भारतभ्रमण - तर तिच्या कविता वाचणार्‍या माणसाला त्यातून काय बोध होणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदीच टुच्चे पुस्तक आहे, असे माझे मत आहे.
आणि त्यातले टीम मॅनेजमेंट चे बालिश फंडे वाचुन तर जाम बोर होते.

त्यांची मनात आणि अर्थात ही पुस्तके तर आजिबात वाचू नयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे विशिष्ट पुस्तक वाचलेले नसल्याकारणाने त्याबद्दल काही म्हणणे नाही, परंतु एकंदरीत अगदीच टुच्चा इसम आहे, असे प्रामाणिक वैयक्तिक मत आहे.

आणि हो, 'चक्क' या शब्दाचा ओव्हरवापर करतो.

त्याचे कोठलेच पुस्तक अजिबात वाचू नये, हे (त्याची जी काही एकदोन पुस्तके नजरेखालून गेलेली आहेत, त्यांच्या आधारावर) म्हणू शकतो. त्यापेक्षा मनोहर पर्रीकराची बडबड ऐकावी. तितकीच करमणूक होते, आणि त्याकरिता (पुस्तक विकत आणण्यासाठी) एक छदामसुद्धा खर्च करावा लागत नाही.

..........

या इसमाचे - किंवा फॉर द्याट म्याटर चेतन भगतचेसुद्धा - एकही पुस्तक मी स्वतःची दमडी खर्च करून वाचलेले नाही. श्वशुर अधूनमधून काहीबाही धाडतात, आणि वर त्याच्यावर अत्यंत भाळून - बोले तो, अच्युत गोडबोल्यावर; चेतन भगतवर नव्हे. - त्याची तोंडभरून स्तुती करतात नि त्याच्या पुस्तकातील उतारे नि प्रसंग वेळीअवेळी उद्धृत करतात. अंगावरून झुरळ गेल्यासारखे वाटते.१अ तर ते एक असो.

१अ हे वाक्य - सहज गंमत म्हणून - 'अंगावरून चक्क झुरळ गेल्यासारखे वाटते' असे वाचून पाहावे. आणि दर दोनतीन वाक्यांमागे - किंवा परिच्छेदामागे दोनतीनदा - असे होऊ लागले, तर वाचकाचे काय होईल, याची कल्पना करून पाहावी. वाचकाची पातळी ही एक तर फडतूसाची नाहीतर अगदीच एखाद्या मतिमंद बालकाची असावी, अशा थाटात हा मनुष्य लिहितो, असे काहीसे इंप्रेशन या इसमाचे जे काही थोडेफार वाचलेले आहे, त्यावरून होते. किंवा, आपल्याला वाचकाच्या पातळीवर जाता येत नसेल, तर वाचकाला आपल्या पातळीवर आणावे, असाही काही उदात्त हेतू असेल त्यामागे कदाचित, कोण जाणे. पण एकंदरीत, 'पठ्ठ्या' आणि 'चक्क' या शब्दांच्या वापराकरिता उलटे टांगून मिरच्यांच्या धुरीची शिक्षा भादंवित लागू केली पाहिजे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंगावरून झुरळ गेल्यासारखे वाटते.

झुरळांची बदनामी थांबवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

अच्युत गोडबोले साहेब एक जुन २०१५ ला ठाणे ग्रंथ संग्रहालयात प्रवचन द्यायला आले होते. पुस्तकात असे लिहिणारा माणूस प्रत्यक्षात देखील असेच बोलतो काय हीच जिज्ञासा ह्या कार्यक्रमास हजर राहण्यामागे होती मात्र दुर्दैवाने ऐनवेळी जायला जमले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यातल्या 'अक्षरधारा' या पुस्तकांच्या दुकानात पुस्तक खरेदी केली. सध्या तिथे ५०,२५,१० टक्के सवलतीत पुस्तकांचे प्रदर्शन चालू आहे (ते कधी पर्यंत आहे वगैरे मी पाहिले नाही.). त्यात श्री. दा. पानवलकरांचे चार कथा संग्रह मिळाले. त्यातला 'सूर्य' नावाचा संग्रह वाचते आहे. चिं. त्र्यं खानोलकरांच्या कथांची या कथा वाचताना आठवण होते आहे. विजय तेंडुलकरांच्या लेखनात पानवलकरांचे कौतुक वाचले होते तेव्हापासून वाचायचे ठरवले होते ते आता जमले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ललित लेखन एकुणात बदनाम. रिपोर्ताज प्रकारात वा 'वा, शरीरा! किती तू छान! तुझे आभारच मानले पाहिजेत की...'छाप लिखाणात गणपती पाडणार्‍यांची काही कमतरता नाही. तसल्यांचीच कृपा. एलकुंचवारांसारख्या कुणाचं लेखन वाचलं की ती बदनामी थोडा काळ निष्प्राण होते.

आज कुंडलकराच्या ब्लॉगवरचं नवीन पोस्ट वाचून तसंच वाटलं. लेख पूर्वप्रकाशित आणि पूर्वी वाचलेलाही आहे. तरीही विलक्षण ताजं करणारा लेख आहे असं पुन्हा वाचताना जाणवलं. मनात येतील ते विचार कोणताही संस्कार न करता सलग मांडले जाताहेत आणि त्यांत एक लय आहे, काहीएक आकार सांधला जातो आहे, एक मूड तयार होतो आहे, असं अगदी क्वचित होतं.

या माणसानं फार लिहिता कामा नये. क्वचित आणि थोडंच लिहावं, नाहीतर याचाही होईल छापाचा गणपती, अशी भीती वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नामांकित फोटोग्राफर सतीश पाकणीकरांचं 'भिंगलीला' नावाचं पुस्तक वाचायला घेतले आहे. फोटोग्राफी या विषयावर एकुणातच मराठीत पुस्तकं कमी आहेत. या पुस्तकात एकुणच फोटोग्रफीच्या तांत्रिक आणि कलात्मक प्रवासाचा आढावा घेतला आहे. सध्या तरी वाचताना चांगलं वाटतंय. संपूर्ण फीडब्याक पुस्तक वाचून झाल्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'रास' हे सुमा करंदीकरांचं आत्मचरित्र वाचतोय.
बर्‍यापैकी साधं नी थेट लेखन आहे. आत्मस्तुतीला लज्जा नाही नी नाव घेऊन केलेल्या परनिंदेला मज्जावही! आवडतंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुमा करंदीकर कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विंदांच्या पत्नी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

चुकून "कोण सुमा करंदीकर? धन्यवाद." असे लिहिणार होतो तेवढ्यात लक्षात आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'अमुकचे स्वातंत्र्य' हे शशांक ओक यांचं पुस्तक वाचलं.

'अंतर्वक्र'सारख्या शब्दाचा 'अंतर्मुख'ऐवजी केलेला वापर वाचून एकदम चमकलं. मग सगळ्या पुस्तकभर तीक्ष्ण, व्याकुळ, काळ्या विनोदाची छाया जाणवत राहिली. डोक्याला शॉट लागतो आहे, पण पुस्तक तर संपल्याखेरीज बाजूला ठेवता येत नाही, अशी अवर्णनीय गोची होऊन, पुस्तक तत्काळ संपवलं.

या प्रकारचं - या प्रकाराला अस्तित्ववादी प्रश्नांबद्दलचं पुस्तक म्हणतात म्हणे - हे मराठीतलं एकमात्र पुस्तक नव्हे. त्यामुळे वाचता वाचता डोक्यात होणारी तुलना अपरिहार्य होती. 'कोसला', 'चांगदेव चतुष्टय', 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर', 'बाकी शून्य' या सगळ्या पुस्तकांची आठवण आली. पण सरतेशेवटी मला ते सर्वाधिक जवळचं वाटलं, ते 'कोबाल्ट ब्लू' या सचिन कुंडलकरच्या पुस्तकाला. 'कोबाल्ट ब्लू'मधून मराठीत समलैंगिकता थेटपणे आली, म्हणून 'कोबाल्ट ब्लू' म्हटल्यावर चर्चेचा ओघ त्याच दिशेनं वळतो. पण त्याचं अप्रूप / धक्का ओसरला की त्यातली घुसमटवणारी सामाजिक-कौटुंबिक-राजकीय चौकट दिसायला लागते. त्या चौकटीला धडका देत, तिला नाकारत-क्वचित शरणागत होऊन स्वीकारत, सतत बंडखोरीच्या पवित्र्यात त्यातली पात्रं वावरताना दिसतात. तसंच इथल्या अमुकचं आहे.

बदलतं सामाजित वास्तव ('आपल्या नकळत इथे काही स्ट्रक्चर्स उभी राहताहेत-वाढताहेत आणि आपल्याला हवी असोत वा नको असोत, ती आहेत आणि राहणारही आहेत, आपल्याला त्यांच्यासकट असण्यावाचून गत्यंतर नाही' अशा आशयाचं अमुकच्या तोंडचं भयचकित वाक्य. आणीबाणीच्या तोंडावर असलेल्या काळात घडणारं हे पुस्तक. त्यातलं हे निरीक्षण. आज-आत्ताही चपखलपणे लागू असलेलं. वाचून अंगावर एकदम काटा आला होता), धुमसती बंडखोरी, स्थैर्याची गरज, लैंगिक आकर्षणं आणि सामाजिक-कौटुंबिक-धार्मिक-शैक्षणिक चौकटींचं असह्य दडपण.

विचित्र पद्धतीनं आकर्षक पुस्तक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'खिडक्या अर्ध्या उघड्या' हे गणेश मतकरींचं पुस्तक वाचलं.

एकमेकांशी संबंधित असणार्‍या पात्रांच्या स्वतंत्र, 'शेवट नसलेल्या' कथा. एकत्रित वाचल्या, तर कादंबरी या लेबलाखाली जाऊ शकेल असं मोठा आवाका असलेलं लेखन. असा त्याचा घाट आहे.

आपल्याला - जालावरच्या बहुतांशी मराठी जनतेला - स्वतःला मध्यमवर्गीय असं संबोधून घेण्याची सवय आणि/किंवा आवड आहे. हे गेल्या वीस वर्षांपूर्वी खरं असलंही असतं. पण तूर्तास घरटी किमान एखादं तरी यांत्रिक वाहन, माणसागणिक एक वा दोन स्मार्टफोन्स, इंटरनेटचं सतत हाताशी असणं आणि बहुतांशी सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची समृद्धी असताना आपण मध्यमवर्गात नाही, श्रीमंत जनतेत मोडतो हे सत्य आहे. गणेशच्या कथा या वर्गातल्या लोकांच्या आयुष्याबद्दलच्या आहेत. त्यातही कमीअधिक सत्ता आणि श्रीमंती उपभोगणारे वर्ग आहेतच. पण त्याच्या कथांमधल्या लोकांना पोटाची भ्रांत पडलेली नाही. तशीच सर्वसामान्य 'म.म.व.' लोकांना ज्या नातेसंबंधांच्या आणि तथाकथित संस्कृतिरक्षणाच्या घोळात अडकून पडायला आवडतं, त्या प्रकारच्या फिक्शनी प्रश्नांचीही त्यांना काही पडलेली नाही. ते लोक तुमच्याआमच्यासारखे अधिक पैसे मिळवू बघतात, त्यात इतरांवर होणार्‍या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अन्यायाकडे लक्ष वेधलं गेलंच तर क्षणमात्र व्यथित झाल्यासारखं करतात, मग ती टोचणी झटकून 'पुढे' जाण्यासाठी जे योग्य असतं ते करतात, सिनेमे आणि पुस्तकं बघतात वा बघत नाहीत, पण टॉरेण्टवरून डाउनलोडवतात, हापिसात-धंद्यात जिवाचं रान आणि सर्वथैव राजकारण करतात, या सगळ्यांतून जे वेळाचे तुकडे मिळतील त्यात नाती, माणसं, भवताल, समाज - वगैरे जमेल तसं बसवतात आणि मग कान-डोळे मिटून घेतात. ही माणसं वाईट नाहीत. थोरही नाहीत. ती तुमच्याआमच्यासारखी आहेत.

हे तुमच्याआमच्या जगाचं प्रतिबिंब दाखवण्याचं काम या गोष्टींना साधलं आहे हा त्यांचा सगळ्यांत मोठा गुण आहे. पण म्हणून, पुस्तक पूर्णतः दोषमुक्त नाही. त्यांतला काही भाग - काही पात्रांची मनोगतं - काहीसा कृतक, बळंच घडवलेला, लेखकाला आतून ठाऊक नसलेला, जाणवतो.

या पुस्तकावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांमध्ये त्यांतली मिंग्लिश भाषा हा एक मुख्य मुद्दा होता. त्याबद्दल मतमतांतरं असू शकतात. पण निदान या गोष्टीतल्या पात्रांचा विचार करता ती भाषा स्वाभाविक आहे असं माझं मत झालं. अर्थात, संवादांमध्ये मिंग्लिश सढळ हस्ते वापरणं आणि निवेदकानं तटस्थ-अस्सल मराठीचा वापर करणं हा एक मार्ग होताच. पण इथे लेखकानं तसं केलेलं दिसत नाही. तसं केलं असतं, तर हे पुस्तक अधिक ताशीव, गंभीर, जिवंत झालं असतं का, हा मला पडलेला एक इंट्रेष्टिंग प्रश्न आहे. त्या संदर्भात मनाशी आलेली एक तुलना बोलून दाखवल्याशिवाय राहवत नाही. शांता गोखलेंचं 'त्या वर्षी' हे गोष्ट म्हणून आणि मांडणी म्हणूनही अधिक चिरेबंदी, सरस, गंभीर, तीव्र पुस्तक आहे हे मान्यच आहे. पण गोष्टीच्या घाटामुळे आणि त्यातल्या पात्रांच्या समकालीनपणामुळे मला काही पातळ्यांवर तरी 'त्या वर्षी'ची आठवण झाली. दोहोंच्या दर्जामध्ये असलेला फरक भाषेच्या या वापरामुळे किती असावा, असा प्रश्न काही काळ तरी डोक्यात घुमत राहील..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खेळघर वाचलं. आवडलं.
विचार करण्यासारखं आहे. पण अशी व्यवस्था असेल तर ती माझ्यासारख्यांच्यासाठी नाही एवढे नक्की.

घटनाक्रम जरा फिल्मी आहे.
डाव्या विचारसरणीचा गडद प्रभाव आहेच. म्हणजे वाईट असे नाही पण कधी कधी एकांगी होत जाते.
प्रयोग करून पाहूच्या नंतर त्यातले सगळेच लोक फार जास्त भाबडे होत जातात. खूप जास्त एकसारखा विचार करायला लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

अगदी अगदी. इतका एकसारखा विचार, की हे सगळे जण लेखकच आहेत की काय, असं वाटतं. परीकथेची संकल्पना (किंवा आराखडा किंवा सांगाडा) म्हणून छान आहे. पुढे काही कामच केलेलं नाही, असं वाटतं. ना व्यक्तिरेखांवर, ना भाषेवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

"खेळघर " कोणी लिहिलय ?

पण अशी व्यवस्था असेल तर ती माझ्यासारख्यांच्यासाठी नाही एवढे नक्की.

कशाबद्द्ल आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखक - रविंद्र रूक्मिणी पंढरीनाथ

युटोपियन आयडीया आहे गाव संकल्पनेची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

'अखेरचा रामराम' हे राम पटवर्धनांनी अनुवादित केलेलं पुस्तक वाचलं. '९:१५ टु फ्रीडम' या मार्टिन फियालालिखित पुस्तकाचं ते भाषांतर आहे. प्रथामावृत्ती १९५५ आणि द्वितियावृत्ती आत्ता पटवर्धनांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त प्रकाशित झालेली.

साम्यवादी झेकोस्लेवाकियातून जर्मनीत पळून जाण्याच्या एका कटाची ही गोष्ट आहे. गोष्ट तशी चांगली आहे. एकदा घेतल्यावर पुस्तक संपेस्तोवर ठेवता येत नाही, अशी चित्तवेधक आहे आणि अगदी छोटेखानी आहे. साम्यवादी दडपशाही राजवटींबद्दलची काही चमकदार वाक्यं लक्षात राहून जातात. "भांडवलशाहीत माणूस कोणत्याही परिस्थितीत प्रथम विचार करतो तो 'यात माझा काय फायदा?' असा. अगदी स्वार्थी. तर साम्यवादी राजवटीत 'यात समोरच्याचा काय बरं फायदा असेल?' असा संशयी आणि अगदी 'नि:स्वार्थी' विचार माणसाच्या मनात आधी येतो!" हा असाच एक मासला.

या प्रकारच्या राजवटी केवळ चित्रपट आणि पुस्तकांतूनच पाहिलेल्या असल्यामुळे त्यांतली भेदकता काही पोचली नाही. माझ्यासाठी ती नुसतीच एक चित्तथरारक कथा राहिली. अर्थात हा काही पुस्तकाचा दोष नव्हे, वा भाषांतराचाही. पण पुस्तक किंवा त्याचं भाषांतर प्रचंड थोर-मैलाचा दगड-लक्ष्यवेधी असंही नव्हे. 'दी इयर्लिंग'च्या अनुवादामुळे पटवर्धनांनी केलेला अनुवाद म्हणताक्षणी पुस्तक उचललं गेलं आणि ते इंट्रेष्टिंग होतं, इतकाच गंमतीचा भाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला हवं आहे हे पुस्तक. कुठे मिळेल ? त्यांचं 'पाडस' फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तिथून घेतोय विकत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ठाण्याच्या मॅजेस्टिकमध्ये मिळालं. नोंदणी न करता. म्हणजे कुठेही सहज उपलब्ध असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धन्यवाद ! आजच बघतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेडरमधले फोटो कॉम्प्रेस करून टाकता येतील का? किंवा थंबनेल्स?
बाफ लोड व्हायला अतिप्रचंड वेळ लागतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

अं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काही चुकलं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

नाही नाही! मला आधी कळलंच नव्हतं तू नक्की कोणत्या फोटोंबद्दल बोलते आहेस. बहुधा तू हेडर असा शब्द वापरल्यामुळे. मग माबोप्रणित बाफ वापरल्यामुळे अजूनच गोंधळ झाला. असो. आता कळलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद नीधप अन चिंंता. मी यापुढे लक्षात ठेवेन. हे माहीत नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

ललित म्हणजे काय

लेख आवडला. महत्त्वाचा मुद्दा - ललित लेखनाची व्याख्या जे लिहिलं जातंय त्याला अनुसरून विस्तारली पाहिजे - एकदम पटला. विदा बघून व्याख्या ठरवायला पाहिजे. आधी व्याख्या ठरवायची आणि विदाचं रेट्रोफिटिंग करायचं याला काय अर्थ?

प्रथितयश संपादकांना ललित विभागात लिहिण्यासाठी चांगलं लेखन मिळत नाही म्हणे. खरंच?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

१क्यु८४ वाचुन झाल्यावर मुराकामीचे दुसरे कोणते पुस्तक वाचावे असे विचार करताना 'काफ्का ऑन शोअर' दिसले. पुस्तकाचे नावही आवडुनच गेले. परंतु पुस्तक तितकेच आवडले असे काही म्हणता येणार नाही. ५०० पानी पुस्तकामध्ये पहिली २०० पाने वाचताना इंटरेस्ट राहतो. पण जसे जसे पुढे जाउ तसे तसे कोणत्याच प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत. जी उपकथानके सुरुवातीला येतात त्यांचा शेवट कसा झाला हेच कळत नाही. काही उपकथानके तर पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये सुरु केली जातात.
त्यामुळे हे पुस्तक सुरुवातीला जरी खुप आवडले असले तरी जेव्हा संपवले तेव्हा अनेक प्रश्न अनुत्तरित होते आणि इंटरेस्ट पण कमी झाला होता.
मुराकामीच्या म्हणण्यानुसार दुसरयांदा पुस्तक वाचले तर अजुन गोष्टी कळतील, अनुत्तरित प्रश्नांचे उत्तर मिळतील. पण मला माहिती नाही मी वाचेन की नाही ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख वाचला.

http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-nativism-by-dr-50497...

अतिशय काँप्रिहेन्सिव्ह आणि जबराट लेख. इतका व्यापक लेख खूप दिवसांनी वाचला. कसब्यांची पुस्तकं वाचायला लागतात आता.

नेमाडेआजोबाको खुंदल खुंदल के, भगा भगा के मारे यारो. पढनाइच होना देखो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान आहे लेख. पटला बर्‍यापैकी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

यग्झाक्टली.

आता यावर नेमाडे काय उत्तर देतात ते पाहणे रोचक ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नेमाडेंच्या विचारधारेचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुद्दे पटण्यासारखे आहेत पण नेमाडेंवरची वैयक्तीक टिका टाळता येऊ शकली असती. त्यामुळे लेखकानेच म्हटल्याप्रमाणे लेख "साहित्यिक राजकारणाची चर्चा" असा काहिसा वाटला. असो, नेमाडे नेहमीप्रमाणे प्रतिवाद करणार नाहीत. (हे पण लेखात मधे कुठेतरी येतं).
उत्तम लेख शेअर केल्याबद्धल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैयक्तिक टीका झाली कारण त्यांच्या कादंबर्‍यांत व्यक्त केलेल्या पात्रांच्या विचारांची समीक्षा करताना ते येतंच, सबब तो भाग इथे अप्रस्तुत वाटत नाही. रादर निवळ वैयक्तिक काही बोलल्याने ती मीमांसा रद्दबातल होते असे मानणार्‍यांपैकी मी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रावसाहेब कसब्यांनी नेमाड्यांवरची सगळी 'भडास' एकाच लेखात काढलेली दिसते! लेखाचा बराच भाग नेमाडे कसे ढोंगी/ भंपक आहेत यावरच खर्चलाय. त्याएवजी त्यांना नेमाड्यांच्या 'देशीवादाची' अजून पिसे काढता आली असती. लेख जबरदस्त आहेच पण नेमाडेंवर बेछूट आणि अशास्त्रीय विधानांचा आरोप लावताना कसबेही तशीच कांही विधानं करताना दिसताहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

>> लेख जबरदस्त आहेच पण नेमाडेंवर बेछूट आणि अशास्त्रीय विधानांचा आरोप लावताना कसबेही तशीच कांही विधानं करताना दिसताहेत! <<

उदाहरणार्थ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

‘भारतात सर्वांना मिळून सारखा इतिहास आहे’ हे त्यांचे वाक्य अकरावी-बारावीतले विद्यार्थी वाचून हसतील. समान इतिहास आणि समान स्मृती हा ‘राष्ट्र’निर्मितीतील एक प्रमुख घटक असतो. भारत त्याच्या इतिहासात आधुनिक राष्ट्रसंकल्पनेच्या दृष्टीने कधीच राष्ट्र बनू शकले नाही, याचे एक कारण समान इतिहास आणि समान स्मृतींचा अभाव आहे,

हे वाक्य अर्धसत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णन केलेली 'डीप कल्चरल युनिटी' आहेच ना!

प्रतिवाद करण्यासाठी सक्षम आणि गतिमान असावे लागते. नेमाडे यांच्यात ही सक्षमता आणि गतिमानता असेल का, याबद्दल मला शंका आहे.

आता हे पण जरा बेधडकच झाले की!

सावरकरांनी जेव्हा हिंदू राष्ट्रवादाची व्याख्या-
‘असिंधु सिंधुपर्यंत यस्य भारतभूमिका।
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः।।’
अशी केली, तेव्हा गोळवलकर गुरुजी प्रचंड संतापले.

घटनेचा पुरावा?

गोळवलकर-सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद ब्राह्मण वर्ग वर्चस्वावर आधारित आहे, हे स्पष्ट आहे.

ही अनेकांची लाडकी संकल्पना असली तरी खरी असेलच असे नाही. (ऐसीच्या दिवाळी अंकातील द्वादशीवारांची मुलाखत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

तुम्हाला कसब्यांची विधानं बेछूट का वाटली ह्याची संगती आता मला लागली. Smile असो. ह्यावर प्रतिवाद करायची सध्या इच्छा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'नांगी असलेले फुलपाखरू' वाचतोय.
मागे सुदर्शनच्या रिंगणात यातील एका लेखाचा संक्षेप 'ऐकला' होता तेव्हापासून या पुस्तकाची ओढ लागली होती.
पहिले दोन त्पशीलवार निबंधवाचून "अहाहा! फिलिंग" आलंय!

कुरुंदकरांहून वेगळी निबंध लेखनाची शैली - काहिशी मिश्कील + खवचट वाक्यांची पेरणी करणारी - तरीही मुद्देसुद नी पूर्णतः वेगळ्या विषयांवरची ही वैचारीक मेजवानी आहे! खूपच आवडतंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुस्तक 'आउट ऑफ प्रिंट' आहे ना? कुठून मिळालं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

होय म्हणूनच वाचायचे हिल्लक होते. मी मैत्रिणीकडून उधारीवर मिळवलंय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

https://kundalkar.wordpress.com/2015/06/16/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%95%E...

अशक्य मजा आलेली आहे! कुंडलकर रॉक्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे अगदी अवांतर आहे. लेखात वाक्य आहे.

म्हणजे सर्व कुटुंबाला मिळून एकच गोष्टं घेतली जात असे . एकच फोन , एकच टीव्ही ,आणि घरात फ्रीजसुद्धा एकच असे.

समाजाच्या काही भागात माणशी एक फ्रीज असतो का? आजवर असे कधी पाहण्यात आले नाही. वाक्याचा टोन 'एकच फोन, एकच टीव्ही (ते ठीक आहे), आणि घरात फ्रीजसुद्धा एकच असे. (पण फ्रीजही एकच? हे म्हणजे काहीतरीच!)' असा काहीसा वाटल्याने अजूनच गंमत/आश्चर्य वाटले. (मागील वाक्यातील कंसातील शब्द माझे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडा काव्यशास्त्रविनोद हो... त्यामुळे गंमत वाटायची परवानगी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जबरदस्त लेख आहे. अगदी फुल्ल आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांना माहित असलेल्या गोष्टी परत सांगण्यात 'रॉकिंग' काय आहे ते समजलं नाही. शिवाय कुंडलकरांकडे सेकंड ह्यांड लाल वॉकमन होता, सध्या आयपॉड आहे आणि त्यांचा बाप बेवडा होता या माहितीपलीकडे नवीन असं काहीच हाती लागलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही जणांना उपरोध हा अलंकार आवडतो अहो. बाकी तुम्ही कागदाच्या पिना काढून कागद परत करणार्‍या गांधीजींसारखी तुम्हांला उपयुक्त होती ती माहिती मिळवलीतच लेखातून! आहे किनाई विनविन? बाकी तुम्हांला रॉकिंग हा शब्द इतका का लागावा, ते मला समजलं नाही. पण असो. मलाही त्यातून तुमच्याविषयी थोडी नवी माहिती मिळालीच. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अहो, आम्ही एकुणात तुमच्या इथल्या प्रतिसादांमुळे तुमच्या साहित्यविषयक जाणीवांबद्दल नितांत आदर बाळगतो. म्हणून तुम्हाला रॉकिंग वगैरे वाटलेला पोस्ट वाचला तर त्यात विशेष काहीच दिसलं नाही (ना शैली, ना मजकूर, ना मुद्दे) म्हणून असा प्रतिसाद दिला. बाकी उपरोधाची कणी जास्त पडल्याने प्रतिसाद कदाचित खारट लागला असावा हे नंतर जाणवलं. पण ते एक असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नका हो नका, नका अशा आदराबिदराच्या नजरेतून पाहू. मला आपलं म्हणा.

गंमत अलाहिदा. गंभीरपणे: मला शैली आणि मुद्दे दोन्हीही अतिशय दिलचस्प वाटले. त्या शैलीत विलक्षण तिरकसपणा आहे. इथे तर झालीच, पण मला बरेचदा कुंडलकरांचं लेखन वाचताना (सिनेमे बघतानाही उदा. 'हॅपी जर्नी'मधला चित्रा पालेकरांचे सीन.) आळेकरांची आठवण होते. त्याच ठरीव चाकोरीकडे इतक्या निराळ्याच कोनातून बघतात हे लोक, की त्यातल्या विसंगती दिसायला लागून हसायला येतं. या विशिष्ट पोस्टमधले सुरुवातीचे काही परिच्छेद तर कहर आहेत. शिवणाच्या मशीनला मिठी मारून रडणार्‍या मुली. मुंग्या येतील इतकं गोग्गोड वागणं. कपाटा-सायकलींना बांधलेली गोंड्याची फुलं. हे सगळं मराठी समाजात (निदान काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी) अगदी अंगभूत असंच होतं. इतकं, की 'असंच असतं, असंच करायचं असतं' अशी स्वाभाविक प्रतिक्रिया होऊन त्यातल्या गंमतीला कुणी हसतबिसत नसे. आताही गोष्टी बदललेल्या असल्या, तरी आपल्यापैकी बर्‍याच जणांना साहित्यात आणि सिनेमानाटकांत मात्र या (किंवा तत्सम) विशिष्ट गोष्टी घडताना पाहिल्याशिवाय पुरेसं नैतिक-मराठी-घरच्यासारखं वाटत नाही. त्यावर या लेखनात नेमकं आणि खोचकपणे बोट ठेवलं आहे असं मला वाटलं. म्हणून 'रॉकिंग'.

बाकी खारटपणाचं असू द्या. मला मीठ थोऽडं पुढे आवडतं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला मीठ थोऽडं पुढे आवडतं.

असे कुठल्या ठिकाणच्या बोलीभाषेत म्हटले जाते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठाण्या-मुंबईचं पाणी चढलेल्या मूळच्या कोकणस्थी मराठी बोलीभाषेत. 'पुढे आलेलं' हा अजून योग्य आणि विस्तृत प्रयोग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>त्या शैलीत विलक्षण तिरकसपणा आहे.
विलक्षण वगैरे नाही वाटला पण तिरकसपणा मान्य. पण ज्या मूळ मुद्द्याकडे तो तिरकसपणा घेऊन जातो, तो मुद्दच मुळात पकड घेत नाही त्यामुळे वाचनाअंती विलक्षण केएल्पैड्य येते (श्रेयअव्हेरः ब्याट्म्यान).

सबब, मॅडमजी, लेख २००९ मध्ये पूर्वप्रकाशित झालेला आहे, याचे ग्रेस मार्क देऊनही लेख माझ्यादॄष्टीने जेमतेम ३५% पर्यंतच पोहोचतो. शिवाय मी ४०%ला पाशिंगवाल्या कोर्सला शिकल्याने इतरांच्या लेखी तो लेख जरी पास असला तरी माझ्या लेखी केटीला गेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्द्याशी पूर्ण सहमत.

तदुपरि केएल्पैड्य या शब्दाचे जनक आहेत रा० रा० अमुकचन्द्ररावजीसो|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चला, म्हणजे आदर बाद, नितांत तर राहूच द्या; एवढीच खरी कमाई तर! असो, कमी नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नुकतेच हे वाचले. आदर काही बादबीद झालेला नाही, उलट वाढलाच्चे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टीपोकल लोअर मिडीलक्लास बालपणाच्या नॉस्टालजियातुन लेखक अजुनही बाहेर पडला नाहीये. ह्यात नविन असे काहीच नाहीये. सध्या ४०-५० च्या वयोगटातल्या सर्वांचे थोड्याफार फरकानी हेच अनुभव असतात. लोकांना काही विशेष लिहीण्यासारखे नसताना लिहावेसे का वाटते हेच कळत नाही. मित्रमैत्रीणीत बोलायला हे ठीक आहे पण पब्लिक फोरम मधे लिहायचे असेल तर काही दर्जा आणी नाविन्य नको काय? कोणा तरी माणसाच्या ५० वर्षा पूर्वीच्या भाकीता प्रमाणे स्वस्त आणि मुबलक उपलब्ध असणारी अभिव्यक्तीच्या साधनांनी age of mediocrity आलेले आहे गेली काही वर्षे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण पब्लिक फोरम मधे लिहायचे असेल तर काही दर्जा आणी नाविन्य नको काय?

कुंडलकरचा लेख मलाही काय लै थोर वगैरे आजिबात वाटला नाही. सेम ओल्ड पुणेरी मध्यमवर्गीय केंद्रित शिट. पण पब्लिक फोरम इ. बद्दल म्हणालात म्हणून सांगतो, तो त्याचा ब्लॉग आहे. तो तिथे काहीही लिहू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पब्लिक फोरम इ. बद्दल म्हणालात म्हणून सांगतो, तो त्याचा ब्लॉग आहे. तो तिथे काहीही लिहू शकतो.

मान्य ना. पण ह्या मिडीयाच्या स्फोटामुळे आणि त्यातल्या निव्वळ फुकटेपणा मुळे तुमच्याच शब्दाप्रमाणे "काहीही" लिहणे शक्य झाले आहे. हे "काहीही" च मला त्रासदायक वाटतय. पूर्वी अगदी टुच्ची मासिके असायची ( अजुन असतात ) पण ती वाचायची तर दोन दिडक्या तरी मोजायला लागायच्या. छापणार्‍याला पण आर्थिक रिस्क घेउन छापायला लागायचे.

इथे ब्लॉग वाचायला ( आणि लिहायला ) पैसे पडायला लागले तर कीती जणं वाचतील असले ब्लॉग?
मी तेच लिहीले आहे की ह्या फुकट आणि सोप्प्या पद्धतीने अभिव्यक्ती करणे शक्य झाल्यामुळे सुमार गोष्टीच घडत आहेत आणि त्या सुमार गोष्टींनाच "रॉक्स" वगैरे म्हणले जात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या फुकट आणि सोप्प्या पद्धतीने अभिव्यक्ती करणे शक्य झाल्यामुळे सुमार गोष्टीच घडत आहेत

अगदी खरंय! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुमचा उपहास माझ्या साठी असेल तर Smile तुमची गाडी चुकली आहे.

माझे स्वताचे लिहीणे मला स्वतालाच वाचवत नाही त्यामुळे मी प्रयत्न करत नाही. प्रतिक्रीया देणे हे मित्रमैत्रीणीत कट्ट्यावर बोलण्यासारखे आहे. तेव्हडेच मी करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा उपहास माझ्या साठी असेल तर (स्माईल)

ट्रोलाच्या मनात उपहास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वैयक्तिक कमेंट आणि आचारविचार लिंक आठवून अं.ह. झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनुरावांनी जाहिर लिहिले आहे की त्या ट्रोलिंग करतात. तेव्हा त्यांना ट्रोल म्हणणे व्यक्तिगत कमेंट मी मानत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनुरावांनी जाहिर लिहिले आहे की त्या ट्रोलिंग करतात

मी असे कुठे लिहीले आहे ते आठवत नाही ( लिहीलेही असेल ). मला अजुन ट्रोलिंग चा नक्की अर्थ कळला नाहीये. एक मात्र नक्की मी इथे टाइमपास साठी येते. कधी कधी माहीती मधे ( ज्ञानात नाही ) भर पडते. वयाची इतकी वर्ष झाल्यामुळे नविन विचार वगैरे कळत नाहीत.
कधी कधी गवि, गब्बर आणि क्वचित बॅट्या आणि इतरही लोकांकडुन काही माहीतीत भर पडते, त्याची मजा वाटते.
आणि टाइमपास साठीच येत असल्यामुळे विकांताला अजिबात फिरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक पातळ्यांवरती रोचक प्रतिसाद आहे. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Wealth of information creates poverty of attention. तेव्हा चिंता नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तेच लिहीले आहे की ह्या फुकट आणि सोप्प्या पद्धतीने अभिव्यक्ती करणे शक्य झाल्यामुळे सुमार गोष्टीच घडत आहेत आणि त्या सुमार गोष्टींनाच "रॉक्स" वगैरे म्हणले जात आहे.

फुकट अन सोप्या पद्धतीमुळे ए प्लस प्लस ग्रेडचा कंटेंटही फुकटात पाहता येतो तर गाळही पाहता येणारच. तेव्हा गाळ आहे, गाळ आहे म्हणून त्याला गालिप्रदान करण्यापेक्षा सर्व दर्ज्याच्या गोष्टी फुकटात पाहता येतात हे मला जस्त महत्त्वाचं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घे एक मार्मिक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Awesome ह्या शब्दाचा अर्थ गेल्या शतकात किती बदललाय हे सगळ्यांना माहितीच असावं.
त्यामु़ळे रॉक्स- जो मुळातच फारसा awesome नव्हता -, त्याचा वापर काहिशा ढिलाईने केला तर सुमारांपर्यंत क्यू जाने का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> टीपोकल लोअर मिडीलक्लास बालपणाच्या नॉस्टालजियातुन लेखक अजुनही बाहेर पडला नाहीये. <<

म्हणजे काय? मला तर सचिन कुंडलकरच्या लिखाणात त्या बालपणीच्या गोष्टींविषयी नॉस्टॅल्जिया नाही तर उलट त्यांची खिल्ली उडवलेली अनेकदा दिसते. आणि स्वतःच्या बालपणच्या संस्कृतीविषयी खिल्ली उडवणारे लोक टिपिकल म्हणवता येतील एवढे संख्येनं प्रबळही दिसत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विली नेल्सन हा कन्ट्री सिंगर आहे हे माहीतही नव्हतं पण हे मुखपृष्ठ एकदम स्ट्राइक झालं अन हे पुस्तक बार्न्स & नोबल्स मध्ये चाळलं. रोचक वाटलं. प्रामाणिक आहेच पण शैली खूप आवडली.

पहील्या पानावरचे नेल्सन यांचे हे मनोगतच एकदम मंत्रमुग्ध करुन गेले.

What I say is that this is the story of my life, told as clear as a Texas sky and in the same rhythm that I lived it.

It's a story of restlessness and the purity of the moment and living right. Of my childhood in Abbott, Texas, to the Pacific Northwest, from Nashville to Hawaii and all the way back again. Of selling vacuum cleaners and encyclopedias while hosting radio shows and writing song after song, hoping to strike gold.

It's a story of true love, wild times, best friends, and barrooms, with a musical sound track ripping right through it.

My life gets lived on the road, at home, and on the road again, tried and true, and I've written it all down from my heart to yours.
__________

आहाहा काय स्वर्गीय आवाज आहे अन आर्तता!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे विलि नेल्सनचं आणखीन एक पुस्तकः 'द फॅक्ट्स ऑफ लाइफ: अँड अदर डर्टी जोक्स'...हे कुठल्याही पानापासून वाचावं असं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की घेते. एकंदर आवडतय पुस्तक. धन्यवाद ऋता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Cass Sunstein on Gone With the Wind.

Mitchell is interested in individuals rather than ideologies or apologetics. She parodies the idea of “the Cause,” and she has no interest in “States’ Rights.” She is elegiac not about politics, but about innocence, youth, memory, love (of all kinds), death, and loss (which helps make the book transcend the era it depicts).

The book has strong feminist themes. It can even be taken as an early argument for sex equality. Scarlett is much smarter than her men, and she deplores traditional sex roles, which are depicted as confining and foolish. Wildly successful in business, Scarlett breaks out of them. Drew Gilpin Faust’s important book, Mothers of Invention, offers a detailed account of the challenges faced by Southern women during the Civil War, as they had to improvise and assume new roles and responsibilities. Faust shows that the war helped to produce a transformation of gender roles. Mitchell’s account of that transformation—in the person of Scarlett, incredulous about social expectations—is not incompatible with Faust’s, and it has real fire.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहा लेख मस्त वाटतोय. सवडीने वाचेन. आत्ता पुरता हे देखील रोचक लेख वाचाच-
http://www.manogat.com/node/15583
http://aisiakshare.com/node/2215

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0