एका दिवसाची कहाणी - सोनेरी किरणे

नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत. अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील. काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता. अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर बस क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या बाजूला एक वाळलेले, पोखरलेले झाडाचे खोड पडलेले होते. बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून पडले असावे. गेल एकदाच हे ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी हे झाड हिरवेगार होते. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, लाल बत्ती वर चार्टर बस थांबली कि कित्येक बाबू खिडकीतून हात लांब करून, झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्याचा प्रयत्न करायचे. काही चक्क बस वर चढून, फांद्या तोडायला कमी करायचे नाही. अर्थातच, दातून साठी. बस थांबली असताना पक्ष्यांची किलबिल ही ऐकू यायची. पण वेळ सदा एक सारखा राहत नाही, काही वर्षांपूर्वी झाडाला वाळवी लागली. वाळवीने झाड पोखरून टाकले. एक-एक करून फांद्या गळून पडल्या. संसारापासून अलिप्त तपस्वी सारखे दिसायचे ते सुकलेले झाडाचे खोड. आज ते ही गेल. अचानक लक्ष्य त्याच जागेवर दीड-दोन फुट उंच एक कडू लिंबाच्या लहानश्या रोपट्याकडे गेले. अरेच्या हे कुठून आले, एका दिवसात रोपटे एवढे वाढत नाही. काही महिन्याचे हे निश्चित असेल. झाडाच्या सावलीत वाढणाऱ्या या रोपट्या कडे आपले लक्ष कसे गेले नाही. झाड गेल्याचे दुख कुठच्या कुठे पळाले. काही वर्षात ह्या रोपट्याचे ही मोठे झाड होईल. एक मोठ्या बहरलेल्या झाडाचे चित्र डोळ्यांसमोर तरळले. आनंदाने युरेका-युरेका म्हणत जोरात ओरडायचे वाटले. पण काय करणार, सभ्यतेच्या बुरख्यात राहणार्यांना, आनंद ही मोठ्याने ओरडून व्यक्त करता येत नाही.

जीवन पार्कच्या स्थानकावर बस थांबली, बस मधून उतरून घराकडे पायी चालत जाऊ लागलो. एका गल्लीत घराबाहेर खाटेवर एक म्हातारी झोपलेली दिसायची. आजकाल तिच्या सोबत दीड-दोन वर्षाची एक चुणचुणीत पिटुकली, बहुतेक तिची नात असावी सोबत खेळताना दिसायची. कालचीच गोष्ट, त्या गल्लीतून जाताना, ती पिटुकली आपल्या हातातले बिस्कीट म्हातारीला दाखवत म्हणत होती, दादी, आप भी लों ना चीजी (खाऊ). तिची दादी प्रेमाने तिच्या डोक्यावर फिरवीत म्हणाली, आपने खा लिया न, समझो मेरा पेट भर गया. अचानक पिटुकलीचे लक्ष्य माझ्या कडे गेले, हातानी बिस्कीट उंचावत आनंदाने ती म्हणाली, चीजी (खाऊ) आणि दुडदुड धावत धावत घरात गेली. मला हसूच आले, म्हातारीकडे पहिले. अस्ताचलच्या सूर्याचे सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. तिचे डोळे बंद होते. तिचा चेहरा संतुष्ट, शांत आणि आनंदी दिसत होता. काही क्षण मी तिला पाहतच राहिलो. अचानक एका आवाजाने तंद्रा भंग झाली. अंकल क्या हुआ, एका दहा एक वर्षाच्या मुलाने विचारले. कुछ नहीं, म्हणत मी तिथून पाय काढला. आज त्या गल्लीतून जाताना सदानकदा घरा बाहेर असलेली खाट दिसत नव्हती. त्या जागी घरा बाहेर एका सतरंजीवर पांढऱ्या वस्त्रात आणि पडलेले चेहरे करून लोक बसलेले दिसले. काय झाले असावे मला याची कल्पना आली. पण घरात काय घडले याची कल्पना इवल्याश्या पिटुकलीला कशी असणार. ती नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट घेऊन इकडे तिकडे दुडदुड धावत होती. तिचे लक्ष्य माझ्याकडे गेले, हातातले बिस्कीट दाखवत म्हणाली, अंकल, चीजी लोगे, मला राहवले नाही, तिच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणालो, आप के लिये है चीजी, आप ही खाओ. तेवढ्यात तिची आई बाहेर आली, तिने तिला उचलले आणि घरात नेले. मी पुढे निघालो. न जाणे का, डोळे पाण्याने डबडबले. डोळ्यावरून चष्मा काढला आणि रुमालाने डोळे पुसले. सहज वर आकाशात बघितले, अस्ताचालच्या सूर्याचे सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती. मनात म्हंटले, उद्या उगविणाऱ्या सूर्याची किरणे ही सोनेरीच असणार. संहार आणि सृजनाची दोन्हीची साक्षी ही सोनेरी किरणे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

सभ्यतेच्या बुरख्यात राहणार्यांना, आनंद ही मोठ्याने ओरडून व्यक्त करता येत नाही.

हे विशेषतः खरे आहे जेव्हा आसपासचे लोक आपली भाषा जाणतात तेव्हा खूप संकोच वाटतो. याउलट परदेशात बसस्टॉपवर बिन्धास्त जोरात हिंदी गाणी म्हणत ठेका धरता येतो. पण हां इथेही, कोणा रडणार्‍या स्त्रीच्या पाठीवरुन हात फिरवता येत नाही न जाणो तिला आवडेल का? लहान मुलांचे लाड तर कधीच करु नयेत कारण .... वेल, खरं तर पालकांचही बरोबरच आहे. लहान मुलाच्या संरक्षणाकरता जागरुक असलच पाहीजे. असो.
.
पटाईतजी, मुक्तक छान आहे. लहान लहान प्रसंगांमधून मनात जी आंदोलने उमटतात त्याचे वर्णन तुम्ही छान करता अन मुख्य म्हणजे करता. असं नाही की ही तर क्षुल्लक, दैनंदिन बाब आहे त्यात काय लिहायचं? फक्त उच्च, बौद्धिक, काव्यमय, उत्कट, चमकदार मीटरमध्ये किंवा समाजोपयोगी लिहीण्याकरता थांबून राहीलो तर कधी लिहीता येइल याची खात्रीच वाटत नाही मला.
.
"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे,
अकस्मात तो ही पुढे जात आहे"
हेच सत्य.
.
आई अन मुलगी यांपैकी आईनी मला सर्वाधिक दिलं आहे अन तरीही माझं प्रेम मुलीवर सर्वाधिक आहे. कारण कदाचित सुप्त अन अमूर्त पातळीवरील कारण हे असेल की तिच्या रुपाने माझे जीन्स जगणार आहेत.
.
प्राणीसृष्टीतील आईच्या त्यागाचं किंवा primal instinct चे उदाहरण द्यायचे तर ऑक्टोपस चे द्यावे लागेल. आई ऑक्टोपस तिच्या अंड्यांचं भक्षकापासून, डोळ्यात तेल घालून रक्षणच करत नाही तर ती त्यांना सतत ऑक्सिजन द्यावा लागतो म्हणून अन्न न खाता अविरत कष्ट घेते. अन जेव्हा अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात तोपर्यंत इतकी दमलेली अन भुकेली असते की मरणाला सामोरी जाते. निसर्गातील मातृप्रेमाचे उच्च उदाहरण म्हणावे लागेल.
.
इतकं सर्व लिहीण्याचे कारण - आदली पीढी, पुढच्या पीढीला संजीवन अन आशीर्वाद देऊन लुप्त होते अन जीवनाचे चक्र अविरत चालू रहाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच लिहिलंय! अगदी आतून!

--

जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निच्या फळांचा
पराधीन आहे जगती...

--

असेच अजून येऊ द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद काव्य ताई. बाकी मी काही कल्पनाशील लेखक नाही. अंतर्जालावर मराठी लिहायला शिकलो. आपण जे काही आजू बाजूला पाहतो, मोडक्या तोडक्या मराठी लिहायचे ठरवले. असे प्रतिसाद लिहायला प्रोत्साहन देतात. आईचा विषय निघाला. गेल्या शनिवार ते काळ बुधवार पर्यंत माझी आई (८२ वर्षे) हॉस्पिटलमध्ये होती. तिची प्रकृती फारच खराब होती. कालच discharge मिळाला, घरी आली. आज तिची प्रकृती थोडी बरी दिसते आहे. आठवड्या भराची सुट्टी घेतली आहे. असो. आधी विचार केला होता आठवड्याची सुट्टी घेऊन कुठे फिरून येऊ. पण आता शक्य नाही. भारत सरकारचे महत्त्वाचे कार्यालय असल्यामुळे सुट्ट्या मोठ्या मुश्किलीने मिळतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad भावना पोचल्या पटाईतजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहीलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वाना धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0