मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग ३ (समाप्त)

.

मुलाला मिसरुड फुटले की अमेरीकन बाप-मुलाचे नाते पारंपारीक बरेचसे वेगळे होते. त्याचे डायनॅमिक्स बदलतात. त्यातील प्रदर्शनिय प्रेमाचा भाग कटाक्षाने कधी मुलाकडून तर कधी बापाकडून टाळला जातो. फार थोडे हाताच्या बोटावर मोजण्याइतके बाप-मुलगा माझ्या परिचयात आहेत, ज्यांनी प्रेमाचे जाहीर प्रदर्शन, मायेचे उघड वर्तन पुढेही चालू ठेवले. अशा प्रदर्शनाबद्दल मला हेवा वाटतो की तिरस्कार की एकाच वेळी दोन्ही हे मला ठरवता येत नाही. हेवा ही वाटतो कारण बाबा व माझ्यात तशा प्रकारचा मोकळेपणा उरला नाही पण सूक्ष्म तिरस्कारही वाटतो.
.
तारुण्यात मुलाकडून घेतल्या गेलेल्या प्रत्येक बंडखोर निर्णयाची एक एक वीट रचत जाते अन बाप-मुलात एक अदृष्य भिंत तयार होते असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अन या वास्तवाला, मी तरी कसा अपवाद असेन? खेद-खंत हीच की ही भिंत ओलांडणं मला नंतरच्या आयुष्यात कधीच जमले नाही. बाबा मला उमगत गेले, माझ्या काही वर्तनाचा पश्चात्तापही झाला पण ही भिंत ओलांडून बाबांच्या कुशीत काही शिरता आले नाही तिथे इगो आड येत राहीला. अन समजा हे अंतर मी ओलांडले असतेही तरी काय मला पूर्वीची, बालपणीची जवळीक साधता आली असती? हेच घुसमटलेपण आमच्या नात्याचा श्वास बनून राहीला.
.
मी परत जेसिकाचा माझ्या मुलीचा फोटो पहातो अन माझ्या डोक्यात चक्र फिरु लागतात... जेसिका पुढे काय बनेल, तिचे व्यक्तीमत्व कसे घडेल, ती आयुष्यातील प्रसंग कसे हाताळेल अन मुख्य म्हणजे आमचे बाप-मुलीचे नाते कसे असेल? त्याला ओहोटी लागेल की ते अधिक घट्ट होइल. आत्ता तरी मी तिच्याकरता, provider आहे, तिला एक मजबूत आधार आहे, तिचे विश्व बर्‍याच मोठ्या प्रमाणात माझ्या अवतीभवती फिरते. पण पुढे असेच राहील की आत्ताची १६ वर्षाची माझी जेसिका, मला दुरावेल, बंडखोर बनेल, मला दुखावेल? पण ....... मी कधी विचार केला होता बाबा दुखावतील का याचा? माझ्या मनात गुन्हेगारी भावनांची एक लाट येऊन जाते.
.
पुढे मी तारुण्यात प्रवेश केला, मला सहचारी मिळाली, जेसिका १ वर्षाची झाली, माझे शिक्षण पूर्ण झाले अन मला माझ्या बालपणीच्याच राज्यात विस्कॉन्सिन मध्ये नोकरी मिळाली. अन मासेमारी विसरलेल्या मला परत एकवार एक एकाकी पाऊलवाट लहानशा तळ्याकाठी घेऊन गेली. जिथे ऊन-सावलीचा खेळ चालला होता, हवा तशीच कुंद होती अन मासे पाण्यात उड्या घेत होते. मी लवकरच एक गळ परत खरेदी केला अन तळ्याकाठी जाऊ लागलो, निवांत वेळेत ब्लेकची "टायगर", यीटस ची "The lake isle of innisfree" गुणगुणत तळ्याकाठी मासेमारी करु लागलो. पुढे तर फ्लाय फिशींग करता एक नवा गळ घेतला अन फ्लाय फिशींग ची औरच मजा चाखली.
.
पण बाबा कुठे होते? ते तर दुसर्‍या राज्यात होते, स्टीव्ह तीसर्‍याच राज्यात होता. आम्ही सारेजण विखुरले होते - आहोत. मी आता वर्षाकाठी १-२ वेळा बाबांना भेटतो पण कसा उडत उडत अन त्या भेटीतही, म्हातारा(Old man) हेच सांगतो की तो बरा आहे. मी म्हणतो मी बरा आहे. पण पुढे भरभरुन संवाद होत नाही, आमच्यातली भिंत पडत नाही. कधीतरी बाबांना घेऊन त्या तळ्याकाठी जायचे आहे, अन bullhead मासा पकडताना त्या संध्याकाळी बाबांच्या डोळ्यात जी चमक दिसली, ती मला परत पहायची आहे. परत बाबांच्या कुशीत शिरुन त्यांना सांगायचं आहे - तुम्ही बाप म्हणून यशस्वी ठरलात बाबा.... मला तुम्ही भरभरुन देऊ केलत. मला तुम्ही सारं काही दिलत. मी तुमचा ऋणी आहे, मी तुमच्यावर तितकच प्रेम करतो जितकं प्रेम विस्कॉनसिन तळ्याकाठच्या त्या चंदेरी रात्री करत होतो, जेव्हा तुमचा शब्द माझ्याकरता प्रमाण होता, मी तुमच्यावर अवलंबून होतो.

.

पण हे मला सांगता येत नाही ... आमच्यातलं अंतर मीटत नाही.

.
स-मा-प्त

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कधीतरी बाबांना घेऊन त्या तळ्याकाठी जायचे आहे, अन bullhead मासा पकडताना त्या संध्याकाळी बाबांच्या डोळ्यात जी चमक दिसली, ती मला परत पहायची आहे. परत बाबांच्या कुशीत शिरुन त्यांना सांगायचं आहे - तुम्ही बाप म्हणून यशस्वी ठरलात बाबा.... मला तुम्ही भरभरुन देऊ केलत. मला तुम्ही सारं काही दिलत. मी तुमचा ऋणी आहे, मी तुमच्यावर तितकच प्रेम करतो जितकं प्रेम विस्कॉनसिन तळ्याकाठच्या त्या चंदेरी रात्री करत होतो, जेव्हा तुमचा शब्द माझ्याकरता प्रमाण होता, मी तुमच्यावर अवलंबून होतो.
.

_/\_ अप्रतिम. मला तरी खुपच भावलं.

मला माझ्या बाबांचाही असाच अभिमान. ते प्रत्येक गोष्ट इत्की पध्दतशीर सांगायचे/सामजवायचे की त्याला मला प्रतिवाद करणे कधीच जमायचे नाही. मी अतिशय हिरमुसायचो. पण मनात एक अभिमान असायचा माझे बाबा हुशार आहेत. ऑफीस असो , मित्र असोत, नातेवाइक असो बाबांचा सल्ला प्रत्येकाला हवा असलेला बघुन रोमांचीत व्हायचो. अर्थात मी जनरेशन नेक्स्ट असल्याने आज ना उद्या त्यांना मी क्रॉस करणारच होतो. आता ते माझे मत विचारात घेतात.

विशेषतः DDLJ नंतरच्या भारताला (मुक्त आर्थीक धोरण स्विकारलेला भारत) फेस करताना त्यांचा कमी पडत असलेला आत्मविश्वास, नव्या बदलत्या परिस्थीतीचे समग्र न झालेले ज्ञान्, राजकारण असो आर्थीक बाबी असोत, आता त्यांना मला सल्ला विचारावासा वाटतो. आणी मी अजुनही तो देताना मनात बाबा या समस्येवर कसा विचार करतील याचे बाळकडुच कामी आणतो. आणी त्यांना सल्ला देतो. एखादा विषय समजुन घ्यायचे फंडे त्यांनीच तर मला शिकवले व आज तेच त्यांना कसे जमत नाही याचे मला प्रचंड आश्चर्य वाटते. म्हणून मनातल्या मनात मी माझे बाबा माझी परिक्षा घेत आहेत म्हणून सल्ला विचारत आहेत असाच भाव निर्माण करतो.. कारण त्यांचा शब्द माझ्याकरता प्रमाण होता, मी त्यांच्यावर अवलंबून होतो. म्हणून मी त्यांच्या कडून बरचं काही शिकु शकलो... त्यांना मी ज्ञानाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कमकुवत कल्पुच शकत नाही. म्हणूनच मी त्यांचा ऋणी आहे, अभिमानी आहे, मी तुमच्यावर तितकच प्रेम करतो जितकं प्रेम बालपणी करत होतो, जेव्हा तुमचा शब्द माझ्याकरता प्रमाण होता, मी तुमच्यावर अवलंबून होतो. दोज वेर दि बेस्ट डेज ऑफ माय लाइफ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

वा! किती उत्कट. तुम्हालाच __/\__
माझं बाबांबरोबरचं नातं खूप छान आहे. आईपेक्षा बाबा फार जवळचे वाटतात. नवरा जहाजावर असताना, बाबांनी मुंबईला बदली करुन, माझ्याबरोबर राहीले. ते हौसेखातर वाईन बनवतात, He has a green thumb - ते बॉन्साय करतात ... किती सुंदर बॉन्साय, खूप नाट्कं लिहीलियेत. अर्थात ते काही प्रसिद्ध वगैरे नाहीत. बंडखोरी मात्र करायची टाप नव्हती माझी :)..... चांगले फटके मिळाले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

आवडलं लिहिलेलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद अनुप. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

आत्ताच तीनही लेख वाचून काढले. मनस्वी लिखाण आवडलं. बाप-मुलाच्या आणि बाप-मुलीच्या नात्याचं वर्णन मासेमारीच्या छंदाभोवती छान गुंफलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

वाचायला बाजुला ठेवले होते. तीनही लेख आवडले.

---

गेल्याच महिन्यातल्या पालकनितीमध्ये मुलीला स्पर्श करून जवळ घेऊन कुरवाळणे, तिची चुंबने घेणे बाप मुलग्यांपेक्षा आधीच कमी करतात व काही वय आल्यावर थांबवतात. आणि मुलींना बापाला वाटत असते त्यापेक्षा बापाचा स्पर्श, सहवास अधिक हवासा असतो - नी त्या तहानलेल्याच रहातात असे लिहिले होते.

हे कितपत खरे आहे? मला माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खुप छान आहेत तीनही भाग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसादकांचे तसेच वाचकांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

तीनही लेख आवडले.

काही प्रसंगच असे असतात जेव्हा जिंकणं हे हरण्यापेक्षा महाग पडू शकते. >> खरंय.

नाव बदलले म्हणून काय झाले, वेड्यांचे इस्पितळ ते वेड्यांचे इस्पितळच. >> Ahem Ahem... कै नै ठसका लागला Wink

मुलींवर स्पर्शातून माया करणे थांबवणे हे भारतात (आणि तत्सम देशात) होते कारण एकंदरच आपण फिजीकली ऑकवर्ड लोकं आहोत.
त्या तहानलेल्याच रहातात >> हे खरं असावं. स्त्रियांनो आठवायचा प्रयत्न करा बरं when was the last time you had a fatherly/brotherly touch from a man Wacko

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहान मुलगी आणि वडील यांच्या मासेमारीच्या छंदाचे हे एक गाणे फार सुंदर आहे-
.

And she thinks we’re just fishin’ on the riverside
Throwin’ back what we could fry
Drownin’ worms and killin’ time
Nothin’ too ambitious
She ain’t even thinkin’ ‘bout
What’s really goin’ on right now
But I guarantee this memory’s a big’in
And she thinks we’re just fishin’

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचताना भावनात्मक झालो. प्रत्येक मुलाला/ मुलीला आणि बापाला वाचावे असे लेखन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद पटाईत जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0