प्रिय शुचिमामीस,

स. न. वि. वि.

मी इथे प्रतिसाद फार देत नसले तरी रोज किमान चार वेळा येऊन नवीन काय आलंय हे पाहात असते. खरडीचं नोटिफिकेशन येत नसल्याने आठवड्यातून दोनदा माझ्याच खरडवहीमध्ये डोकावून येते. दर दोन दिवसांनी बोर्डावर किंवा प्रतिसादांत नवीन नांव दिसतं आणि लोक त्या आयडीशी प्रेमाने गप्पाही मारत असतात. मग 'कोण असावं?' हे कुतुहल, इतरांच्या खरडवह्यांची उचकपाचक, असे करताना शंभरातल्या नव्व्यान्नव वेळा* ती तूच असतेस. कधी हर्मिट क्रॅब, वामा, कधी नावच्या अलिकडे-पलिकडे दहा-पंधरा ठिपके, आणि काय न काय!! आता तुलाच तुझे किती आयडी आहेत आणि कोणत्या आयडीने काय लिहिलेयस हे आठवत नाहीय, तर ही मज पामरास कसे ठाऊक असावे?

तर, मला तुझ्या आयडी बदलत राहण्यावर आक्षेप नाही. पण असे का करतेस याबद्दल कुतूहल आहे. म्हणून खास तुझ्यासाठी हा उघड पत्र-प्रपंच. (अनावृत्त (शुद्धीपत्र-अनावृत) असे लिहिण्याची पद्धत आहे, पण मला तो शब्द भयंकर अश्लील वाटतो. म्हणून साधा सोपा शब्द.)

एकंदरीत टोपणनावाने लिहिण्याची प्रथा काही नवीन नाही. मीही टोपण नावाने लिहिते. पण मग अमकं नांव व त्यामागची ढमकी व्यक्ती असं एक नातं तयार होतं आणि माझ्यापुरतं मला लोकांनी मस्त कलंदर्/मकी या नावाने ओळखावं आणि माझं लेखन माझ्या खर्‍या किंवा खोट्या नावाशी जोडलं जावं असं मला वाटतं. माझीही काही संस्थळांवर एकाहून अधिक टोपणनावं आहेत. पण त्याचा हेतू एक वेगळी लेखनशैली किंवा लेखनविषय असा आहे. माझ्या ओळखीच्या काही लोकांनीही अशा कारणासाठी अशी एकाहून अधिक नांवे घेतली आहेत आणि त्यातली काही जगजाहीर देखील आहेत. त्यामुळे एकाहून अधिक आयडी असू शकतात. आता मला तुझे नक्की किती आयडी आहेत हे माहित नाही. इथेच किमान दोन-तीन असावेत. त्यातल्या एका आयडीने तू लग्नासाठी वैशालीमध्ये भेटायला गेलेल्या मुलीची कथा लिहिली होतीस इतपत माहित आहे. परंतु नंतरची वाटचाल तशी जाणवली नाही.

तर बाई (तुझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण मान ठेवून) मला तुला असं विचारायचं आहे की
१. तू अशी दिवसागणिक नांवं का बदलतेस?
२. सगळ्या आयडींनी तेच ते लिहायचं असेल तर वेगवेगळी नांवं आणि आयडीज घेतल्यानं नक्की काय साध्य होतं?
३. तुझ्या मुलीला घासकडवींनी ओलिस ठेवून 'तुझ्या नांवं आणि आयडी बदलण्यावर नक्की काय प्रतिक्रिया येतात' याचे आलेख काढण्यासाठी ते तुला असं करायला भाग पाडताहेत का?
४. तुला घासकडवींच्या आलेखांचं अजीर्ण होऊन त्यांचं तोंड एकदाचं बंद करण्यासाठी या मानसशास्त्रीय प्रयोगाचं बाड त्यांच्या संस्थळावर (आभासी जगात तोंडावर मारता येत नाही)मारायचं आहे का?
५. त्या ठिपक्यांच्या नांवात नक्की अलिकडे-पलिकडे किती ठिपके द्यायचे हे तू कसं लक्षात ठेवतेस?
६. तुझा आयडी, नावं बदलण्याचा अल्गोरिदम नक्की काय आहे?
७. तूझा आत्तापर्यंतचा नावांचा आणि आयडींचा स्कोर काय?
८. तुझ्या सतत नांवं बदलण्याचा लोकांना त्रास होतो याबद्दल तुला गवि(यांना त्रास होतो असं हे कधीच दाखवत नाहीत , सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी पसरवत असतात) ते बॅटमॅन (याला ओढून ताणून सगळं आपल्यावरच आहे असं म्हणायचं असतं) या स्केलवर नक्की कसा फीडबॅक मिळतो?
९. माझ्या रेफरन्ससाठी म्हणून तरी , सध्याच्या सगळी 'चालू' आयडींच्या नावांची यादी देत्येस का? किमान या धाग्यातले तरी प्रतिसाद कुणाचे आहेत हे कळायला मदत होईल.

तुझी कृपाभिलाषी,
-मस्त कलंदर

तळटीप- वाहत्या गंगेत हात म्हणून इतरांनीही त्यांच्या मनातले प्रश्न विचारलेत तरी हरकत नाही. काय ते एकदाचे होऊन जौ दे.

*- श्रेयअव्हेर- नांव सगळ्यांना माहित आहे.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

ROFL ROFL ROFL ROFL
शुचिमामी? हा मला ठाउक नसलेला आयडी आहे. बाकी काही प्रश्न नाहीत ब्वा पडलेले मला. हेच भन्नाट आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलादेखील काही प्रश्न पडत नाहीत. तिने परतपरत डिस्प्ले नेम बदलले तरी चालते. आणि अनेक अकाऊंट काढण्याचादेखील त्रास असा मला होत नाही पण इतरांना होऊ शकतो हे समजू शकते.

एखादी व्यक्ती कोणतीही गोष्ट का करते याची उत्तरं नेहमीच मिळतात असे नाही. त्या व्यक्तीलादेखील ती माहीत असतील का याची शंका आहे. आंतरजालचतर आहे! चलता है...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

८. तुझ्या सतत नांवं बदलण्याचा लोकांना त्रास होतो याबद्दल तुला गवि(यांना त्रास होतो असं हे कधीच दाखवत नाहीत , सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी पसरवत असतात) ते बॅटमॅन (याला ओढून ताणून सगळं आपल्यावरच आहे असं म्हणायचं असतं ) या स्केलवर नक्की कसा फीडबॅक मिळतो?

लोल! अतिलोल! महालोल!

बाकी प्रतिक्रया ल्यापटापवर पोचलो की...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

याच वाक्याला प्रचंड हसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्केल परफेक्ट आहे!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधन'शुचि'तेचा अभाव समजावे काय यास????? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅहॅहॅ... भारी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला तुझ्या आयडी बदलत राहण्यावर आक्षेप नाही. पण असे का करतेस याबद्दल कुतूहल आहे. मला एक नाव घेतलं की दुसरं आवडतं हे एक कारण मग "त्याच" आय डी चं नाव बदलत बसते पण पूर्ण आय डी बदलण्यामागे जे कारण आहे ते मी सांगू शकणार नाही Smile
.
अर्थात अनेकांना या सुविधेच्या अतिवापराचा त्रास होत असावा, त्याबद्दल मी दिलगीर आहे पण निदान उद्धटपणा, तेच तेच उगाळून, गोलगोल बोलणे, एकोळी धागे काढून नाकी नऊ आणणे, फटकळपणा (हा काहीजण सद्गुण मानतात. असो बापडे) असे दुर्गुण तर माझ्यात नाहीत. प्रत्येकात काहीतरी कमी असतेच.
.
तीसरं नाव बदललं तरी अ‍ॅटीट्युड अन कल, आवड अन शैली तीच रहाते त्यामुळे ओळखता तर येतेच. पण त्याबद्दल मला तक्रार नाही.
.
त्या ठिपक्यांच्या नांवात नक्की अलिकडे-पलिकडे किती ठिपके द्यायचे हे तू कसं लक्षात ठेवतेस?
त्या आय डी ने खरं तर पुन्हा लॉगिन करता येऊ नये म्हणून ठीपके दिलेले असतात Sad व इमेल = werwqrnvfgbhgwrerer.com असा काहीतरी अनामिक दिलेला असतो.
.
पण सॉरी आता नाही बदलणार आय डी. अगदी "रिया" हा आय डी मला आवडत नाहीये तरी Sad
.
संस्थळाच्या प्रगल्भ अन सहनशील वातावरणाचा गैरफायदा घेतल्याबद्दल दिलगीर आहे. पण मी मुद्दाम केले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

अगदी "रिया" हा आय डी मला आवडत नाहीये तरी

१९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात 'रिया' हे एका आंघोळीच्या साबणाच्या ब्र्याण्डचे नाव होते, असे स्मरते. दोनतीन वेगवेगळ्या वासांचा विकल्प होता आणि दोन्ही की तिन्ही विकल्प ऑफबीट (नि काहीसे चमत्कारिक) होते, अशीही आमची खोत चाललेली याददाश्त सांगते.

असो. ही माहिती अगदी उगाचच (आणि फॉर-व्हॉटेवर-इट-इज़-वर्थ तत्त्वास अनुसरून) सांगितली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ये, दो ताजगीभरे खुशबुओं मे मिलते हैं- फुलवा रिया और नींबू रिया'
-टीनामुनिम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>१९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात 'रिया' हे एका आंघोळीच्या साबणाच्या ब्र्याण्डचे नाव होते, असे स्मरते. दोनतीन वेगवेगळ्या वासांचा विकल्प होता आणि दोन्ही की तिन्ही विकल्प ऑफबीट (नि काहीसे चमत्कारिक) होते, अशीही आमची खोत चाललेली याददाश्त सांगते.<<<

"फूलवा रिया और निबू रिया"
- टीना मुनीम अंबानी.

कळावे आपले स्नेही
याददाश्त को तर-ओ-ताजा़ रखनेवाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

असा चुकीचा इमेल आयडी देता येतो? माझ्या मते खाते अ‍ॅक्टिव्हेट करण्याची लिंक(वनटाईम पासवर्डवाली) दिलेल्या इमेल अ‍ॅड्रेसवरती येते. जर तोच चुकीचा असेल तर खातेच तयार होऊ शकत नाही.

पण सॉरी आता नाही बदलणार आय डी.

व्यक्तिशः माझ्या मनात व्यक्तिरेखा आणि लेखन याची एक प्रतिमा तयार होते. त्यामुळे मला एखाद्याने सारखं नांव बदललं की त्रास (त्याला अगदी 'त्रास' असं त्रासिक नांव देता यायचं नाही, पण तत्सम काहीतरी) होतो. असाच त्रास मला एका व्यनिसाखळीत अचानक कुणीतरी टिंकरबेल उद्भवली तेव्हा झाला होता. मग सगळ्यांची नांवे वाचून, जोड्या जुळवून, आधीचे निरोप वाचून ती व्यक्ती कोण आहे ते शोधलं. व्यनि असल्यानं ती व्यक्ती कोण आहे हे कळायलाच हवं होतं. काल परवा 'अदिती'च्या लेखाच्या पुनर्वाचनाचा आनंद मिळाला. तो लेख मी पूर्णपणे विसरून गेले होते. आणि माझ्यासोबत विक्षिप्तपणा करत नसल्याने माझ्या डोक्यात पटकन एकच अदिती आली. पहिला परिच्छेद वाचताना 'या कार्टीनं भांगेच्या तारेत असले शब्द वापरले की काय?' असं वाटलं. पण तीही असं छानसं लिहू शकते हे मला माहित आहे. पुढचा परिच्छेद वाचताना मात्र राहावलं नाही आणि पलेखकाच्या नांवापर्यंत स्क्रोल केलं. त्यानंतर काय वाटलं असेल हे सांगायची गरज नाही. पण माझ्यासाठी लेखकाचं नांव महत्वाचं आहे. पण ते माझ्यापुरतं आहे. तू आयडी बदलावास किंवा बदलू नयेस असं माझं काहीही म्हणणं नाही. फक्त इतक्या वेळा या गोष्टीची पुनरावृत्ती झाल्याने मला त्यामागचं कारण समजून घेण्याची उत्सुकता आहे, इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

मी समजा "अबक" आय डी घेतला (बरोबर इमेल१ पत्ता देऊन)
अन नंतर मी तो पत्ता अनामिक - sadasdasdasdasd.com पत्त्याला बदलला अन पासवर्ड = grtgyhetyrtyryh96!jdjksdj कॉपी / पेस्ट केले
तर जर पासवर्ड आठवले नाही तर त्या पत्त्यावर जाताच येत नाही.
ना इमेलवर पासवर्ड मागवता येतं कारण तो इमेल पत्ता फेक आहे.
______________
अन माझा इमेल१ जो की व्हॅलिड आय डी आहे तो परत अन्यत्र वापरता येतो. कारण आता अबक वर अनामिक इमेल आहे म्हणजे इमेल१ वापरास मुक्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

अबक चे अँड्रेस चेंज झाल्यावर वेरीफिकेशन होतच नाही. आणी समजा होत असते तर नवीन एमेल आकांउंट बनवता येत असतोच की Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

३. तुझ्या मुलीला घासकडवींनी ओलिस ठेवून 'तुझ्या नांवं आणि आयडी बदलण्यावर नक्की काय प्रतिक्रिया येतात' याचे आलेख काढण्यासाठी ते तुला असं करायला भाग पाडताहेत का?
४. तुला घासकडवींच्या आलेखांचं अजीर्ण होऊन त्यांचं तोंड एकदाचं बंद करण्यासाठी या मानसशास्त्रीय प्रयोगाचं बाड त्यांच्या संस्थळावर (आभासी जगात तोंडावर मारता येत नाही)मारायचं आहे का?

अब्रह्मण्यम् अब्रह्मण्यम्!! कोणाच्या अस्तित्वाच्या पाउलखुणा कुठच्या दिशेने वळताना दिसतात याला आम्ही जबाबदार आहोत हा विचार आमच्या अतिवर्धित इगोस कितीही सुखावणारा असला तरीही असले पाप आमच्या हातून कधीही घडणार नाही. हा, आता ऐसी अक्षरेवर काहीतरी एक वेगळेपण राखावे यासाठी इतर संपादक-व्यवस्थापक (किंवा व्यवस्थापकीणबाई) जर शुचिमामींना फूस लावत असतील तर आपल्याला काही माहीत नाही ब्वॉ.

पण आपण तर बाबा त्यांना त्यांच्या ओरिगिनल आयडीनेच - शुचि म्हणूनच ओळखतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बॅटमॅन (याला ओढून ताणून सगळं आपल्यावरच आहे असं म्हणायचं असतं)

या जामातृशोधाचा उद्गमही या निमित्ताने विचारूनच टाकतो. धागाकर्त्री मॅडम, असा निष्कर्ष काढण्यामागची कारणपरंपरा नेमकी काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'शोले'मध्ये जय व वीरु हेच नायक आहेत; गब्बर हा खलनायक आहे; हा निष्कर्ष काढण्यामागची कारणपरंपरा काय असावी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळाच्या ओघात लोकांकडून गोष्टी प्रक्षीप्त केल्या गेल्या आणी गब्बरला व्हिलन ठरवलं गेलं Sad मूळ कथा तशी नाहीच मुळी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

दोन्ही उदाहरणांमधले सामंतर्य विशद न करता नेहमीप्रमाणे प्रश्नपिंक टाकण्याची परंपरा रोचक आहे.

(तरी नशीब यावेळी नंतरचे अनुल्लेखजन्य रूदन नाही ते. Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रिय माठ्या,
दोन्ही गोश्टी स्वयंस्पष्ट आहेत असे म्हणायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या केसमध्ये असेच कसे आहे ते विशद करण्याची तसदी घ्या इतकेच सुचवायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकांनी या वाक्याला दाद दिली, आणि तू सोडून इतर कुणाला आक्षेप नाहीये यातच काय ते समज! ;-p

तसाही मौजमजेचा धागा आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

दाद कांय कशालाही देंतात हों Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयडी बदलायला काहीच हरकत नाही पण सोडलेला आयडी दुसराच कोणी घेणार नाही याची सोय करुन ठेवा म्हणजे झालं.
एकदा मी आयडी बदलण्याचा विचार केल्ता पण जुना आयडी घेऊन कोणीतरी जुनं उट्टं काढू शकतं आणि अशा केसेस झालेल्यात असं श्री. ऐसीअक्षरेंनी सांगितलं. अर्थात शुचिमामींचा जुना आयडी घेऊन कोणी काही लिहीलं आणि त्यात कर्केचा सिंह किंवा वृश्चिकेचा मंगळ किंवा एखादी कविता किंवा मेल-फिमेल ब्रेन असं नसेल तर या त्या शुचिमामी नाहीत हे कोणीही ओळखेल म्हणा.

खुलासेवजा टीपः श्री. हे श्रीमान किंवा श्रीमतीचं लघुरुप आहे. उगाच सेक्सिस्ट म्हणून अंगावर येऊ नये.

अवांतरः सेक्सिस्टला मराठीत काय म्हणतात? एकलिंगकल्ली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनाहूत सल्ला देण्याचा मोह आवरत नाही म्हणून लिहितो.
तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व नांवांत, शुचि हेच नांव सर्वात चांगले आहे. म्हणजे कसं आहे ना, की तुम्ही अगदी शुचिर्भूत होऊन, देवासमोर बसून एखादे स्तोत्र म्हणता आहात, सगळीकडे अगदी मंगल वातावरण पसरले आहे, असे एक चित्र डोळ्यांसमोर उभे रहाते. नाहीतरी तुम्हाला रिया आवडत नाही, तर बदलूनच टाका कायमचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नको आता नाही बदलत Sad
शुचि नाव मलाही आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

शुचिर्भूत होऊन

आयला, शुचिमामी भूत?????? बचाओ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयला, शुचिमामी भूत?????? बचाओ!

बॅट्या तुला आता झपाटणार!
हा हा ही ही हु हु हो हो हॉहॉहॉ!!!!!
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या तुला आता झपाटणार!
हा हा ही ही हु हु हो हो हॉहॉहॉ!!!!!

आयला!

हा ब्याट्या आता (चड्डीत) जुलाब झाल्यावर चड्डी बदलल्यासारखा दिवसाकाठी पंचवीस आयडी बदलून लिहू लागला, तर कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा ब्याट्या आता (चड्डीत) जुलाब झाल्यावर चड्डी बदलल्यासारखा दिवसाकाठी पंचवीस आयडी बदलून लिहू लागला, तर कठीण आहे.

अधोरेखिताची शृंगापत्ती की काय ती कशी सोडवणार म्हणे ओ तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्वाइंट आहे.

जबरदस्त प्वाइंट! एकदम कडक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दस्त

"दस्त सफा तो आप सफे, आप सफे तो दुनिया सफी" असे प्रबोधन करणारी एक रेडिओवरील जाहिरात आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थात, दस्तादस्ताची दास्ताँ वेगवेगळी असावी बहुधा. अन्यथा, 'दस्तखत' म्हणजे 'द्रवरूप सोनखत' असा अर्थ लावण्याची सुविधा उगाचच उपलब्ध होईल.

("दस्त सफा तो आप सफे"मधला दस्त नेमका कोठला असावा?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

("दस्त सफा तो आप सफे"मधला दस्त नेमका कोठला असावा?)

उर्दूस्टाईल वाटतो आहे. म्हणजे अर्थातच अरबी किंवा फारसी. फारसीत दस्त असा शब्द आहे परंतु त्याचा अर्थ हात असा आहे. गूगल ट्रान्सलेट ऑफ faeces इन बोथ अरबी & फारसी करून पाहिले असता जी उत्तरे आली त्यांचा दस्ताशी काहीच संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयडी बदलण्याबद्दल माझं व्यक्तिगत काही म्हणणं नाही. पण त्या निमित्ताने काढलेल्या अन्य खोड्या गंमतीशीर आहेत. विद्रट गुर्जींना बाण बरोबर लागलाय.

('उघड पत्र-प्रपंच' हे जशास तसं भाषांतर वाटतं. त्यापेक्षा 'जाहीर पत्र प्रपंच' कसं वाटतंय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद गं. कधीकधी चुकून शब्दशः भाषांतर केल जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

सरदारजी वेगवेगळी रुपे घेउन दुकानात ग्राहक म्हणुन येतो तरी दुकानदार रोज त्याला ओळखून हाकलून देतो या इनोदाची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ओबेलिक्स वेगवेगळी वेषांतरे करून म्याजिक पोशनच्या लायनीत लागतो, तरीही गेटफिक्स त्यास दर वेळेस नाकारतो, हे आम्हांस आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिमामीच्या निमित्ताने का असेना मकीपणजी लिहित्या झाल्या हे उत्तम.
पणजीला लिहिते केल्याबद्दल मामीचे जाहिर आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण शुचिमामी हा काय प्रकार आहे? आणि मामी का? हे अस्वलपूर्व काळातले संदर्भ उलगडा प्लीज.
.
सध्या ससपेन्स चित्रपटही येत नाहीत चांगले. अ‍ॅगाथा ख्रिस्तीही वाचून झालीये बरीचशी- त्यामुळे मला तरी नवी नवी नावं घ्यायची आयडीया चांगलीच वाटते.
शिवाय संस्थळावर सोय आहे- मग ती वापरू का नये? संपादकांनी काहीतरी सांगोपांग विचार करूनच ही सोय मेंबरांना दिली असणार. त्याचा कुणीतरी पुरेपुर वापर करतंय ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते "मामी" का हे मलाही माहीत नाही बाकी शुचिमामी शब्द पराने पहील्यांदा वापरला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

थत्तेचिच्चा, शुचिमामी ही विशेषणं ही पराची देण आहे.

त्याचा कुणीतरी पुरेपुर वापर करतंय ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

शक्य आहे. मी माझं मत मांडलं. शुचिने मला हवं तसंच करावं असं म्हणणं नाहीय, पण तरीही मला माझं मत द्यावंसं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

येथे जाहीर करण्यात येत आहे की अस्वल हा माझा डु आयडी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शुद्धीपत्र क्र. २:- अरे अस्वला, (ईईईई...)
थत्तेचिचा आणि शुचिमामी ही नांवे ही पराची देण आहे.

आता ठीक आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

अच्छा...

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पेन्ग्विन बुक ऑफ हिंदू नेम्स मध्ये रिया या नावाचा अर्थ गाणारी मुलगी असा दिला आहे.
आणि आय-डी बदलला तरी नविन आय्-डी ला ईथे रुळण्यासाठी तिचे सकारात्मक प्रतिसाद नक्कीच मदत करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेन्ग्विन बुक ऑफ हिंदू नेम्स मध्ये रिया या नावाचा अर्थ गाणारी मुलगी असा दिला आहे.

अच्चा, म्हणूनच गाण्याच्या सरावाला रिया'ज़ म्हणतात की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद अंतरा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनावृत लिहायचेय तर नुसते उघडे नको.. उघडे-नागडे असे हवे! Blum 3

@शुचि उर्फ अ उर्फ ब उर्फ क : ते आयडी परत वापरायचे नसतात तर त्याच आयडीचे नाव का बदलत नाही? नवा आयडी का काढता?

@ननि

अवांतरः सेक्सिस्टला मराठीत काय म्हणतात? एकलिंगकल्ली?

लिंगसापेक्षतावादी! ROFL

@बॅट्या: कारणे कसली शोधतोस? धाग्याचा प्रकार बघ (मौजमजा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शुचिमामी, हर्मिट क्रॅब, अपुली-गपुली, सारिका, वृंदा, रिया...
तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए कोण है ये "पैचान कौन", "रुचिमामी"?? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मी काय म्हणते, नवीन आयडी घ्यायचाच असेल तर असा घ्यावा की पुन्हा लॉगिन करताना निदान आपल्यातरी लक्षात राहिलेला बरां Smile शुचिमामी हे नावं एकदम आवडलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का त्यापेक्षा एक्सेल शीट बनवा की तेजायला Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

शुचिमामी हे नावं एकदम आवडलंय!

असं असेल तर तुमची शुद्धलेखनात चूक झाली की हो ... मीटरचा विचार करा की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> शुचिमामी हे नावं एकदम आवडलंय<<

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मिटवा, संपादन, प्रतिसादच्या शेजारी "प्रून" हा काय प्रकार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एका ठिकाणचा प्रतिसाद काढून/छाटून दुसर्‍या ठिकाणी आरोपित करायला/नवा धागा बनवायला त्याचा व्यवस्थापकांना वापर होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

...बोले तो, अलूबुखारा किंवा जर्दाळू. हे पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आलुबुखार म्हणजे प्लम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> शुचिमामी हे नावं एकदम आवडलंय!
छेछे, इतक्या पटकन निर्णय ऐसीवर होत नाहीत. "मनात पडलेले प्रश्न"चा त्रिशतकी धागा झाला पाहिजे याच्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं आता हेच नाव ठेवतेय - शुचिमामी Wink
१०१% नक्की

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मी तुला नेहेमीच शुची म्हणून ओळखते. तुझं खरं नाव आठवायलाही मला कष्ट करावे लागतात. हेच नाव असूदेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येस्स्स्स्स्स्स्स यहीच नाम रहेगा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

आदुगर मला शुचि म्हंजे शुभदा चित्रे अस वाटल व्हत. त्याण्ला इचारलबी व्हत मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आदुगर मला शुचि म्हंजे शुभदा चित्रे अस वाटल व्हत.

मला तर शुद्धलेखन चिकित्सा वाटलं होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ मलाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला "शुमाकर चिडला" असं वाटलं होतं.

(काहीही...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला तर.......

जाऊ दे. नै सांगता येणार. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काय काय? शुचि मंजे शू ची जागा? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी काय बोल्लो नाय बर्का !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे हो काय? तुमचा गिरीराज सिंग होऊ देऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..सहमत..ती कॉमेंट नसती तर बरं वाटलं असतं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद गवि. मला फार काही विशेष वाटलं नाही कारण एका कानाने ऐकून दुसर्‍याने सोडून दिले होते Smile जोक है समझके.
पण तिमा अन तुम्हाला जे वाटलं ते मला सोडून देण्यासारखे वाटले नाही. म्हणून हा प्रतिसाद. Smile परत थँक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

ती कमेंट मला विशेष धमाल्/विनोदी वाटली नाही.
विशेष वाईट्/निंद्य वगैरेही वाटली नाही.
फारतर विनोदाचा फसलेला प्रयत्न. पण ह्याउप्प्राआ काहीही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

well said Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

सहमत आहे. लहान मुले करतात त्या प्रतलावरचा कमेंट आहे. अलिकडे मुलासोबत जास्त गपाट्या मारण्याचा प्रयत्न असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाईस!!!!
फक्त मी लहान मुलगी नाही एवढाच बारकाव्यातला फरक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

"वय हा आकडा नाही; ती वृत्ती आहे " असं हल्लीच्या काही सेल्फ हेल्प बुकात, तथाकथित इन्स्पिरेशनल संदेशात लिहून आलेलं असतं ब्वा.
ते पाहू गेल्यास.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गझब किया ... तेरे वादे पे ऐतबार किया
तमाम उम्र कयामत का इंतिजार किया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोटीमोटी बातों पर ध्यान देना ही नही चाहिये. मनुष्यको चाहिये ... के ... मनुष्य की अंतरात्मा मे झांकने का प्रयास करे. क्यों की सबसे महत्वपूर्ण बात है मन की सफाई ____ दशरथप्रसाद शर्मा (रामप्रसाद शर्मा ऑफ गोलमाल फेम ... के स्वर्गवासी पिताश्री)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां आता अगदी स्वतःवर ओढवून घेणं असलं, तरी या "काव्या" या आय डी वर या धाग्याचा व्यवस्थित समाचार घेते. = aggressively defend करते. कारण एकच सध्या मंगळ लग्नात आहे अन मला त्यामुळे एकदम टुणटुणीत वाटतय. Wink .... नाही तसे नाही पण खरच मनच मोकळं करते Smile
.
(१) सर्वात प्रथम मी इतके आय डीज बदलले त्याचे कारण मला माझी एक विशिष्ठ वृत्ती किंबहुना compulsion बदलायचे होते. ते जे की जमत नव्हते-नव्हते-नव्हते.
.
(२) अर्थात आय डी बदलला की वृत्ती जादूने बदलत नाही. त्याकरता प्रयत्नांची कास धरावी लागते, आत्मपरीक्षण लागते - माझ्या डोक्यात या common sense चा उजेड फार उशीरा पडला हे सत्य आहे.
.
(३) मला समंकडून ताकीद/तंबी मिळाली नाही आणि संस्थळाची ही लवचिकता , हे feature मी वापरु शकले, म-न-मु-रा-द वापरले (कदाचित काहींचे म्हणणे असेल की abuse केले) या बद्दल मी व्यवस्थापकांची ऋणी आहे.
.
(४) आजच राघांची कोणाच्या तरी खवतील Comment वाचली की - Be a Contributor. Grow up. त्यातील "Grow up." भाग वगळा. पण ती सूचना मला अतिशय आवडली. याचे एक कारण हेच मी तीव्रतेने Contributor होऊ इच्छिते.
.
...... ४-अ - Contributor म्हणजे नळ गळल्यासारखे जुलाबी धागे काढणे नव्हे (:( हे कळायलाही फार उशीर झाला ते सोडा.)
.
......४-ब - पण एकोळी प्रतिसाद व स्मायली हे Contribution निश्चितच नाही - हे १००% मान्य आहे.
.
पण मग प्रश्न उद्भवतो ideal Contributor कसा असतो? तुम्हाला काय वाटतं?
.
(५) माझा आय डी dysfunctional आहे हे मान्य आहे. अर्थात हे मान्य केले म्हणजे जबाबदारी टाळली असे होत नाही. तसा हेतूही नाही. फक्त म्हणणं हे आहे की - Yes, my ID is dysfunctional. अन कोणत्याही club (साभार-निळे) मध्ये वावरायचे काही संकेत असतात ते धुडकावले तर तुम्ही त्या club चे सदस्य होत नाही फक्त नवखे अन odd बनून रहाता. हेदेखील मला मान्य आहे.
.
(६) परंतु मला हे कुतुहल आहे की आय डी ओळखून आपण नक्की काय साध्य करतो? हा सध्या "पांडुरंग" नावाने वावरणारा हा बॅट्या आहे हे कळल्याने नक्की काय फरक पडतो? "पांडुरंग" व "बॅट्या" हे place holder आहेत. -
.
.....(६-अ)आपण फक्त मनातील प्रतिमेस उजाळा देतो?
.
.....(६-ब)त्या व्यक्तीला त्या प्रतिमेत कैद करतो?
.
.....(६-क) त्या व्यक्तीकडून त्याच त्याच चूकांच्या अपेक्षा करतो
.
......(६-ड)की त्या व्यक्तीची तीच तीच बलस्थाने शोधू लागतो? नक्की काय होतं?
.
(७) महत्त्वाचा हा प्रश्न आहे की - अनेक आय डी घेतल्याने, संस्थळास काय हानी पोचते? Sad या प्रश्नाचे उत्तर crucial आहे. की त्यामुळे डाटाबेसवर भार पडतो की बॅन्ड्विड्थ जास्त जाते की अजुन काही?

.
(८) अन शेवटचं हे की अन्य संस्थळावरती असल्या थेरांनी जी सालं निघाली असती ती इथे निघाली नाहीत ज्याचे श्रेय सर्व सदस्यांच्या सुसंस्कृतपणाला व सहनशीलतेला जाते. मला हा मुद्दा त्रिवार मान्य आहे. अन या सहनशीलतेबद्दल, मी सर्वांची ऋणी आहे व या थेरांबद्दल दिलगीरही आहे.

* या विषयावरती उद्या सकाळी उत्तरे/प्रतिसाद द्यायला जमेल. त्यापूर्वी जमणार नाही. पण आपण जरुर मते मांडावी कडू अथवा गोड कशीही. Let the bashing begin Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परंतु मला हे कुतुहल आहे की आय डी ओळखून आपण नक्की काय साध्य करतो?

शुचि ताई - ह्याच धाग्यावर आधी मी विचारले होते की आयडी बदलण्या मागे थॉट प्रोसेस काय आहे? त्याचे तुम्ही फारच थोडे उत्तर दिले आहे. त्याचे उत्तर द्यायच्या आधी तुम्ही दुसर्‍यांनाच हा प्रश्न विचारत आहात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(२) अर्थात आय डी बदलला की वृत्ती जादूने बदलत नाही. त्याकरता प्रयत्नांची कास धरावी लागते, आत्मपरीक्षण लागते - माझ्या डोक्यात या common sense चा उजेड फार उशीरा पडला हे सत्य आहे.

शुचीताई - खरे तर आयडी बदलण्याचा उपाय तुम्ही नीट वापरलात तर वृत्तीत थोडाफार फरक पडु शकतो.
त्या साठी तुम्हाला नक्की काय बदल हवा आहे ते ठरवायला पाहीजे आणि जो नविन आयडी तयार कराल त्याचे मानसिक प्रोफाइल तुम्हाला जसा बदल हवा आहे तसे मनाशी ठरवायला लागेल. आणि जितका वेळ त्या आयडी ने ऐसी वर आहात तितक्यावेळ त्या प्रोफाईल प्रमाणेच वागण्याचा नियम केला पाहीजे.
विचारांनी जसे वर्तन बदलते तसेच सातत्यपूर्ण वर्तनानी विचार पण बदलायला लागतात.

सध्या काय होतय की, तुम्ही फक्त नविन आय्डी घेताय, पण त्या आयडीच्या प्रोफाईल मधे काहीच बदल नाहीये. इतकेच काय, तुम्ही जे आयडी घेता, त्यांची नावे बघताच लक्षात येते की हा शुचिताईंचा आयडी आहे. काव्या हा नविन आयडी बघितल्या बघितल्या मला वाटले होते की ह्या शुचि ताईच असणार.

ता.क. : हेच तुमच्या खरडवहीत लिहायचे होते पण तुमचा हा आयडी चे अस्तीत्व पुढचे एक मिनिट तरी आहे की नाही ही खात्री नसल्यामुळे इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

गुंडोपंत हा (माजी) जालआयडी या प्रकाराचा मानदंड समजता येईल. गुंडोपंत हा आयडी धारण करणारी व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात तशी नाही. पण त्यांनी गुंडोपंत या आयडीचे बेअरिंग उत्तम सांभाळले होते.

परंतु काव्या हा आयडी घेऊन शुचिमामींनी जे अकांडतांडव केले ते खचितच वेगळे बेअरिंग होते. त्यामुळे संशय आलेल्या लोकांना सुद्धा क्षणभर दचकावे लागले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शुचिमामींनी जे अकांडतांडव केले ते खचितच वेगळे बेअरिंग होते

त्यांनी इंग्रजी कवितेचा धागा काढला तेंव्हाच कळले की ह्या शुचीताई आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परफेक्ट.. शिवाय जुण्या जाणत्या आहेत हे पहिल्या प्रतिसादापासूनच दिसलंच.

कितीही आयडी बदलले, कितीही वेगळी शैली घेण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक व्यक्तीच्या लिखाणावर त्याच्या अंगठ्याच्या ठशातल्या रेषांप्रमाणे एक खोलवर रुजलेली "सिग्नेचर" एखाद्या वॉटरमार्कसारखी राहतेच.

ठराविक अक्षरे दीर्घ काढणे, एखादा शब्द आवडता असणे..एखाद्याच शब्दाला लिहिण्याची वेगळी लकब.. असंख्य गोष्टींचा समूह होऊन ही सिग्नेचर बनते.

या सर्व छापील सिग्नेचर्सच्या वरताण वैचारिक सिग्नेचर असते. कितीही दाबून ठेवली तरी अंतरीचा आत्मा उसळतोच वर. त्यामुळे आयडी बदलून लपता येत नाही. जर लपायचे असेल तर गप्प, वाचनमात्रच लपावे लागेल. चार वाक्यापेक्षा जास्त आकाराचे काहीही लिहूनसवरुन तरीही लपणे जवळजवळ अशक्य.

शुचिताईच नव्हे, सर्वच आयडींना हे लागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने