उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - ९

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अ‍ॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============
फोर्टात बर्मा-बर्मा येथे या शनिवारी खाण्याचा योग आला. अँबियन्स छान आहे. अन्नाची चवही उत्तम. आम्ही स्टार्टर्स साठी गाजर-आल्याच्या सुपातला समोसा तर मेघना-ऋ ने मुळ्याचं सूप घेतलं होतं. ड्राय खौसी, एक कसलातरी पिवळ्या रंगाचा मसाले भात(त्यात काळे तीळही होते), न्यूडल्स आणि मंडाली मीशे (ब्रॉथ विथ व्हेजिटेबल्स) असं सगळं ऑर्डर केलं होतं. मंडाली मीशे थोडंसं चवीला सपक होतं, बाकी सर्व चवीला सर्वच उत्तम होतं. आम्ही खूप उशीरा गेल्यामुळे सगळी ऑर्डर एकदाच द्यावी लागली आणि नंतर डेझर्ट वगैरे मागवण्याच्या आधीच हाती बिल मिळालं. असो. पण त्यामुळं आता दुसर्‍यांदा तिथे नक्कीच जाणं होईल.
तिथली छोटीशी चहाची किटली आणि बर्मी छत्र्या खूप आवडल्या.

सगळ्यात वेगळं म्हणजे तिथलं टॉयलेट खूप स्वच्छ होतं, बर्माच्या इंटरेस्टिंग गोष्टी आणि फोटोज तिथे लावले होते.

5
Your rating: None Average: 5 (1 vote)

पुण्यात जंगली महाराज

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

तुम्हारे महल चौपारें | यही रह जायेंगे सारे |
अकड किस बात की प्यारें | ये सर फिर भी झुकाना है ||

या

या धाग्याचे'खाण्यातजास्तीतजास्तबाहेख्याली हा पुरस्कार श्री घनू यांना देण्यात येत आहे ... ( एवढे सगळे खाऊन जी काय आहे ती 'फिगर' टिकवायला कुठे जिमतात हेही बघायला पाहिजे ) ( खरं तर यहा पुरस्कारा गॉथमवासी पण पटकाऊ शकले असते , पण त्यांनी त्यांचे वलंदेज देशातील कारनामे धाग्याओ आणले नाहीत ). गोग्गोड खाऊ पुरस्कार बॅटमॅन आणि ढेरे शास्रीना विभागून. उरलेल्याना उत्तेजनार्थ 'प्रयत्न वाढवा' पुरस्कार

अण्णा तुमची खंबीर साथ पायजेल,

अण्णा तुमची खंबीर साथ पायजेल, आम्हीही मग पटकावू हा पुरस्कार!

अहो , आता तुमचे दिवस . तुम्ही

अहो , आता तुमचे दिवस . तुम्ही ,घनू ,ढेरेशास्त्री,बॅटमॅन वगैरे नि नवीन जागा शोधाव्या , इतरां सांगाव्या ,अशी ससे करावी , अशी अपेक्षा ......................... ब्लु डायमंडी झूल आता पूर्णपणे उतरलेल्या डेक्कन रॉंदेवू तुन जस्ट घरी येतोय आत्ता.. अवांतर : आला नाहीस पराडाईज ला बऱ्याच रविवारी ?

आर्थर्स थीम उत्तमच, पण

आर्थर्स थीम उत्तमच, पण त्याच्या मागच्या गल्लीत गेल्यास जबरी रत्ने हाती लागतील. फ्रेंच विंडो नामक जबरी बेकरी, स्क्विसितो नामक इटालियन थिन क्रस्ट पिझ्झा व अन्य ऑथेंटिक गोष्टी मिळणारे उत्तम हाटेल व मलाका स्पाईस हे आग्नेय आशियायी जेवणवाले हाटेल ही तीन ठिकाणे आर्थर्स थीमपासून अक्षरशः १००-२०० मीटरवर आहेत.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आर्थर्स थीमच्या पुढे थोड्या

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

स्क्विझिटोला गेलोय. छान आहे.

स्क्विझिटोला गेलोय. छान आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मग लगेहाथ फ्रेंच विंडोला

मग लगेहाथ फ्रेंच विंडोला गेलेलात की नाही? ती फ्रेंच बेकरी एक नंबर जबर्‍या आहे. मालक उंचापुरा किरिस्ताव आहे पण मराठी अगदी शुद्ध बोलतो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

नाय. फ्रेंच विंदोला नाय गेलो.

नाय. फ्रेंच विंदोला नाय गेलो. पण अलिकडेच लव, शुगर, डो नामक दुकान/बेकरीत गेलो होतो. राहुल टॉकीज शेजारी. चीज केक मस्तं होता.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

'शुगर डो' आणि 'मायनस एट्टीन डीग्री'

हे शुगर डो, बाणेर-पाषाण लिंक रोड वर देखील एवढ्यातच सुरु झालंय (एवढ्यात म्हणजे तरी अता ६ महिने होऊन गेले असतिल). तिथे गेलो होतो एका रविवारी रात्री. चिझ केक खाल्ला नाही पण इतर जे बाकी पदार्थ खाल्ले ते ठिकठिक होते.

बाणेर रोडला (म्हणजे हॉटेल ग्रिनपार्कच्या जरा पुढे बाणेरकडे जाणार्‍या रस्त्याला)'मायनस एट्टीन डीग्री' नावाचा एक छोटेखानी रेस्टो-कॅफे आहे. अत्तापर्यंत तिथे खाल्लेले आणि प्यायलेले पदार्थ फार छान आहेत. गोडात म्हणायचं झालं तर तिथले मफिन्स, पेस्ट्रीज, मॅक्रुन्स, ब्राउनिज(+सिझलिंग) हे अत्तापर्यंत चांगलेच होते. चिझकेक इथेही ट्राय केला नाहीये पण आजवरच्या अनुभवावरून तिथला चिझकेकही उत्तम असावा असा विश्वासपुर्ण-अंदाज.

- १८

+ १
अतिशय आवडता कॅफे, खूपदा जाणं होतं!

मेर्सी बूकू! पुण्यातील उत्तम

मेर्सी बूकू! पुण्यातील उत्तम युवरूपियन बेकर्‍यांची संख्या वाढतेय! हिकडे जाऊन अता ट्राय करणे आले.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

बघायला पाहिजे ...कुठला चीज

बघायला पाहिजे ...कुठला चीज केक खाल्लात ? (काही काही ठिकाणी लेमन चीज केक नावानी जवळ जवळ श्रीखंड भरवतात .. टिपिकल उडप्याच्या पंजाबी कम काँटी कम इटालियन कम पण भाजी टाईप रेस्टोज मध्ये )

एकच व्हरायटी होती. चीज केक या

एकच व्हरायटी होती. चीज केक या नावाने. तुम्हाला उत्साह असेल तर औंधला ला बूशी दॉर म्हणून पण आहे एक बेकरी/बुलाँजरी ती पण बेश्टे केक्/पेस्ट्री/ब्रेड साठी.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

पुन्हा एकदा ( दुसरे) आर्थर'स

पुन्हा एकदा ( दुसरे) आर्थर'स थीम : कोरेगाव पार्क मध्ये बऱ्याच वर्षांपासून आर्थर'स थीम आहे . अत्यंत कन्सिस्टंटली चांगले कॉंटिनेंटल मिळण्याची जागा . अतिप्रिय . म्हणून बाणेर रोड च्या शेवटी शेवटी उजवीकडील क्रॉस रस्त्यावर बालेवाडी हाय स्ट्रीट ( सालं काय नाव ए , उद्या दगडेवाडी वॉल स्ट्रीट येईल)नावाच्या भागात आर्थर'स थीम चालू झाले आहे असे समजल्याने ,काल चाकं तिकडे वळवली .अपेक्षा अशी होती कि मूळ रेस्टॉरंट च्याच दर्जाचा नवीन मेन्यू मिळेल. पण जुनाच मेनू निघाला.पण तोच उत्तम दर्जा आणि चवही असल्याने तरीही अत्यंत समाधानानं बाहेर आलो. कॉंटिनेंटल पदार्थांची रुचीअसल्यास जरूर जावं अशी जागा. याच्याच शेजारी बरीच इंटरेस्टींग रेस्टॉरंट्स दिसल्याने आता इकडे वारंवार येणे आले.

मी ही पहिल्यांदा अर्थर्स थीम

मी ही पहिल्यांदा अर्थर्स थीम मधे गेलो ते बालेवाडीतल्याच. खाय खाल्लं ते आठवत नाही पण तिथल्या चविपेक्षा त्या रेस्टॉरंटच्या भयाण सॉफेस्टीकेशनची आठवण मात्र अजून आहे. कदाचित म्युझिक वगैरे काही चालू नव्हतं बॅकग्राउंड्ला. हॉटेल बर्‍यापैकी माणसांनी भरलेलं होतं पण तरिही सगळे शांततेने (फक्त खायलाच आल्यासारखे) खात होते. वेटर्स पण शांत-लयित आणि शर्टाला घड्यापडणार नाही ह्याची काळजी आणि तितपत वाकतच ऑर्डर घेत होते. त्या अति-सोफेस्टीकेशनच्या वातावरणात मला गरगरायला झालं. ह्याअधिही काही फाईन-डाईन अगदी ३-५ स्टार फाईन-डाईन मधे गेलोय पण हे असलं अंगावर येणार सॉफेस्टीकेशन मात्र अर्थरलाच अनुभवायला मिळालं.
काँटीनेंटल खायचं असल्यास त्याच रांगेत 'इनकॉग्नीटो' (मला आर्थरपेक्षा इथले ईटालियन पदार्थ जास्त सरस वाटले, पण इथे जाम वेटींग असतं ब्वा) किंवा 'अर्बन फाऊंड्री' देखिल चांगले पर्याय आहेत. 'कॅफे मेजिस्तो' हे शेफ-दिपूचं चांगलं कॅफे आहे, जरा महागडी च्याव-म्याव करायची असेल तर चांगला पर्याय आहे, शेफ-दिपूपण तिथेच पडीक असतो आणि टीवीवर त्याच्या रेसपिज चे विडिओ चालू असतात.

आता उरलेल्या ठिकाणी जाणार

आता उरलेल्या ठिकाणी जाणार आहेच . Kp मधल्या आर्थर'स थिम मध्ये तुम्ही म्हणता तसे भयाण वातावरण कधीच नसे. कालही तसे वाटले नाही . सर्वसामान्य होते. तुम्ही काही विशेष मुहूर्तावर गेला होतात का ? ( म्हणजे काय माहित नाही पण त्या अमूशेच्या भयाण राती .. वगैरे ) मला हे प्रिय कारण अत्यंत कॉन्सिस्टंटली चांगली चव , वर्षानुवर्षे ...

आर्थर्स थीम म्हणजे "मार्की दि

आर्थर्स थीम म्हणजे "मार्की दि सेद", "मारी आंत्वानेत" वगैरे ऐतिहासिक डिशेस मिळणारं हाटेल ना?

...आबा कावत्यात!

होय होय तेच ते .. मी कोणीतरी

होय होय तेच ते .. मी कोणीतरी प्रिन्सेस खाल्ली ..

स्पेशल वडापाव

खादाडीपायी भटकण्याच्या नादात वडापाव आणि सँडविचचा संगम करून स्पेशल वडापाव नामे प्रकार खाण्यात आला ... गोरेगावात पूर्वेला खोपोलीचा वडापाव कित्येक वर्ष ज्याम फेमस आहे .. त्याच्या बरोब्बर समोर एक वडापावचा बेनामी स्टॉल आहे.. पदार्थांच्या नावावरून त्याचे नाव पांडुरंग आहे हे हे समजले .. अस्मादिकांच्या भाऊसाहेबांनी अगोदरच खोपोलीच्या समोरच्या स्टॉल वर स्पेशल वडापाव ज्याम भारी मिळतो म्हणून माहिती दिली असल्याने दुसरे काही खाण्याची हुशारी करण्याचा प्रश्नच नव्हता ...
स्टॉलवाल्या काकांनी एका डिश मध्ये पाव चिरून त्यात तीन प्रकारच्या चटण्या भरल्या , मग त्यात कांदा ,काकडी आणि कोबी बारीक चिरून, टोमॅटो च्या चकत्या लावून घेतल्या , मग कढईतून गरम गरम काढलेला वडा थोडा चेपून पसरट करून त्या पावात सारला .. त्यावर चीझ किसून ,थोडी हिरवी चटणी कोबी आणि भरपूर बारीक शेव पसरून चार तुकडे करून अक्खा ऐवज आमच्या हातात ठेवला ... इथे आधीच गरमागरम वड्याच्या वासाने तोंडाला पाणी सुटलेलं .. पहिला घास तोंडात कोम्बल्याक्षणी सणकून दाद गेली ...ज्यांना वेगळं कॉम्बिनेशन खायला पंचाईत नसते त्यांनी एकदा चाखून पाहायला हरकत नाही .. हा पूर्ण मामला नक्त पंचवीस रुपयांना मिळतो ...

कहीं ये वो तो नहीं?

हा तो स्टॉल नाही

आरे रोड च्या प्रीतम फास्ट फूडला लागून आहे... खोपोली वडापाव च्या अगदी समोर

बॅटमॅन, जंतू, घनू. नेहेमीचे

बॅटमॅन, जंतू, घनू. नेहेमीचे यशस्वी हॉटेल शोधक, सांगा पुण्यातली एखादी नवीन छान जागा.

एवढ्यात विशेष असं नविन ठिकाणी जाणं झालं नाही. पण ढेरेशास्त्रींनी आठवण काढलीच आमची तर असं रिकाम्या पोस्टिने कसं जायचं, म्हणून हे थोडंफार :

१. Spice It- Hotel Ibis : दिवाळी दरम्यान ऑफिसच्या सहकार्‍यांसोबत विमान-नगरच्या 'आयबिस' च्या 'स्पाईस-ईट' ह्या रेस्टॉरंट मधे जाणं झालं. म्हणायला थ्रि-स्टार हॉटेल पण रेस्टॉरंट अतिशय साधारण. आम्ही लंच ला गेलो होतो, बुफे पद्धतिचं जेवण होतं. मेन्यू बद्दल विशेष लिहीण्यासारखं नाही शिवाय पर्याय ही फारच त्रोटक होते. त्या भागात आणि आयबिस सारख्या ठिकाणी प्रत्येकी फक्त ५५०/- होते म्हणुन गेलो पण ते ५५०/- ही वर्थ नव्हते. मी झोमॅटोवर झणझणीत फिडबॅक लिहाला आहे पण त्यांनी त्याला पुसलंही नाही Sad, माज्जोर्डे... हा तो फिडबॅक http://www.zoma.to/PneKKK

२. CAFÉ PETERDONUTS Bavdhan : मला हे कॅफे जाम आवडतं. एक तर तिथला 'माहोल', म्युझिक, पदार्थ, इन्टेरिअर - सगळंच मस्तं. कितीही वेळ गप्पा ठोकत बसा, लोळा कोणी घाई करत नाही. पदार्थ ही फर्मास. भरपुर अ‍ॅपेटायझर्स किंवा सॅंडवीचेस मागवायचे आणि सिझन/वेळे नुसार सोबतीला कोल्ड किंवा हॉट कॉफी- बस्स -पोटोबा तृप्त होतो. मला त्यांचे 'हॉट गर्लीक फ्राईज' आवडतात. ह्यात फ्राईज हॉट गार्लीक रेड सॉस मधे टॉस करुन सर्व केल्या जातात. थोड्या आंबट, जरा तिखट आणि लसणीचा फ्लेवर - अहाहा! ड्रिंक मधे, हेझलनट फ्रॅपे उत्तम - संपुच नये असं, प्रमाणात गोड आणि थंडावा. ऑम्लेट्स,पास्ता, बर्गर, वॅफल हेही चांगलं असतं. आणि हो, ह्यांचे डोनटस मला मॅड-ओव्हर-डोनट पेक्षा जास्त चांगले वाटले. नक्की जा-च!

CAFÉ PETERDONUTS प्रभात रोडला

CAFÉ PETERDONUTS

प्रभात रोडला हे अनेक दिवसांपासून दिसतय. अजून गेलो नाही. जायला हवं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हो हो, मी ही पहिल्यांदा तिथेच

हो हो, मी ही पहिल्यांदा तिथेच पाहिलेलं. बर्‍याच ठिकाणी आहे त्यांच्या शाखा. औंधेत पण पाहत आलोय मी. पण जाणं झालं ते केवळ बावधनातल्या कॅफेत. ह्याव्यतिरिक्त पिंपरी आणि विमान-नगर मधे आहे.

कोणीतरी कोरिअन कपल मालक आहे

कोणीतरी कोरिअन कपल मालक आहे चेनचं.
http://www.koreatimes.co.kr/www/news/nation/2015/04/654_177845.html

रोचक...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अरे वा, रोचक आहे ही माहिती.

अरे वा, रोचक आहे ही माहिती. त्यांच्या मेन्यूवर कोरियन पदार्थ दिसले पण घ्यायची हिंमत झाली नाही, अता मालकच कोरियन आहेत तर ट्राय करायला हरकत नाही (स्माईल)

औंधात मारू (एम ए आर डब्बल ओ)

औंधात मारू (एम ए आर डब्बल ओ) नामक एक कोरिअन फूडवाले हॉटेल आहे म्हणतात. कधी गेलो नाही, ते रडारवर आहे...

कोरेगाव पार्कात बोतेको नामक ब्रझिलियन जेवण सर्व करणारे हॉटेल आहे. उत्तम चव, पण तुटून पडण्याइतकी खास वाटली नाही. हे चिकनबद्दल. भोपळ्याचे सूप बाकी मस्त होते. पण ओव्हरप्राईस्ड वाटले.

https://www.zomato.com/pune/boteco-koregaon-park

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मारू सापडले तरी जाऊ नका.

मारू सापडले तरी जाऊ नका. कोरिअन जेवणाविषयी निष्कारण अढी तयार होईल.

एवढं वाईट आहे का?

एवढं वाईट आहे का?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सहमती

होय.

ब्राझिलिअन खायला जायला

ब्राझिलिअन खायला जायला पाहिजे. धन्यवाद!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

नवीन हाटेलांत जाणं थांबवलं का

नवीन हाटेलांत जाणं थांबवलं का लोकांनी? बॅटमॅन, जंतू, घनू. नेहेमीचे यशस्वी हॉटेल शोधक, सांगा पुण्यातली एखादी नवीन छान जागा.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

झिंदाबाद, झिंदाबाद

सध्या तंगी आहे त्यामुळे 'घरकी दाल मुर्गी बराबर' नाही तर 'माणुसकीचा परिमळ झिंदाबाद'.
- रशियन मैत्रिणीच्या हंगेरियन मित्रानं दोह्याच्या ड्यूटीफ्रीमधून आणलेल्या फ्रेंच कोन्याकचा आस्वाद घेत घेत दिलेला प्रतिसाद. सोबत अमेरिकन मित्रानं आणलेल्या रायच्या पिठाचा घरी केलेला ब्रेड आणि सोबत ब्रिटनहून आलेलं प्रचंड मॅच्युअर चेडार त्यामुळे जागतिकीकरणसुद्धा झिंदाबादच.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तंगी

पुढली तंगी आली की लगोलग आम्हांलाही कळवा. आम्ही येऊ तुमच्याकडे खायलाप्यायला. (डोळा मारत)

शो ऑफ!!

शो ऑफ!!

न मी

>> शो ऑफ!! <<

अंहं मी डावा नसून उजवा आहे हे सिद्ध करण्याचा तो क्षीण प्रयत्न होता.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'सोडाबॉट्लओपनरवाला

काल रात्री KBC मध्ये 'सोडाबॉट्लओपनरवाला ' मध्ये गेलो.
मस्त इराणी ( पण स्वच्छ ) डेकॉर , अँबियांस . 'द बॉम्बे इराणी दारू मेन्यू ' या हेडिंग खाली असर्वसाधारण कॉकटेल्स ( वोडका विथ कोकम किंवा उसाचा रस वगैरे सारखी 'डेंजर ' कॉकटेल्स ) बावा पेग ९० ml अशी पतियाळा ला लाजवणारी हेडिंग्स . भिंतीवर बावा इसम्स धमाल . फूड टिपिकल इराणी सर्व उपलब्ध . सल्ली बोटी पासून लागन नु कस्टर्ड पर्यंत . टॉयलेट मध्ये ' एम प्रॉपरली डिकरा ' सारखे अपेक्षित पोस्टर्स ( कोणाचेही लक्ष नाही , पण मस्त स्विंग आणि रॉक अँड रोल चालू ,) मस्त जागा !! इराणी खाणे आणि पारशी बावागिरी ज्यांना आवडते त्यांनी नक्की जावे

इराणी की पारशी?

(फरक आहे. दोन्हीं झरथुष्ट्रीच झाले,तरी फरक आहे.)

'द बॉम्बे इराणी दारू मेन्यू' आणि 'एम प्रॉपरली डिकरा'/बावा पेग हे विसंगत वाटते. इराणी मनुष्य 'डिकरा' वगैरे म्हणेल (किंबहुना गुजराती बोलेल), असे वाटत नाही; ती खासियत पारशांची. तसेच, पारशांना जरी 'बावा' म्हणत असले, तरी इराण्यांना म्हणत नसावेत.

शिवाय, करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग, पण 'सल्ली बोटी' हा खासा पारशी प्रकार असावा, इराणी नव्हे. (चूभूद्याघ्या.)

पारसी-इराणी

दोन्हीं झरथुष्ट्रीच झाले,तरी फरक आहे

हे बरोबर आहे.

दोन्ही जमाती (पारसी आणि (हॉटेलवाले) इराणी) दोन्ही झरत्रुष्टीच. दोघेही एकाच अग्यारीत जातात आणि गुजरातीतच बोलतात (दोनेक पिढ्यंपूर्वीपर्यंतचे इराणी 'दरी' नावाची भाषा बोलत. पण आता त्यांनीही गुजरातीच स्वीकारली आहे).

फक्त त्यांच्या कॅलेंडरात एक महिन्याचा फरक आहे! इराणी नववर्ष पारशांच्या एक महिना नंतर येते. त्यांचे तारू वादळात महिनाभर भरकटल्यामुळे ते एक महिना मागे पडले, अशी दंतकथा (ब्रून-मस्का) खातखात सांगितली जाते!

आणखी एक ,(रेस्टो वाले) इराणी

आणखी एक ,(रेस्टो वाले) इराणी बहुधा झोराष्टीयन नसावेत , बहुधा शिया असतात !!

झरथुष्ट्री...

रेष्टारण्टवाली इराणी मंडळी झरथुष्ट्री असल्याबद्दलची माझी माहिती येथून होती. कदाचित अंशतः चुकीची असू शकेल.

(बोले तो, 'इराणी' नावाची एक धर्माने (पारशांप्रमाणेच) झरथुष्ट्री, वंशाने/भौगोलिक उद्गमाने (पारशांप्रमाणेच) इराणोद्भव, परंतु अन्यथा सांस्कृतिक, भाषिक इ. दृष्ट्या पारशांपेक्षा पूर्णपणे वेगळी, आणि मुख्य म्हणजे पारशांच्या आठशेनऊशे वर्षांनंतर हिंदुस्थानात आलेली एक जमात आहे, याबद्दल संदेह नाही. कौंटरमागचे इराणी ते हेच इराणी काय, याबद्दल थोडा संदेह आहे; हा भाग त्या विकीपानावरून उचललेला आहे, कदाचित चुकीचाही असू शकेल.)

कुणास ठाऊक ,पण निदान पराडाईज

कुणास ठाऊक ,पण निदान पराडाईज , गुडलक , सनराईस , मुंबई चे क्यानी यांचे मालक तरी शिया आहेत.इतरांचे बघायला पाहिजे

तर असे आहे कि, मालक पारशी आहे

तर असे आहे कि, मालक पारशी आहे म्हणतात . मेनू मध्ये सर्व पारशी specialities आहेतच.या शिवाय टिपिकल इराणी , (म्हणजे इराण मधील नाही तर गुडलक छाप इराणी)आहेत.(आणि या दोन्ही दुसरीकडे फारश्या मिळत नाहीत)decor मध्ये टिपिकल इराणी रेस्टो फील देण्याचा प्रयत्न केला आहे . मुख्य म्हणजे येथील (म्हंजीभारतातील) रन ऑ द मिल नॉर्थ, साऊथ,काँटी, ओरिएंटल,इटालियन रेस्टो पासून वेगळे आणि विशेष म्हणून लिहिले. एवढंच.

वाह! बेरी पुलाव?

वाह!

बेरी पुलाव?

...आबा कावत्यात!

ई केबीशी का है?

ई केबीशी का है?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हे चुकून kbc टंकले , ते bkc

हे चुकून kbc टंकले ,बरोबर पकडलेत हो इतिहास तज्ञ !!(स्माईल) ते bkc टंकायचे होते .

धन्यवाद, मुंबै खाद्यभ्रमंतीत

धन्यवाद, मुंबै खाद्यभ्रमंतीत अजूनेक ठिकाण अ‍ॅडवल्या गेले आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

" साके सुशी " हे जपानी

" साके सुशी "

हे जपानी पद्ध्तीचे भोजनालय आहे. यात मधोमध एक सरकता पट्टा, (ओव्हल शेप चा असतो ) आणि त्याच्या दुतर्फा टेबल्स असतात. या पट्ट्यावर निरनिराळ्या रंगाच्या प्लेटस असतात. त्यात सुशी (चिकटभाताच्या रोल मधे सीफुड, मांसाहारी, आणि काही शाकाहारी पदार्थ घातलेले ) ठेवलेले असतात. प्रत्येक रंगाच्या प्लेट ची वेगळी किंमत असते. त्या किंमतींचा तक्ता टेबलपाशी ठेवलेला असतो.आपल्याला हवी ती प्लेट सरकत्या पट्ट्यावरून उचलून घ्यायची.त्याच बेल्टवर वसाबी ची बरणीही असते. त्यातली अगदी थोडी (कारण खूप तिखट असते )एका छोट्या वाटीत घेऊन त्यात सोया सॉस घ्यायचा. टेबल्च्या कडेला गरमपाण्याचा एक लहानसा नळ असतो. ग्रीन टी साठी. तिथेच एका सुबक लाकडी पेटीत चॉप स्टिकस आणि कागदी रूमाल ठेवलेले असतात.
सुशी खेरीज वेगवेगळे "डॉन", "उडोन" आणि राईस डिशेश मागवता येतात ( जे त्या सरकत्या पट्ट्यावर नसतात ). यात राईस अथवा नूडल्स बरोबर सीफुड, किंवा इतर मांसाहारी, काही थोडे शाकाहारी पदार्थ असतात. एका लाकडी बाउल मधे गरम मिसो सूप देतात.

भोजनासाठी थोडा जास्त वेळ हातात असेल, तर इथे जरूर जावे.

Green Tea

ग्रीन टी

आणि इतक्या चांगल्या जेवणानंतर आईस्क्रीम हवेच.

Strawbery-Banana rendezvous

Strawberry-Banana rendezvous

तुम्हारे महल चौपारें | यही रह जायेंगे सारे |
अकड किस बात की प्यारें | ये सर फिर भी झुकाना है ||

वासाबी

वसाबी ची बरणीही असते. त्यातली अगदी थोडी (कारण खूप तिखट असते )एका छोट्या वाटीत घेऊन त्यात सोया सॉस घ्यायचा.

तिखट (बोले तो जिभेला) वगैरे नसते फारसे, पण (सोया सॉस घालून पुरेसे डायल्यूट केले नाही, किंवा - गॉड फॉरबिड - नुसतेच खाल्ले, तर) थेट मेंदूला जाऊन भिडते नि झिणझिण्या आणते. (म्हणजे साधारणतः फेसलेली मोहरी खाल्ल्यावर जो येतो, तोच इफेक्ट, फक्त गुणिले किमान शंभर.)

बोले तो, कोणीतरी तुमच्या जिभेला बायपास करून थेट कवटीत शिरले, आणि तुमच्या मेंदूचा कडकडून चावा घेतला, तर काय होईल, याची कल्पना करा. वासाबी नुसते खाल्ल्यास ते होते.

खाण्याची प्रॉपर पद्धत म्हणजे (खास याच कामासाठी बनवलेल्या) इवल्याश्या बशीत भरपूर सोया सॉस, पातळ स्लाइस करून व्हिनेगरमध्ये मुरविलेले आले (व्हिनेगरमध्येच मुरवितात ना?) आणि हे वासाबी, एकत्र घोटायचे, नि मग त्या रसायनात तुमची ती सुशी किंवा साशिमी जो काही कच्च्या माशाचा प्रकार असेल, तो डिपवून खायचा. मात्र, नवशिके असाल, तर हा प्रकार करण्यापूर्वी हाताशी एक भला मोठा (शक्यतो थंडगार) पाण्याने भरलेला जग आणि एक ग्लास आहे, याची खात्री करून घ्यावी; प्रकार पुरेसा डायल्यूट न झाल्यास ज्या झिणझिण्या येतात, त्यानंतर काहीही सुचत नाही.