कैच्याकै कविता ....

एकंदरीतच आंतरजालावरील नवकवितांचे भांडार पाहून आमच्यातला 'इरसाल म्हमईकर' जागा झाला.

कविता..कवि...आणि कैच्याकै कविता...
कधी मुक्यानेच बोलणारी कविता,
तर कधी बिअरसवे डोलणारी..
येता जाता माफी मागणारी कविता....!

झुरळावर स्वार होवून जोमाने
ढेकणावर चढाई करणारी कविता..
आरसे फोडत, वादळात सापडत..
सिगरेटी फुकायला लावणारी कविता...!

अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन्
गोमुत्राची चव शिकवणारी कविता..
आमच्यासारखे समिक्षक असताना..
सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..!

गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना...
तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता..
विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत...
आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...!

डोळ्यासमोरून अलगद फिरताना..
डोक्यावरून जाणारी कविता..
आमच्या मंद डोक्यात मंदपणे..
कैच्याकै भरवणारी कविता...!

वरील कवितेतील आशय कुणाला समजला आहे का? असल्यास त्याला भर चौकात ढोलताशाच्या गजरात, हार तुरे घालुन सुळावर देण्यात येइल. Wink

कैच्याकै नवकवि इरसाल म्हमईकर

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनातल्या मनात आनंदुन घेतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0