माणसे जोडणे ...

आपण "माणसं जोडण्याच्या" मोठमोठया गोष्टी करतो आणि नेहेमी त्याची महती गात असतो.
आपण मित्र जोडतो, इतर सहकारी जोडतो.

पण रक्ताच्या नात्यांनी आधीच आपल्याशी जोडलेल्या माणसांना "जोडण्याचा" प्रयत्न कधी का करत नाही?

बाहेरची माणसे जोडतांना आपण त्यांना गुणदोषांसकट स्वीकारतो पण नात्यातील माणसांना मात्र आयुष्यभर वेगवेगळ्या अपेक्षा आणि नियमांच्या खाली दाबून टाकतो आणि आपण स्वतः मात्र आपल्यात बदल करत नसतो. म्हणून ते अवघड आहे.

कुणी म्हणेल की मित्र निवडतांना चाॅ‌ईस असतो, नात्यात नसतो.

पण देवाने तेच तर एक चॅलेंज दिले आहे आपल्याला. ते म्हणजे : नात्यातील रक्ताने आधीच जोडल्या गेलेल्या माणसांना "जोडण्याचे" काम.

बाहेर च्या "सतराशे साठ" माणसांना जोडले तरी घरातल्या "सात आठ" माणसांपैकी एकालाही "जोडता" आले नसले तर काय उपयोग?

कुणी म्हणेल की नातेवाईकांपेक्षा मित्र तरी कामास येतात.

पण हा स्वार्थ झाला. कारण याचा अर्थ आपण बाहेरची माणसे सुद्धा यासाठीच जोडतो की ते उपयोगाला पडतील.

चाणक्य म्हणतो ते मग खरे आहे का? कोणत्याही मैत्री मागे कोणता न कोणता स्वार्थ असतोच. आणि रक्ताचे विविध नाते तरी कुठे वेगळे आहेत? त्यातही आयुष्यभर स्वार्थ असतोच ...

बघा. पटतंय का?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाहेर च्या "सतराशे साठ" माणसांना जोडले तरी घरातल्या "सात आठ" माणसांपैकी एकालाही "जोडता" आले नसले तर काय उपयोग?

या दोन्हीत नक्की काय संबंध आहे? एक कमी महत्त्वाचं आणि एक जास्त महत्त्वाचं अशी काहीतरी मांडणी त्यात आहेशी वाटते. आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

घरात सात आठ मेंबर असले तरी बरेच वेळा बेबनाव असतो, पण तो बाहेर मात्र अनेक मित्र बाळगून असतो, पण त्याचा काय उपयोग? अशा अर्थाने ते लोहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

का बरे नाही उपयोग? घरातले लोक मित्र असले, तर बाहेरची मैत्री क्वालिफाय होते असे काही आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

देवाने तेच तर एक चॅलेंज दिले आहे आपल्याला. ते म्हणजे : नात्यातील रक्ताने आधीच जोडल्या गेलेल्या माणसांना "जोडण्याचे" काम.

देवाला का बरं मध्ये ओढता? Smile
रक्ताच्या माणसांना वेगळं जोडावं लागत असेल तर ती आपली नव्हेतच असं समजावं का?
बरं बायकांचा तर मोठाच घोळ. (वर घोळाची भाजी वाच्ल्याने हाच शब्द पटकन आठवला) नवर्^याची रक्ताची नाती तिला ( जरा जास्तच मनापासून ) सांभाळत बसावी लागतात. वर स्वतःची आहेतच Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लांबून सगळेच गोड असतात. ह्याच बाहेरच्या लोकांबरोबर रोज राहायला लागा मग ते आपोपाप घरातल्या माणसांसारखेच लांब जातील. दिवसातून २ तास भेटणारे आणि अगदी ऑफीस मध्ये ८ तास भेटणारे त्यांचे सगळेच गुण दाखवतात असे नाही. काहींचे कळते काहींचे कळत नाही. तेंव्हा असे इतके अनुमान काढणे फार बरोबर नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणत्याही मैत्री मागे कोणता न कोणता स्वार्थ असतोच.

असच काही नाही. आता मैलोन मैल अंतरावरच्या मित्र-मैत्रिणींशी आपण खरड व व्यनि तून जोडलेलो असतोच की. हां त्यांच्याशी संपर्क साधून (कनेक्ट होऊन) निखळ आत्मिक आनंद मिळतो त्याला जर तुम्ही स्वार्थाचं लेबल चिकटवणार असाल तर ....निखळ आनंद मिळतो हे खरे आहे. मानसिक एकटेपणा दूर होतो. यात स्वार्थ असेल तर असो बापडा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0