सुक्या घोळीचा रस्सा

साहित्यः
सुक्या घोळीच्या तुकड्यांचे छोटे तुकडे.
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
मसाला २ चमचे जर मिरची पुड वापरणार असाल तर पाऊण ते १ चमचा पुरे.
२ चमचे तांदळाच पिठ
फोडणी साठी तेल २ मोठे चमचे
लिंबा एवढी चिंच
गरजे नुसार मिठ
थोडी चिरलेली कोथिंबीर
१ हिरवी मिरची

पाककृती:
१) सुक्या मशाचे एक ते दिड ईंचाचे तुकडे करून ते पाण्यात ठेवावेत ५ मिनीटांनी खवले जरा मऊ पडली की खवले काढून टाकावी व तुकड्या स्वच्छ धुवुन घ्याव्या.

२) भांड्यामधे तेल गरम करून त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी देऊन कांदा गुलाबी रंगावर परतवावा.

३) आता त्यात हिंग, हळद, मसाला घालून गरजेनुसार पाणी घाला. माश्याच्या तुकड्या घाला. १० मिनीटे हा रस्सा उकळू द्या.
४) ह्या रश्यात मिठ (तुकड्या खारवलेल्या असतात त्यामुळे मिठ थोडे कमीच घालायचे), चिंचेचा कोळ व तांदळाचे पिठ पाण्यात पेस्ट करून सोडा. आता अजून ५ मिनीटे उकळू द्या. वरून मोडलेली मिरची व कोथिंबीर घाला उकळताना व गॅस बंद करा.

टिपा:
सुक्या माश्याचे कालवण अगदी तोपासू लागते. अशाच रावस, पापलेट वगैरे मोठ्या माशांच्या तुकड्याही मिळतात. ह्याच पद्धतीने त्याचे कालवण करता येते.

तांदळाचे पीठ दाटपणासाठी वापरले जाते.
ह्या तुकड्यांना खाराचे मासेही म्हटले जाते.
सुक्या घोळीच्या तुकड्या बाजारात मिळतात. सुकी घोळ नीट पारखुन घ्यावी. चांगली कडकडीत सुकलेल्या व खाली फोटोत अशी मोठी खवले दिसतात तशा खवले असलेल्या तुकड्या घ्यायच्या. खवल्यांमुळे मासा घोळीचा आहे की दुसरा ते लक्षात येत. घोळीची खवले खाली फोटोत देत आहे.

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

अहाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा प्रकार कधी खाल्लेला नाही. आता खावा लागेलसं दिसतं! धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वॉव.. मस्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच!
माझे दोन प्रश्न :
१. सुक्या माश्यांचा वास येत नाही का जास्त (स्टींकी)? (बोंबील च्या अनुभवावरुन हा प्रश्न विचारावा वाटला).
२. हिरवी मिरची अशी मोडून वरून टाकण्यामागे काही विशेष कारण? (मुळ चवीला किंवा रस्स्याला मिरचीने डॉमीनेट करू नये म्हणून असे असावे का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनु मासे व्यवस्थित सुकले असतील तर कुबट वास येत नाही. शिवाय योग्य प्रमाणात चिंच घालायची, मिरची आणि कोथिंबीर मोडून घातल्याने त्यांचे स्वाद रश्य्यात उतरतात असा माझा अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव! खरंच तोंपासु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ताजी घोळ खाल्ली आहे, सुकी अद्याप नाही. आणून बघायला हवी.

बादवे, सध्याच्या ह्या ताज्या मासळीच्या मोसमात मुद्दामहून सुकी का करावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुनिल चेंज म्हणून कधीतरी करायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कीच! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याकडे नेमके जेवायच्या वेळी टपकणारे अनेक पाहुणे-मित्रमंडळी असतील नाही? Smile

मसाला घालून

कोणता मसाला वापरला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खपले. मस्त फोटो व रेसिपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0