धनु राशीच्या शुक्रास पत्र

अन्यत्र पूर्वप्रकाशित.

धनु राशीच्या शुक्रास पत्र -

या अप्रतिम लेखाचे स्वैर भाषांतर -

बरेच दिवस तुला सांगेन सांगेन असे म्हणत आहे - मला तू फार आवडतोस. स्वच्छंद, मनास येइल तिथे मनास येईल तेव्हा विहरणारा मनमौजी तू, या वीकेंडला एखाद्या किल्ल्यावर भटकून ये तर एखाद्या आठवड्यात कुठे फिल्म फेस्टिव्हलचाच बेत आख, क्वचित गर्दीपासून दूर वसलेल्या शांत खेड्याची सहल कर तर कुठे तळ्याकाठी पुस्तक वाचत बस. तुझ्या पायाला भिंगरी ही सदाचीच.
बरं ही झाली तुझी प्रत्यक्ष केलेली भटकंती, मनाने केलेल्या प्रवासांना तर मर्यादाच नाही. तुझ्या कपाटात दर वेळेला मी नवीन नवीन पुस्तके पाहते. ऐतिहासिक, अध्यात्मिक, तत्वज्ञानाची, प्रवासवर्णनांची, कादंबर्‍या किती किती म्हणून सांगू. या जादुई पुस्तकांवर बसून, मनाने कित्येक देश-विदेश फिरुन येतोस तू. परक्या भाषांतील सिनेमे, संगीत हेदेखील तुझ्या खास आवडीचे. मनाने खराखुरा जिप्सी च तू, असा कसा सतत क्षितीजे विस्तारण्याच्या ध्येयाने झपाटलेला, खोल तत्वज्ञानात डुंबणारा!

जे जे उदात्त त्याचा तुला वेध. सत्यात रमणारा मस्त कलंदर असा तू. पण तुझ्यात काहीच दुर्गुण नाहीत असे काही नाही बरं का. कुठे बांधून घेणे तुला जमलय का कधी? चाकोरीचा तिटकारा असणार्‍या तुला एखाद्या व्यक्तीशी, जागेशी इतकच काय एखाद्या तत्वाशी एकनिष्ठ होणं अवघडच जातं. मध्ये तू सलग ३ महीने घरभाडे चुकते करण्याचे विसरलास, आणि मी विषय काढला की तू विषयांतर करायचास. जरा स्थिर हो एवढच माझं म्हणणं. तुझ्या जीवनाच्या तारुला कुठेतरी नांगर घाल, थोडा श्वास घे. पण नाही, कमिट करण्याची तुला अनाठायी भीती. मी काय म्हणते जरा एका जागी स्थिरावलास तर तुलाच तुझ्या आवडीच्या क्षेत्रांत , अधिक संधी मिळतील - जसे शिकविणे, तत्वज्ञान इतरांबरोबर वाटणे, क्षितीजे विस्तृत करणे वगैरे. स्थैर्य हे तुझ्यासाठी बंधन नाही होणार , उलट एक आकर्षक पैलूच जडेल तुझ्या मनस्वी , पक्ष्यासारख्या स्वच्छंदतेला.

तुला असलेली सच्च्या मैत्रीची किंमत जाणते मी. "मैत्री" - जादूभरा शब्द आहे नाही तुझ्यासाठी? असा किंवा अशी एक सवंगडी जिच्यासोबत शारीरीक, बौद्धीक, मानसिक भरारी घेत घेत तू नवे नवे प्रांत पादाक्रांत करशील. असा सखा जो ना कधी फसवेल, ना ठकवेल, ज्याला सत्याची चाड आसेल, जो जीवश्चकंठश्च असेल. ज्याला तुझ्यासमच उदात्ततेचे, महानतेचे वेड असेल.

मला कसे माहीत? अरे वेड्या भरभरुन बोलताना तूच नाही का मला सांगीतलस एके दिवशी? कोणालाही कोणत्याही परीस्थितीत, कशाही बद्दल जज न करणे हीच प्रेमाचे, संपूर्ण स्वीकाराचे लक्षण असे तूच नाही का म्हणालास? विसरलास? गुरु ग्रहाचे भाग्य तुला नेहमीच साथ देत मग ते जुगारात असो वा अगदी मैत्रीत किंवा प्रेमात. तसेही मैत्री व प्रेम या दोन भिन्न संकल्पना नाहीच तुझ्यासाठी. माझं मागणं एवढच की मानवी स्वभावातील महन्मंगलतेचा, उदात्ततेचा शोध तू असाच चालू ठेवावास. आकाशातील तार्‍यावर बाण सोडणार्‍या तुझे पाय मात्र घट्ट जमिनीवर स्थिर असावेत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

रोचक! अशा स्वच्छंदी नी मनस्वी व्यक्ती भेटतात, कित्येकदा अगदी थोडा काळ पण आनंद पखरतात.
मात्र वर्णन केलेल्या अस्थैर्यामुळे हा आनंद त्यांच्या आयुष्यात नेहमीच टिकतोच असे नाही.

==

या मागच्या फलज्योतिषाला पास! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या मागच्या फलज्योतिषाला पास!

का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला द्यायचाय म्हणून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लिहीलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ऋ, अनुप, टिंकू.
हा बघा तक्ता ज्यातून तुमची शुक्र रास काढता येते - http://www.astro.com/swisseph/venus.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टौरस Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त! सुंदरच. माझी धनु आहे. तू क्रिचर ऑफ गुड टेस्ट अन कंफर्ट असशील Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे कन्या, रैट?

बादवे - आपल्याकडील राशींची नावं आणि पाश्चात्य संस्कृतीमधील राशींच्या नावांमध्ये एवढं साधर्म्य का बरं... म्हणजे आपला वृषभ तो त्यांचा टॉरस (दोन्हीकडे बैलच) असं का? खरं तर आकाशात पाहिलं तर तो फोकलीचा बैल नाही तर खेकडा नाही तर सिंह काही केल्या दिसत नाही.... च्यामायला मग ठिपके कसेही जोडा....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेमिनी म्हणजे मिथुन, व्हर्गो म्हणजे कन्या.
वृषभाचा ठळक व्ही (ज्यात रोहिणी येते) हा त्याच्या थोबाडाचा आणि शिंगाचा भाग आहे. चूभूदेघे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढिल राशींचे आकार मला मुळ वर्णनाशी जवळचे वाटतात
बरेच सारखे:
१. वृषभ
२. सिंह
३. तुळ
४. वृश्चिक

जरा ओढून ताणून पण ठीक
१. मिथून
२. मकर
३. मीन

बाकीचे म्हंजे बळंच आहेत Wink

आणि हो इंग्रजी आणि आपल्या तारकासमुहांची नावे काहीवेळा सारखी असली तरी त्यात समाविष्ट तारका नेहमीच त्याच असतील असे नव्हे

उदा. आपला मृग नी त्यांचा यांत वर्णन, तारका सगळेच वेगळे आहे.
वृषभ आणि टॉरसबद्द्लही तेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते विंचवाचं कॉन्स्ट्लेशन भारी दिसतं बरं का. अगदी नांगीसकट. प्रचंड सुंदर दिसतं. बाकीची कॉन्स्टलेशन्स (मराठी शब्द? तारकांगणे?) कळत नाहीत मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राशी हे प्रकरण आपल्याकडे आयात केलं गेलं आहे. राशी म्हणजे सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गाचे बारा भाग. भारतात नक्षत्रं वापरत असत.

भारतीय कालगणना चांद्र कालगणना आहे. चंद्राचा आकाशातला मार्ग २७ भागांमध्ये विभागला आणि ती नक्षत्रं. भारतीय महिन्यांची नावंसुद्धा नक्षत्रांवरून आलेली आहे. महिन्यातल्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्यावरून महिन्याचं नाव पडतं. चित्रा-चैत्र, विशाखा-वैशाख, इत्यादि. मृग नक्षत्र म्हणत असले तरीही मृगशीर्ष असा तारकासमूह आहे (महिन्याचं नाव मार्गशीर्ष). आणि आकाशात त्याच तीन ताऱ्यांमध्ये हरीण (मृगशीर्ष) किंवा योद्धा (ओरायन) यांची डोकी बसवलेली आहेत.

याशिवाय आकाशाचा बराच भाग आहे, ज्यात वेगवेगळे तारकासमूह आहेत. वेगवेगळ्या संस्कृतींनी त्या ताऱ्यांमध्ये आपापल्या (सुरस, रंजक = लफडेल) पुराणकथा त्यात बसवल्या. त्या सगळ्यांमध्ये बराच फरक आहे. पण सूर्याचा भासमान भ्रमणमार्ग सगळीकडे एकच असल्यामुळे आणि राशींची संकल्पना तशीही आयात केलेलीच असल्यामुळे ते साधर्म्य आहे.

---

धनू राशीत धनुष्य बघू शकणाऱ्या लोकांबद्दल मला निराळाच आदर वाटतो. मला तिथे कायम चहाची किटली दिसते. (थंडीचे दिवस असतील तर चहाची जरा जास्तच आठवण येते.) करोना बोरीयालिस (उत्तर मुकुट) नावाचा तारकासमूह भारतातून सहज दिसतो. बघितलं तर तो मुकुट आहे, म्हटलं तर भिकाऱ्याचा कटोरा. (कृपया यात तत्त्वज्ञान शोधू नये.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कृपया यात तत्त्वज्ञान शोधू नये.

ROFL

रंजक = लफडेल

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0