सोनसाखळी

तो तसा खानदानी सर्टीफ़ाइड, म्हणजे –वडिल-आजा-पणजा माहित असलेला, फ़ॅमिली ट्री असलेला, ब्लु ब्लडेड !
साहेबांनी जास्त किंमत मोजुन आणलेला, शिवाय सॉलीड ट्रेन्ड !
शॉक्स- स्टीक्स –हंगर- रीपीटेशन ( दिडशे मिनीमम पर डे एका अचुक विधीने टांग उचलण्यासाठी ) देउन केलेला ट्रेन्ड
सॅल्युट ! म्हणताच विशिष्ट पोज देणारा, दिल जीतने वाला कुत्ता ! माणसांहुन जास्त वफ़ादार !
साहेब प्रेमळ ,पट्टा क्लासी लेदरचा, आणि गोल्ड प्लेटेड सोनसाखळी.
साहेब नियमीत सकाळचा फ़ेरफ़टका मारतांना त्याला बरोबर नेतात, बरोबर ताफ़ाच असतो.साहेबांच्या.
साहेब मात्र सोनसाखळी घट्ट धरुन ठेवतात फ़ारच नाईलाज झाला तरच गार्ड ला देतात.
पण तो जरा उत्सुक झाला कुठे, थबकु लागला, मर्यादा सोडु लागला, तर बरोब्बर ताण देउन ओढतात.
साखळी हातात ठेउन कंट्रोल ठेवणं साहेबांना नेहमीच छान च जमत. नव्हे व्यसनच आहे त्यांना त्याचं, साखळीसम्राट संबोधन कस वाटत ? कि कंट्रोलींग फ़्रिक ?
तुमचा गैरसमज होतोय कदाचित साहेबांविषयी ते किनई फ़ारच प्रेमळ व समजुन घेणारे पण आहेत.
त्याला कधी कधी मोकळ देखील सोडता त्याचा लोनलीनेस कळतो साहेबांना.
तो पण मग संधीचा फ़ायदा उठवुन उरकुन घेतो महत्वाच्या मार्मिक गरजा आणि कम्पॅनियनशिप ची गरजपुर्ती.
मोकळे मित्र मैत्रीणी बघुन हेवा वाटतो त्याला खदखदतो संताप सोनसाखळी विषयी थेट सबकॉन्शस मध्ये जाते तिडीक, संतापाच हाडुक चघळत चघळत तो समजावतो मनाला.
साहेबांची संस्कृतीमान्य कम्पॅनियन जीला सहधर्मचरीणी देखील म्हणु शकता तीने बोलवले एकदा एका स्वामींना
डोळ्यात काही ओले प्रश्न होते मालकीणीच्या इतकच कळल त्याला, मात्र उतारा देतांना स्वामींनी दिली दत्ताची तसबीर
तो आनंदुन गेला अरे आपला हि देव असतो की. दत्ताच्या फ़ोटुत पायाशी दिसला त्याला स्वत:चा चेहरा
मग त्याने एक धाडसी प्रार्थना करुनच टाकली आणि खदखदत असलेला सोनसाखळी विषयीचा संताप ओकला दत्तापुढे
दत्तात्रय हसले नेहमीच्या सराइतपणे म्हणाले “ अरे वेड्या का चिडचिड करतोस ?, तु एकटा थोडाय सोनसाखळीने बांधलेला “
तो चिडुन म्हणाला. “काहितरी फ़ालतु सांत्वन नको, तुम्ही एकुलते एक च देव आमचे”,
दत्तात्रय म्हणाले. “ थांब बेटा तुला दिव्य दृष्टी देतो तुच तुझ बघुन घे.”
आणि चमत्कार झाला त्याला दिव्यद्दृष्टी मिळाली आता तो बघु लागला चहुकडे प्रत्येकाच्या गळ्याकडे
अरेच्या अरेच्या काय हे ?
आनंदि आनंद गडे सोनसाखळी सगळीकडे.
त्याला कार्यकर्त्यांच्या, मालकीणीच्या, पाहुण्यांच्या, सर्वच माणसांच्या, सर्वांच्याच गळ्यात ( आजपर्यंत मि.इंडिया सारखी इनव्हीजीबल असलेली ) साखळी दिसु लागली
एकाहुन एक सुंदर ,नाजुक नक्षीकाम केलेल्या, लांबच लांब ,खुप (मात्र महत्वाच म्हणजे दुसर टोक काहि दिसल नाही) म्हणजे जस त्याच्या सोनसाखळी च दुसर टोक साहेबांच्या हातात असा सरळ सरळ मामला नसतो होय !
शेवटी हिंमत करुन तो साहेबांच्या बेडरुम मध्ये घुसला आजपर्यंत सहसा साहेबांच्या गळ्याकडे निरखुन पाहण्याची डेरींग नव्हती केली त्याने,
आता त्याने निरखुन बघितल आणी काय शेल शॉक्ड झालाय तो तेव्हापासुन
अहो साहेबाच्या हि गळ्यात एक साखळी होती चमचमणारी इतकी चमक की तो आंधळा च झाला.
आता एका कोपर्यात निमुट बसतो तो शेपुट आत घालुन साखळी वगैरे बद्दल च्या आठवणींची देखील त्याला भीती वाटते.
त्याची मालकीण टेपचा आवाज मोठा करते. टेप कोकलतो रजनीगंधा फ़ुल तुम्हारे महके यु हि जीवनमे
मग गाण्यात पुढे सुखावणारा बाईच्या आवाजातला व्हीस्परींग टोन येतो
कितना सुख है बंधन मे ...................

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

Smile जरा जास्तच सुस्पष्ट (ऑब्व्हिअस) झालीये.
पण आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.
पण काही छुपा अर्थ वगैरे आहे का यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इसापनीति चा भरपूर प्रभाव आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलं आयुष्य किती आणि विचार करायचा किती!
- एक जृंभणश्वान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0