एक मासा : सुदैवी की दुर्दैवी?

नुकताच औरंगाबाद-वेरूळ-अजंठा अशा प्रवास मोहिमेवर जाउन आलो. त्या प्रवासात एक क्वचित आढळणारी गोष्ट बघितली, अंध मासा.

सकाळी लवकर पुण्याहून निघून दुपारी जेवायच्या वेळी औरंगाबादला पोहोचलो. कडकडून भूक लागली होती. शहरात शिरल्या-शिरल्या जे पहिले हॉटेल लागेल त्यात जेवून घेऊया असे ठरले. शहरात आल्यावर एक सुप्रिया नावाचे हॉटेल दिसले. ते कसे असेल ह्याची जरा चाचपणी करायला आत शिरलो माझ्या धाकट्याला घेऊन. आत भिंतींवर मोठे मोठे फिश टॅन्क्स होते, भिंतींवर म्हणजे भिंतींत कंसील्ड असलेले. माझ्या धाकट्या मुलाचा मासे हा वीक पॉंईंट आहे. लगेच त्याची ऑर्डर आली, 'इथेच जेवायचे' आणि तो एका टेबलावर जाऊन बसलाही. निमूटपणे बाहेर येऊन बाकीच्या सगळ्यांना आत यायला सांगितले.

सगळे येऊन स्थानापन्न होईपर्यंत मुलाचे मासे मोजून झाले होते. सगळ्या माश्यांना नावे देऊन त्यांचे बारसेपण झाले होते. ऑर्डर देऊन झाल्यावर मग जरा ऐसपैस बसून मीही मग मुलांबरोबर माशांना न्याहाळू लागलो. अचानक एका माशामध्ये काहीतरी वेगळेपण जाणवले. मग जरा निरखून बघितल्यावर लक्षात आले की त्याला डोळेच नाहीयेत. अंध प्राणी बघायची ही पहिलीच वेळ. डोक्याला बराच ताण देऊनही अंध असा कोणता प्राणी बघितल्याचे आठवेना.

परत परत बघून खात्री करून घेतली आणि मग मॅनेजरला बोलावून त्याच्याशी बोलून खात्री पटवून घेतली. त्याने सांगितले की जेव्हा हॉटेलमध्ये त्या माशाला आणले तेव्हा तो एकदम पिल्लावस्थेत होता. तो मासा जन्मापासून अंध आहे. मग एकदम त्या माशाची कणव आली. एकतर त्या भिंतीतल्या टॅन्कमधले बंदिस्त जीवन त्यात पुन्हा सगळा अंधार. त्याचे इतर माश्यांशी काय बोलणे होत असावे ह्याचा विचार करू लागलो आणि डोळ्यापुढे संवाद आला:

अंध मासा (एका माशाला): 'काय भावड्या कसे काय चालू आहे?, मजा आहे म्हणा तुझी. रंगीत जग बघायला मजा येत असेल नाही?'

दुसरा मासा : 'मित्रा, तू फार नशीबवान आहेस!'

अंध मासा : 'का चेष्टा करतो रे आंधळ्याची :('

दुसरा मासा : 'चेष्टा? आपल्या भाई-बांधवांना तळलेल्या, भाजलेल्या अवस्थेत आपल्या डोळ्यासमोरच मनुष्यप्राण्याकडून खाल्ले जाताना उघड्या डोळ्यांनी बघणे, तेही एकदा दोनदा नव्हे तर आपले स्वतःचे आयुष्य संपेपर्यंत, हे किती भयानक आणि जीवघेणे असते ह्याची तुला कल्पना नाही मित्रा. शाप आहे हा शाप.! तुला नशीबवान म्हणतोय कारण तुला डोळे न देऊन देवाने ह्या शापापासून मुक्त केले आहे.

हा संवाद डोळ्यापुढे आल्यानंतर मी खरंच ठरवू शकलो नाही की तो अंध मासा सुदैवी की दुर्दैवी Sad

हाच तो सुदैवी (की दुर्दैवी?) अंध मासा ->

ह्या फोटोत हा मासा मला खरंच एकदम केविलवाणा वाटतो, एकदम अंगावर येतो हा फोटो.

हेच ते दोघे (भावड्या आणि मित्रा), संवाद करणारे मासे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एकदम टची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या! जेव्हा फटु बघायचे असतात तेव्हा आम्ही हाफिसात असतो Sad
बाकी संवाद आवल्डा.. फटु नंतर बघितले जातील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. कल्पनाविलास लांबवता आला असता.
२. माशांचे फोटो काढताना फ्लॅश न मारल्यास उत्तम.

अवांतरः एका कॉन्फरन्सच्या निमित्ताने महागड्या रेस्तराँमधे जेवणाची संधी आली. हे रेस्तराँ होतं एका मत्स्यालयात आणि खाण्याच्या जागेच्या भोवती मोठा दंडगोलाकार फिशटँक होता. त्यात आम्हाला एक फेंगडा मासा दिसला. त्या माशाचं आमच्या टेबलवर नाव पडलं टिमी. सोकाजी, आंधळा मासा पाहून तुला वाईट वाटलं; आम्ही मात्र टिमीवरून ड्रिंकींग गेम खेळलो. टिमीने एक फेरी मारली की एक पेला रक्तवारूणी प्यायची. पुढचा हिशोब आठवत नाही. ... ज्याची त्याची जाण, समज, इ. इ. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तो आंधळा मासा पाहून मुलांना बरेच प्रश्न पडले असावेत असा विचार मनात आला, आणि त्याबरोबर तुम्ही त्या वर काय उत्तरे दिली असतिल हा सुद्धा.
पुर्वी कधी वाचले होते ते असे आठवतेय की मानवी डोळ्याला जे रंग दिसतात ( colour perception) ते तसेच इतर प्राण्यांना ( इथे मासे)दिसत नाहीत. शिवाय पाण्यात काही खोलीवर प्रकाश न पोचू शकल्यामुळे सगळेच ब्राउन / काळे ( डार्क या अर्थाने) दिसते.
त्यामुळे ह्या माशाला रंगाच्या बाबतीत डोळे असुन नसुन काही फरक पडला असेल असे वाटत नाही.
तुम्हाला या माशाबद्दल कणव वाटली ती जाणवली. तुम्ही कदाचित रूपकात्मकही लिहीले असेल. मला मात्र हा मासा सुदैवी वाटतो. त्याला दिसत नाही हे जरी खरे असेल तरी त्याला टाकीबाहेर अन्नासाठी ( आणि survival साठी ) जी वणवण करावी लागली असती ती ईथे बहुतांशी कमी असेल आणि तो शिकार होण्याची शक्यता देखिल त्याच प्रमाणात कमी असेल असे वाटून गेले.
या माशाच्या निमित्ताने आणखी एक प्रश्न पडला. एखादी व्यक्ती आंधळी असते तेव्हा त्या व्यक्तीचे इतर सेन्सेस( मराठी शब्द?) फार प्रखर असतात, उदा. कान. माशांच्या किंवा इतर जनावरांच्या बाबतीतही हेच घडत असावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<< आपल्या भाई-बांधवांना तळलेल्या, भाजलेल्या अवस्थेत आपल्या डोळ्यासमोरच मनुष्यप्राण्याकडून खाल्ले जाताना उघड्या डोळ्यांनी बघणे, तेही एकदा दोनदा नव्हे तर आपले स्वतःचे आयुष्य संपेपर्यंत, हे किती भयानक आणि जीवघेणे असते ह्याची तुला कल्पना नाही मित्रा. शाप आहे हा शाप.! >>

हा संवाद कल्पिण्या इतकी संवेदनशीलता तुमच्यात आहे तर तुम्ही देखील आमच्यासारखे व्हेगन (Vegan)का होत नाही? निदान तुमच्या वाटचे काही जीव तरी ह्या हालअपेष्टा भोगणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चेतन,

मी फिशटॅन्क मधेले मासे खात नाही, समुद्रातले आणि नदीतले खातो.

खासकरून मासे खाताना मी फिशटॅन्क समोर बसून खात नाही. (त्यादिवशीही चिकन खाल्ले होते).
त्यामुळे खाताना, स्वर्गवासी झालेल्या माशाच्या आत्म्याला शांती लाभावी अशी प्रार्थना करून, इतर माशांना वाईट वाटणार नाही अशी दक्षता नक्कीच घेतो. Wink

- (मासेखाऊ) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छ्या सोकाजी, त्यापेक्षा तू फ्रूटेरियन हो. झाडावरून गळलेली फळंच खायची, फळं तोडायची नाहीत, धान्य तृणांवरून ओरबाडून घ्यायचं नाही इ.इ.

आणखी एक प्रकार अमेरिकेत टीव्हीवर पाहिला त्याचं नाव विसरले. 'उरलं-सुरलं खाणारे' असं त्यांना म्हणता येईल. बाजारातून एक्स्पायरी डेट उलटल्यामुळे फेकून दिलेले, पण तरीही खाणेबल असणारे पदार्थ खाणारे लोकं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यापेक्षा माणसांनाच का नाही खात? सालं लै वाढलंय पॉप्युलेशन आजकाल. आणी हो, फक्त व्हेजिटेरिअन लोकांनाच खा, म्हणजे प्राणीही वाचतील आणि प्राण्यांना खाता म्हणून तक्रार करणारेही कमी होतील..

(सोकाजींपासून कोसो दूर...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हायला,
एकदम नरभक्षक ??? आवरा....

- (उपोषण करावे का ह्या विचारात असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम नरभक्षक ??? आवरा....

नको, तशीही भारतात स्त्री बालकांची संख्या कमी आहे म्हणतात. नरभक्षण सुरू राहू देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.