पाणीचोर पाईन्स

परवा एनपीआर (नॅशनल पब्लिक रेडियो)वर एक दक्षिण कॅलिफोर्नियातल्या दुष्काळासंबंधित बातमीपत्र ऐकलं.
जिव्हाळ्याचा विषय, दुसरं काय!!
तर त्यात असं सांगितलं की,
कॅलिफोर्नियाच्या उत्तर-पूर्व भागात सिएरा-नेव्हाडाची पर्वतराजी आहे. तिथेच काही शेकडो चौरस मैल पसरलेलं योसेमिटी नॅशनल पार्कही आहे. त्यात सूचीपर्णी वृक्षांचं घनदाट अरण्य आहे.
हिवाळ्यात तिथे बेफाम म्हणजे ६-८ फूट किंवा त्याहीपेक्षा जास्त बर्फ पडतो. आणि उन्हाळा आला कि तो बर्फ वितळून झालेलं पाणी वेगवेगळ्या ओहळां-नद्यांतून दक्षिण-मध्य कॅलिफोर्नियाला पाणीपुरवठा करतं.
अनेक शतकांपासून निसर्गानेच केलेली ही व्यवस्था...
माणसाने त्यात काड्या सारण्यापूर्वीची!!

तर गेल्या दोन एक दशकांपासून इथे पर्यावरणाचं रक्षण करण्याची चळवळ सुरु आहे. आणि कॅलिफोर्नियन म्हणजे एकदा एक गोष्ट डोक्यात घेतली की तिचा अगदी अतिरेक करण्यात पटाईत!
त्यामुळे वनसंरक्षणासाठी कडक कायदे केले गेले. वृक्षतोड तर थांबवलीच पण नैसर्गिकरित्या लागणारे वणवेदेखील विमाना-हेलिकॉप्टरमधून पाणी मारून आटोक्यात आणून विझवले गेले...
चळवळीला चांगलं फळ आलं आणि आता त्या भागात चांगले १५-२० वर्षे वय असलेल्या हजारो जोमदार पाईन वृक्षांची भरघोस वाढ झाली आहे...

प्रॉब्लेम असा की आता असं आढळून आलं आहे की हे पाईन्स भरमसाठ पाणी शोषून घेतात आणि आपल्या पानांवाटे त्याचं बाष्पीभवन करतात!
म्हणजे उन्हाळ्यात जे पाणी वितळून दक्षिण-मध्य कॅलिफोर्नियात वहात येत असे ते हे वृक्ष तिथल्या तिथेच पिऊन डायरेक्ट आकाशात वाफ सोडतात!
त्यामुळे दक्षिण-मध्य केलिफोर्नियातली जमीन तशीच कोरडी! तिथले शेतकरी-माळी बोंबा मारतायत!!
त्यावर आता कॅलिफोर्नियाच्या वनखात्यानं आपलं सुपीक डोकं खाजवून दोन उपाय सुचवले आहेत..
१. नैसर्गिकरित्या लागणारे वणवे न विझवता तसेच जळू द्यायचे ज्याकरवी बरेच पाईन्स आपोआप जळून जातील.
२. या रानात लॉगिंगला (वृक्षतोडीला)परवानगी द्यायची.

पण दोन्ही उपायांत समस्या आहेतच.
पहिल्या उपायातला धोका म्हणजे हे रान शेकडो मैल पसरलेलं असल्याने एकदा जर आग पूर्ण आटोक्याबाहेर गेली तर मग ती रानातच राहील, रानाबाहेर पडणार नाही याची काय गॅरंटी? वणवे तीन-चारशे फुटांचे डांबरी हायवे उड्या मारून ओलांडून पलीकडे जातात. आणि आता त्या अभयारण्याच्या बाहेर कडेकडेने लोकवस्ती झालीये तिचं काय?
दुसर्‍या उपायातली समस्या म्हणजे नुसती झाडं तोडून भागणार नाही. ते लाकूड बाहेर आणायचं म्हणजे कच्चे का होईना पण रस्ते बांधावे लागणार, त्यावरून अजस्त्र ट्रक्स रात्रंदिवस ये-जा करणार. त्यामुळे या अभयारण्याचं वेगळंच नुकसान होणार!!

याव्यतिरिक्त पर्यावरणवादी लॉबी काय बोंबाबोंब करणार ती गोष्ट वेगळीच! इथे तो तर एक थर्ड रेलच आहे!!

त्यामुळे तूर्तास आम्ही दक्षिण-मध्य कॅलिफोर्नियातले लोक माणगावी मानसांसारखे पाण्याकडे नजर ठेऊन बसलेले आहोत!
या पानीचोर पाईन्सच्या आयला!!!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

ही कविता आठवली Smile

बाकी कोलोरॅडो नदीचं हक्काचं पाणी वाळवंटी फिनिक्स आणि नेव्हाडाकडे वळवलं जातंय, ते थांबवून दक्षिण कॅलिफोर्नियाकडे अधिक पाणीपुरवठा व्हावा आणि यासाठी कावेरी पाणीवाटप आयोगाच्या धर्तीवर त्रिसदस्यीय समिती नेमण्यात यावी; अशी मी मागणी करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर मी जे माणसाने निसर्गात काड्या घालण्याचं म्हंटलंय त्याचं एक उदाहरण म्हणून मी वरील अभिप्राय उधृत करू इच्छितो....

पण त्याच बरोबर जो उपाय सुचवलाय त्यालाहि पाठिंबा देऊ इच्छितो!!!!
फक्त त्या त्रिसदस्यीय समितीमध्ये एक उत्तर कॅलिफोर्नियाचा, एक दक्षिण कॅलिफोर्नियाचा आणि एक मेक्सिकन सान डियागोचा (गेस व्हू?) असे तीनच सभासद असावेत अशी मागणी करतो!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मग त्या बाष्पाचं होतं काय? दक्षिण-मध्य केलिफोर्निया कोरडा होण्याएव्हढा जर पाण्याचा उपसा होत असेल तर तिथली आर्द्रता वाढते / वाढली आहे का? का एव्हढ्या मोठ्या पृथ्वीतलाच्या मानाने हे वाढिव बाष्प चिल्लर आहे नी कुठेतरी पाउस थोडा वाढतो एव्हढंच? त्या वरून फार दिवस डोक्यात असलेला प्रश्न विचारतो. जमिनिवरचं पाणी (म्हणजे समुद्र, नद्या, तळी वगैरे) उन्हाने तापून, त्याचं बाष्पीभवन होउन आकाशात जातं आणि कालांतराने पावसाच्या रूपाने पुन्हा जमिनीवर पडतं आणि हि पाण्याची शृंखला अथक चालू असते. ग्लोबल वॉर्मिगमुळे हवेत असलेल्या बाष्पाचं प्रमाण वाढलंय, साधारण तपमान वाढलंय तशी साधारण आर्द्रता पण वाढली आहे असं काही वाचनात आलंय का कुणाच्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पण मग त्या बाष्पाचं होतं काय?

ते बाष्प वर कधीतरी कन्डेन्स होत असेल आणि त्याचा पाऊस पडतही असेल. पण (बहुदा पृथ्वीच्या परिवलनामुळे) तो पाऊस कॅलिफोर्नियात न पडता अन्यत्र कुठेतरी, बहुदा पॅसिफिक महासागरात, पडत असावा....
आमच्याकडे आर्द्रता कोरडी ठणठणीत आहे (वरील श्री. नंदन यांच्या प्रतिसादामुळे हे सिद्ध होतंय!!!) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठ्यपुस्तकात 'कॅलिफोर्निया' फारच समृद्ध वगैरे गोष्टी वाचल्यापासून आमचे कॅलिफोर्निया प्रेम(कॅलिफोर्निया ड्रिमिंग) ओतु जात असे, अर्थात तेंव्हा सुदान हा गवताळ प्रदेश आहे असं भुगोलाच्या पुस्तकात वाचल्याने त्याबद्दलही प्रेम होतेच, काही काळापूर्वी ती कॅलिफोर्निया(साक्रेमँन्टो) ट्रिप करणेचे झाले आणि तो ओसाड वाळवंटी प्रदेश पाहून मनाला अत्यंतिक क्लेश झाले, त्यामुळे आता सुदानभेटही टाळण्याचे योजले आहे.

बाकी तुमच्या पाणी समस्येबाबत तुम्ही अजितदादांना भेटावं असा सल्ला देऊ इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>कॅलिफोर्निया(साक्रेमँन्टो) ट्रिप करणेचे झाले आणि तो ओसाड वाळवंटी प्रदेश पाहून मनाला अत्यंतिक क्लेश झाले,

कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचं आश्वासन अशा प्रकारे पाळलं गेलं आहे म्हणायचं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काय हो पिडांकाका, तुम्हा कॅलिफोर्नियन माणसांपेक्षा ते पाईन वृक्ष कमी महत्त्वाचे आहेत असं तुमचं मत आहे का? म्हणजे फेब्रुवारी मार्चपासूनच 'आमचं लॉन बघा कसं हिरवं हिरवं गार! तुमचं नुसतंच गार!' असं म्हणत इस्ट कोस्टवाल्यांना जळवता यावं यासाठी आख्खा निसर्ग वेठीवर धरणं कॅलिफोर्नियनांना शोभतं का? 'आमच्याकडचा निसर्ग इतका चांगला आहे इतका चांगला आहे की डिसेंबरमध्येसुद्धा आम्हाला शॉर्ट्स घालून फिरता येतं (एरवी अंडरवेअरवरतीच भागतं खरं तर)' असं बोंबलून दाखवणारे तुम्ही कॅलिफोर्नियन, इवलासा पाऊस कमी झाल्यावर निसर्गावर दोष ढकलता! ते काही नाही, मी तर म्हणेन बरी अद्दल घडली तुम्हाला.

(हू.. हू.. हू.. च्यायला इकडे झाली बरं का थंडी सुरू! पण आम्ही तक्रार करतोय का पहा!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(दि.पु.चित्र्यांची क्षमा मागून)

देवा, ह्याही राज्यात पाऊस पाड!

देवा, ह्याही राज्यात पाऊस पाड!
जिथे पाण्याला येतो वाईनचा वास,
जिथे द्राक्षांच्या मळ्यात होतो रुद्राक्षांचा भास,
देवा, जिथे तू नाहीस आणि निषिद्ध आहे टेक्सास,
देवा, ह्याही राज्यात पाऊस पाड!

जिथे समर आणि विन्टर - दोन्ही ऑलिम्पिक्स निभतात,
जिथे रिपब्लिकन्ससुद्धा उत्क्रांतीवर विश्वास ठेवतात,
(आणि तरीही बर्‍याचदा क्लोजेटमध्ये असतात),
देवा, ह्याही राज्यात पाऊस पाड!

जिथे ट्रोजनांचेही डिफेन्सिव्ह बॅक्स् असतात,
जिथे हॉलिवूडची यंत्रं अखंड चालू असतात,
जिथे सिलिकॉन व्हॅलीचा ओव्हरटाईम सदैव चालतो,
देवा, ह्याही राज्यात पाऊस पाड!

कारण इथे कालच्या पावसातले गाणी गातात,
आणि पीक काढणारे यशवंत, मनोहर असतात;
जिथे दुष्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात,
देवा, ह्याही राज्यात पाऊस पाड!

१. सॅन फ्रान्सिस्कोच्या लिबरल 'इन्क्लिनेशन'वरची विनोदी टिप्पणी: "In San Francisco, the only people in the closet are Republicans."

२. निरोधचा एक ब्रँड आणि 'युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया'ची अमेरिकन फूटबॉल टीम - या दोघांचेही नाव 'ट्रोजन'. डिफेन्सिव्ह बॅक ही अमेरिकन फूटबॉलमधली एक पोझिशन आहे. तस्मात्, विनोद स्वयंस्पष्ट असावेत :).

३. तसा टुकारच पीजे आहे; पण 'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे' ही ओळ वारंवार आठवत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं!!
आम्हाला फक्त,
"नॅन्सी पुलोसी वारा घाल,
काशकार्‍या, तू पाणी दे!"
इतकंच सुचलं होतं....
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अती लिबरल झाल्याची शिक्षा दिली देवानं, दुसरं काही नाही! तो पॅट रॉबर्ट्सन उगाच नाही ओरडत! भोगा आता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

राष्ट्रीय महामार्ग १ आणि ५ वर 'कुठे नेउन ठेवलाय क्यालिफोर्निया माझा?' असे फ्लेक्स दिसतील बहुदा लवकरच! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा फ्लेक्सचा आणि घोषणांचा खास आम्रविकन शैलीतला अवतार महरठ्ठ देशीयांपैकी कुणी एकाने मनावर घेवोन तेथे प्रसिद्ध करावा, अशी या निमित्ताने सुचवणी करतो. आमचे तेवढे ज्ञान नाही, नपेक्षा आम्हीच केले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'कुठे नेउन ठेवलाय क्यालिफोर्निया माझा?'

पन आसलं कायतरी गुळमुळीत, मिळमिळीत इष्टकोष्टी लिवन्यापरास,
"ह्या पाईनरूपी अफझलखानाचा कोथळा काढा!!"
हे कसं वाटतंय?
डिरेक्शनपण आगदी आमच्या सायबांसारखी अचूक हाये! Wink
कडवट कॅलिसैनिक,
पिवळा डांबिस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाची "चला निसर्ग वाचवूया" म्हणजे फक्त "माणूस" वाचवूया अशी हाळी आहे. त्यात एका अर्थी काही गैर नाहीही.
तेव्हा माणूस वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न चालु आहेत असं दिसतंय

बाकी द्विधा/विरोधाभास रोचक आहे हे खरंच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!