भरती ओहोटी

भरती ओहोटी

काचेच्या पेटीवरून सरकणारे एकेक दवबिंदू
शिंपल्याचा आकार घेत घेत
माझ्यापर्येंत पोहोचतात तेव्हा
ओहोटीचे अनेक क्षय झालेले चंद्र
पुन्हा काचेच्या पेटीवरून सरकत जातात

पावलात पाऊल हातात हात
ठश्यात ठसे मिळवत
आठवणीचे कोरे कागद
झडून जातात
लाटा रेंगाळतात

इथून कुठेतरी चार हजार मैलावर
पौर्णिमा आणि भरती असेल
माहित आहे मला

अनुरागा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता समजण्याचा प्रयत्न केला. फक्त ध्वन्यर्थ. काहीसा अकादमिक प्रयत्न.
आठवणीचे आठवणीचे कोरे कागद
झडून जातात
हे जरासे वेग्ळे वाटले.
कवितेला सागरी संदर्भ आहेत तिथे कोरे कागद जरासे अस्थानी वाटले. शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद प्रयत्नात राहीन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0