छत्रीखालचं बालपण

मी "ऐसी" चा सभासद झाल्यापासून उत्तम लेख आणि उत्तम कविता वाचायला मिळू लागल्या आहेत. पण फक्त आस्वाद घेणे यावर समाधान मानण्याची प्रकृती नसल्याने मी कधी काळी जुळवलेली कविता इथे पोस्त करण्याचे धाडस करत आहे. सांभाळून घ्यावे.

छत्रीखालचं बालपण
===============
मुसळधार पावसात
खिडकीसमोर बसून
आठवणींचे कण गोळा करताना
हमखास सापडणारा एक कण….
म्हणजे आपलं ‘छत्रीखालचं’ बालपण….

पावसाळ्यात रोज सकाळी
शाळेत जायची इच्छा नसतानाही
आजोबांची जड काळी छत्री घेऊन
चिखलातून वाट काढ़त जात
छोट्या रंगीबेरंगी छत्र्यांमध्ये मिसळणारं….
आपलं ‘बुजलेलं’ बालपण….

खूप पाऊस पडल्याने
शाळेला सुट्टी मिळाली,
तर लपाछपी खेळताना
तीच काळी छत्री उघडून
त्यामागे बिनधास्त लपणारं….
आपलं ‘खट्याळ’ बालपण….

दप्तराच्या ओझ्यासोबत
छत्रीची वेगळी पिशवी वागवणारं,
आणि वर्गाबाहेर ठेवल्यामुळे
वेंधळ्यासारखी छत्री विसरल्यावर
आईचा मार खायला लावणारं….
आपलं ‘भिजलेलं’ बालपण….

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

Smile
कल्पना छाने.
लेखन/प्रतिमा/प्रतिके किंचित अमॅच्युरीश/ओव्हरयुज्ड आहेत, पण ते असायचेच. इथे कुठे सगळे प्रोफेशनल लिहितात!
तेव्हा बिंधास्त लिहा. फिकर नॉट! Smile

अजून येऊ द्या! वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखन/प्रतिमा/प्रतिके यांबाबत सहमत आहे. नवे काही लिहिताना त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती साबुदाणेवाली रहस्य कविता वाचल्यावर ही बालपण, पाऊस, छत्री वगैरेवाली कविता पटकन समजल्याने चांगली वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवडलीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोट्या रंगीबेरंगी छत्र्यांमध्ये मिसळणारं….
आपलं ‘बुजलेलं’ बालपण….

वा!! रुपक फार आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद! पुढे काही चांगले लिहिण्यासाठी / share करण्यासाठी उत्साह मिळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता छान आहे... शब्दांतली निरागसता जाणवतेय... Smile
लिहीत रहा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."