गणपती पूजेच्या मागची अवधारणा

आज गणेश चतुर्थी, आज बाप्पा आपल्या घरी येतात. १० दिवस आपण बाप्पाची पूजा अर्चना करतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतो. आपण बाप्पाची पूजा का करतो या मागची अवधारणा काय? हा प्रश्न मनात येतोच.

गणपती किंवा गणाध्यक्ष याचा अर्थ गणांचा अधिपती सोप्या शब्दात म्हणावे तर कुळ, जाती, बिरादरी, राज्याचा किंवा देशाचा प्रमुख म्हणजे गणपती ज्याला जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. वैदिक युगात प्रत्येक गण (कबीला) प्रजातान्त्रिक पद्धतीने आपल्या प्रमुखाची निवड करायचे. विभिन्न गणांचे प्रमुख मिळून इंद्राची निवड करायचे. असो.

आपल्या देशात गणराज्यांचे अस्तित्व बुद्धाच्या काळापर्यंत टिकून होते. मगधच्या राजा अजातशत्रू ने समस्त गणराज्यांच्या विनाश करून मगधचे विशाल साम्राज्य उभे केले. १९४७ मध्ये भारताला स्वतंत्रता मिळाली आणि पुन्हा गणराज्य भारतात पुनर्जीवित झाले. आज देशात प्रधानमंत्रीच्या स्वरूपात आणि राज्यात मुख्यमंत्री गणाध्यक्ष- गणपती कार्यभार संभाळतात.

देशावर/ राज्यात शासन करणाऱ्या प्रमुखाच्या अंगी काय गुण असावे त्याचे स्वरूप म्हणजे बाप्पाची मूर्ती. बाप्पाची मूर्ती शासकाच्या अंगी काय गुण असावे याची आठवण आपल्याला करून देते. बापाचे विशाल मस्तक बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. शासक हा बुद्धिमान असावा. परिस्थितीचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता शासकात असावी. अन्यथा काय होते, हे आपण गेल्या ५-७ वर्षांत आपण बघितलेच आहे. बाप्पाचे कान लांब आहेत आणि मुख लहान. अर्थात शासक मितभाषी अर्थात कमी बोलणारा असावा पण ऐकण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी. वाचाळ लोक दुसर्याचे ऐकत नाही. अश्या लोकांना निवडण्यात काहीच अर्थ नाही. कारण ऐकण्याच्या क्षमतेशिवाय जनतेचे विचार आणि मनोगत काय आहे शाश्काला कसे कळणार? समर्थांनी ही म्हंटले आहे, ‘श्रवणें होये कार्यसिद्धीl श्रवणें लागे समाधीl श्रवणें घडे सर्व सिद्धीl समाधानासीl’(दा.बो. ७-८-८). बाप्पाला लंबोदर ही म्हणतात. बाप्पाचे उदर मोठे आहे. याचा अर्थ शासकाच्या अंगी सर्व काही पचविण्याची क्षमता असायला पाहिजे. एकी कडून मिळालेली बातमी दुसरीकडे सांगितली नाही पाहिजे. अन्यथा सहयोगी मध्येच आपसांत भांडणे होतील. आपले मनोगत मित्र असो वा शत्रू कुणाच्या ही समोर उघड केले नाही पाहिजे. प्रजेच्या कल्याणासाठी स्वत:चे मान-अपमान सर्व पचविण्याची क्षमता असली पाहिजे. बाप्पाची सोंड हत्तीच्या सोंडीप्रमाणे मोठी आहे. आपल्याला माहितच आहे, हत्तीची सोंड मोठ्या मोठ्या वृक्षांना धाराशायी करू शकते त्याच प्रमाणे ती एक छोटी सुई सुद्धा उचलू शकते. तिची वास घेण्याची क्षमता ही अदभूत असते. राज्य प्रमुखाला देश्यात होणाऱ्या लहान-मोठ्या सर्व घटनांची, कुठे काय चालले याची माहिती असायला हवी. शिवाय शेजार-पाजारच्या देशांत आणि जगात काय चालले याची इत्यंभूत माहित ही असायला पाहिचे. अन्यथा केंव्हाही दगा होऊ शकतो. शिवाजीचे राजांचे गुप्तचर विभाग त्या काळी देशात सर्वश्रेष्ठ होते म्हणून ते आग्याांहून सहज परत येऊ शकले. समर्थांनी म्हंटले आहे: ‘जो दुसर्यांचे अंत: कारण जाणे l देश काळ प्रसंग जाणेल त्या पुरुषा काय उणे l भूमंडळीl’ (दा.बो.१४-७-२७).

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. प्रजातान्त्रिक पद्धतीने महाराष्ट्रातील जनता राज्याचा प्रमुख निवडणार आहे. श्री गणेशाची पूजा करताना, गणेशाचे किती गुण निवडणूकीत उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये आहे याचा विचार करून जनतेने राज्याचा प्रमुख निवडला पाहिजे. असे केल्यास राज्याची भरभराट होईल. प्रजा सुखी आणि समृध्द होईल. पुन: सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख चुकीच्या संस्थळावर टाकलेला आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
येथे मुळातच देव संकल्पना मानणार्‍यांची संख्या नगण्य. जे देवाला मानतात त्यांनाही ते कबूल करण्याची भिती वाटते.
तरीही तुमच्या लेखातील वाक्यांचा प्रतिवाद करणारे / चिरफाड करणारे प्रतिसाद आले नाहित याचा अर्थ तुम्हाला देव पावलाय असे समजा. Smile

अवांतर : आपल्या लेखांमधील बरेचसे शब्द हिंदी असतात. कदाचित आपण दिल्लीवासी असल्यामुळे असे असावे.
अवधारणा म्हणजे मराठीत "कल्पना" असा आहे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही पण अगदी... Smile
संस्थळाच्या बोधचिन्हावर गणपती दिसतो आहे, आणि संस्थळाच्या संपादकांपैकी एकाने छायाचित्र काढण्याकरिता आव्हान म्हणून "सुखकर्ता दु:खहर्ता" ही अवघी आरतीच दिली आहे!
अवधारणा (इंग्रजी अर्थ) comprehension, hypothesis, concept, conception
त्यामुळे मराठी "कल्पना" शब्द ठीक वाटतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुटके साहेब

जे लोक देवावर विश्वास ठेवीत नाही, ते बहुतेक अधिक विश्वासी बहुधा अंध विश्वासी ही असतात. असे बहुत लोक पहिले आहे. बोलतात एक आणि करतात एक. संकटात १००% लोक देवावर विश्वास ठेवतात.
माझा देवावर विश्वास आहे, म्हणून मी कुठल्या ही बोटात अंगठी घालत नाही, लग्नात ही आमच्या संपूर्ण घराण्यात कधी जन्म कुंडली मिळविण्याचा आग्रह धरला नाही. जोतीषांकडे कधी जात नी. घरात सर्व सणवार मात्र आनंदाने साजरे करतो. आपली परंपरा अक्षुण ठेवली आहे. घरात नवीन पिढीत गेल्या १५ वर्षांत (सहा लग्न झाले/ठरले त्यात महाराष्ट्र, हिमाचल, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, हरियाना इत्यादी राज्यांचा व विभिन्न जाती समूहांचा समावेश आहे.
शेवटी कबीरांनी म्हंटले आहे:


दुःखमें सुमिरन सब करें, सुख में करें न कोय.
जो सुख में सुमिरन करें, दुःख काहे को होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप्पाचे कान लांब आहेत आणि मुख लहान. अर्थात शासक मितभाषी अर्थात कमी बोलणारा असावा पण ऐकण्याची क्षमता त्याच्या अंगी असावी.

बिचारे मनमोहन सिंग! बहुदा (मेनस्ट्रीम) हिंदू नसल्यामुळे बदनाम झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हो ना.

"प्रजेच्या कल्याणासाठी स्वत:चे मान-अपमान सर्व पचविण्याची क्षमता असली पाहिजे." हा सुद्धा गुण समजला तर तोही त्यांच्यात पुरेपूर होता असे म्हणतात. मात्र त्याच कारणासाठी त्यांना दोषी ठरवले गेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते साहेब

प्रजेच्या कल्याणासाठी स्वत:चे मान-अपमान सर्व पचविण्याची क्षमता असली पाहिजे
इथे एकच प्रश्न मान-अपमान कुणाच्या हितासाठी पचविले? प्रजेच्या कि काही विशिष्ट व्यक्तींच्या हिता साठी? आपण सुज्ञ आहात आपल्याला उत्तर माहितच असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती ताई ,
बिचारे मनमोहन सिंग! बहुदा (मेनस्ट्रीम) हिंदू नसल्यामुळे बदनाम झाले

आपल्या सारख्या शिक्षित व्यक्ती कडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना मी पहिले ही आहे आणि बोललो ही आहे. व्यक्तिगत रूपेण माणूस किती ही स्वच्छ, चांगला 'राजहंस' सारखा असला तरी ही राजा होण्यासाठी 'गरुडाचे'व्यक्तित्व लागते. यात धर्माचा संबंध येत नाही. बहुतेक तुम्ही पंजाब, दिल्लीत या भागात राहिल्या नाही कारण येथे हिंदू आणि सिखांमध्ये फारसा फरक नाही. या भागात लग्न संबंध जाती आधारावर ठरतात. हिंदू -सिख या कल्पनेच्या आधारावर नाही. असे कित्येक लग्न मी बघितले आहे.

मेडमला राजनेता नको होता माजी पंत प्रधान नरसिंगरावांचा अनुभव कदाचित त्यांना चांगला आल्या नसल्या मुळे, त्यांनी एका नौकरशाहला पंत प्रधान केले.(कळसूत्री बाहुल्या प्रमाणे नाचविता येईल). परिणाम आपण पाहतोच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<आपल्या सारख्या शिक्षित व्यक्ती कडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती.>

पण अदितीताई विक्षिप्तहि आहेत हे विसरलात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परिणाम आपण पाहतोच आहे.

परिणाम असा झाला की भारताचा जीडीपी ग्रोथ रेट जगापेक्षा पाच टक्क्यांनी जास्त राहिला. म्हणजे जगाचं उत्पादन जेव्हा पंचवीस टक्क्यांनी वाढलं, तेव्हा भारताचं उत्पादन दुप्पट झालं. हा परिणाम होणार असेल तर भारतीय नागरिक पंतप्रधानपदावर कळसुत्री बाहुलं पुढची कितीही वर्षं जरूर चालवून घेतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मेडमला राजनेता नको होता माजी पंत प्रधान नरसिंगरावांचा अनुभव कदाचित त्यांना चांगला आल्या नसल्या मुळे,

माझ्या इतिहासाच्या ज्ञानाप्रमाणे नरसिंहराव राजीव गांधींच्या मृत्यूनंतर पंतप्रधान झाले. तिथपासून सुमारे १९९८-९९ पर्यंत सोनिया गांधी राजकारणात पडल्या नव्हत्या. त्या राजकारणात पडल्या त्यापूर्वीच १९९६ मध्ये नरसिंहराव पायउतार (+रिटायर) झाले होते आणि सीताराम केसरी काँग्रेस अध्यक्ष झाले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मेडम राजनीतीत नव्हत्या. श्रीमती मेनका गांधीना घराबाहेर हाकलण्याच कारण काय? वारसा हक्कावर अधिकार पाहिजे होता म्हणून. ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या आठवणीनुसार मेनका गांधी १९८२-८३ मध्ये इंदिरा गांधी हयात असतानाच बाहेर पडल्या.

१९८७-८९ मध्ये त्या जनता दलात सामील झाल्या. (त्यापूर्वी १९८४ मध्ये त्यांनी राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली होती).

पण ते असो. तुम्ही दिल्लीत रहात असल्याने तुम्हाला काही अधिकच्या गोष्टी ठाऊक असू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मलाही असेच काहीसे आठवते.

मनेकाबाईंना जर कोणी हाकलले असेलच, तर ते इंदिराबाईंनी असावे.

मधल्या काळात त्या 'संजय विचार मंच' म्हणूनदेखील काही चालवत असल्याचे अंधुकसे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0