संधी

भांडताना यापुढे माणूसकी ठेवायची आहे
एकदा बोलायची संधी तुलाही द्यायची आहे

टाळला जातोच एखादा सगा तू भेटशी तेव्हा
अंतरी इच्छा भले दोन्ही सुभे राखायची आहे

ठेव सांभाळून ही जिंदादिली शाळेतल्या पोरा
यापुढे आयुष्य ही मोठी परीक्षा यायची आहे

वाहवा खोटी हवी आहे तुला मी जाणले नाही
माफ़ कर मित्रा खरी मैत्री मला उमजायची आहे

मी तुझ्याइतकाच तेजाळीन ह्याची शाश्वती नाही
मात्र हा काळोख पुसण्याची धुरा पेलायची आहे
-----------------------
'कणखर'

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

टाळला जातोच एखादा सखा तू भेटशी तेव्हा
असे हवे होते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

सगाच अपेक्षित आहे पाभे, सगा म्हटले की कोणीही होऊ शकते. सखा म्हटले की फक्त मित्र असे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निग्रहाने सोड इवला खंड हा
वाट पाहू लागले मोठे प्रतल

ठेव सांभाळून ही जिंदादिली शाळेतल्या पोरा
यापुढे आयुष्य ही मोठी परीक्षा यायची आहे

वाहवा खोटी हवी आहे तुला मी जाणले नाही
माफ़ कर मित्रा खरी मैत्री मला उमजायची आहे

कडक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0