मज सांग बंधो,कथा एका लाल मिरचीची...


मज सांग बंधो, कथा एका लाल मिरचीची...

असे ऐकली कथाअकलेच्या कांद्याची अन् चाळीतल्या बटाट्यांची

मज सांग बंधो,कथा एका लाल मिरचीची...

लवंगी मिर्चीनेरंगवली लावणी अन् मामाच्या घरच्या केळ्याच्या शिक्रणी


मज सांग बंधो,कथा एका लाल मिरचीची...

तर मग ऐक परि, कथनकरीन गद्यातूनि, ...

कथा ही एका लाल मिरचीची...

चार एक वर्षापुर्वीची गोष्ट...

असाच एकदा एका किराणा मालाच्या दुकानात सामान आणायला गेलो होतो. गर्दी होती म्हणून बाहेर उभा असता नजर पडली एका सुक्या मिर्चांच्या पोत्याकडे. त्या तकतकीत मिर्च्यांच्या लाल चुटूक रंगाची मोहिनी मला पडली अन त्यातली एक सहजचाळा म्हणून मी खुळखुळ्यासारखी वाजवून पाहिली. मजा वाटली म्हणून वाण्याला माझ्या मालात त्या एका मिर्चीचा हिशोबही चुकता केला. घरी आलो. वाटले जरा नातीला खुळखुळ्यासारखे वाजवून खुष करेन. रात्री जेवणानंतर त्या मिर्चीला मी सर्वांना दाखवत म्हटले, ‘चला आता आपण एक खेळ केळू या. या मिर्चीत किती बिया असतील याचा अंदाज बांधायचा.दहा टक्के इकडे तिकडे चालेल. ज्याचा अंदाज अचुक येईल त्याला एक कॅडबरी बक्षीस.’

कागदावर जो तो लिहायला लागला. प्रत्येकानी डोके लढवले. कोणी 20 तर कोणी 30, 40, जास्तीत जास्त 50पर्यंत अंदाज वर्तवले. नंतर ती मिर्ची फोडून बिया मोजता आम्हाला थक्क व्हायला झाले.त्यात तब्बल 80 बिया निघाल्या! अंदाज कोणाचाच बरोबर आला नाही पण यापेक्षा त्यातील बियांच्या संख्येने आम्हाला विचारात पाडले. मला वाटले या बिया आपण रुजवल्या तर? मग दुसऱ्या दिवशी मी एक गादी वाफा तयार केला. एका तरटाच्या पोत्यावर माती पसरली.थोडे शेणखत मिसळले. पाणी देऊन त्यात मन लाऊन सर्व 80 बिया लावल्या. त्यांना रोज वेळेवर पाणी द्यायला लागलो. कधी सावली तर कधी उन्हं दाखवून रोपटी उगवायला लागली. पाहिले तर 80 पैका 40 बियांनी तग धरला होता. म्हणजे 50 टक्के मॉर्टॅलिटी रेट होता. होताहोता त्या 40 रोपांनी तरारी दाखवली. आता रोजची निगा केल्याने ती दहा एक इंचांची झाली.वाटले आता या रोपांना असे न ठेवता कुडयात ट्रान्सप्लांट करू या. दहा कुंड्या आणल्या. त्यात खाली दगडावाळूवर एक थर नंतर त्यावर पालापाचोळा मग लाकडाचा भुस्सा व भाताची तुसे वर शेणखताचा थर व नंतरकाळ्यामातीने कुंड्यांना तयार केले. प्रत्येकात 4 रोपांची लागवड केली आणि रोजच्यारोज पाणी, उन दाखवत ती रोपे आमच्या गच्चीत वाढायला लागली. काही वाचीव तर काही ऐकीव माहितीनुसार कीटकनाशकाची फवारणी, खते,नियमित पाणी व देखभाल यामुळे रोपांची वाढ यथायोग्य होत होती.

असे दहा महिने गेले. एके दिवशी रोपांना फुलोरा आला. पांढऱ्या रंगाच्या फुलांनी रोपे डवरली. पुढे काही दिवसांनी त्या फुलातून इवल्या इवल्या मिर्च्यांची फूट दिसायला लागली अन पाहतापाहता मिर्च्यांनी झाडे डवरली. पहिल्या तोडीत सव्वा दोन किलोच्या मिर्च्यांचे पीक आले! पुढे आणखी तीन तोडीत एकूण दहा किलो पर्यंत तोड गेली!

मजा म्हणून सहज लावलेल्या एका मिर्चीतून दहा किलो मिर्च्या निर्माण झाल्याचे पाहून निसर्गाच्या अदभूत लीलेपुढे नतमस्तक होत... वंदन केले... अशी ही एका लाल मिर्चीची गोष्ट...

बंधो, शशी, तुझ्या उत्साही प्रोत्साहनामुळे पुन्हा कथन करायला मला हुरूप आला. तू कथन मोबाईलवर टेप करून असे सादर करशील असे वाटले नव्हते !...

संकलनः – शशिकांत ओक...
कथनकार :- चुलत बंधू प्रकाश ओक.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

मिरची जरा तिखट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!!! मजेशीर आहे. आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका बीजा केला नाश,मग भोगिले कणीस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय? ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'एका बीजा केला नाश'मधून बहुधा गर्भपाताकडे निर्देश असावा, असा अ(न)र्थ लागला. (तो बरोबर की चूक, हा भाग अलाहिदा.)

पण... पण... 'मग भोगिले कणीस'??????

((बहुधा) अनवधानाने का होईना, पण...) गर्भपातविरोधी मोहिमेस (अप)प्रचाराकरिता एक उपयुक्त स्लोगन देऊ केल्याबद्दल कडक निषेध. (वगैरे वगैरे.)

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नाहीतर आमच्या निषेधाला कोण विचारतो? (रिपब्लिकन माजलेत साले!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान! खरच निसर्ग अशा गमती दाखवून (खरतंर उगाचच) चकीत करत असतोच.

समांतरः यावरून आठवले:
मागे लेकीला BCL मधून एक पुस्तक आणले होते, त्याचे नाव विसरलो, मात्र त्यात ब्रिटीश/युरोपियन ढंगाची चित्रे होती.
एक मुलगा सूर्यफुलाच्या दहा बिया लावतो, त्यातील एक बी उंदीर पळवतो, एक लहानसं रोप गोगलगाय खाते, मग काय कुत्रा काही वाढलेली रोपे तोडतो, एकदा काय त्या मुलाचा क्रिकेट बॉलच झुडूपात जातो वगैरे करत शेवटी दोनचे झाडे उरतात नी फुलतात. पैकी एका झाडाला फुलल्यावर कीड लागते नी एकच झाड उरते, नी ते झाड त्या मुलाला पुन्हा दहा बिया देते अशी गोष्ट होती.
लहान मुलांना आकड्याची ओळख व्हावी नी झाडांचा जीवनक्रमही समजावा अशा उद्देशाने अतिशय जिवंत चित्र काढलेले ते पुस्तक मुलीला फारच आवडले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मागे लेकीला BCL मधून एक पुस्तक आणले होते...

(पुण्याची असे गृहीत धरून) त्या लायब्रीस BCL असे संबोधणे (तत्त्वतः) चूक आहे. (व्यवहारात सगळेच म्हणतात.)

BCL बोले तो फक्त नवी दिल्ली/मुंबई/चेन्नई/कोलकाता येथीलच. (भारतातील) उर्वरित सर्व निव्वळ BL. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हो की.
खरंतर BCL च्या साईटवर पुण्याच्या लायब्ररीचाही पत्त आहे. BCL ची ब्रांच पुण्यातही आहे वगैरे लिहिलेलं आहे साईट वर, मात्र पुण्याच्या पानावर फक्त ब्रिटीश लायब्ररी असा उल्लेख आहे.

आता या विकांताला लायब्ररीत गेल्यावर बघतो तिथे काय लिहिलंय ते. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

BCL ची ब्रांच पुण्यातही आहे

'ब्रांच' बोले तो, समजा तुम्ही पुण्यात राहता, पुण्याच्या लायब्रीत तुमचे सदस्यत्व आहे आणि तुम्ही मुंबईला कायमस्वरूपी स्थलांतर केलेत (किंवा वाइसे वर्सा), तर पुण्याच्या लायब्रीला विनंती करून त्यांचे पत्र घेऊन ते मुंबईच्या लायब्रीत सादर केल्यास तुमचे सदस्यत्व मुंबईच्या लायब्रीस ट्रान्स्फर केले जाऊ शकतेच (किं. वा. व.).

बोले तो, या सर्व लायब्र्या एकमेकींच्या अफीलिएट आहेतच, त्याबद्दल प्रश्न नाही. मात्र, भारतात जेथेजेथे म्हणून ब्रिटिश हायकमिशन/डेप्युटी हा. क./कॉन्सुलेट आहे, तेथेतेथे ही लायब्री थेट त्यांच्याशी संलग्न आहे आणि तिचे व्यवस्थापन थेट आणि पूर्णतः ब्रिटिश कौन्सिलच्या अखत्यारीत आहे. (केवळ अशाच लायब्र्यांना 'ब्रिटिश कौन्सिल लायब्री' असे नामाभिधान आहे.) भारतातील इतर ठिकाणी अशा ज्या लायब्र्या आहेत, त्या ब्रिटिश कौन्सिल लायब्र्यांशी संलग्न आहेत, परंतु थेट ब्रि.हा.क./ब्रि.कौ.च्या अखत्यारीत/व्यवस्थापनाखाली नाहीत; ब्रि. कौ. आणि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली आहेत. अशा लायब्र्यांना 'ब्रिटिश लायब्री' असे नामाभिधान आहे. फरक हा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत धाग्याशी संबंधित नाही तरीहि BCL शी माझा दीर्घ परिचय असल्याने येथे हे लिहिण्याचा मोह - धागाकर्त्याची क्षमा मागून - टाळता येत नाही.

१९६०-६१ च्या सुमारास ही लायब्ररी पुण्यामध्ये रानडे इन्स्टिट्यूटमध्ये सुरू झाली तेव्हापासून मी तिचा सदस्य होतो. तेव्हा तिची वार्षिक फी केवळ रु ५ - No deposit अशी होती. दळवी नावाचे जरा रागीट आणि तिरसट वाटणारे एक गृहस्थ तेथे ग्रंथपाल होते आणि आम्ही विद्यार्थी त्यांचा संपर्क टाळत असू. कालान्तराने विद्यार्थ्यामधून सरकारी नोकरात माझे परिवर्तन झाले तरीहि सुदैवाने सर्व पोस्टिंग्ज पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्ली अशाच ठिकाणी झाल्याने तेथे तेथे माझे सदस्यत्व चालूच राहिले आणि तिचा मी भरपूर लाभ घेतला.

१९९४-९५ च्या सुमारास जुन्या सदस्यांना एकदाच पैसे भरून Life Membership देऊ करण्यात आली तीहि मी घेतली. तदनंतर काही वर्षांनी भारतच सोडल्याने आता माझी Life Membership नाममात्र उरली आहे.

(मुंबईच्या लायब्ररीमध्ये पंजाबी सलवार-कमीज वापरणार्‍या एक ब्रिटिश बाई नोकरी करत असत. त्या कोण ही उत्सुकता शेवटपर्यंत तशीच राहिली!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरविंद कोल्हटकरजी मला ब्रिटिश कौन्सिल लायब्रेरी वरील विचार कथन जवळचे वाटले. आपण सध्या पुणे मुक्कामी असल्यास मला प्राथमिक मार्गदर्शनासाठी आपल्याला भेटणे शक्य होईल तर आवडेल. आपला मो क्र. द्यावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकांताला खात्री केली, ब्रिटीश लायब्ररी इतकेच नामाभिधान आहे Smile
बाकी इतर माहिती माझ्यासाठी नवी आहे, त्याबद्दल आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान. एका मिरचीत ८० बिया असतील वाटले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक.

८१ निघाल्या, तर १ खिशात/पर्समध्ये घाला. ७९ निघाल्या, तर १ शेजारणीकडून उसनी घ्या. त्यात एवढे मोठे ते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आग्राकाकन्याय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तात्पर्य: मेहनतीचे खतपाणी घातले तर १ रुपयाचे १०० रुपये होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर!!! ललीत लिहीण्याची हातोटी आहे तुमची पटाईतजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...मध्यंतरी इन्फ्लेशनमुळे त्या १०० रुपयांची किंमत १ रुपयाहून कमी होते, त्याचे काय?

(मिरचीच्या रूपकात हे बहुधा स्पष्ट होत नसावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी बीज एकले
बीज अंकुरले, रोप वाढले
आधी बीज एकले.
एका बीजापोटी तरू कोटी
कोटी जन्म घेती सुमनेफळे
आधी बीज एकले.
व्यापुनी जगता तूही अनंता
बहुविध रूपे घेसी, घेसी
परी अंती ब्रह्म एकले.
- संत तुकाराम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही तुमच्या अध्यात्मोधार्मिक ज्ञानाचे नि त्याच्या योग्य जागी पेरण्या करण्याच्या पद्धतीचे फॅन आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद अजो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+ १ Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या ओळी तुकारामांच्या नसून शांताराम आठवले यांच्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमके हेच टंकायला आलो होतो.

यासंबंधाने गाळीव इतिहासातली नोंद पुढीलप्रमाणे: हा पिच्चर रेकॉर्डब्रेक हिट झाला असला तरी त्यात भाव खाऊन गेला तो 'आदी बीज एकले' हा अभंग!! पण कवीचे नाव होते शांताराम आठवले. म्हणून लोक तुकाराम विसरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एन्टर दाबल्यानंतर, मला शंका चाटून गेलेली. असो. अमुक व बॅटमन यांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0