कटी पतंग

तर बरं का, एकदा एका बाप्याची पतंग कटली! म्हणजे कुणी काटली नाही. तर कणीला जिथे मांजा बांधतात ना, तिथेच निसटली. आता लोंबणारा मांजाच नाही, त्यामुळे ती काय टपरी पोरांना भेटली नाही. ती गेली उडत उडत आधीच्या उडवणार्‍याकडे! तिला वाटलं, आपल्याला बघून त्याला आनंद होईल. पण त्याच्याकडे तर कोर्‍या पतंगांची थप्पीच होती! आणि एका सुंदर पतंगीला तो कणीच बांधत होता. त्याने कटलेल्या पतंगीला पाहिलं आणि छदमीपणे म्हणाला, तू कशाला आलीस परत? आता तुझा नंबर ही सगळी चळत संपल्यावर! कटलेली पतंग फार निराश झाली. एकदम दिशाहीनपणे उडायला लागली. एका अंबॅसॅडर चालवणार्‍या डायवरला मिळाली. तो तिला पळवू लागला तोच विरुद्ध दिशेने जीपमधून एक बाप्या आला. त्याने डायवरशी फायटिंग करुन तिला सोडवली. तिच्याच सांगण्यावरुन एका म्हातार्‍याकडे पोचली. त्याचा मुलगा पतंग उडवत असताना गच्चीवरुन पडून मेला होता. कटलेल्या पतंगीला आधार पाहिजे होता. तिनं सांगितलं, तुमचा मुलगा जी शेवटची पतंग उडवत होता ना, तीच मी! झालं, म्हातारा द्रवला. मुलाची आठवण म्हणून त्याने तिला घरांत ठेवून घेतली. पण तिला उडवणारं कोणीच नव्हतं, म्हणून ती सारखी फडफडायची.

आता ज्या बाप्याची पतंग कटली होती त्याने तेंव्हापासून पतंग उडवणेच बंद केले होते. योगायोग म्हणजे, त्यानेच तिला वाचवले होते आणि तो म्हातार्‍याच्या घराजवळच रहात होता आणि म्हातार्‍याकडे त्याचं येणंजाणं पण होतं. आता या कटलेल्या पतंगीला बघितल्यावर ते आणखीनच वाढलं. ही कटी पतंग आपण कधी एकदा उडवतो असं त्याला झालं होतं. पतंगीची पण मनातून तीच इच्छा होती. पण हा बाप्या कोण आहे हे तिला कळलं होतं त्यामुळे ती डबल फडफडायला लागली होती. पतंगी दु:खी का ते बाप्याला कळत नव्हतं. तिला बरं वाटावं म्हणून त्यानी तिच्यासमोर आरडीची कितीतरी गाणी म्हटली! पण ती आणखीनच फडफडायची. शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने किशोरच्या आवाजात गाणे न म्हणता मुकेशचा आवाज काढून आरडीचं गाणं म्हटलं. तरी काही उपेग नाही.

इकडे चळतवाल्या पतंगियाचे सगळे पतंग संपले असावेत बहुधा. म्हणून तो हिच्या मागावर आला होता. तिला त्रास देत होता. त्यामुळे शेवटी पतंगीने एकदम लताच्याच आवाजात एक जबरी गाणं म्हटलं. ते इतकं जबरी होतं की आजुबाजूचा पालापाचोळा उडायला लागला. बाप्यालाही ते ऐकू गेलं.बर्‍याच घडामोडी घडल्या. बाप्याने चळतवाल्याला हाकलून दिले. म्हातार्‍याला पटवून दिले की तुझ्या मुलाची आठवण म्हणून नुसती ठेवून दिलेली ती पतंगी दु:खाने फडफडती आहे. ती अशी खुंटीवरच फाटून जाईल. त्यापेक्षा मी तिला नवीन कणी बांधतो आणि मुक्त आकाशांत बदवतो, म्हणजे तिला मजा येईल. (स्वतःला मजा येईल हे न सांगण्याइतका तो धूर्त होता) आता तो म्हातारा पुन्हा द्रवला.(हिंदी सिनेमे फार बघितल्याचा परिणाम!)

अशा तर्‍हेने, ज्याची पतंग कटली होती त्यालाच ती परत मिळाली आणि सर्व लोकांची 'मुरादें' पुरी झाली. अशा आपल्या पतंगी न कटोत आणि कटल्या तरी त्या तुम्हाला परत मिळोत या सदिच्छेने ही चित्तरकथा संपवतो.

आमचे या विषयातले गुरु, 'फारएंड' साहेबांना समर्पित!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

ROFL

__/\__

अवांतर: आम्ही कणीला कन्नी म्हणायचो, आणि आमचा "तो" पतंग असायचा Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा हा हा तिमा रॉक्सस्टार इज ब्याक. लय भारी लिहीलय.
पण काही म्हणा चित्रपटातली गाणी छान होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
झक्कास

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ह्यावर आधीच पोंबुर्प्याचा पंपूने लिखाण केले आहे, त्यातील एक दिलखेचक वाक्य - "चंद्राबाई नर्सच्या हसण्यातून चांदणे सांडते". पंपूचहाता

गल्ली चुकली, हा प्रतिसाद तिकडे नर्सांच्या वार्डात पडायचा तो ब्रदरच्या वार्डात पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे म्हणजे कंपूबाजांनी फक्त कंपूतल्यांनाच कळेल असं झालं वाटतं! म्हणजे 'कटी पतंग' जर बघितलाच नसेल, स्टोरी माहितीच नसेल त्याला हे कथाकथन दुर्बोधच वाटणार. तेंव्हा लिंक देतो, तिथे मूळ स्टोरी मिळेल. ती वाचल्यावर काही बोध होतो का पहा, अशी सर्वांना विनंती आहे.
मूळ कथेतील सर्व पात्रे या पतंगी कथेत घेतली नाहीयेत.

http://en.wikipedia.org/wiki/Kati_Patang

- तिमा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिनेमा पाह्यला नाही, तरी गोष्ट सांगण्याची तिरशिंगी स्टाइल आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फडफडणे हा शब्द मस्त मादकपणे वापरला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.