पहाटे येणारी नर्स

हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या धर्तीवर माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच.

बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्या वर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नाही. सकाळची वाट पाहण्या शिवाय गत्यंतर काय?

सकाळचे पाच वाजले, सुहास्य करत ती रूम मध्ये आली, गुड मार्निंग, कैसे हो अंकल (आधीच छातीत चीर पडलेली आणि त्यात “अंकल” मनात म्हणायचो किती तुकडे होणार या नाजुक हृदयाचे), तरीही तिच्या कडे पाहून मी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करायचो. जवळ येऊन ती सरळ हाताचे मनगट आपल्या हातात घ्यायची. तिचा नाजुक, कोमल, रेशमी, मुलायम स्पर्श हाताला जाणवताच वेदना कुठच्या कुठे गायब व्हायचा, सर्व शरीर शांत झाल्या सारख वाटायचं. पण दुसर्याच क्षणी, आपल्या खिश्यातून भली मोठी सुई असलेली सिरींज बाहेर काढायची. एका हाताने सिरींज डोळ्यांसमोर नाचवत, दुसर्या हाताने टक-टक करून सिरींज वाजवायची. मग चेहऱ्यावर हास्य आणत, अंकलजी, थोडा दर्द होगा, म्हणत सुई हातात खुपसायची, त्या वेळी तिचा चेहरा अमेजोनच्या जंगलातल्या रक्त पिणाऱ्या वटवाघुळणी सारखा दिसायचा. असे वाटायचे, ती जिभेने लप-लप करून रक्त पीत आहे, आणि रक्त पिऊन तिचे ओठ लाल सुर्ख झालेले आहे. मी डोळे बंद करून घ्यायचो. काही क्षणांनी डोळे पुन्हा उघडायचो, सिरींज मधून रक्त एका ट्यूब ती भरायची. मग पुन्हा चेहर्या वर हास्य आणत, गुड डे, अंकल म्हणत बाहेर जायची, त्या वेळी ही हाताना तिचा ओझरता स्पर्श व्हायचा. ती गेल्या नंतर काही काळ तरी शरीराला वेदना जाणवायच्या नाही. मग पुन्हा त्याच असह्य वेदना सुरु व्हायच्या. कधी-कधी मनात विचार यायच्या, वटवाघुळणी, परत ये, तुझा वेदना दूर करणारा, नाजुक, कोमल, रेशमी स्पर्श मला दे, वाटलं तर पाहिजे जेवढे रक्त पी.

टीप: सकाळी सकाळी, टेस्टिंग साठी रक्त घेणे ही नर्सची ड्युटी होती. बाकी सर्व मनातले विचार आहेत. नर्सेसचा सेवा भाव पाहून मला काय वाटते ते:

नर्स

पृथ्वीवर अवतरली
अमृतघट घेउनी
अप्सरा शापित कुणी.

रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

रोचक आहे.
नर्सेसचा हात - विशेषतः नाडी बघताना - मला नेहमी थंडगार लागतो, तो असा असतोच का माहिती नाही.
बाकी कोमल, रेशमी वगैरे याही अवस्थेत जाणवणे म्हणजे तुम्ही खरे रसिक! Smile

लवकर बरे व्हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला वाटत स्त्रियांचे हातपाय किंवा एकंदरच स्पर्श गार असतो आणि पुरूषांचा गरम. हापिसातपण सगळे पुरूष थंडगार एसीत आरामात बसलेले असतात आणि स्त्रिया कुडकुडत ज्याकेट वगैरे घालून बसतात.
बाकी पटाईत अंकल Wink Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटत स्त्रियांचे हातपाय किंवा एकंदरच स्पर्श गार असतो

हे पालींबद्दल (प्रेडिक्टेबली) ऐकले होते. स्त्रियांबद्दल नवीनच ऐकतोय.

तदुपरि (हा शब्द बॅटमॅन यांजकडून (प्रेडिक्टेबली) साभार.), फ्रिजिडिटी हा स्त्रियांचा सार्वत्रिक/सार्वकालिक गुणधर्म नसावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

बाकी पटाईत अंकल Wink

अगदी!

किंबहुना, प्रस्तुत लेखास प्रचंड 'पोटेन्शियल' आहे, असे मत नमूद करून, अधिक विस्तीर्ण वितरणाकरिता त्याचे इंग्रजीतून त्वरित भाषांतर व्हावे, असे सुचवू इच्छितो.

(इंग्रजी भाषांतराकरिता 'द नर्स हू कम्स अ‍ॅट डॉन' अशा शीर्षकाचा विचार करता येईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'द नर्स हू कम्स अ‍ॅट डॉन'

कम अक्षरों में ज़्यादा परिणाम Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

www.io9.com/why-do-womens-bodies-run-colder-than-mens-836827770 हे मिळालं शोधल्यावर पण मिथदेखील असू शकेल.

बाकी प्रतिसादात पाल आल्याने भडकाऊ द्यावी की इंग्रजी नावामुळे विनोदी/मार्मिक विचार करतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रजी नाव = विनोदी, मार्मिक आणि पाल= भडकाऊ?????

पालींची बदनामी थांबवा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझे हात नेहमी गरम असतात ... व्हेरी वॉर्म!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुदा ज्यांना आपण नियमित स्पर्श करतो त्यांच्या स्पर्शाची जाणीव आपल्याला असतेच. परक्या व्यक्तीला फार तर हस्तांदोलनाच्या निमित्ताने तळहाताला ओझरता स्पर्श करण्याचे प्रसंग येऊ शकतात. दंड किंवा पोट वगैरे त्वचा तळहातापेक्षा अधिक संवेदनशील असावी जिथे डॉक्टर किंवा नर्स स्पर्श करतात. तो स्पर्श वेगळा वाटत असावा इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यावर आधीच पोंबुर्प्याचा पंपूने लिखाण केले आहे, त्यातील एक दिलखेचक वाक्य - "चंद्राबाई नर्सच्या हसण्यातून चांदणे सांडते". पंपूचहाता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नर्स Smile ..... नबा म्हणतत तसे खच्चून पोटेन्शिअल आहे या लेखात. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोलटकरांची कविता इथे आठवणे अपरिहार्य आहे .. Smile
-----------------------------
Ryles tube removed
----------------------------

एक गुलाबाची कळी
ढकलते माझ्या नाकात रबराची नळी
​एक झगेवाली पूर्णिमा
देते मला मागच्यामागे एनिमा
एक वाजवते बीन
माझ्या दिमतीला दाशा तीन

गालावर ओघळते लाळ
तेव्हा एक पुसते कपाळ
पाठीला येतो घाम
तेव्हा एक लावते कानाला बाम
आणि तिसरी
वाजवते बासरी


- अरूण कोलटकर (पृ. १०३, कवितासंग्रह : 'अरुण कोलटकरच्या कविता', प्रकाशन: 'प्रास', १९७७ )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0