<नवीन फोटो काढणे : निरर्थक उद्योग>

इतकी वर्षे फोटोग्राफी करून झाली आणि त्यातले बहुतांश फोटो फेसबुकवर अपलोड करून झाले, तरी माणसे जगभर नवीन नवीन फोटो घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझ्या काही मूलभूत शंका आहेत...

समजा एखादा नवीन फोटो घेतलाच तर ते फोटो आत्तापर्यंतच्या फोटोंपेक्षा मूलत: वेगळे असतील का? निसर्गदृश्य, व्यक्तिचित्रं आणि फुलांचे गोग्गोड फोटो यापेक्षा नवीन काही निराळे मिळू शकेल का? मला वाटते नाही. याची मुख्य कारणे अशी की, रंग, पोत, आकार आत्तापर्यंतच्या फोटोंपेक्षा वेगळे नसणार. साहजिक छायाचित्रांची ही मूलतत्त्वे विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट नियमांनी तीच चित्रं निर्माण करणार. कदाचित त्यांचं प्रमाण कमी-जास्त बदलेल, जसे वाळवंटात पाण्याचे प्रमाण कमी असते.

थोडक्यात फोटोग्राफीचे मूलभूत नियम नवीन वेगळे सापडण्याचे काही कारण नाही. आता हाच युक्तीवाद पुढे खेचला तर असे लक्षात येते की नवीन फोटो आत्तापर्यंतच्या फोटोंपेक्षा फार वेगळे असतील असे नाही फक्त जिथे फोटो काढू तिथल्या परिस्थितीचे प्राबल्य असेल. उदाहरणार्थ, फोटो काढण्यासाठी कोणी पाण्याखाली गेलेले असेल तर तिथे कदाचित फक्त जलचरच सापडतील. कदाचित तिथले काही जलचर पृथ्वीवर आत्तापर्यंत दिसलेले नसतील, किंवा फेसबुकवर अजून अपलोड व्हायचे असतील. एव्हढेच... पण पाण्याखाली एखादा नवीनच रंग सापडण्याची शक्यता किती. मला वाटते शून्य. कारण आत्तापर्यंत सगळे रंग, आकार, पोत सापडलेले आहेत.

थोडक्यात आत्तापर्यंत कोट्यवधी फेसबुक अपलोडमध्ये जे दिसून आलेले नाही ते नवीन फोटोंमध्ये दिसण्याची शक्यता पण शून्यच वाटते. फोटोग्राफीची मूलतत्त्वे बदललेली नसल्याने नवीन फोटोंच्या मर्यादा पण त्याच असणार.

म्हणुनच मला नवीन फोटो काढणे एक निरर्थक उद्योग वाटतो...

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

असे निरर्थक कसे असेल? तुमच्यावर फोटोंचा अति मारा होतोय का? तुम्ही फक्त facebook च पाहता का? असे बरेच प्रश्न मला पडले तुमचं लिखाण वाचून.

मी लहानपणी एक वचन ऐकले होते आणि काही कारणाने ते अजून लक्षात आहे - "व्यासोव्च्छिश्टं जगत्सर्वं!" (शुद्धलेखनातील चू. भू. द्या. घ्या.) थोडक्यात, व्यास मुनींनी महाभारत लिहून जगातले सर्व काही लिहून टाकले आहे किंवा जगातले सर्व विषय उष्टावले आहेत. आता आणखी लिहिण्यासारखे काही नाही. तरीही यानंतर हौशे, नवशे, गवशे आणि पु. ल. यांचे लिखाण थांबले का हो? तसे थांबायला पाहिजे होते असे तुमचे मत आहे का?

तुम्हाला हा जो फोटोंबद्दल प्रश्न पडलाय तोच मला सिनेमाच्या गाण्यांबद्दल पडत असे. इतकी गाणी झाली तरी हे संगीतकार लोक नव्या नव्या चाली कशा बनवत असतील? एका दिवशी तरी जगातल्या सगळ्या चाली संपणार. मग हे लोक काय करतील? पण आता youtube वर कुणी कुणी गाणी कुठून उचलली आहेत ते पहिले आणि तो दिवस हिंदी संगीतकारांसाठी तरी कधीच येउन गेलाय याची खात्रीच पटली.

फक्त facebook पाहण्यापेक्षा flickr, ५००px असली संकेतस्थळे थोडी चाळा आणि तुमची खात्री पटेल की फोटो काढणे निरर्थक नाही. अजून खूप शक्यता बाकी आहेत. पृथ्वीवरील कानाकोपऱ्याचे फोटो काढून झाले असतीलही. केवळ कॅमेरा आणि त्यावरील रेकॉर्डेड चित्रे महत्वाची नसून त्यामागील व्यक्ती आणि तिची कल्पनाशक्ती कधीही संपणार नाही. आजकाल केवळ पैसा आहे म्हणून DSLR घेणारे लोक आहेत आणि केवळ प्रेक्षणीय स्थळी गेले म्हणून तिथल्या नावाच्या पाटीशेजारी ऊभे राहून फोटो काढणारेही लोक आहेत. त्याच वेळी नवे नवे प्रयोग करणारे पण लोक आहेत. या दोन्ही प्रकारचे लोक कायमच राहतील. आपण कुठल्या प्रकारात मोडतो ते आपणच ठरवायचे!

ता. क. : facebook वर राहूनच चांगले फोटो बघायचे असल्यास "Hari Menon Photography" हे पान नक्की बघा. तुम्हाला काही न काही नवे सापडेल याची खात्री आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे निरर्थक कसे असेल? तुमच्यावर फोटोंचा अति मारा होतोय का? तुम्ही फक्त facebook च पाहता का? असे बरेच प्रश्न मला पडले तुमचं लिखाण वाचून.

मी लहानपणी एक वचन ऐकले होते आणि काही कारणाने ते अजून लक्षात आहे - "व्यासोव्च्छिश्टं जगत्सर्वं!" (शुद्धलेखनातील चू. भू. द्या. घ्या.) थोडक्यात, व्यास मुनींनी महाभारत लिहून जगातले सर्व काही लिहून टाकले आहे किंवा जगातले सर्व विषय उष्टावले आहेत. आता आणखी लिहिण्यासारखे काही नाही. तरीही यानंतर हौशे, नवशे, गवशे आणि पु. ल. यांचे लिखाण थांबले का हो? तसे थांबायला पाहिजे होते असे तुमचे मत आहे का?

तुम्हाला हा जो फोटोंबद्दल प्रश्न पडलाय तोच मला सिनेमाच्या गाण्यांबद्दल पडत असे. इतकी गाणी झाली तरी हे संगीतकार लोक नव्या नव्या चाली कशा बनवत असतील? एका दिवशी तरी जगातल्या सगळ्या चाली संपणार. मग हे लोक काय करतील? पण आता youtube वर कुणी कुणी गाणी कुठून उचलली आहेत ते पहिले आणि तो दिवस हिंदी संगीतकारांसाठी तरी कधीच येउन गेलाय याची खात्रीच पटली.

फक्त facebook पाहण्यापेक्षा flickr, ५००px असली संकेतस्थळे थोडी चाळा आणि तुमची खात्री पटेल की फोटो काढणे निरर्थक नाही. अजून खूप शक्यता बाकी आहेत. पृथ्वीवरील कानाकोपऱ्याचे फोटो काढून झाले असतीलही. केवळ कॅमेरा आणि त्यावरील रेकॉर्डेड चित्रे महत्वाची नसून त्यामागील व्यक्ती आणि तिची कल्पनाशक्ती कधीही संपणार नाही. आजकाल केवळ पैसा आहे म्हणून DSLR घेणारे लोक आहेत आणि केवळ प्रेक्षणीय स्थळी गेले म्हणून तिथल्या नावाच्या पाटीशेजारी ऊभे राहून फोटो काढणारेही लोक आहेत. त्याच वेळी नवे नवे प्रयोग करणारे पण लोक आहेत. या दोन्ही प्रकारचे लोक कायमच राहतील. आपण कुठल्या प्रकारात मोडतो ते आपणच ठरवायचे!

ता. क. : facebook वर राहूनच चांगले फोटो बघायचे असल्यास "Hari Menon Photography" हे पान नक्की बघा. तुम्हाला काही न काही नवे सापडेल याची खात्री आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन वेळा सारखाच मजकूर पोस्ट झाला त्याबद्दल क्षमस्व.

चुकून दोनवेळा पोस्त डकवली गेली असल्यास ती काढून कशी टाकावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन-दोनदा सांगणे हि हल्लीची अम्येरिकेतली फॅशन आहे का हो? नाय म्हणजे आमच्या पुण्यात सरकारी बिएसएनएल्च्या तांब्याच्या तारेवरचे आंतरजाल बरे चालते पण तुमच्या कडचे ते फायबर का काय ते एवंढे कसे हो स्लों? नाय म्हणजे तुम्ही पुढारलेली लोकं न? जरा स्वतःचे नेटकनेक्श्न घ्या, दुसर्‍याच्या वायफायवर कितीदिवस चालवणार?

आता हा प्रतिसाद अवांतर म्हणून फाट्यावर मारु नका हां!!! कारण तुम्ही एकदा नाय तर चांगलं दोनदा फाट्यावर माराल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो मी आजोबा,

अमेरिकेतली हपिसं म्हणावी तेवढी फास्ट स्पीड देत नाहीत त्याला मी काय करू? एवढा हापिसातला सोमवार चा timepass म्हणून दुर्लक्ष करा जरा. दोन वेळा पोस्त गेल्याबद्दल माफी मागितली आहे. मी ऐसी चा नवा भिडू असल्याने चूक सांभाळून घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, यात तुमची चूक बहुदा नसावी. प्रतिसाद दिलात तेव्हा ऐसीच्या सेवादात्याकडूनच अडचण येत होती. ती आता बहुदा निस्तरली आहे. राहू देत ते दोन-दोन प्रतिसाद. (वेळेला उपद्रवी प्रतिसादही काढून टाकत नाही तर मजेमजेत दिलेले प्रतिसाद कशाला काढायचे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता हा प्रतिसाद अवांतर म्हणून फाट्यावर मारु नका हां!!! कारण तुम्ही एकदा नाय तर चांगलं दोनदा फाट्यावर माराल.

ठ्ठो ROFL ROFL ROFL धन्य _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणुनच मला नवीन फोटो काढणे एक निरर्थक उद्योग वाटतो...

मग अशावेळेस अश्लिलतेकडे जग वळते, तिकडे सगळेच कसे नाविन्याने भरलेले आहे, तिथे निरर्थकतेलाही 'अर्थ' प्राप्त होतो, तिथे एका डोंगारावरुन दुसर्‍या डोंगरावरचे दिपच काय तर इकडच्या डोंगरावरचा दिपस्तंभही दिसेल, अशा वेळेस १४ वर्षे वाया गेली असं वाटत नाही, आणि लॉंगफॉर्म/शॉर्टफॉर्म सगळं-सगळं कसं उलगडत जातं, त्याच्या तळाशी तुम्हाला कायमच तीच अनुभुती नविन वाटत रहाणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशिब...व्यास मुनींनी सगळे फोटो पण काढून ठेवलेले नाहियेत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवनवीन फोटो काढल्याशिवाय तुम्ही सर्व फोटो काढल्याचे अन पाहिल्याचे कसे कळेल? आम्ही नाही रोज-रोज त्याच त्याच वेबसाईट पाहून काही नविन फोटो अन व्हिडीओ शोधत? शिवाय, कधी कधी त्याच त्याच फोटोंतही नवी मजा असते हे वेगळे काय सांगणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हा उद्योग नुसता निरर्थकच नव्हे तर मूर्खपणाचाही आहे असे मला वाटते.

अँसेल अॅडम्स आणि आल्फ्रेड स्टीगलिट्झ यांनी मांडलेल्या मिड्योक्रसी फोटोथिसिसनुसार फोटोग्राफी ही एक सर्वसामान्य कला आहे आणि कॅमेरा हे एक सर्वसामान्य उपकरण आहे आणि आपल्या कॅमेऱ्यांसारखे हजारो कॅमेरे असलेल्या या मराठी आंजावरही आपल्या कॅमेऱ्यासारखी लाखो उपकरणं असतील असे त्यांचे म्हणणे होते.
घासूगुर्जी यांनी तयार केलेल्या समीकरणावरून आपल्या 'म.आं.जा'मध्येच दशहजारावधी प्रगत कॅमेऱ्यांचे ब्लॉग्ज असायला हवेत असा अंदाज निघतो.
त्यावर चिंतातुर जंतूने विचारलेला प्रश्न मार्मिक आहे आणि Gurji's Paradox म्हणून प्रसिद्ध आहे.

नुकताच जेआर या कलाकाराने मिड्योक्रसी फोटोथिसिसच्या विरोधात जाणारी मल्टी फोटो कलाकृती मांडली. त्यांच्या कलाकृतीनुसार आपल्या कॅमेऱ्यासारखे कॅमेरे प्रचंड प्रमाणात असले तरी बऱ्याच लोकांनी काढलेले फोटो एकत्र करून चांगली कलाकृती निर्माण करता येते, ती अतिशय प्रदर्शनीय आहे आणि म्हणूनच निसर्गदृश्य, व्यक्तिचित्रं आणि फुलांचे गोग्गोड फोटो या पातळीवरचे फोटो जालावर सर्वसामान्य असले तरी मेंदूला कार्यरत करणाऱ्या फोटोंच्या बऱ्याच कल्पना असू शकतात.

पण माणसाच्या अज्ञानाला आणि गोग्गोडपणाला सीमा नाही म्हणतात. जालावर माणसाच्या "फोटोग्राफी"मुळे माणसाच्याच दृश्यकलाजाणीवांना धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आलेली आहे. मोबाईल कॅमेऱ्यांची रेलचेल व दाखवायचा गोग्गोडपणा आणि दृश्यकलांविषयी प्रीतीमुळे त्या फोटोंवर घाण करण्याचे वाढते प्रकार यामुळे काही थोर्थोर मंडळींना दुसरे फोटोसंस्थळ वाढवण्याचे डोहाळे लागले आहेत.
"Breaking free from banking" नावाच्या एका डॉक्युमेंटरीत श्रीमान कौशल पारीख म्हणतात "Sometimes I instantly see a moment and capture it ...". WTF?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Sometimes I instantly see a moment and capture it ...

हे "Instantly" वाले काय maggi खाऊन फोटो काढतात की काय देव जाणे!

Candid Photography हा एक सुंदर प्रकार आहे पण त्यासाठी सुद्धा प्लान करूनच बाहेर पडावे लागते.

बाकी फोटोग्राफी हि सर्वसाधारण कला आहे हे पटत नाही. पण त्यासाठी लागणारी सर्वसाधारण दर्जाची उपकरणे सहज उपलब्ध आहेत हे नक्की. आणि त्यानंतर आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे लोक. काही लोक अत्युच्च दर्जाची उपकरणे वापरून बंडल फोटो काढतात, तर काही लोक सर्वसाधारण उपकरण हातात घेऊन जादुई फोटो टिपतात. facebook मुळे या दोन्ही प्रकारच्या लोकांना सहन करावे लागते हे खरे आहे. (मी स्वत: कुठल्या प्रकारात मोडतो ते माझ्या facebook मित्रांनी ठरवले असेल बहुदा!)

माझी सवय आहे की जिथे जायचं असेल तिथले फोटो आधी बघायचे नाहीत. डोक्यात कुणाच्या कल्पना भरून न घेता स्वत: जसे चांगले वाटतील तसे फोटो काढायचे. आणि तिथे गेल्यावर मी हातात मशीन गन असल्यासारखा सटासटा क्लिकत सुटतो. आणि चांगले फोटोग्राफर नेमका ह्याच्या उलटं करतात. ते परिसराची / हवामानाची / प्रकाशाची नेमकी माहिती घेतात. कॅमेरा कुठला वापरू आणि त्यात काय setting ठेवू हा विचार अगदी शेवटी करतात. वेळप्रसंगी हवा तसा फोटो काढण्यासाठी दुर्गम भागांची चढाई करतात. नेमकी वेळ साधण्यासाठी सकाळी लवकर उठणे किंवा रात्री १२ वाजता जंगलात कॅमेरा आकाशाकडे तोंड करून लावून ठेवणे असा सगळं काही करतात. सगळ्यात अवघड म्हणजे क्षणार्धात अवतरणारी आणि नाहीशी होणारी विद्युल्लता… ती टिपता यावी म्हणून तास न तास कॅमेरा लावून तपस्या करतात. हा सगळा एवढा बिकट मामला निरर्थक कसा असेल? किंवा अति सुंदर छायाचित्रे टिपणारे लोक सर्वसाधारण कलाकार तरी कसे असतील?

झकिर हुसेन कडे जो तबला आहे अगदी तसाच तबला तुमच्या आमच्याकडेही असू शकतो की! पण म्हणून आपण झाकीर हुसेन बनत नाही. केवळ "कॅमेरा उदंड जाहला" म्हणून टाहो फोडण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला जे फोटो बघायचे ते बघा, जे नाही बघायचे ते बघू नका. स्वत: काढणार असाल तर स्वत:च्या कल्पनाशक्तीवर विश्वास ठेवा आणि आवश्यक परिश्रम घ्या (हेच मी स्वतःला पण सांगतो!).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin
लिंकांमुळे प्रतिक्रिया मुदलापेक्षा चांगली झालीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेच्चा! हे सदर मौजमजा आहे हे आत्ता कळले. मौजमजेत बरेच डोस पाजले की मी! Smile Smile हाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्जि करू न्ये. मी पण विनोदी प्रतिसाद लिहीताना काही आवडलेल्या लिंका दिल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता कळलेच आहे तर लक्षात असु द्या की मराठी आंतरजालावर < > अशा कंसातील टायटल हे विडंबन दर्शवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख Biggrin आणि प्रतिसाद _/\_.
बर्याचदा दुर्लक्ष करतो तरीही ते 'कुछभी कर फेसबुकपे डाल' लय बोअर मारतात कधीकधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मुळापासुन" यांनी विंडंबनामधली हवा काढुन घेतली असल्याने मी जास्त काही ल्हीत नाही. Smile पण विदाचार्यांचा प्रयत्न चांगला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय चावटपणा लावलाय गुर्जी, आं? तुम्ही असं कायतरी लिवता नि पोरं भलभलते लेख लिहितात मग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

१९९९ मधे मी आमच्या मामाश्रींना इन्फर्मेशन सुपर हायवे बद्दल बोललो तेव्हा त्यांनी ही असाच प्रश्न विचारला होता. - पण एवढ्या इन्फरमेशन चे करायचे काय ?
मामाश्री के प्रश्न का उत्तर आपके सामने है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0