मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १५

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

---------------

थॅलेसेमिया झालेल्या रुग्णाला लाल रक्त पेशी देता येतात तसे चांगले कॉलेस्ट्रॉल (बहुदा एच डी एल) सुद्धा इंजेक्शन / सलाइन द्वारे देता येणे शक्य नाही का?

हृद्यरोगावर ही पद्धत "प्रिव्हेन्टिव्ह मेजर" या पद्धतीने काम करू शकेल ना? या दृष्टीने काही संशोधन झाले आहे का?

field_vote: 
0
No votes yet

ते कोलेस्टेरॉल (एच डी एल) वाढवले तरी एलडीएल आणि व्हीएलडीएल कसे कमी करणार? टोटल कोलेस्टेरॉल सुद्धा महत्त्वाचेच ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

टोटल कॉलेस्ट्रॉल हा माझ्या माहिती प्रमाणे फक्त रेशो आहे.

In healthy individuals, about 30% of blood cholesterol, along with other fats, is carried by HDL.[1] This is often contrasted with the amount of cholesterol estimated to be carried within low-density lipoprotein particles, LDL, and called LDL-C. HDL particles remove fats and cholesterol from cells, including within artery wall atheroma, and transport it back to the liver for excretion or re-utilization; thus the cholesterol carried within HDL particles (HDL-C) is sometimes called "good cholesterol" (despite being the same as cholesterol in LDL particles).

एच डी एल वाढवले तर ते रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहिलेले फॅट आणि इतर कॉलेस्ट्रॉल घटक काढायला मदत करते आणि ब्लॉकेजेस कमी करायला मदत करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

व्यायाम व आहारावरील नियंत्रणाने बऱ्यापैकी कमी होत असावे. (माझे थोडेसे कमी झाले. मात्र ते धोक्याच्या पातळीवर आधीही नव्हतेच)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"टारझनच्या गोष्टी" नामक अनमोल प्रकाशनाचे शशिकांत कोनकर/रमेश मुधोळकर यांचे जुने पुस्तक कुठे मिळेल? पुण्यात एबीसीमध्ये तीन दुकाने सर्चवली, पण मिळालंच नाही. Sad

मला त्या मराठी पुस्तकाची वरिजिनल व्हर्जनच पाहिजे आहे. अन्य कुठलीही नकोय. अनमोलवाल्यांनी त्या जुन्यावाल्या व्हर्जनीत बदल केले असतील तर बदलपूर्व व्हर्जनच पाहिजे.

एडगर राइस बरोज़ वाली इंग्रजी व्हर्जनही नकोय-ती ट्रेडमार्क वल्कले नेसलेला टारझन सिंहाच्या जबड्यात सुरा खुपसतानाचे मुखपृष्ठ असलेली मराठी व्हर्जन पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुणेमराठीग्रंथालयाच्या बालविभागात असण्याची शक्यता आहे, पण सदस्यता गरजेची आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. पण मला विकत कुठे मिळेल तर पाहिजे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रंथालयातून घेउन स्वतःपुरते स्कॅन करुन नाही का ठेवता येणार?
विक्री वा वितरण वगैरे करु नकोस म्हणजे झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ते आहे, पण ते पुस्तक इतकेही दुर्मिळ झालेले नसावे असे वाटते. तितके दुर्मिळ असेल तर मात्र तो पर्याय आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रेत्येक्ष अनमोललाच फोन लावून बघा.
Address: 1360, Bharat Bhavan, Shukrawar Pwth, Shukrawar Peth, Pune, Maharashtra 411002
Phone:020 2447 3183 - हा नंबर गुगल ने दिला आहे, अपमान झाल्यास मी जबाबदार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. त्या व त्यांनी दिलेल्या अन्य नंबरांना फोन लावून पाहिला. औट ऑफ प्रिंट आणि औट ऑफ स्टॉक दोन्हीही आहे. Sad

स्कॅनिंगचाच मार्ग तूर्तास अवलंबावासे वाटतेय. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरेरे, मलाही हवं होतं.
काळीढुस्स एस्मरेल्डा, विक्राळ न्यूमा सिंह, करचक आणि (बहुधा) टर्कोजची लढाई इ. आठवून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाहतो कुठं मिळालं तर. लडाई अभी जारी है!!

बाकी टर्कोजवरनं आठवलं- "का गोडा? का गोडा?" Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही पुस्तकमालिका माझ्याकडे होती. आता जीर्ण होऊन गेली. पण ती परत मिळवायला आवडेल. आउट ऑफ प्रिंट ?

मला तर एखाददोन वर्षांपूर्वी फास्टर फेणेचा एकत्रित संच आला त्या सुमारास हाही संच मॅजेस्टिकमधे दिसला होता. तेव्हा समहाउ फाफे घेतला पण टारझन घेतला गेला नाही. आता हे सर्व कळीचे शब्द ऐकून त्या मंडळींना भेटण्याची इच्छा होतेय.

बादवे मॉन्शर थुरान हा कोणत्या खलनायकाचा दुसरा अवतार असतो ? माझी मेमरी दगा तर देत नाही ना?

आणि हा पुस्तकसंच माझ्यामते कोणी टिकेकर नावाच्या लेखकाने लिहीला (भावानुवादित केला असेल) आहे. मुधोळकर नसावे.

प्रकाशक बहुधा उत्कर्ष (याविषयी मात्र खात्री नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुस्तकमालिका नै ओ. एकच पुस्तक ए. तूर्तास औटॉफप्रिंट अ‍ॅज्वेलॅज औटॉफस्टॉक पण आहे असे कळते.

मॉन्शर थुरान हा निकोलास रोकॉफ अन पॉलवीच या जोडगोळीपैकी रोकॉफचा दुसरा अवतार असतो. अन लेखक शशिकांत कोनकर हे आहेत. प्रकाशन अनमोल. यात मात्र कन्फूजन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओक्के.. रॉकॉफचा अवतार.. सही..

बाकी मी म्हणतोय ते दहा भाग लई म्हणजे लईच भारी आहेत.. ते मिळाले तर आधी घे. आपल्याला पूर्ण त्या त्या जागी घेऊन जाणारे.

http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=070514052431&Previe...

हे पहा. मी लहानपणी घेतलं तेव्हा कव्हर वेगळं होतं. एकसारखं आणि साधं.

आता प्रत्येक भागाला वेगळे कव्हर आलेले आहे.

बुकगंगावर औट ऑफ स्टॉक असले तरी औट ऑफ प्रिंट वाटत नाहीये. तिथेच ई बुक मात्र उपलब्ध दिसते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.पण धिस वॉजंट माय यारो..प्लस ते सर्व भाग एका पुस्तकात कंबाईन्ड अन समराईझ्ड होते. पाहतो काय ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"टारझनच्या गोष्टी" पुस्तक online शोधता शोधता इथे येऊन पोहोचलो. माझ्यासारखे उत्सुक अजूनही आहेत हे बघून फार बरं वाटलं आणि पुस्तक एव्हढं दुर्मिळ झालं आहे हे समजून वाईटही वाटलं.

मागील ४-५ वर्षात काही प्रगती झाली का? कोणाला original ( वल्कले नेसलेला टारझन सिंहाच्या जबड्यात सुरा खुपसतानाचे मुखपृष्ठ असलेलं) पुस्तक सापडलं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतापासून पाकिस्तान वेगळा केला गेला तेव्हा धर्माधारित फाळणी झाली. बांगलादेश तयार झाला १९७१ साली, त्याआधी तो पाकचाच भाग होता.

आता प्रष्ण असा, की अख्ख्या उपखंडात पोष्ट-१९७१ पाकिस्तान सोडला तर 'बांगलादेश' मुसलमान मेजॉरिटीवाला कसा काय तयार झाला? बाकी यूपीबिहारात नै झालं असं कै ते? पंजाब, सिंध, इ. बद्दल समजू शकतो, ते भाग सेंट्रल आशिया इ. ला जवळ होते त्यामुळे त्यांचे इस्लामायझेशन समजू शकतो. काश्मीरबद्दलही समजू शकतो. पण मधला सगळा पट्टा सोडून एकदम बांगलादेश कसा काय मुसलमानबहुल झाला? असं नक्की काय झालं तिथं जे अन्य भारतापेक्षा वेगळं होतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हरे राम ! इसने ६ सोनेरी पाने नही पढ्या.
तो सावरकरवाद्यांत वर्ल्ड फेमस असलेला सिद्धांत ठौक नै काय तुम्हास?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तूर्तास आम्ही बियाँड सोनेरी पाने थिंकण्याचे डेअरवत आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे पुस्तक वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद म्याडम. हे पुस्तक वाचेन आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुसलमानबहुल झाला नाही तो १९४७ मध्येही होताच.

अ‍ॅबरेशन हे होते की पाकिस्तानी बंगालची लोकसंख्या पश्चिम पाकिस्तानाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होती. त्यामुळे बंगालमधील पार्टी बहुमतात निवडून आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रश्न बहुधा हा असावा, की (१९४७मध्ये नव्हे, पण) जेव्हा केव्हा झाला, तेव्हा हा मधलाच पॉकेट कसा काय झाला असावा? (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरएसएसची थिअरी ताणून.....

बंगाल मध्ये सर्वप्रथम इंग्रजी राज्य (१७५७) स्थापन झाले. हिंदू त्यांच्या संपर्कात आल्यामुळे प्रबोधन वगैरे झाले. त्यामुळे त्यांना कमी मुले होऊ लागली वगैरे.......................

सिरिअसली....

माझ्या माहितीप्रमाणे बिहार १९१२ मध्ये वेगळा झाला. तोवर तो बंगाल प्रेसिडेन्सीतच होता. तेव्हाची डेमोग्राफी ठाऊक नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वंगभंग आंदोलन झाले १९०५ ला. तेव्हाही ईस्ट बंगाल मुसलमानबहुलच होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रश्न संयुक्त बंगाल प्रांताच्या डेमोग्राफीचा नसून, बंगालचा जो हिस्सा आज बांग्लादेश म्हणून ओळखला जातो (आणि वंगभंगात वेगळा करण्याचे घाटिले होते), तेवढ्याच भूभागाच्या डेमोग्राफीबद्दल असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

(अतिअवांतर: 'बंगाल प्रेसिडेन्सी' हा शब्दप्रयोग येथे तितकासा उचित वाटत नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे, 'बंगाल प्रेसिडेन्सी'ची मूळ व्याप्ती ही (निदान एके काळी तरी) बंगाल, बिहार, ओरिसा आणि कदाचित आसाम/ब्रह्मदेश इ.इ. इतपतच मर्यादित नसून, 'मुंबई किंवा मद्रास प्रेसिडेन्श्यांत अंतर्भूत न होणारा ब्रिटिश हिंदुस्थानाचा उर्वरित सर्व भाग' अशी (बहुधा व्याख्येने) असावी. बोले तो, ब्रिटिश पंजाब हासुद्धा बहुधा 'बंगाल प्रेसिडेन्सी'खाली यावा.

कदाचित येथे आपल्याला (बोले तो तुम्हांआम्हाला) जो संयुक्त बंगाल अपेक्षित आहे, त्यास 'बंगाल प्रॉव्हिन्स' अथवा 'बंगाल प्रांत' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे काय? (चूभूद्याघ्या.))

(संदर्भ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनेरी पाने सोनेरी पाने

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यग्जाक्टलि हाच मुद्दा आहे. धन्यवाद न'वी बाजू.

पूर्व बंगाल या प्रदेशात इतक्या मोठ्या प्रमाणात इस्लामायझेशन कसे काय झाले? सराउंडिंग म्हणाल तर मुसलमानबहुल भाग आजिबात नाहीत कुठल्याच दिशेने.

अन हा भागही अगोदरच मुस्लिमबहुल झाला असावा. पंजाब हा किमान रणजितसिंगाच्या वेळी तरी मुसलमानबहुल असल्याचा उल्लेख आहे. झालंच तर बंगालचे नबाब लोक काय इतके कन्व्हर्जनबद्दल आग्रही म्हणूनही प्रसिद्ध नाहीत म्हणताना शंका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शैलेनने ऐसीवर जे नाणेविषयक लेख लिहीलेत त्यात असा उल्लेख वाचल्याचा आठवतोय की दिल्ली आणि बंगाल भागात इस्लाम आधीपासूनच होता. इनफ्याक्ट मधेकधीतरी दिल्लीच्या मुस्लिम राजसत्तेपेक्षा बंगालची मुस्लिम राजसत्ता प्रबळ होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामचंद्र गुहा माहिती देऊ शकतील. त्यांची एक लिंक मी कैक वर्षांपूर्वी वाचली तेंव्हा बंगाल मधला इस्लाम हा पूर्णपणे बंगाली होता म्हणजे त्याची वाढ आपोआप होत गेली आणि तो बाकीच्यान्च्यापेक्षा बराच वेगळा होता. आता सगळेच कट्टर होत आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा अत्यंत अनाभ्यासु तर्क
मुघल राजवटींच्या वेळी हल्लीचा पाकिस्तान ते बंगाल या पट्ट्यात बरेच मुसलमान वाढले होते. पैकी युपी, बिहार भागात हिंदुंची धार्मिक स्थळेही खूप असल्याने, तसेच बौद्ध धर्माचाही प्रभाव असल्याने तिथे हिंदु सुद्धा बरेच होते. पुढे इंग्रज आल्यावर कलकत्ता, कराची ही मोठी बंदरे तयार झाल्यावर अनेक जनता या दोन पोल्सला एकवटली, त्यात हिंदूंमध्ये जातीव्यवस्थेमुळे प्रत्येकाला काही रोजगार बांधलेला होता. त्यात साधारण १/४ जनता व्यापारी वर्गातली असली तरी तितकीच या पोल्सला स्थलांतरीत झाली बाकीची हिंदु जनता मधेच राहिली. मुसलमान जनतेला तसे बंधन नसल्याने, नोकरी+धंदा अश्या दुहेरी कारणाने ती जनता पूर्वेला व पश्चिमेला गेली. त्यामुळे हे पोलराझेशन झाले असु शकत असेल का?

अर्थात हा अत्यंत वाईल्ड गेस. मुर्ख विचार वाटल्यस सोडून देणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. कलकत्ता पश्चिम बंगालात आहे. अजूनही.

२. सिराजउद्दौला हा बंगालात ब्रिटिश सत्ता स्थापन होण्याच्या बहुधा (चूभूद्याघ्या.) अगोदरपासूनचा. मुसलमान. ब्राह्मण नव्हे, कायस्थही नव्हे. ('बंगालातल्या दोन डॉमिनण्ट हिंदू जाती' या अर्थी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'बंगालातल्या दोन डॉमिनण्ट हिंदू जाती' ह्यात ठाकूर, रेड्डी, मराठा ह्यास समांतर बंगाली असे काही नाही काय ?
परंपरेने बहुसंख्य क्षात्रकर्म कोण करत असे? तिथले बामणेच करीत काय ?
कन्फ्युज्ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बंगालात दोनाहून अधिक डॉमिनण्ट हिंदू जाती असण्यास कोणताही प्रत्यवाय व्यक्त केलेला नाही.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाकूर तर आहेतच ना.... रोबिन्द्रनाथ ठाकूड वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

@अस्मि: मुसलमान आक्रमणे झाल्यानंतर काही वर्षांतच इस्लाम भारतभर पसरू लागला तसा तो बंगालमध्येही पसरला. प्रष्ण त्याबद्दल नाहीये तर 'मुस्लिमबहुल' होण्याबद्दल आहे. बाकी १८ व्या शतकात दिल्लीच्या राजसत्तेची पॉवर अतिशयच कमी झाली होती हे निर्विवादच आहे.

@सलीलः इस्लामचे लोकल फ्लेवर्स कैक ठिकाणी होत होते, आधी मेहदवी अन आता वाहाबी, देवबंदी, इ. चळवळींना ते खपत नाही. ते फ्लेवर्स असूही शकतील, पण 'मेजॉरिटी' पणाबद्दल प्रष्ण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे बघा, पॉलिगामीला दोष देतायतं, डावे नाराज होतील अशाने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म...निव्वळ तो मुद्दा लोकसंख्यावाढीमागे कधीच नव्हता. अन असलाच तर हिंदूंनाही एकाधिक बायका जुन्या काळी सहज असायच्या. सबब ते दोन्ही ऑफसेट झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रावणाच्या आजीचं नाव काय होतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईची आई ताडका. वडिलांची आई हविर्भू.

हविर्भू-पुलस्त्य सुमाली-ताडका
| |
विश्रवा------------------------- कैकेशी
|
रावण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सॉल्लिड! रावणाच्या दोन्ही आज्यांची नावं सांगितल्याबद्दल. बोनस पॉईंट मिळाल्याचा आनंद झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! धन्स हो अनुप्राव. महापराक्रमी लंकस्थ दशग्रंथी ब्राह्मणांची वंशावळ तर आम्ही कधीचीच विसरून गेल्तो.

सौजन्यः 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठेवलेल्या बाईला "अंगवस्त्र" का म्हणत असावेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तत्पूर्वी, मनुष्य देहाचा संबंध न आणता वस्त्र आणि अंगवस्त्र हे दोन्ही कोणती वस्त्रे आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अंदाजः

पत्नी म्हणजे "अर्धांग". इच्छा असो-नसो अर्धंच अंग टाकायची सुविधा नाही.

याउलट अंगवस्त्र म्हणजे कंटाळा आला, मालिन्य आलं किंवा दुसरं बरं मिळालं तर कधीही बदलून टाकता येतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ऋषिकेशच्या दहा प्रमुख शंका कोणत्या असाव्यात?

तो इतक्या शंका मांडतो नि इतक्या शंकेखोरपणे मांडतो कि विचारता सोय नाही. शिवाय अलिकडे मोदी सरकार आल्यापासून त्याच्या शंकांना उत आला आहे. सरकार नि राजकारणाचे जाऊ द्या, तो अगदी कोणाला म्हणजे कोणालाच शंकापरीक्षेपासून सोडत नाही. तर अलिकडे त्याला पडलेल्या सर्वात मोठ्या दहा शंका कोणत्या असाव्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रतिसादात वापरलेलं विशेषनाम चुकलं आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मुळ्ळीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ठ्ठो ROFL

तंतोतंत ROFL

खरेतर ऋषिकेशऐवजी अरुणजोशी या नावानेच जास्त शोभेल तो प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मंजे -
१. नृपेंद्र मिश्रांना अध्यादेश काढून सचिव बनवले तेव्हा अजून १०० अध्यादेश पोतडीतून येणार का?
२. धर्मेद्र प्रधान "मला" माहित नाहीत तर ऑयल नि गॅस क्षेत्र सांभाळायची क्षमता त्यांच्यात असेल काय?
३. जर्मन आज्जी माझा मोबाईल पळवून नेईल का?
४. ऑर्गॅनिक फूड बनवता येते का (वर लेखकाने येते म्हटले असताना देखिल)?

असले विचार मी करत नाही.

मी प्रश्न मांडतो, कोणत्याही अधिकृत भूमिकेवर शंका घेत नाही. अधिकृत भूमिका मान्य करून मी पुढचे म्हणणे मांडतो.

आणि बाकी जाऊ दे, तो सुप्रसिद्ध कॉसेंट्रेशन कँप विसरलास का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>मी प्रश्न मांडतो, कोणत्याही अधिकृत भूमिकेवर शंका घेत नाही.

(अधिकृत भूमिकेवर) शंका घेणे न घेणे हे कोणाचे सरकार आहे यावर अवलंबून नसतेच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(किमान माझ्या बाबतीत) नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एखाद्या व्यक्ती/आयडीच्या विचारपद्धतीबद्दल जाहीररित्या प्रश्न विचारायचं कारण काय आहे? (व्यक्तिगत, morbid curiosity पलिकडे काही खास कारण असेल तर रस आहे. नाहीतर जाऊ द्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटतं की ऋषिकेश हा एक केवळ आयडी आहे. तो स्त्री, पुरुष, मशिन कि अजून काय आहे मला माहित नाही. अरुणजोशी या आयडीचे देखिल असेच असू शकते. जोपर्यंत योग्य त्या न्यायिक अ‍ॅफिडेविटवर कोणी माहिती जाहीर करत नाही तोपर्यंत तिला काही अर्थ नसतो.

आणि धाग्यांचे वा प्रतिसादांचे अनेक प्रकार असू शकतात. मागे एका आयडीने (बतुकेच आपणच) अरुणजोशी या आयडीच्या क्षमतांच्या सन्मानार्थ एक फ्लेक्स वाला धागा काढला होता. त्याला बाकी सदस्य morbid reformist intellectual arrogance-cum-sarcasm म्हणाले का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खाससं कारण - मौजमजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर्षभराच्या आतच ऐसी अक्षरेचे सदस्यत्व संकेतस्थलीय कम्यूनिकेशनच्या बाहेरही एकटेपणा घालवायला फार उपयुक्त ठरले आहे. एका वा अनेक प्रकारे समरुचीय (भिन्नविचारी का असेनात)अशा सदस्यांशी स्थळाबाहेरही चांगल्या कम्यूनिकेशला प्रारंभ झाला आहे. सर्कल मधल्या प्रत्येकाने नोकर्‍या, राहायच्या जागा, इ इ बदलल्याने डोक्यातले विचार मांडायचे कुठे ही भ्रांत मिटली आहे असे म्हणता येईल. या स्थळाच्या सदस्यांच्या जागी (मुख्यत्वे, महाराष्ट्र, अमेरिका) राहत नसताना देखिल (म्हणूनच ही गरज प्रकर्षाने भासली असावी का?) बर्‍याच इंटरअ‍ॅक्शन्स झाल्या ज्या मैत्रिपूर्ण नि इन्फॉर्मल म्हणता याव्यात.

यावरून, जनरली ४० वर्षे वयानंतर, जो मी लवकरच होईन, प्रत्यक्ष आयुष्यात नवी अनौपचारिक मैत्री होणे थोडे दुष्कर असते का? शिवाय क्ष व य दोन लोकांची मैत्री व्हायला, अशा वेळी, त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांचे थोडे थोडे तरी जुळणे गरजेचे आहे का? म्हणजे हम तीन और वो तीन असतील तर ३*३ =९ मैत्र्या गरजेच्या आहेत का? आम्ही गुरगावला असू तेव्हा तरी २*२ =४ मैत्र्या दोन कुटुंबांच्या सदस्यांत असत. जेव्हा एखादे काँबो मैत्री नसे, तेव्हा त्या नात्याची खेचायला इतरांना फार मजा येई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर्षभराच्या आतच ऐसी अक्षरेचे सदस्यत्व संकेतस्थलीय कम्यूनिकेशनच्या बाहेरही एकटेपणा घालवायला फार उपयुक्त ठरले आहे.

+१००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुण्यात पाऊस कधी पडणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेट मंतय आज किंवा पुडल्या सोमवारला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बुग्गु बुग्गु बुग्गु बुग्गु!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉफ्टवेअरात(याला कुणीतरी मराठी शब्द सुचवा ब्वॉ) चुका होतात त्या काढताना

"डिबुग्गु डिबुग्गु डिबुग्गु डिबुग्गु" असे वाजवता आले, तर बहार यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांना मंत्रवस्तू आणि तंत्रवस्तू असे पर्याय ऐकले होते. ते वापरात आले नाहीत नि रुळले नाहीत, त्यामुळे ते ऐकायला विचित्र वाटतात. पण मला तंत्र - आणि - मंत्र यामागचा तर्क लईच आवडला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शब्द आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सॉफ्टवेअर = प्रणाली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

@मेघना: मंत-तंत्राची कल्पना मस्त रोचक आहे. पण प्रचलित अर्थामुळे न रुळणे क्रमप्राप्त होतेच.

@ऋ: चालू शकेल, पण..समहौ तितका फील यीना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेटची भाकिते एकदम अचूक असतात. गेल्या दोन वर्षांपासून हे निरीक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्रात (खासकरून कोकणात) चाकवत, आंबट चुका, राजगिरा आणि लालमाठ या पालेभाज्यांच्या पेरणीचा सीजन कोणता आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> महाराष्ट्रात (खासकरून कोकणात) चाकवत, आंबट चुका, राजगिरा आणि लालमाठ या पालेभाज्यांच्या पेरणीचा सीजन कोणता आहे? <<

ह्या पालेभाज्या बाजारात वर्षभर दिसतात. पाणी मिळालं की पालेभाजीला ते पुरेसं असावं आणि भाजीचं रोपटं खाण्यायोग्य तयार व्हायला फार कमी वेळ लागत असावा असा माझा अंदाज आहे. त्यामुळे वेगळा सीझन नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाजारात दिसतात हे खरंय, पण नेमके कुठून येतात हा प्रश्न देखील आजकाल महत्त्वाचा आहे. आमच्याकडे कोबी-कॅप्सिकम-टोमॅटो-पालक बारा महिने बाजारात दिसतात, पण इथे ३-४ महिनेच उगवतात. बंगलोर कडून, किंवा उत्तरेकडच्या डोंगराळ प्रदेशाकडून "रबी" हंगामाच्या अधिकाधिक भाज्या आजकाल इथल्या बाजारात आता वर्षभर मिळतात - आणि त्यांच्यावर प्रवासात नेमके काय संस्कार केले जातात देव जाणे.

येथील पालेभाज्यादेखील वर्षभर उगवत नाहीत - बहुतेक देशी प्रकार पावसाळ्यातले (कोलमी शाक, लाल शाक - आपल्या राजगिर्‍यासारखी, पुईं शाक - मायाळू चा प्रकार), किंवा थंडीतले आहेत (पालक, दोपाटी पालक, माठ, वगैरे).

मला कोणीतरी चाकवत, राजगिरा आणि चुक्याच्या बिया दिल्या. - या पावसाळ्यात लावून बघावे का विचार करत होते.

(जाता जाता - बागकामात रस असलेल्या ऐसीकर आहेत का? "सध्या बागेत काय लावलंय" या मोसमी धाग्याला वाव असेल का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लीज, काढाच धागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

(जाता जाता - बागकामात रस असलेल्या ऐसीकर आहेत का? "सध्या बागेत काय लावलंय" या मोसमी धाग्याला वाव असेल का?)

वाव असावा, निदान धाग्यामुळे वाव मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बागकामाचा असल्याने चांगला वाव दीड वाव मिळेल असं वाटतं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होणारे अपत्य पोटात असताना महिला जेव्हा कसली कसली चूर्णे, नी सकाळच्या तांब्या-पितळ्यांच्या नादी लागून स्वतःच्या शरीरावर सौष्ठवपूर्ण अत्याचार करून आपला आकार २-३पटीने वाढवतात तेव्हा त्यांना हसावे, कीव करावी की रागवावे हेच समजत नाही! Sad

त्या अपत्यात २-३ किलोच्या अधिक वाढिसाठी स्वतःचं आजन्म नुकसान! वाईटही वाटतं नी रागही येतो त्या बायकांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टॉनिक वगैरे घेण्यात किंवा आवर्जून पौष्टिक्/संतुलित खाण्यात वाईट काय आहे नक्की ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी कुठे म्हटलंय त्यात वाईट आहे? नीट वाच मी काय म्हटलंय
नीट संतुलीत खाणे, आणि काहिबाही गोष्टी खाऊन उगाच शरीरे दुप्प्ट-तिपटीने वाढवणे यात फारच मोठा फरक आहे.

त्या काळात बाळाच्या वजनाव्यतिरिक्त काही किलोने वजन भरपूर आराम व उत्तम खाणे यामुळे वाढते ते कबूल आहेच. विविध सप्लिमेंट्सने शरीर बेढब होईल इतके फुगवण्याबद्दल म्हणतोय. अशा बायकांना मग या जाडपणामुळे अनेक व्याधी आयुष्यभर होतात - नी त्या जाडेपणाचेचे त्या व त्याहीपेक्षा त्यांच्या आया समर्थनही करतात व मुलींना भरीस पाडतात ते बघुन प्रचंड राग येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग समजलं नाही .
आजन्म नुकसान नक्की कशाला म्हटलय?
मला अर्थ लागला तो असा :-
"असे केल्याने स्त्रिया स्वतःचे आजन्म नुकसान करुन घेतात"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तु प्रतिसाद देईपर्यंत वर स्पष्टीकरण दिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो ना. प्रेग्नंट असताना उपवास करकरून गर्भ सुकवण्याचे सोडून वजन वाढवायची कसली ही थेरं? एक तर पोरं पैदा करायची ती एक ब्याद अन त्यात परत वजन वाढतंय ती दुसरी! खरंच काही किलोंनी जन्माचं नुकसान होतं. (म्हणजे काय होतं असं विचारणारा कोण *** प्रतिगामी रे तो?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असो.!! प्रतिसाद नीट वाचावेत इतकेच म्हणतो
२-३ पट शरीरे वाधवणे योग्य आहे असे वाटाते?!@!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसाद योग्य वेळी अपडेट करावेत इतकेच म्हणतो. स्पष्टीकरण अगोदर लिहायला काय हरकत होती? शेवटी जसा प्रतिसाद तसेच उपप्रतिसाद येणार. इतका ब्याकलॅश आल्यावरच अपडेटवण्याची बुद्धी व्हावी हे रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणता प्रतिसाद तथाकथित ब्याकलॅश नंतर अपडेट झाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आयमाय स्वारी. पाहण्यात गफलत झाली. प्रथम प्रतिसादाला अनुसरून बोललो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋ शी सहमत.

संतुलित आणि प्रमाणात खाणे हेच योग्य. जास्त फॅटयुक्त आणि साखरयुक्त पदार्थ पोषणाच्या नावाखाली खायला घातले असता आणि हालचाल अजिबात न करता जास्तीतजास्त आराम करण्याने (प्रेग्नन्सीत कष्ट केल्याने विशिष्ट रिस्क अपेक्षित नसतानाही) वजन भरपूर वाढून राहात असतेच. हे बर्‍याच सुखवस्तू स्त्रियांबाबत होते.

इनफॅक्ट मला या क्षेत्रातल्या डॉक्टरकडून कळलेली माहिती अशी की मूल हे पूर्णपणे पॅरासाईट असते. आईच्या शरीरातून ते आपल्याला हवे ते घटक पूर्णपणे शोषतेच. त्यामुळे आईचे पूर्ण कुपोषण झाल्यावरच बाळाचे कुपोषण होते. एरवी आई सुकेल पण बाळ आपला कोटा वसूल करतेच.

याचा अर्थ लगेच असा घेऊ नये की गर्भाचे कुपोषण होतच नाही. मुद्दा इतकाच की आहारशास्त्रीय दृष्ट्या सकस पण एम्प्टी कॅलरीज आणि फॅट्स कमी असलेला नेहमीचा आहरच चांगला. अधिकच्या अतिरिक्त पोषणाची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी सर्व ठीकच आहे पण एम्प्टी क्यालरीज हे मद्यसेवनास म्हणतात असे ऐकले होते.
बाकी, गविंचा एकदा प्रतिसाद आल्यावर प्रतिवाद करायला आजवर तरी मला स्कोप मिळालेला नाही.
+१ म्हणून मोकळा होतो झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ऋ आणि गविंशी सहमत आहेच. पण मला वाटत गरोदरपणात वाढणार्या वजनाची अतिखाणे+बाळाचे वजन याशिवाय इतर काही नैसर्गिक कारणेदेखील असतील. कोणत्या महीन्यात वजन कितीने वाढते याचा काही चार्ट असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या एका मैत्रिणीला दर दीड तासानं भूक लागत असे. नि ते खाऊनही तिचं वजन इतकं वाढलं नव्हतं. माणसागणिक बदलत असणार हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शुगर होती काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या निरीक्षणानुसार बाळाच्या लिंगावरपण अवलंबून आहे. मुलगा असेल तर बेढब होत नाहीत फारशा. म्हंजे आधी होत्या तशाच राहतात. बादवे शिन्मातल्या नट्या त्या कशाकाय येतात इनशेप लगेच? त्यांचे वजनपण १५ २० किलोने वाढते की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या एका मैत्रिणीला दर दीड तासानं भूक लागत असे. नि ते खाऊनही तिचं वजन इतकं वाढलं नव्हतं.

बिंगो! केवळा अधिकच्या आहाराने वजन असं दुपटी-तिपटीनं वाढत नाही.शरीरप्रकृती असतेच पण त्यामुळे गर्भारशीचे जाडपण येतं हे बघितलं आहे. अन् ते कायमस्वररूपी नसतं, केवळ जास्त खाण्याने व चलनवलनाचा अभाव यामुळे ते येतं. पुन्हा व्यायाम सुरू झाला व आहार मंदावला की हे कमी होतं.

जरा सकाळादी वृत्तपत्र वाचलीत तर माझ्या रागाचे कारण समजावे. एक डॉक्टर नसलेले बाबा (इतर काही वृत्तपत्रात इतरांची दुकाने चालु आहेत), विविध तयार चुर्णे आदी गोष्टी गर्भाच्या प्रकृतीला अतिशय आवश्यक सांगत त्याची जाहिरात करतात. इतकंच नाही तर असा गर्भ वाढवणे ही आपली संस्कृती वगैरेची लेबले लावतात. म्हणे गर्भावर संस्कार करतोय! त्यात ती आयुर्वेदिक वैग्रे असल्याने 'साईडैफेक्टस' नाहित असा दावा असतो. "झालाच तर फायदाच होईल की नै? शिवाय दूध वाढतं!" वगैरे वरचा फुकट हितोपदेश असतोच.

या गोष्टींनी गर्भ गुटगुटीत होत असेलही किंवा नसेलही - मात्र त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून बाईच्या शरीराचे काय?
"त्यात काय एवढे? बाळंतपण म्हटले की "थोडे इकडे तिकडे व्हायचेच!"" -इति आकाशवाणी..
प्रत्यक्षात त्या (कायमचे गर्भार दिसु लागलेल्या) बाईकडे बघुन याला "थोडे" कसे म्हणावे हे समजत नाही Sad

माझ्या परिचयात असे एक उदा पूर्वी होते तेव्हा मीही ज्येष्ठ बायकांच्या बोलण्यावरून हे बाळंतपणानंतर होतेच अशी समजुत करून घेतली होती. मात्र आता हे सर्रास दिसू लागले आहे.

आजच हाफिसात एक कलिगला वेगळ्या रुंदीची खुर्ची लागावी इतकी वाढता वाढे होऊन आलीये (प्री-बाळंतपण अर्धीखूर्चीही खूप झाली असती). त्यात तिच्या गायनॅकने स्पष्ट सांगितलं होतं की वजन वाढवायची गरज नाही गर्भ उत्तम वाढतो आहे. तरी हिच्या आई व सासु दोघींनी प्रचंड फोर्स करून "त्या पुस्तकातील" ''कोर्स'' पूर्ण करायला लावला. तीने सुरवातीला नकार दिल्यावर "काय बै हल्लीच्या मुली. नुसती चवळीची शेंग रहायला हवं. मग दोन पौंडाचं पोरही खपवून घेतील. आम्ही बघा कसं...."

हे सगळं ऐकून कितीही सम्यक रहायचं म्हटलं तरी तोल सुटतोच! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्यात तिच्या गायनॅकने स्पष्ट सांगितलं होतं की वजन वाढवायची गरज नाही गर्भ उत्तम वाढतो आहे. तरी हिच्या आई व सासु दोघींनी प्रचंड फोर्स करून "त्या पुस्तकातील" ''कोर्स'' पूर्ण करायला लावला. तीने सुरवातीला नकार दिल्यावर "काय बै हल्लीच्या मुली. नुसती चवळीची शेंग रहायला हवं. मग दोन पौंडाचं पोरही खपवून घेतील. आम्ही बघा कसं...."

ही बोले तो ती आपल्या मुलांनातवंडावर 'माया' करणारी पिढी, की त्या ('मायावी') पिढीचा ह्यांगोवर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्रजन्ति ते मूढधियः पराभवं, भन्ति मायाविषु ये न मायिनः|
-भौतेक भारवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कृपया उलटटपाली संस्कृत-इण्टू-मराठी डिक्षनरी पाठवून देता का प्लीज?

(किंवा, त्यापेक्षा, अर्थच का नाही सांगून टाकत सरळ?)

- (असंस्कृत) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मायावी लोकांप्रती मायावीपणे न वागणारे मूर्ख लोक पराभव पावतात" असा अर्थ आहे. कोटी पाहून त्याची आठवण जाहली इतकेच.

*वरती श्लोकात 'भन्ति' हे चुकीचे रूप टङ्कले आहे, त्याजागी 'भवन्ति' असे पाहिजे.

(नाव सोडल्यास भारवीचा भ देखील ठौक नसणारा) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !